Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026

    रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…

    April 24, 2026

    Dnyaneshwari : ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोकआद्यें…

    April 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोकआद्यें…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोकआद्यें…

    Team AvaantarBy Team AvaantarApril 24, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय अकरावा

    जें अतींद्रिय म्हणोनि व्यवस्थिलें । केवळ ज्ञानदृष्टीचिया विभागा फिटलें । तें तुम्हीं चर्मचक्षूंपुढें सूदलें । मी कैसेनि देखों ॥159॥ परि हें तुमचें उणें न बोलावें । मीचि साहें तेंचि बरवें । एथ आथि म्हणितलें देवें । मानूं बापा ॥160॥ साच स्वरूप जरी आम्हीं दावावें । तरी आधीं देखावया सामर्थ्य कीं द्यावें । परि बोलत प्रेमभावें । धसाळ गेलों ॥161॥ काय जाहलें न वाहतां भुई पेरिजे । तरी तो वेळु विलया जाइजे । तरी आतां माझें निजरूप देखिजे । तें दृष्टी देवों तुज ॥162॥ मग तिया दृष्टी पांडवा । आमुचा ऐश्वर्ययोगु आघवा । देखोनियां अनुभवा । माजिवडा करीं ॥163॥ ऐसें तेणें वेदांतवेद्यें । सकळ लोकआद्यें । बोलिलें आराध्यें । जगाचेनि ॥164॥

    संजय उवाच :- एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः । दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् ॥9॥

    पैं कौरवकुळचक्रवर्ती । मज हाचि विस्मयो पुढतपुढती । जे श्रियेहूनि त्रिजगतीं । सदैव असे कवणी ॥165॥ ना तरी खुणेचें वानावयालागीं । श्रुतीवांचूनि दावा पां जगीं । ना सेवकपण तरी अंगीं । शेषाचांचि आथि ॥166॥ हां हो जयाचेनि सोसें । शिणत आठही पाहार योगी जैसे । अनुसरलें गरुडाऐसें । कवण आहे ॥167॥ परि तें आघवेंचि एकीकडे ठेलें । सापें कृष्णसुख एकंदरें जाहलें । जिये दिउनि जन्मले । पांडव हे ॥168॥ परि पांचांही आंतु अर्जुना । कृष्ण सावियाचि जाहला अधीना । कामुक कां जैसा अंगना । आपैता कीजे ॥169॥ पढविलें पाखरूं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा न चले । कैसें दैव एथ सुरवाडलें । तें जाणों न ये ॥170॥ आजि परब्रह्म हें सगळें । भोगावया सदैव याचेचि डोळे । कैसे वाचेचे हन लळे । पाळीत असे ॥171॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती

    अर्थ

    जे (विश्वरूप) इंद्रियांस प्रत्यक्ष दिसणे शक्य नाही, म्हणून शास्त्रांद्वारा ठरले आहे आणि जे केवळ ज्ञानदृष्टीलाच विषय होणारे आहे, असे जे विश्वरूप, ते तुम्ही माझ्या चर्मचक्षूंपुढे ठेविले तर मी ते कसे पाहू? ॥159॥ परंतु हा तुमचा कमीपणा बोलू नये. मीच सहन करावे ते बरे. या अर्जुनाच्या बोलण्यावर देव म्हणाले, होय बाबा, तू म्हणतोस ते मला मान्य आहे. ॥160॥ आम्हास जर स्वरूप खरोखरच दाखवायचे होते, तर तुला प्रथम ते पाहाण्याचे सामर्थ्य द्यावयास पाहिजे होते. परंतु प्रेमामुळे बोलता बोलता विसरून गेलो. ॥161॥ हे कसे झाले म्हणशील तर, जमिनीची मशागत न करता तिच्यात बी पेरले आणि त्यास पाणी घातले, तर तो पेरण्याचा आणि पाणी घालण्याचा वेळ फुकट जातो. (त्याप्रमाणे तुला विश्वरूप पाहाण्याची दृष्टी न देता तुझ्यापुढे विश्वरूप मांडले तर, ते मांडणे व्यर्थ जाणारच). परंतु आता माझे स्वत:चे स्वरूप पाहाण्यास समर्थ असणारी दृष्टि तुला देतो. ॥162॥ मग अर्जुना, त्या दृष्टीने आमचा सर्व ऐश्वर्ययोग पाहून त्याला अनुभावामध्ये साठवून ठेव. ॥163॥ वेदांताचा जो जाणण्याचा विषय, सर्व लोकांचा जो मूळ पुरुष आणि जो जगाला पूजनीय असा जो श्रीकृष्ण परमात्मा, तो याप्रमाणे बोलला (असे संजय म्हणाला). ॥164॥

