Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
कारल्याच्या भाजीसाठी साहित्य कृती हेही वाचा – Recipe : व्हेज ऑयस्टर मोमोज… सोबत टोमॅटोची चटणी! कारल्याच्या चकत्यांसाठी साहित्य हेही वाचा – Recipe : असा सुरती उंधियू करून पाहिला आहे का? कृती (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकाव तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
शोभा भडके भाग – 11 “आरू… आवर की पटकन! किती येळ? शाळेचा पसारा घेऊन बसलीयस… पाव्हणे यायची येळ झाली…” आई खोलीत येत तिला म्हणाली. “हो आवरते,” असं म्हणत आरूने तिचे ड्रॉइंग बुक, कलर, पेन्सिल वगैरे सगळं, तिच्या फॅशन डिझायनिंगसाठी लागणारं सामान, ती एका बॉक्समध्ये भरून ठेवत होती. आज शिव आणि त्याची फॅमिली येणार होती आरूला पाहायला. रात्रीच रामच्या बाबांनी ते या लग्नाला तयार आहेत, असं कळवल होतं. त्याचीच तयारी बाहेर सुरू होती. अंगणात मांडव घातला होता… बसायला गाद्या टाकल्या होत्या… रामचं घर साध्या पद्धतीचं असल्यामुळे घरात जास्त पाहुणे मोकळेपणाने बसू शकले नसते म्हणून मग बाहेर अंगणात मंडप घालून त्यांच्या बसण्याची…
अध्याय आठवा पैं वेदाचें बहुवसपण । देखेचिना जयाचें आंगण । हें गगनाचें पांघरूण । होय देखा ॥190॥ ऐसें जाणूनि योगीश्वर । जयातें म्हणती परमपर । जें अनन्यगतीचें घर । गिंवसीत ये ॥191॥ जें तनूवाचाचित्तें । नाइकती दुजिये गोष्टीतें । तयां एकनिष्ठेचें पिकतें । सुक्षेत्र जें ॥192॥ हें त्रैलोक्यचि पुरुषोत्तमु । ऐसा साचु जयांचा मनोधर्मु । तयां आस्तिकांचा आश्रमु । पांडवा गा ॥193॥ जें निगर्वाचें गौरव । जें निर्गुणाची जाणीव । जें सुखाची राणिव । निराशांसी ॥194॥ जें संतोषियां वाढिलें ताट । जें अचिंतां अनाथांचें मायपोट । भक्तीसी उजू वाट । जया गांवा ॥195॥ हें एकैक सांगोनि वाया । काय फार…
दर्शन कुलकर्णी रथसप्तमी / भानुसप्तमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – सारं काही मराठीसाठी! दिनविशेष ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक म.द. हातकणंगलेकर टीम अवांतर मराठी साहित्य क्षेत्रात समीक्षेचा मानदंड म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक म. द. हातकणंगलेकर यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1927 रोजी कोल्हापूर येथील हातकणंगले या गावी झाला. वडिलांच्या अकाली निधनामुळे ते मामाकडे सांगलीत आले आणि सांगलीकर होऊन गेले. 1944 साली ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले. नंतर 1946 साली त्यांनी विलिंग्डन कॉलेजात असताना इंटर आर्ट्सच्या परीक्षेत तर्कशास्त्र या विषयासाठीचे प्रसिद्ध असे सेल्बी पारितोषिक मिळविले. नंतर 1948 मध्ये बी.ए परीक्षेत इंग्रजी विषयासाठी त्यांना मुंबई विद्यापीठाचे एलिस पारितोषिक मिळाले.…
सुधीर करंदीकर पुण्याच्या गमतीशीर पाट्या आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेतच. नुकताच मला फोनवर ‘पुणेरी उत्तरे’ याचा छान अनुभव आला, तो शेअर करतोय… पौड रोडला एक प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीचे ऑफिस आहे. मेडिकल एक्सपेन्सेस करता, या इथे मी इन्शुरन्सची पॉलिसी घेतली आहे. गेल्या आठवड्यात मला त्या ऑफिसमध्ये एक क्लेम नेऊन द्यायचा होता म्हणून आदल्या दिवशी मी दुपारी त्या ऑफिसला फोन केला, तिकडे फोनवर मॅडम होत्या… मी : मॅडम नमस्कार, सकाळी ऑफिस किती वाजता उघडतं? तिकडून मॅडम : सकाळी नऊ वाजता. आणि फोन बंद झाला. विचार केला, उद्या ऑफिस उघडतानाच तिथे पोहोचावं, गर्दी वाढायच्या आत क्लेम द्यावा आणि ऊन वाढायच्या आत घरी पोहोचावं. हेही वाचा -…
