Author: दीपक तांबोळी

Avatar photo

निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

भाग – 1 “कुलकर्णी, अहो कुलकर्णी…” चव्हाणांनी गेटवर उभं राहून हाक मारली, तसं कुलकर्णींनी दार उघडलं. “या या चव्हाण काका. कसं काय येणं केलंत?” “अहो, तुमच्या ओळखीचा कुणी घरगुती मेसवाला आहे, जो घरी डबा पाठवू शकेल?” “माझ्या परीचयाचा तर कुणी नाही, पण मंजूला माहीत असेल. ती आता आंघोळीला गेलीये. तुम्ही या ना… आत बसा. येण्यातच आहे ती…” चव्हाण आत जाऊन बसले. कुलकर्णी आणि त्यांचा पंधरा वर्षांचा शेजार. पण आज ते पहिल्यांदाच त्यांच्या घरात बसले होते. त्यांनी घरभर नजर टाकली. त्यांच्या दोन मजली बंगल्याच्या मानाने खूप लहान घर असलं तरी चांगलं स्वच्छ आणि नीटनेटकं दिसत होतं. “का तुमचा डबेवाला आज येणार…

Read More

उत्तरार्ध पांडुरंग माळी सरांच्या सांगण्यावरून चेतन शेलार प्रसिद्ध लेखक सुधाकरराव शिर्के यांच्याकडे आला होता. त्याने लिहिलेल्या कथांसाठी त्याला सुधाकररावांकडून प्रस्तावना हवी होती. पण सुधाकरराव नवोदितांच्या प्रस्ताव देत नसत. पण माळी सरांकडून चेतन आल्याने त्यांनी त्याच्या कथा ठेवून घेतल्या. पांडुरंग माळी त्यांचे बालपणीचे जिवलग मित्र. आठवडा उलटून गेला तरी सुधाकररावांनी चेतनच्या कथांकडे ढुंकूनही पाहिलं नाही. नवख्या लेखकाच्या कथा कचऱ्यात टाकायच्या लायकीच्याच असतात, असं त्यांना वाटत होतं. आठव्या दिवशी आलिशान गाडीतून छाबरीया इंडस्ट्रीजची चेअरमन आरती छाबरीया आली आणि तिने आपल्या नव्या कवितासंग्रहासाठी सुधाकरराव यांना प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली आणि 25 हजार रुपयांचा चेक त्यांनी मानधन म्हणून दिला. आपल्या मॅरेज ॲनिव्हर्सरीला ते पुस्तक…

Read More

पूर्वार्ध “सर नमस्कार. मी चेतन शेलार, माळी सरांनी मला तुमच्याकडे पाठवलंय,” दारात उभा असलेला तरुण म्हणाला. “ये ये बैस…” सुधाकरराव शिर्केनी त्याला आत बोलावलं. चेतन आत येऊन अवघडून बसला. सुधाकररावांनी त्याचं निरीक्षण केलं. साधारण 24-25 वर्षांचा तरुण दिसत होता. प्रथमदर्शनी चेतनबद्दल त्यांचं मत काही फारसं चांगलं झालं नाही. “हं बोल, कशाकरिता येणं केलसं?” खरं तर तो कशासाठी आलाय हे त्यांना चांगलंच माहीत होतं. माळी सरांनी त्यांना चेतनबद्दल सर्व कल्पना देऊन ठेवली होती. “सर, मी काही कथा लिहिल्या आहेत, त्यांचा कथासंग्रह करायचा विचार आहे. आपली प्रस्तावना हवी होती मला त्यासाठी…” “अगोदरचं काही साहित्य प्रकाशित झालंय?” “नाही सर. हा पहिलाच कथासंग्रह आहे.”…

