Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: दीपक तांबोळी
निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
उत्तरार्ध घरात कुरबुरी वाढल्याने धाकटा मुलगा शिरीष आणि त्याची पत्नी नेहा वेगळे रहायला लागले. शिरीषचे भाऊ निर्मल आणि गुणवंत यांच्यासोबत अण्णा रहात होते. शेवटी ते त्यांनी बांधलेलं घर होतं. त्याचे ते मालक होते. पण नंतरच्या सहाच महिन्यांत दोन्ही मुलं आणि सुनांनी या मालकाचं जीवन आश्रितासारखं करून टाकलं. खाण्यापिण्याचे आबाळ आणि वेळेवर औषधं दिली न गेल्याने त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला. त्यांना पॅरेलिसीस झाल्यावर दोघा भावांनी त्यांना शिरीषच्या घरी आणून सोडले. अर्थात, शिरीष आणि नेहाला अगोदरच निर्मल आणि गुणवंत यांनी अण्णांच्या चालवलेल्या हेळसांडीबद्दल वाईट वाटत होतं. दोघांनीही आनंदाने अण्णांची जबाबदारी स्वीकारली. गेली सात वर्षं अण्णा पॅरेलिसीस होऊन पडले होते. पण दुर्दैवाने एक दिवस…
पूर्वार्ध शिरीष जसा घरात शिरला, तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली, “अहो, जरा अण्णांना बघता का? खूप अस्वस्थ वाटताहेत. जेवलेही नाहीत!” “हो. फ्रेश झालो की, लगेच बघतो.” बाथरूममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रूममध्ये गेला. नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते. जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं. खरंच अस्वस्थ वाटत होते. त्यांचे खोल गेलेले डोळे, निस्तेज नजर, चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं. लक्षण काही ठीक दिसत नव्हतं. “काय झालं अण्णा? काय होतंय?” स्वतःलाच धीर देत त्यानं विचारलं. अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला. त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले, पण ते शिरीषला समजले नाहीत. त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो…
“अगं आशा, परवा आपलं बोलणं झालं होतं बघ माझ्या पापडाच्या बिझनेसबद्दल… येऊ का तुझ्याकडे पापड घेऊन?” सीमाने फोनवर आशाला विचारलं. “अगं ये ना! त्यात काय विचारायचं? ये. मी घरीच आहे,” आशा म्हणाली. सीमाने मुलीला स्कूटी काढायला सांगितली. घाईघाईने तिने मुगाच्या आणि उडदाच्या पापडाचे एक एक किलोचे पाच सहा पॅक एका पिशवीत घेतले. आशाच्या भरपूर ओळखी होत्या. ती तिच्या मैत्रीणींना विचारून आपले हे सगळे पापड खरेदी करेल, अशी सीमाला खात्री होती; म्हणून पिशवीचं वजन जास्त होत असतानाही तिने अजून एक किलोचा एक पॅक पिशवीत टाकला. आशा एक नंबरची भटकभवानी होती. ती घरी सापडणं मोठं मुश्कील! आज ती घरी होती. आज आपलं…
उत्तरार्ध राजूशेठच्या कपड्यांच्या दुकानात सफाईचे काम प्रदीप करत होता. पंधरा-सोळा वर्षांचा गोरागोमटा स्मार्ट मुलगा होता तो. त्यामुळे तो जेव्हा काम मागायला आला, तेव्हा तो दुकानाच्या सफाईकामासाठी योग्य आहे, असं राजूशेठ वाटेना. तरीही, तीन दिवसांपासून सफाईसाठी माणूस नव्हता. त्यामुळे दारी आलेल्या माणसाला परत पाठवणे, त्यांना योग्य वाटत नव्हतं, म्हणून त्याला दुकानात कामाला ठेवला. सुरुवातीला त्याला काम व्यवस्थित जमत नव्हते. पण हळूहळू तो शिकला. सफाईच्या कामाबरोबर तो इतरांनाही मदत करायचा. त्याच्या या मदतीमुळे सेल्समन त्याच्यावर खूश होते. महिना झाल्यावर राजूशेठने प्रदीपच्या हातात तीन हजार ठेवले, तेव्हा प्रदीपचे डोळे भरून आल्याचं त्यांना जाणवलं. “काय रे काय झालं?” “काही नाही. पहिला पगार आहे ना…
पूर्वार्ध “दुकानात सफाई कामासाठी त्वरित मुलगा पाहिजे” ही पाटी वाचून तो दुकानात शिरायला लागला तसं सिक्युरिटी गार्डने त्याला अडवलं “काय पाहिजे?” त्याने शांतपणे बोर्डाकडे बोट दाखवलं. गार्ड समजला. आत हात दाखवून म्हणाला, “राजूशेठ समोरच बसलेत, त्यांना भेटून घे…” अस्वस्थ मनाने तो आत शिरला. समोरच काऊंटरवर राजूशेठ कस्टमरकडून पैसे घेण्यात गुंतले होते. कस्टमर गेल्यावर त्यांची नजर त्याच्यावर पडली. “बोला.” “ते… तुम्हाला सफाईकामासाठी मुलगा पाहिजे आहे ना?” “हो. तू करणार आहेस का?” त्याने मान डोलावली. राजूशेठने त्याच्याकडे निरखून पाहिलं. पंधरा-सोळा वर्षांचा गोरागोमटा स्मार्ट मुलगा. कपडे मात्र साधारण होते. दुकानाच्या सफाईकामासाठी योग्य आहे, असं त्यांना वाटेना… पण तीन दिवसांपासून सफाईसाठी माणूस नव्हता. त्यामुळे…
