Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    April 22, 2026

    Dnyaneshwari : एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती

    April 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 एप्रिल 2026

    April 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 एप्रिल 2026

    Team AvaantarBy Team AvaantarApril 22, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 22 एप्रिल 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 02 वैशाख शके 1948; तिथि : षष्ठी 22:49; नक्षत्र : आर्द्रा 22:13;
    • योग : अतिगंड 09:08, सुकर्मा 30:07; करण : कौलव 12:01;
    • सूर्य : मेष; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:18; सूर्यास्त : 18:57;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    प्रख्यात अमेरिकन व्हायोलिनवादक येहूदी मेन्युइन

    टीम अवांतर

    प्रख्यात अमेरिकन व्हायोलिनवादक आणि वाद्यवृंदसंचालक येहूदी मेन्युइन यांचा जन्म 22 एप्रिल 1916 रोजी न्यूयॉर्क येथे एका ज्यू कुटुंबात झाला. येहूदींची आई पियानोवादक होती. त्यांच्याकडून येहूदींना संगीताचे बाळकडू मिळाले. येहूदी यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून व्हायोलिन शिकण्यास सुरुवात केली. वयाच्या सातव्या वर्षी ‘सॅन फ्रॅन्सिस्को ऑर्केस्ट्रा’ समवेत त्यांनी व्हायोलिनवादनाचा पहिला जाहीर कार्यक्रम केला आणि जाणकार रसिकांची प्रशंसा मिळवली. तसेच अकराव्या वर्षी लूट्व्हिख व्हान बेथोव्हनच्या काँचेर्टोचे वादन करून अप्रतिम तंत्रकौशल्य आणि  सूक्ष्म संवेदनशीलता या गुणांच्या बळावर त्यांनी संगीतजगताला अचंबित केले.

    येहूदी यांनी पॅरिसमध्ये रोमानियन संगीतकार आणि व्हायोलिनवादक झॉर्झ एनेस्को यांच्याकडे संगीताचे पुढील शिक्षण घेतले. त्यांच्या वादनशैलीचा येहूदी यांच्यावर खूप प्रभाव पडला. आपल्या संगीत कार्यक्रमांतून दुर्मीळ आणि नवनव्या रचना सादर करण्यावर त्यांनी कटाक्ष ठेवला. हंगेरियन संगीतकार, पियानोवादक आणि मानववंशशास्त्रज्ञ बेलॉ बॉर्‌टोकच्या सोनाटा फॉर सोलो व्हायोलिन या रचनेचा या संदर्भात उल्लेख करता येईल.

    हेही वाचा – घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    पंडित नेहरूंच्या आमंत्रणानुसार येहूदी यांनी भारताचा दौरा केला. योगविद्या आणि भारतीय संगीत यांना पाश्चात्त्य जगतात दमदार प्रतिष्ठा मिळवून देण्याची त्यांची कामगिरी लक्षणीय आहे. 1966 मध्ये बाथ येथे तर, 1967 मध्ये न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या सभागृहात प्रख्यात सतारवादक रविशंकर यांच्याबरोबर त्यांनी जुगलबंदीचे कार्यक्रम केले. त्यात त्यांनी शास्त्रोक्त भारतीय संगीतरचना सादर केल्या.

    इंग्लंडमधील ब्रिटीश ट्रान्सनॅशनल समूहांनी स्थापन केलेल्या इलेक्ट्रिक अँड म्युझिकल इंडस्ट्रीज (इएमआय) या संस्थेबरोबरचा त्यांचा ध्वनीमुद्रणाचा करार सुमारे 70 वर्षे टिकला, जो संगीत उद्योगाच्या इतिहासातील सर्वांत प्रदीर्घ काळ राहिलेला करार म्हणून ओळखला जातो.

    येहूदी यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी गौरविण्यात आले. सिटी ऑफ फ्रीडम पुरस्कार; पंडित जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सन्मान पुरस्कार; 20 विद्यापीठांद्वारे मानद डॉक्टरेट; केनेडी सेंटर ऑनर्स; ग्लेन गोल्ड पुरस्कार; इस्रायलमधील वुल्फ फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा ‘वुल्फ पुरस्कार’; युनेस्कोचे सद्भावना राजदूत; जर्मनीच्या “फेडरल रिपब्लिक ऑफ ऑर्डर ऑफ मेरिटचा” ग्रँड क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान करण्यात आला.