Read More

भल्या पहाटे मार्केटमध्ये जाऊन लिलावात घेतलेली भाजी कमलाने टोपलीत टाकली आणि जड टोपली डोक्यावर घेऊन ती भाजी विकायला निघाली. काल म्हणावा तसा धंदा झाला नव्हता. “आज तरी चांगली कमाई व्हायला पाहिजे,” असे मनाशीच बडबडत ती “भाजी घ्या होsss मेथी, पालक, भोपळा, भेंडी, मिरची, कोथिंबीर…” असं ओरडत गल्ल्यागल्ल्यांतून फिरू लागली. पाय चालत होते, पण तिचं मन मात्र थाऱ्यावर नव्हतं. मनात सतत येणारे विचार ती थांबवू शकत नव्हती… नुकतीच बाळंतीण झालेली तिची मुलगी घरी आली होती. दुसरी मुलगीच झाली म्हणून तिच्या नवऱ्याने आणि सासूने तिला घरी आणून टाकलं होतं. जावयाची तिनं खूप मनधरणी केली होती. त्याच्या पाया पडली… जावई थोडा नरमला. पण…

Read More

“अण्णा आज लवकर फिरून आलात? आणि हे काय तुमची तर आंघोळही झालेली दिसतेय?” मनोजने उठल्यावर वडिलांना विचारलं. “अरे, आज गुढीपाडवा ना! म्हणून आजचा मॉर्निंग वॉक थोडा लवकर आटोपला. येताना कडूनिंबाचा पाला आणि फुलंही तोडून आणली आहेत बघ पुजेला. आज मीच पूजा करणार आहे. सुनबाई उठली का?” “नाही अजून. आज सुटी आहे ना शाळेला, म्हणून थोडं उशिरा उठेल.” “बरं, झोपू दे.” अण्णा पुजेला गेले. एरवी ते पाटावर बसणं जमत नाही म्हणून पूजा करायचे नाहीत, आज मात्र का कुणास ठाऊक त्यांना ती अडचण वाटत नव्हती. मनोज बेडरूममध्ये गेला. विद्या आणि मुलं गाढ झोपली होती. सात वाजले होते. सणासुदीला लवकर उठावं, असं अण्णांचं…

Read More

वडील वारले त्यावेळी सचिन फक्त पंधरा वर्षांचा होता. पाठोपाठ आईसुद्धा देवाघरी गेली. 13 वर्षांच्या रंजनाची आणि 11 वर्षांच्या अनिताची जबाबदारी येऊन पडली.  नोकरी करता-करता त्याने आपलं शिक्षणही सुरू ठेवलं होतं. फॅक्टरीत मूळ मालक गेल्यानंतर त्याच्या मुलांनी ताबा घेतला आणि सचिनचा पगार वेळेवर मिळणे बंद झालं. सचिनच्या वडिलांचं वडिलोपार्जित घर शहराच्या अगदी मध्यवस्तीत होतं. वडिलांनी ते एका व्यापारी मित्राला भाड्याने दिलं होतं. शब्दाला जागण्याचा तो काळ होता. त्यामुळे लेखी करार करण्याची गरज कुणालाच भासली नाही. पण मित्राच्या निधनानंतर त्याचे घरभाडे येणे बंद झालं. मग सुरू झाल्या कोर्टकचऱ्या! हायकोर्टात सचिन खटला जिंकला. सचिनने एका बिल्डरला गाठून ते घर दीड कोटीला विकले. बहिणींना कोर्टात यावं…

Read More

चपला काढून जसा सचिन घरात शिरताच, त्याच्या बायकोने, सुचिताने एक पाकीट त्याच्या हातात दिलं. “काय आहे हे?” त्याने विचारलं. “काय माहीत! रजिस्टर पोस्टाने आलंय. कुणा वकिलाचं दिसतंय…” वकील म्हटल्याबरोबर सचिनच्या पोटात खड्डा पडला. त्याने घाईघाईने पाकीट उघडून आतलं पत्र बाहेर काढलं. पत्राच्या उजव्या बाजूला वरती ॲड. सुचित्रा पाटील असं लिहिलेलं होतं. खाली त्याच्या जुन्या घराचं सविस्तर वर्णन होतं आणि त्याखालचा मजकूर असा होता – “वरील मिळकत वडिलोपार्जित असून आपण वर्ष 2003 साली बनविलेल्या मुख्त्यारपत्रानुसार या मिळकतीची परस्पर विक्री केली आहे. हिंदू कौटुंबिक कायद्यानुसार आपल्या बहिणी, अनिता आणि रंजना यांचा या मिळकतीवर समान हक्क असतानाही आपल्या बहिणींना विश्वासात न घेता किंवा…