“दादा मी काय म्हणतोय, आम्ही मुलांच्या शाळेजवळ एक फ्लॅट बघितलाय आणि तिथे शिफ्ट व्हायचं म्हणतोय,” मंदार चाचरत म्हणाला. “काय? शिफ्ट व्हायचं म्हणजे तू हे घर सोडून जाणार?” रवी विश्वास न बसून त्याच्याकडे पाहातच राहिला. “हो दादा… अरे मुलांनाही शाळा जवळ पडेल, शिवाय मुलं आता मोठी होताहेत. चारूचंही फ्रेंड सर्कल मोठं झालंय. तुम्हाला याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय. स्वतंत्र झालं की, आम्हांलाही आमच्या जबाबदाऱ्या समजतील.” ते ऐकून रवी सुन्न झाला. त्याने रेखाला हाक मारली. “रेखा, बघ गं हा मंदार काय म्हणतोय!” रेखा बाहेर आली. “ऐकलं का रेखा, हा मंदार वेगळं व्हायचं म्हणतोय.” “काय्य? भाऊजी अहो तुमच्या मनात…
भाग – 3 लोढा शेठला सिक्युरिटी एकनाथचा मुलगा दिनूचा वाढदिवस जोरदार साजरा करायचा होता. सोसायटीत राहणाऱ्या प्रत्येकाने दोन हजार जरी जमा केले तरी, दिनूचा वाढदिवस जोरदार साजरा करता येणार होता आणि सोसायटीतला कुणी नाही म्हणेल असंही त्यांना वाटत नव्हतं; कारण सगळेच पैसेवाले होते आणि महत्त्वाचं म्हणजे दिनू होताच तसा. सदोदित उत्साहाने फसफसलेला. हाक मारली की, कुणाच्याही मदतीला धावून जाणारा. कोणतंही काम सांगा दिनूने ते केलं नाही, असं नाही. बरं या कामाचा कुणी मोबदला देईल, अशीही अपेक्षाही नाही. पण लोढा शेठच्या या प्रस्तावाला सोसायटीत फारसा कुणी दुजोरा दिला नाही. मीटिंगमध्ये 48पैकी 12 सदस्य आले होते. त्यातील सहाजणांचा विरोध होता. एक दिवस…
भाग – 2 लोढा शेठला सिक्युरिटी एकनाथचा मुलगा दिनूचा वाढदिवस जोरदार साजरा करायचा होता. सोसायटीत राहणाऱ्या प्रत्येकाने दोन हजार जरी जमा केले तरी, दिनूचा वाढदिवस जोरदार साजरा करता येणार होता आणि सोसायटीतला कुणी नाही म्हणेल असंही त्यांना वाटत नव्हतं; कारण सगळेच पैसेवाले होते आणि महत्त्वाचं म्हणजे दिनू होताच तसा. सदोदित उत्साहाने फसफसलेला. हाक मारली की, कुणाच्याही मदतीला धावून जाणारा. कोणतंही काम सांगा दिनूने ते केलं नाही, असं नाही. बरं या कामाचा कुणी मोबदला देईल, अशीही अपेक्षाही नाही. पण लोढा शेठच्या या प्रस्तावाला सोसायटीत फारसा कुणी दुजोरा दिला नाही. मीटिंगमध्ये 48पैकी 12 सदस्य आले होते. त्यातील सहाजणांचा विरोध होता. दुसऱ्या दिवशी…
भाग – 1 लोढा शेठच्या गाडीचा हॉर्न वाजला तसा एकनाथच्या ऐवजी दिनू सिक्युरिटी रुममधून बाहेर आला. त्याने लगबगीनं फाटक उघडलं. गाडी जशी गेटच्या बाहेर पडू लागली, तसा त्याने आपला बाप जसा ठोकतो तसा सॅल्यूट लोढा शेठला पाहून ठोकला. लोढा शेठच्या चेहऱ्यावर त्याला बघून एक प्रसन्न हास्य झळकलं. “पोरगा खरंच स्मार्ट आहे,” ते मनातल्या मनात म्हणाले. गाडी पुढे रस्त्याला लागली, तसा कालचा प्रसंग त्यांना आठवला. काल त्यांच्या मुलाचा पंधरावा वाढदिवस त्यांनी सोसायटीच्या क्लबहाऊसमध्ये जोरदार साजरा केला. त्यांचा मुलगा सनी दहावीच्या परीक्षेत 99% घेऊन पास झाला होता, हे खरं वाढदिवस साजरा करण्यामागचं मुख्य कारण होतं. सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड कम केअरटेकर एकनाथचा मुलगा…
“अरे बापरे! तुम्ही तर मेकॅनिकल इंजिनीअर आहात अशोक; मग तुम्ही ऑफिस असिस्टंटसाठी का अप्लाय केलात?” अग्रवाल शेठनी विचारलं. अशोक ओशाळवाणं हसला. मग म्हणाला, “काय करणार सर, दोन वर्षं झालीत बी.ई. होऊन, पण अजून नोकरी नाही. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही त्यामुळे…” “काय करतात वडील तुमचे?” “गणपती मंदिराजवळ फुलांचं दुकान आहे सर आमचं…” “ओह! पण तुम्हाला कल्पना आहे ऑफिस असिस्टंटला काय काय काम असतात ती?” “हो सर. सगळी नॉन-टेक्निकल काम असतात. पण ईलाज नाही सर… माझ्या आईवडिलांना माझ्याकडून फार अपेक्षा होत्या. मी मात्र दोन वर्षांपासून रिकामा बसून आहे. ते मला बोलत नाहीत, पण त्यांची मन:स्थिती मी समजू शकतो. या नोकरीमुळे…

