Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    May 18, 2026

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026

    मुंबईची भेळपुरी अन् कोलकात्याची झालमुरी!

    May 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, May 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मुंबईची भेळपुरी अन् कोलकात्याची झालमुरी!
    फूड काॅर्नर

    मुंबईची भेळपुरी अन् कोलकात्याची झालमुरी!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरMay 17, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, मुंबईची भेळपुरी, कोलकात्याची झालमुरी, भेळपुरीचा इतिहास, मुंबईचे वैशिष्ट्य भेळपुरी, पौष्टिक भेळपुरी, इन्स्टन्ट भेळपुरी, भेळपुरी झालमुरी फरक, भेळ हेल्दी स्नॅक,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोलकात्यामध्ये एका झालमुरीच्या दुकानाजवळ आपला ताफा थांबवून तेथील स्थानिक दुकानातील भेळीचा म्हणजेच तेथील झालमुरीचा आस्वाद घेतला, या बातमीने सर्वांचे लक्ष वेधले… या भेळीमध्ये वेगळेपण असं काय आहे, त्याचा शोध घ्यायला मी सुरुवात केली.

    भेळ… नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं! दिसायला अगदी साधा, खिशाला परवडणारा, चवीलाही तितकाच लाजवाब असलेला हा पदार्थ. श्रीमंतांच्या पार्ट्यांपासून ते गरिबांच्या झोपडीपर्यंत… शाळेच्या बाहेरचे आजीचे दुकान ते ऑफिसच्या कट्ट्यापर्यंत भेळीचं साम्राज्य पसरलेलं आहे. सर्व आबालवृद्धांना आवडणारा पदार्थ म्हणजे भेळ! या साध्याशा वाटणाऱ्या भेळीचा इतिहास आणि भूगोल दोन्ही तितकेच रंजक आहेत.

    मुंबईला भेळीचे ‘माहेरघर’ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भेळीचा खरा उगम आणि प्रसिद्धी मुंबईत झाली. 19व्या शतकात जेव्हा मुंबईत गिरण्यांचं जाळं पसरलं होतं, तेव्हा कामगारांसाठी झटपट आणि स्वस्त काहीतरी खाणं हवं होतं. अशा वेळी उत्तर भारतीय ‘चाट’ आणि महाराष्ट्रातील ‘मुरमुरे’ यांची सांगड घातली गेली आणि ‘मुंबईया भेळपुरी’ जन्माला आली. गिरगाव आणि जुहू चौपाट्यांवर या भेळीने आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आणि आणि तिथूनच ती जगप्रसिद्ध झाली. इथली ‘ओली भेळ’ म्हणजे चिंच-गुळाची चटणी, मिरचीचा ठसका आणि वरून पेरलेली बारीक शेव!

    हेही वाचा – वर्ध्यातील गोरस पाक म्हणजे स्वर्गीय सुख!

    विठ्ठल कोळी यांचे मुंबईतील गिरगाव चौपाटीवर ‘विठ्ठल भेळपुरी’ नावाचे जुने दुकान आहे. असे मानले जाते की, 1930-40च्या दशकात त्यांनी भेळीला एक विशिष्ट व्यावसायिक ओळख मिळवून दिली. त्यांनी मुंबईच्या सीएसटी येथील दुकानापासून भेळविक्री करायला सुरुवात केली, असेही सांगितले जाते. मुंबईचे विविध समुद्र किनाऱ्यांवर फिरायला येणाऱ्या लोकांना या भेळ नावाच्या पदार्थाने विशेष आकर्षित केले. 60-70 च्या दशकात किंबहुना त्याही आधी मुंबईत सर्व समुद्र किनाऱ्यांवर भेळेची तसेच पाणीपुरीची दुकाने उभी राहिली. सिने इंडस्ट्रीतील बड्या बड्या स्टार्स लोकांनाही भेळीचा आस्वाद घ्यायला आवडायचे.

    मुंबईत भेळ प्रसिद्ध करण्यात गुजराती समुदायाचाही वाटा आहे. चिंच-गुळाची आंबट-गोड चटणी आणि विविध प्रकारचे फरसाण यांची चव मुरमुऱ्यात मिसळून गुजराती बांधवांनी भेळीला आणखी एक ओळख मिळवून दिली.