डॉ. विवेक वैद्य मागच्याच आठवड्यातली गोष्ट. नवराबायको एक लहान 6-7 वर्षांच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले. मुलगा सिनियर केजी किंवा फर्स्ट स्टॅंडर्डमध्ये असावा. मुलगा चुणचुणीत होता. दोघे नवराबायको एकमेकांशी मराठीत बोलत होते तर, मुलाशी हिंदीत बोलत होते. मला काही समजेना!? “हा मुलगा तुमचा आहे?” “हो… आमचाच आहे!” नवरा म्हणाला. पत्नीने ‘एवढेही समजत नाही,’ असा रागीट कटाक्ष टाकला. “तुमच्यासोबत राहतो? की मामाकडे?” नंदुरबारहुन मध्य प्रदेश जवळ आहे. सेंधवा… पानसेमल… तिथे मामा राहत असेल तर, तो हिंदी बोलत असेल. “नाही. आमच्यासोबतच राहतो. का विचारताय असे?” “तुम्ही मराठी भाषिक असून त्याच्याशी हिंदीत बोलताय म्हणून विचारतोय…” “ते होय. तो इंग्लिश मीडियमच्या शाळेत जातो म्हणून!” हेही…
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये मसाला वांगी, फ्लॉवरची भाजी, पातळ पालेभाजी करताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : बटाटा वेफर्स, ब्रेडरोल अन् दहिवडे करताना या टिप्स वापरा हेही वाचा – Kitchen Tips : सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे… तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
डॉ. किशोर महाबळ माहिती संकलन हा ज्ञानप्राप्तीमधील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कोणत्याही विषयाचे अध्ययन उत्तम होण्यासाठी त्या विषयाबद्दल माहिती मिळविणे अतिशय गरजेचे असते. याच माहितीचे नंतर वर्गीकरण, विश्लेषण करून निष्कर्ष काढले जातात. याच असंख्य निष्कर्षांमधून त्या विषयाचा विकास होत जातो. माहिती जेवढी अचूक तेवढी ती उपयुक्त ठरते. म्हणून, अचूक माहिती गोळा करणे अत्यावश्यक ठरते. माहिती कशी गोळा करायची, ती कशी नोंदवायची, याचे शास्त्र विकसित झाले आहे. माहिती संकलन शास्त्राचे काही प्राथमिक धडे शालेय स्तरावरच सर्व विद्यार्थ्यांना देता येऊ शकतात. कोणत्याही विषयाची अचूक माहिती ही त्या विषयाचे विविध भाग-उपविभाग समजून घेण्यास उपयुक्त ठरते. माहिती जितकी जास्त मिळेल आणि अचूकतेने नोंदविली…
अध्याय आठवा जैसें आटलिया रूपें । आटलेपण ते खोटी म्हणिपे । पुढती तो घनाकारु हारपे । जे वेळीं अळंकार होती ॥173॥ इयें दोन्ही जैसीं होणीं । एकीं साक्षीभूत सुवर्णी । तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी । वस्तूंचां ठायी ॥174॥ तें तरी व्यक्त ना अव्यक्त । नित्य ना नाशवंत । या दोहीं भावाअतीत । अनादिसिद्ध ॥175॥ जें हें विश्वचि होऊनि असे । परि विश्वपण नासिलेनि न नासे । अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ॥176॥ पाहें पां तरंग होत जात । परि तेथ उदक तें अखंड असत । तेवीं भूतभावीं नाशिवंत । अविनाश जें ॥177॥ नातरी आटतियें अळंकारी । नाटतें कनक असे…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तणावपूर्ण असेल. मात्र संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्याची योजना आखाल. कोणाच्याही सल्ल्याने फसून महत्त्वाची कामे पुढे ढकलू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. योग्य कामांवर तुमची ऊर्जा केंद्रित करा, ती वेळेवर पूर्ण होतील याची खात्री करा. प्रलंबित आर्थिक बाबी पूर्ण होण्याची शक्यता आहे. वृषभ – नवीन वाहन खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. व्यवसायातही चांगला नफा मिळेल. जुने कौटुंबिक वाद मिटतील असे दिसते. मुलांना दिलेले वचन पूर्ण करावे लागेल. वडिलांना बाहेर सहलीला घेऊन जाऊ शकता. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित खटला तुम्ही जिंकण्याची शक्यता आहे. मिथुन -…

