Author: माधवी जोशी माहुलकर

Avatar photo

एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

रामनवमी विशेष कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम भाबड्या या भक्तांसाठी देव करी काम कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम… श्रीराम! संपूर्ण भारताचं आराध्य आणि लाडकं दैवत! रामनाम घेतले की, सगळी संकटं दूर होतात, तो सर्व परिस्थितीमध्ये आपला पाठीराखा असतो, ही सर्व भारतीयांची श्रीरामाच्या प्रती भावना आहे. तो आपल्यातीलच एक वाटत असल्यामुळे आपण त्याला ‘राम’ अशा एकेरी नावाने संबोधतो. सावळा, नीलवर्णी असा विरळा रंग असलेला, मानवजन्म घेऊनही आपले आगळेपण राखणारा राम! तो आपल्या प्रत्येकाचा हृदयस्थ आहे. वर्षानुवर्षे आपण रामायण ऐकतो, तीच कथा कितीतरी विद्वानांनी आपापल्या रसाळ वाणीत मांडली, पण आजही संपूर्ण कथा माहिती असूनही नव्याने ऐकताना रटाळ वाटत नाही, अशी अवीट गोडीची…

Read More

मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील पदार्थ खात असत. सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असताना देखील त्या आपला हा नियम मोडत नसत. त्या सेटवर नेहमी आपले जेवण स्वतःच तयार करायच्या… त्याकरिता त्या स्वतःसोबत एक स्टोव्ह, स्वयंपाकाची भांडी आणि शिधा सोबत नेत असत. तुपात किंवा तेलात तळलेले अन्न ‘पवित्र’ मानले जाते आणि त्याला बाहेरील अशुद्धतेचा विटाळ होत नाही, अशी त्यांची धार्मिक धारणा होती. पक्की रसोई लवकर खराब होत नाही, त्यामुळे शूटिंगच्या लांबच्या वेळापत्रकात ते सोयीचे पडायचे. ‘ शोले’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक प्रसिद्ध किस्सा सांगितला जातो की, रामगडच्या सेटवरही त्यांनी आपले सोवळे पाळले होते.…

Read More

हरीश राणा या 31 वर्षीय तरुणाच्या इच्छा मरणाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. गाझियाबाद येथील हरीश राणा हा त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत हुशार आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा गुणवंत मुलगा. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. अचानक एक दिवस तो राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरून कोसळला आणि त्या अपघातामुळे त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली. या एका घटनेने संपूर्ण कुटुंबाचे हसते-खेळते आयुष्यच उद्ध्वस्त झाले. गेली 13 वर्षे हा तरुण कोमामध्ये असून, मृत्यूशी झुंज देत होता. “आज ना उद्या आपला मुलगा डोळे उघडेल, तो बरा होईल…” या एकाच आशेवर हरीशच्या आई-वडिलांनी दिल्लीतील ‘एम्स’सारख्या (AIIMS) नामांकित रुग्णालयाचे उंबरठे झिजवले. मात्र, त्यांच्या नशिबात नियतीने कधीच न संपणारा…

Read More

भाग – 1 “सौमित्र, अरे रात्रीचे अकरा वाजलेत, तुझी आई परत घरात दिसत नाही रे….” नानासाहेबांच्या त्या हाकेने सौमित्र एकदम आपल्या खोलीतून बाहेर आला. पाठोपाठ मेघापण बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर थोडे त्रासिक भाव दिसले, पण त्याकडे दुर्लक्ष करून नानासाहेब आणि सौमित्र सुमतीताईंना शोधायला बाहेर पडले. इतक्या रात्री कुठे गेली असेल? कोणाला विचारणार? तसे करणे बरेही वाटत नव्हते. दोघेही आपापल्या विचारांच्या तंद्रीत चालत चालत घराजवळील गणपतीच्या मंदिराजवळ आले. तिथे त्यांना मंदिराच्या पायरीवर एकट्याच बसलेल्या सुमतीताई दिसल्या… त्यासरशी सौमित्र झपझप चालत त्यांच्याजवळ जाऊन जवळपास ओरडलाच, “आई, काय हे? का अशी त्रास देतेस? न सांगताच कशी काय निघून येऊ शकते तू आणि तेही…

Read More

डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि जानेवारीत मिळणारे एक नैसर्गिक आंबट-गोड चव असलेले बहुतांश महिला आणि लहान मुलींचे आवडते फळ म्हणजे गावरान बोरं! लहानपणी आमच्या शाळेच्या कंपाऊंडबाहेर एक आजी बोरं, आवळे, चिंचा विकायची. तिच्याकडे ही गावरान ताजी बोरं हिवाळ्यात खूप सुंदर आणि टवटवीत असायची. त्या काळात एक पैसा, दोन खडकू, तीन पैसे, पाच पैसे, दहा पैसे, वीस पैसे अशी नाणी चलनात होती, किरकोळ खरेदी सगळी या नाण्यांवरच चालायची. ती आजी पाच पैशाला पाच आवळे, पाच पैशात चार-पाच चिंचेची बुटकं आणि दहा पैशाला एक छोटंस मापटं भरून बोरं द्यायची. मधल्या सुट्टीत शाळेतल्या सगळ्या मुली आजीजवळ बोरं, आवळे, चिंचा, कवठं घ्यायला झुंबड करायच्या, ती…