Read More

भाग – 3 ‘प्राजक्ताची फुलं’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचा सोहळा आयोजित करून स्वप्नीलने जुईला सुखद धक्का दिला होता. त्यानंतर लगेच तिला घेऊन तो उटीजवळ मित्राच्या रिसॉर्टवर गेला. तिथे त्या मित्राकडून स्वप्नीलही एक उत्कृष्ट कवी असल्याचे जुईला समजले आणि ती चकितच झाली. त्याने स्वप्नीलच्या कवितांचे पुस्तकच तिला वाचायला दिले. रात्री एक वाजेपर्यंत जुई त्या कविता वाचत होती. वाचून झाल्यावर भरून आलेले डोळे तिने पुसले. सुधीरच्या ज्या कवितांसाठी ती वेडी झाली होती त्या कविता तिला आठवल्या. स्वप्नीलच्या उच्च दर्जाच्या कवितांपुढे त्या तिला भिकार वाटल्या. आपले वर्कशॉप चालविण्यासाठी स्वप्नील मेकॅनिकल इंजिनीअर व्हावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी स्वप्नील इंजिनीअर झाला. नंतर…

Read More

भाग – 2 7 जानेवारीची सकाळ उजाडली. आज जुईचा वाढदिवस होता. उठल्यापासून स्वप्नीलशी तिचं दोनतीनदा बोलणं झालं, पण त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यानेच काय स्वप्नीलचा भाऊ, वहिनी, त्यांची मुलं… कोणीच तिला शुभेच्छा दिल्या नाहीत. आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल त्यांना कळलं तर नाही? या विचाराने ती धास्तावली. स्वप्नील आणि त्याचा भाऊ दोघंही फॅक्टरीत निघून गेले. थोड्या वेळाने तिच्या मित्रमैत्रिणींचे फोन यायला लागले. तिला फोनवर बोलताना तिच्या जाऊने दोन-तीनदा बघितलं, पण तिने कसलीही उत्सुकता दाखवली नाही. दुपारची जेवणं होऊन गेली आणि तिच्या लक्षात आलं की, तिचे आई-वडील, बहीण, मेव्हणे यापैकी कोणीही फोन केला नव्हता. इतक्या सगळ्यांना आपल्या वाढदिवसाचा विसर पडावा, याचा तिला…

Read More

भाग – 1 “चल, येतो मी,” स्वप्नील बॅग उचलत जुईला म्हणाला. “ओके,” जुईने निरोप देण्यासाठी हात हलवला, पण अचानक काहीतरी आठवून म्हणाली, “अहो, मी काय म्हणते… आज गंधे हॉलमध्ये कवीसंमेलन आहे. जायचं का आपण संध्याकाळी?” “अं… माझं जमेल असं वाटत नाही. तू जाऊन ये ना संध्या वहिनीसोबत…” “संध्या वहिनींना कुठे इंटरेस्ट आहे अशा कार्यक्रमात… कुठे सेल लागलेला असला की, मात्र एका पायावर तयार!” स्वप्नील हसला. “बायकांना शॉपिंगशिवाय दुसरं सुचतं तरी काय? सगळ्यात प्रिय छंद असतो तो त्यांचा!” जुईने तोंड वेडंवाकडं केलं. स्वप्नीलने गाडी स्टार्ट केली आणि तो निघून गेला. जुई स्वतःशी चरफडली. मग तिने कुणी नाही आलं तरी, कवीसंमेलनाला उपस्थित…

Read More