Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: दीपक तांबोळी
निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
भाग – 2 नीरजने मुंबईतल्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेतली, पण पहिल्याच वर्षी अभ्यासात त्याची पीछेहाट पाहायला मिळाली. एक दिवस अचानक नीरज घरी आला. रात्री सर्व एकत्र बसले असताना ‘मी इंजिनीअरिंग सोडण्याचा निर्णय घेतलाय,’ असा बॉम्बगोळा त्याने टाकला. तो म्हणाला, “माझ्या लक्षात आलंय की, इंजिनीअरिंग माझ्या कपॅसिटीच्या बाहेरचं आहे. म्हणून मी इंजिनीअरिंग सोडण्याचा निर्णय घेतलाय… बाबा, मला काय म्हणायचंय, ते समजून घ्या. तुम्ही जुन्या पिढीतले लोक. आज काय ट्रेंड्स सुरू आहेत? कमी शिकलेले लोकही कसा खोऱ्याने पैसा कमावताहेत, हे आमच्या नव्या नेटसॅव्ही पिढीला जास्त कळतंय. सध्या फूड इंडस्ट्रीज तुफान पैसा कमवतेय. मॅक्-डोनाल्ड, डॉमिनोज याबरोबरच स्विगी, झोमॅटो यासारख्या ॲपवरूनही माणसं प्रचंड…
भाग – 1 “मग काय ठरलं तुझं? कोणत्या फॅकल्टीला घेतोय ॲडमिशन?” घरात आल्या आल्या राजेशने नीरजला विचारलं. “अर्थातच, मेकॅनिकल!” नीरज विश्वासाने म्हणाला. “मला खूप इंटरेस्ट आहे मशिन्समध्ये. त्या कशा बनतात, कशा चालतात हे जाणून घ्यायला मला आवडेल. शिवाय, मेकॅनिकल इंजिनीअर्सना पुण्यामुंबईतल्या फॅक्टरीत खूप डिमांड आहे, असं मी ऐकलंय.” “तरी पण मला वाटतं, आपण ॲप्टिट्युड टेस्ट करून घेऊया, म्हणजे आपला निर्णय कन्फर्म होईल.” “तशी गरज तर नाही म्हणा, पण तुम्ही म्हणताय तर करून घेऊया,” नीरज म्हणाला. नीरजचा नुकताच सीईटी आणि जेईईचा रिझल्ट लागला होता. चांगले मार्क्स मिळाले होते. त्याअगोदर बारावीचा रिझल्ट लागला होता. त्यातही त्याला चांगले मार्क्स होते. नीरजला मुंबईतल्या कॉलेजमध्ये…