    नाशिकची ‘झटका भेळ’

    मुंबईहून पुढे निघालं की, नाशिकमध्ये आपल्याला भेळीचं एक वेगळं आणि रांगडं रूप पाहायला मिळतं… ते म्हणजे ‘नाशिकची झटका भेळ’. नाशिककर म्हणजे तिखटाचे शौकीन! या भेळीच्या नावातच सर्व काही आलंय. हिरव्या मिरचीचा सढळ वापर करून बनवलेली याची विशेष चटणी इतकी तरतरी आणणारी असते की, ती खाल्ल्यावर जिभेला अक्षरशः ‘झटका’ बसतो. याशिवाय, तिथला भेळभत्ताही प्रसिद्ध आहे. कुरमुरे, फरसाण आणि इतर सामग्री त्यात असते. आपण त्यात फक्त, कांदा, टोमॅटो, उकडलेला बटाटा (ऐच्छिक), बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वाटलेली मिरची त्यात मिक्स करावी लागते.

    भडंग, गिरमिट आणि बरंच काही…

    भेळीचा हा प्रवास इथेच संपत नाही, तर तिच्या या प्रवासात वाटेतील अनेक थांबे आहेत जिथे ती भडंग, गिरमिट, सुशीला यासारख्या अनेक नावांनी नटली आहे. लसणाचा ठसका आणि कुरकुरीत मुरमुरे असलेला ‘भडंग’ म्हणजे कोल्हापूरची शान. तर, उत्तर कर्नाटकात याच  भेळीला ‘गिरमिट’ म्हणतात. यात फोडणीचा मसाला आणि डाळ्यांच्या पिठाचा वापर असतो. पुण्यात भेळ थोडी सुकी आणि जास्तीची लसूण चटणी तसेच चिंच, पुदिन्याच्या चटणीसह खाण्याची पद्धत आहे.

    यामध्ये कोलकातामधील ‘झालमुरी’चा ठसका काही औरचं आहे. जसे आपण भारताच्या नकाशावर पूर्वेकडे सरकतो, तसं भेळीचं रूप पूर्णपणे बदलतं आणि समोर येते ती म्हणजे ‘झालमुरी’. बंगालची झालमुरी आणि महाराष्ट्राची भेळ यात एक मुख्य फरक आहे – तो म्हणजे कच्चं मोहरीचं तेल. कोलकात्याच्या झालमुरीमध्ये मोहरीचे तेल आणि एक खास ‘भाजा मोशला’ (भाजलेला मसाला) वापरला जातो. ही झालमुरी टिनच्या डब्यात जोरजोरात हलवून मसाला एकजीव करून दिली जाते. मी माझ्या बंगाली मैत्रीणीकडे ही झालमुरी कैक वेळेस खाल्ली आहे, तिला मात्र आमच्या विदर्भातील प्रसिद्ध कच्चा चिवडा आवडतो, जो भारतातील विविध प्रांतातील अनेक लोकांचा आवडता पदार्थ आहे. करायला अत्यंत सोपा आणि चविष्ट कच्चा चिवडा उन्हाळ्यात तर कैरीमुळे अजूनच चविष्ट लागतो.

    काळाच्या ओघात आता भेळ केवळ रस्त्यावरील गाडीवर मर्यादित राहिलेली नाही. आज बाजारात इन्स्टंट भेळीची पाकिटं उपलब्ध आहेत. अगदी आपल्या नागपूरची प्रसिद्ध हल्दीरामची भेळ असो किंवा ‘Top Tip – ताम्हणकर दीदी की इन्स्टंट भेळ’ असो किंवा इतर ब्रँड्स; यामुळे भेळ आता प्रवासाचा सोबती झाली आहे. या पाकिटांमुळे तुम्ही कुठेही असा या भेळीचा तुम्हाला आनंद घेता येतो. ही इन्स्टंट भेळीची पाकीट सोबत असतील तर अगदी परदेशातही, तुम्हाला हवी तेव्हा, काही मिनिटांत चटपटीत भेळ तयार करता येते.

    भेळ म्हणजे ‘ऐक्याचं’ प्रतीक

    भेळ हा पदार्थ आपल्याला बरंच काही शिकवतो. वेगवेगळ्या चवींचे घटक – गोड चिंच, तिखट मिरची, आंबट लिंबू, कुरकुरीत मुरमुरे आणि मऊ बटाटा, शेव, फरसाण – जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच ती चविष्ट लागते. भारतीय संस्कृतीही या भेळीसारखीच आहे, जिथे विविध चवींचे लोक एकत्र येऊन एक सुंदर समाज बनवतात.

