Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ओम सोशल मीडियाय नमः

    June 18, 2026

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    June 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 एप्रिल 2026

    Team AvaantarBy Team AvaantarApril 23, 2026Updated:April 30, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जून महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 23 एप्रिल 2026; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 03 वैशाख शके 1948; तिथि :  सप्तमी 20:49; नक्षत्र : पुनर्वसु 20:57;
    • योग : धृति 27:32; करण : गरज 09:45;
    • सूर्य : मेष; चंद्र : मिथुन 15:12; सूर्योदय : 06:17; सूर्यास्त : 18:57;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    गंगासप्तमी

    गुरुपुष्यामृत योग – रात्रौ 08:57पासून सकाळी 06:17पर्यंत

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन

    टीम अवांतर

    युनेस्को (UNESCO) अर्थातच संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने 1995 साली जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन अधिकृतपणे जाहीर केला. खरंतर, लेखक मिगुएल डी. सर्व्हंटेस यांच्या सन्मानाप्रित्यर्थ बार्सिलोना येथील सर्व्हेन्टेस प्रकाशन गृहाचे संचालक व्हिसेंट क्लेव्हल यांनी 1922 मध्ये जागतिक पुस्तक दिनाची कल्पना मांडली. तो 7 ऑक्टोबर रोजी स्पेनमध्ये साजराही झाला. मात्र, सर्व्हंटेस यांचा मृत्यू झाल्यानंतर तो त्यांच्याच पुण्यतिथी दिवशी म्हणजेच 23 एप्रिल रोजी साजरा करण्यास सुरुवात झाली. याशिवाय, इंग्रजी साहित्यात अमीट ठसा उमटवणारे महान नाटककार आणि कवी विल्यम शेक्सपिअर, इतिहासातील अत्यंत प्रभावी पुस्तकांपैकी एक मानले जाणाऱ्या “Don Quixote” या साहित्याचे स्पॅनिश भाषेतील महान लेखक मिगेल दे सर्व्हांतेस, तसेच इतिहासकार आणि लेखक इंका गार्सिलोसा यांचेही निधन 23 एप्रिल रोजीच झाले. या तिघांचे साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदान लक्षात घेऊन त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस निवडण्यात आला.

    जगभरातील लोकांनी वाचनाकडे वळावं, पुस्तकांची कदर करावी यासाठी युनेस्कोने हा उपक्रम सुरू केला. विशेष म्हणजे, या दिवसाचं निमित्त साधून युनेस्को एका वर्षासाठी पुस्तकाच्या जागतिक राजधानीची निवडही करते. यंदा 2026 मध्ये मोरोक्कोमधील रबात या शहराची जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड केली आहे. युनेस्कोचा उद्देश वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणे, लेखनासाठी प्रेरणा देणे आणि पुस्तकाच्या माध्यमातून विचारमंथनास चालना देणे हाच आहे.

    हेही वाचा – प्रतीक्षेचा उत्सव साजरा करणारं ‘सिमसिम’!

    आजही अनेक विकसनशील देशांमध्ये पुस्तकांपर्यंत पोहोचणे एक मोठं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर भारतासारख्या लोकशाही देशात, जिथे विचारस्वातंत्र्य हे मूलभूत मूल्य मानलं जातं, तिथे वाचनसंस्कृतीची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. कारण लोकशाही टिकते ती विचारांनी, आणि विचार येतात ते वाचनातून.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आज तुमचे नेतृत्व चमकून उठेल. लोक तुमचे म्हणणे सहजपणे ऐकतील. परदेश प्रवासाची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्यात एक मोठी संधी मिळू शकते. मात्र आजच्या दिवशी शब्द हेच तुमचे सामर्थ्य आणि कमजोरी दोन्ही आहेत. बोलण्यापूर्वी विचार करा. तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी पालकांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल.

    वृषभ – आज नोकरदार जातकांसाठी एक विशेष दिवस असेल. वरिष्ठांकडून जबाबदारीचे पद देऊ केले जाऊ शकते, ज्यामुळे तुमची ओळख आणखी वाढेल. मालमत्तेशी संबंधित समस्या सुटतील. प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जाल. तथापि, भोवतालच्या लोकांना ओळखणे महत्त्वाचे ठरेल. प्रत्येकजण तुमचा हितचिंतक नाही, हे लक्षात ठेवा. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते.

    मिथुन – आयुष्यात संतुलन राखणे आवश्यक आहे. नवीन ओळखींमुळे फायदा होईल, परंतु आरोग्यातील चढउतारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी काही लोक तुम्हाला गोंधळवून टाकण्याचा प्रयत्न करू शकतात, सावध रहा. इतरांच्या प्रभावाखाली येऊन घाईघाईने निर्णय घेऊ नका, अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो. व्यवसायात काहीशी अस्थिरता राहील.