    येहूदी यांनी बरीचशी ग्रंथरचनाही केली आहे. त्यात थीम अँड व्हेरिएशन्स हा लेखसंग्रह; व्हायोलिन : सिक्स लेसन्स; डब्ल्यू. प्रिम्‌रोझ आणि डी. स्टीव्हन्ससमवेत व्हायोलिन अँड व्हायोला ही वादन तंत्रविषयक पुस्तके तसेच कर्टिस डब्ल्यू. डेव्हिससमवेत द म्युझिक ऑफ मॅन यांचा उल्लेख करता येईल. त्यांचे अन्‌फिनिश्ड जर्नी हे आत्मचरित्र देखील वाचकप्रिय ठरले. 12 मार्च 1999 रोजी त्यांचे जर्मनीत निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – करिअरमध्ये असे नवीन प्रकल्प किंवा जबाबदाऱ्या मिळतील जिथे तुमचे नेतृत्व कौशल्य चमकेल. आर्थिक परिस्थिती मजबूत असेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवा. विवाहितांना जोडीदाराकडून भक्कम आधार मिळेल. आज आरोग्य सामान्य असेल, मात्र उन्हामुळे थकवा जाणवू शकतो.

    वृषभ – भूतकाळातील मेहनतीचे फळ आज मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. नोकरी किंवा व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे, मात्र घाई करू नका. कौटुंबिक सुख टिकून राहील आणि संबंध अधिक दृढ होतील.

    मिथुन – आज संवाद आणि बुद्धी यांच्याशी निगडित कार्यांमध्ये यश मिळेल. प्रवास किंवा छोटे बदल फायदेशीर ठरू शकतात. करिअरमध्ये टीमवर्क उत्तम राहील. आर्थिक परिस्थिती मध्यम राहील. डोकेदुखी किंवा तणावामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, म्हणून शक्यतो विश्रांती घ्या.

    कर्क – भावनिकदृष्ट्या संवेदनशील असाल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी मिळू शकते. करिअर स्थिर राहील. नवीन नोकरीची शोधाशोध सुरू करण्यापूर्वी अजून थोडा वेळ थांबा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या; पोटाचे विकार उद्भवू शकतात.

    सिंह – व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही नेतृत्वाच्या भूमिकेत चमकून जाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, पण अनावश्यक खर्च टाळा. कौटुंबिक जीवनात रोमांचक प्रसंग येतील. आरोग्य चांगले राहील, पण उष्णतेच्या विकारांपासून सावध रहा.

    कन्या – व्यावहारिकतेवर लक्ष केंद्रित करा. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल, पण वरिष्ठ किंवा सहकारी यांच्यापासून चार हात लांबच रहा. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. ​आरोग्य ठीक असेल, पण मानसिक ताण येऊ शकतो.

    तुळ – नातेसंबंध आणि भागीदारीवर लक्ष केंद्रित केले जाईल. वैवाहिक जीवन सुखी राहील आणि प्रेमसंबंधांची नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. करिअरच्या नवीन संधी निर्माण होतील, परंतु अंतिम निर्णय विचारपूर्वक घ्या. माफक प्रमाणात आर्थिक लाभ होईल.

    वृश्चिक – गुप्त माहिती किंवा संशोधनातून फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये आव्हाने निर्माण होतील, पण तुमच्या दृढनिश्चयामुळे यश मिळेल. कौटुंबिक संबंध अधिक घट्ट होतील. आरोग्याकडे लक्ष द्या; सांधेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.

    हेही वाचा – काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली

    धनु – आज प्रवासाच्या संधी मिळतील. करिअरमध्ये प्रगती शक्य आहे, विशेषतः शैक्षणिक किंवा परदेशाशी संबंधित क्षेत्रांमध्ये. आर्थिक ओघ चांगला राहील. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवाल, कारण त्यामुळे आनंद वाढेल. आरोग्य चांगले राहील.

    मकर – आजचा दिवस शिस्तबद्ध पद्धतीने कामे हातावेगळी करण्याचा आहे. तुमची कारकीर्द स्थिर असेल, पदोन्नतीसाठी मात्र थोडी वाट बघावी लागेल. पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगा, अनावश्यक खर्च टाळा. तुमचे कौटुंबिक जीवन स्थिर असेल. आरोग्य चांगले राहील.

    कुंभ – नवीन कल्पना आणि सामाजिक उपक्रम फायदेशीर ठरतील. तुमच्या अफाट नेटवर्किंगमुळे नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. करिअरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात गोडवा वाढेल. चांगल्या आरोग्यामुळे मनःशांती लाभेल.

    मीन – तुमची आध्यात्मिक आणि भावनिक बाजू मजबूत राहील. सृजनशील कामामुळे करिअरमध्ये उत्तम यश मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. प्रेम आणि कौटुंबिक जीवनात सुख मिळेल. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि पुरेशी झोप घ्या.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 एप्रिल 2026

    April 21, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 एप्रिल 2026

    April 20, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 21, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 21 एप्रिल 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 01…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 एप्रिल 2026

    April 20, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    April 22, 2026

    Dnyaneshwari : एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती

    April 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 एप्रिल 2026

    April 22, 2026

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 275
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 393
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 197
    • मैत्रीण 18
    • ललित 572
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    April 22, 2026

    Dnyaneshwari : एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती

    April 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 एप्रिल 2026

    April 22, 2026
    Most Popular

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    April 22, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.