    संजय म्हणाला, हे राजा (धृतराष्ट्रा), महायोगैश्वर्यसंपन्न हरि याप्रमाणे बोलून, नंतर अर्जुनाला (आपले) ऐश्वर्ययुक्त उत्कृष्ट रूप दाखविता झाला. ॥9॥

    (संजय म्हणाला,) हे कौरव-कुळातील सार्वभौम महाराजा, मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की, लक्ष्मीपेक्षा त्रैलोक्यामध्ये जास्त दैववान कोणी आहे का? ॥165॥ अथवा तत्वाची गोष्ट वर्णन करण्यात वेदांशिवाय जगात दुसरा कोण समर्थ आहे दाखवा बरे? अथवा एकनिष्ठ सेवकपण जर पाहिले तर, ते एक शेषाच्याच ठिकाणी आहे. ॥166॥ अहो महाराज, ज्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या इच्छेने योगी असे आठही प्रहर शिणत असतात (असे भगवंताकरिता कश्ष्ट सोसणारे कोण आहेत?) आणि गरुडासारखा देवास आपल्याला वाहून घेतलेला (दुसरा) कोण आहे? ॥167॥ परंतु ते (आता) सर्व एका बाजूला राहिले. ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले, त्या दिवसापासून, ते श्रीकृष्णापासून भक्ताला होणारे सुख, त्यांच्याच ठिकाणी एकवटले. ॥168॥ परंतु पाचही पांडवांमध्ये श्रीकृष्ण हे सहजच अर्जुनाच्या आधीन झाले. जसे एखाद्या विषयासक्त पुरुषाला स्त्री आपल्या आधीन करते, ॥169॥ शिकवलेला पक्षीही असे बोलत नाही, करमणुकीकरिता पाळालेला पशूही इतका हुकूमात राहात नाही, इतके अर्जुनाच्या आधीन श्रीकृष्ण झाले. या अर्जुनाच्या ठिकाणी दैव कसे भरभराटीस आले आहे, ते समजत नाही! ॥170॥ या प्रसंगी संपूर्ण परब्रह्मवस्तूचा अनुभव घेण्याचे भाग्य याच्याच दृष्टीला लाभले आहे, पाहा! श्रीकृष्ण अर्जुनाच्या बोलण्याचे लाड कसे पुरवीत आहे! ॥171॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    April 23, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती

    April 22, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें, आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें

    April 21, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    By Team AvaantarApril 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा जयातें सांगावया वेद बोबडे । पहावया काळाचेंही आयुष्य थोडें । धातयाही…

    Dnyaneshwari : एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती

    April 22, 2026

    Dnyaneshwari : अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें, आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें

    April 21, 2026

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणसी माझे डोळे

    April 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026

    रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…

    April 24, 2026

    Dnyaneshwari : ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोकआद्यें…

    April 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 एप्रिल 2026

    April 24, 2026

    जगदीश महाजनना जाणवलं, पाठकच खरे हितचिंतक… 

    April 24, 2026

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 277
    • अवांतर 183
    • आरोग्य 104
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 394
    • फिल्मी 46
    • फूड काॅर्नर 198
    • मैत्रीण 18
    • ललित 577
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026

    रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…

    April 24, 2026

    Dnyaneshwari : ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोकआद्यें…

    April 24, 2026
    Most Popular

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.