    कर्क – शासकीय बाबींमध्ये विचारपूर्वक बोलणे महत्त्वाचे आहे. भावंडांसोबतचे सुरू असलेले वाद चर्चेद्वारे मिटू शकतील. प्रलंबित आर्थिक कामेही पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. अनावश्यक ताण सोडून शांततेचा मार्ग स्वीकारा. तुमचा कल अध्यात्माकडे असेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. प्रवासादरम्यान तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकते, जी भविष्यात फायदेशीर ठरेल.

    सिंह – कठोर परिश्रम हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. व्यवसायात केलेले बदल फायदेशीर ठरतील. तुम्ही परदेश प्रवासाची योजना आखू शकता. प्रेमसंबंध अधिक घट्ट आणि दृढ होतील. मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. मालमत्ता खरेदी करण्याच्या दृष्टीने चाचपणी कराल. मुलांना दिलेले वचन पाळल्यास तुम्ही त्यांची मने जिंकाल. कौटुंबिक आघाडीवर शांतता राहील.

    कन्या – करिअरमध्ये यशस्वी व्हाल. कामाचा ताण जास्त असला तरी, तुम्ही प्रत्येक काम उत्कृष्टपणे पूर्ण कराल. तुम्ही जे काही हाती घ्याल, त्यात यश मिळवाल. मात्र भावंडांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करणे टाळा. कुटुंबातील एखादा सदस्य नोकरीच्या निमित्ताने दूर जाऊ शकतो. भूतकाळातील चुकांमधून शिकून पुढे वाटचाल केल्यास यश मिळवणे आणखी सोपे जाईल.

    तुळ – आज आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होतील. व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरेल. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. बाहेरचे अन्न खाणे टाळा, त्यामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात. संततीच्या काही मागण्या पूर्ण कराव्या लागू शकतात. दिवसाची सुरुवात धार्मिक कार्याने होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला शांती मिळेल.

    वृश्चिक – करिअरच्या नवीन संधी निर्माण होतील. न्यायालयीन खटल्यांसंदर्भात बरीच धावपळ होईल, पण हळूहळू मार्ग मोकळा होईल. समाजात आदर आणि सन्मान वाढेल. त्यामुळे जोडीदाराचे  हृदय अभिमानाने भरून येईल. कुटुंबात नवीन पाहुण्याच्या आगमनाचा आनंद साजरा कराल. राजकारणात असलेल्यांनी सावधगिरीने पावले उचलावीत. शासकीय कामात काही अडथळे येऊ शकतात.

    धनु – आज तुम्ही उत्साहाने परिपूर्ण असाल. या ऊर्जेला योग्य दिशेने वळवून, तुम्ही मोठे यश मिळवू शकता. अतिशय हुशारीने विरोधकांना मात द्याल. वरिष्ठांच्या सल्ल्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तुम्ही एखाद्याला उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील, घरातील वातावरण बदलेल.

    हेही वाचा – तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    मकर – मालमत्तेसंबंधीच्या बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कामानिमित्ताने थोडी धावपळ होईल, पण ती फायद्याची ठरेल. व्यवसायातील जोडीदारावर विश्वास ठेवण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही चांगली बातमी मिळू शकते. नवीन घर बांधण्याचे नियोजनही सुरू कराल, पण सावध रहा. एखादे जुने रहस्य उघडकीस येऊ शकते. कोणतीही महत्त्वाची माहिती कोणाशीही शेअर करणे टाळा.

    कुंभ – आजचा दिवस म्हणजे तुमच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. तुम्ही तुमच्या योजना पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबातील कुणाबद्दल नाराजी असेल तर, एका समंजस संवादाने ती दूर करा. मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. संततीसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला आनंद मिळेल आणि ताण कमी होईल.

    मीन – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल, पण तो एक मोठी शिकवण देऊन जाणारा असेल. काही कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे संयम बाळगा. व्यावसायिक भागीदाराकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. फार जुनी समस्या सोडवल्याने दिलासा मिळेल. आर्थिक गरजांसाठी कुटुंबाकडून किंवा बँकेकडून मदत घ्यावी लागू शकते.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जून 2026

    June 17, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जून 2026

    June 16, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    By Team AvaantarJune 18, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 18 जून 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 28…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जून 2026

    June 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जून 2026

    June 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 जून 2026

    June 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    ओम सोशल मीडियाय नमः

    June 18, 2026

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    June 18, 2026

    साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…

    June 18, 2026

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    June 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 332
    • अवांतर 190
    • आरोग्य 121
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 458
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 224
    • मैत्रीण 21
    • ललित 715
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ओम सोशल मीडियाय नमः

    June 18, 2026

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    June 18, 2026
    Most Popular

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.