    आजकाल आहारतज्ज्ञही भेळीला ‘हेल्दी स्नॅक’ मानतात, कारण त्यात भाजलेले मुरमुरे आणि ताज्या भाज्यांचा वापर करता येतो. थोडक्यात काय तर… भेळ हा केवळ एक पदार्थ नाही, तर तो एक सोहळा आहे. कागदाच्या द्रोणातली शेवटची पापडी आणि त्यावर उरलेली थोडीशी ‘सुकी भेळ’ खाण्यात जो आनंद आहे, तो जगातील कोणत्याही महागड्या डिशमध्ये नाही! इथे खाली मी विदर्भातील प्रसिद्ध कच्च्या चिवड्याची पद्धत दिलेली आहे.

    हेही वाचा – जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    बहुतांश लोकांना कच्चा चिवडा कसा करतात ते माहीत असावे. कच्चा चिवडा आणि भेळ यामध्ये खूप फरक आहे. घरी भेळ करायची असेल तर ती खाली सांगितल्याप्रमाणे करता येईल.

    साहित्य

    • कुरमुरे (मुरमुरे) – 2-3 वाट्या
    • बारीक शेव – 1 वाटी,
    • फरसाण – अर्धी वाटी
    • तळलेले शेंगदाणे – मुठभर
    • तळलेल्या डाळवा – मुठभर
    • खारी बुंदी – अर्धी वाटी
    • कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
    • टोमॅटो – 1 लहान (बारीक चिरलेला)
    • उकडलेला बटाटा – 1 (लहान तुकडे केलेला)
    • हिरवी चटणी – 1-2 चमचे
    • (हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि लिंबू घालून केलेली)
    • चिंच-गुळाची चटणी – 2-3 चमचे (गोडव्यासाठी)
    • लाल तिखट — अर्धा चमचा
    • चाट मसाला – 1 चमचा
    • लिंबाचा रस – 1 चमचा
    • कोथिंबीर – एक वाटी (बारीक चिरलेली)
    • मीठ – चवीनुसार

    कृती

    1. एका मोठ्या बाऊलमध्ये कुरमुरे घ्या. कुरमुरे थोडे मऊ वाटत असतील, तर कढईत थोडे मीठ किंवा हळद टाकून दोन मिनिटे परतून घ्या, जेणेकरून ते कुरकुरीत होतील.
    2. कुरमुऱ्यांमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि उकडलेल्या बटाट्याचे तुकडे घाला.
    3. आता यात हिरवी तिखट चटणी आणि चिंच-गुळाची गोड चटणी आवडीनुसार घाला.
    4. त्यानंतर लाल तिखट, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाका.
    5. मग यात अर्धी वाटी शेव आणि फरसाण घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.
    6. शेवटी लिंबाचा रस आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करा.
    7. वरून तळलेले शेंगदाणे, तळलेल्या डाळवा तसेच भरपूर शेव घालून लगेच खायला द्या.
    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    Recipe : पारंपरिक ‘उन्हातले कैरीचे लोणचे’

    May 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : चटपटीत लाल मिरच्यांचे लोणचे, खमंग गाजराचे लोणचे

    May 14, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : मसालेभात, पुलाव, रस्सा भाजी, कटाची आमटी बनविताना…

    May 12, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : पारंपरिक ‘उन्हातले कैरीचे लोणचे’

    By माधवी जोशी माहुलकरMay 15, 2026

    नागपूरसारख्या कडक उन्हात कैरीचे ‘उन्हातले लोणचे’ (Sun-dried Pickle) घालणे म्हणजे एक उत्तम प्रयोग असतो! या…

    Recipe : चटपटीत लाल मिरच्यांचे लोणचे, खमंग गाजराचे लोणचे

    May 14, 2026

    Kitchen Tips : मसालेभात, पुलाव, रस्सा भाजी, कटाची आमटी बनविताना…

    May 12, 2026

    90च्या दशकातील अकोल्यातील खाद्यसंस्कृती

    May 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    May 18, 2026

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026

    मुंबईची भेळपुरी अन् कोलकात्याची झालमुरी!

    May 17, 2026

    लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी

    May 17, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 17 ते 23 मे 2026

    May 17, 2026

    Dnyaneshwari : या बोला म्हणे अनंतु, मी कोण हें आहासी पुसतु

    May 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 300
    • अवांतर 186
    • आरोग्य 111
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 423
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 209
    • मैत्रीण 19
    • ललित 631
    • शैक्षणिक 80
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    May 18, 2026

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026

    मुंबईची भेळपुरी अन् कोलकात्याची झालमुरी!

    May 17, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    May 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.