Read More

सिनेमांमधून मुंबईच्या सण-उत्सवांचे दर्शन होत असते. गोविंदाच्या जल्लोषापासून बाप्पाच्या दर्शनापर्यंत सर्व उत्साहात दाखवलं जातं. विशेष म्हणजे, सिनेमांमध्ये दाखविले जाणारे सण-उत्सव हे कधी सामाजिक एकतेचे रूप म्हणून दाखवले गेले तर, कधी असामाजिक अराजकता या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दाखविले गेले. खरंतर, हे सण, उत्सव आपणच निर्माण केलेत सामूहिक एकोप्यासाठी आणि सामूहिक आनंदाकरिता ना? परंतु त्यामधील ही एकत्मतेची भावना मात्र दिवसेंदिवस बीभत्स होत चाललीय, अस वाटत. दोन हात, दोन पाय, एक डोकं अशा सारख्याचं शरीराचा मनुष्य केवळ त्याच्या वैचारीक भेदामुळे एकमेकांशी वैर घेऊन बसला आहे. अग्नी, जल, वायु, पृथ्वी, आकाश ही निसर्गातील पंचतत्व. मनुष्यरुपी चालता बोलता देह जेव्हा निष्प्राण होतो तेव्हा तो पंचतत्वात विलीन…

Read More

संजीव कुमार, शबाना आझमी, राकेश रोशन आणि सारीका यांच्या अभिनयाने नटलेला ‘देवता’ नावाचा सिनेमा आठवतोय? त्याच सिनेमातील किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या तलम आवाजातील नितांत सुंदर गाण ‘गुलमोहर गर तुम्हारा नाम होता, मौसम-ए-गुल को हँसाना भी हमारा काम होता…’ आहे न रेशमी वस्त्र ल्यायल्यासारखे गर्भरेशमी गाणे? हे गुलजार या मनस्वी संवेदनशील कवीचे पिवळ्या गुलमोहरासारखे सोनसळी शब्द आहेत आणि त्यावर आपल्या रेशमाच्या जरतारी तारांनी साज चढवला आहे, गुलजार इतक्याच हळव्या आणि नाजूक दिलाचे संगीतकार आर. डी. बर्मन यांनी. काय एकेक शब्द आहेत गुलजार यांचे! एखाद्या झाडाविषयी सुद्धा इतकं समरसून लिहावे? आणि त्यावर कोटीचा संगीताचा साज चढवावा तो आर.डी. यांनीच! तो…

Read More

मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वॉशिंग मशीन, भांडी धुवायचे मशीन यासोबत आटाचक्की किंवा जिला ‘घरघंटी’ म्हणूनही संबोधले जाते, ते मशीन घरामधे असणे अगदी अनिवार्य झाले आहे. या मशीनला ‘घरघंटी’ का म्हटले जात असावे, याबाबतीत काही माहिती नाही. ही घरघंटी किंवा आटाचक्की मी जेव्हा पुण्यात माझ्या भाच्याकडे पहिल्यांदा पाहिली, तेव्हा मला जरा नवल वाटले, पण ही वस्तू किती उपयोगी आहे, हे नंतर समजले. त्याच्याकडे तर सर्व काम या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटनेच होतात. त्याच्या घराची फरशी पण त्याची ‘गंगाबाई’ नावाची फ्लोअर क्लिनर मशीन किंवा ‘रोबोट’ म्हणू हवं तर ती झाडून पुसून स्वच्छ करते. ही गंगाबाई आकाराने लहान आणि गोल असल्याने प्रत्येक रूममध्ये गरागरा…

Read More

सध्या चर्चा आहे ती, रणबीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त अभिनीत ‘धुरंधर’ चित्रपटाची! अगदी कंदहार विमान अपहरण ते मुंबईवरील 26/11चा दहशतवादी हल्ला या सर्वांचा पाकिस्तानशी असलेला संबंध दाखवला आहे. या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे, पूर्वीच्या एव्हरग्रीन गाण्यांची आठवण हा चित्रपट करून देतो. ‘ना तो कारवाँ की तलाश हैं…’ या ओळीचा अतिशय चपखलपणे वापर केला आहे. वास्तवात जवळपास 65 वर्षांपूर्वी झळकलेल्या भारत भूषण आणि मधुबाला अभिनीत ‘बरसात की रात’ (1960) या चित्रपटातील ही कव्वाली आहे. ही कव्वाली तुफान गाजली… तिची जादू आजही कायम आहे. संगीतकार रोशन यांनी या चित्रपटातील कव्वाली संगीतबद्ध केल्या होत्या. त्यानंतर आलेल्या ‘दिल ही तो हैं’…

Read More

माझी आजी फार सोवळ्याची नव्हती, परंतु तिचे घरात काही नियम होते. ते नियम तिला कोणी मोडलेले आवडत नसे. जसे उन्हाळ्यात आई आणि आजी जेव्हा घरात उडदा-मुगाचे पापड करायच्या तेव्हा त्या पापडाच्या पीठाचा एक गोळा गोमुत्र टाकुन वेगळा भिजवायचा म्हणजे ते पापड सणावारांना देवाच्या नैवेद्याकरता वापरायचे… दिवाळीत सगळे चिडीचूप झाल्यावर अनारसे शांततेत करायचे म्हणजे येणाऱ्या-जाणाऱ्यांचा, कोणाचा पायरव होऊन ते तळताना हसत नाहीत वगैरे असे तिचे त्या काळानुसार नियम होते. आमचे कुटुंब शाकाहारी असल्यामुळे नॅान-व्हेज आणि अंडे खाणाऱ्या माझ्या वडिलांच्या मित्रांशी ती थोडी फटकून वागे. त्या काळात शाकाहारी कुटुंबातील व्यक्तीने नॅान-व्हेज खाणे म्हणजे त्या घरात क्रांती घडवून आणण्यासारखे होते. चिकन, मटण खाणे…

Read More