Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आजची ती…

    June 23, 2026

    Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 एप्रिल 2026

    Team AvaantarBy Team AvaantarApril 21, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जून महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 21 एप्रिल 2026; वार : मंगळवार
    • भारतीय सौर : 01 वैशाख शके 1948; तिथि : पंचमी 25:20; नक्षत्र : मृगशीर्ष 23:58
    • योग : शोभन 12:31; करण : बव 14:45;
    • सूर्य : मेष; चंद्र : वृषभ 13:00; सूर्योदय : 06:18; सूर्यास्त : 18:56;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    जर्मन प्राच्यविद्या पंडित गुंथेर सोन्थायमर

    टीम अवांतर

    जर्मन प्राच्यविद्यापंडित, हिंदू धर्म आणि समाज यांचे अभ्यासक तसेच विवेचक गुंथेर डीट्स सोन्थायमर यांचा जन्म 21 एप्रिल 1934 रोजी पश्चिम जर्मनीमधील उल्म येथे झाला. माध्यमिक शिक्षणाच्या काळातच काही सहाध्यांमुळे भारत आणि भारतविद्या यासंबंधी त्यांच्यात जिज्ञासा निर्माण झाली आणि त्यांच्याच सहकार्याने ‘भारत मजलिस’ या अभ्यासगटाची स्थापना करून तिचे नेतृत्व केले.

    सोन्थायमर यांना भारतीय समाजजीवन आणि भारतविद्येचे खूप आकर्षण होते. हिंदू विधी आणि धर्मशास्त्राच्या अभ्यासासाठी ते भारतात आले. 1958 ते 1961 या काळात पुण्याच्या लॉ कॉलेजचे प्राचार्य जी. व्ही. पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास केला. तर, संस्कृत भाषेचा अभ्यास प्रा. वि. म. बेडेकर यासोबत केला. याच कालखंडात डी. डी. कोसांबी यांच्याशी परिचय झाला आणि त्यातून लोकसंस्कृतीविषयी जिज्ञासा निर्माण झाली. कोसांबी यांच्या विचारधारेचा खोलवर ठसा त्यांच्या मनावर उमटला.

    1961मध्ये त्यांनी लंडनच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजमध्ये प्रवेश घेतला. तेथील प्राच्यविद्यापंडित जे. डी. एम्. डेरेट यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी.चा अभ्यास केला. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता ‘द जॉईंट हिंदू फॅमिली : इट्स ईव्हॅलूशन ॲज ए लिगल इन्स्टिट्यूशन’ आणि पदव्युत्तर पदविकेचा विषय होता ‘द कन्सेप्ट ऑफ दाय : ए कंपेरेटिव्ह स्टडी’ हे त्यांचे दोन्ही प्रबंध ग्रंथरूपात प्रसिद्ध झाले. पीएच्.डी. प्राप्त केल्यानंतर भारतविद्येच्या अध्ययनासाठी आणि संशोधनासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या हायडेलबर्ग विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. येथे प्राध्यापक असताना संशोधनासाठी भारताच्या विविध भागात ते जात असत.

    हेही वाचा – कर्तव्याने घडतो माणूस…

    सोन्थायमर यांनी संस्कृत, हिंदी, मराठी, तेलुगू या भाषा आत्मसात केल्या. मराठी भाषेतील प्रावीण्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजांशी सहज संवाद साधता आला, इतका की धनगर मंडळी त्यांना आपल्यातील एक असे समजू लागली. या समाजाचे आचार, उत्सव, देवदेवता याविषयीचे ज्ञान प्राप्त केले. महाराष्ट्रात खेडोपाडी आढळणारे वीरगल व सतीचे दगड हा त्यांच्या कुतूहलाचा, जिज्ञासेचा आणि अभ्यासाचा विषय बनला होता. त्याची माहिती त्यांनी ‘मेमोरिअल स्टोन्स : ए स्टडी ऑफ देअर ऑरिजिन, सिग्निफिकन्स अँड व्हरायटी’ (सहलेखक सेत्तार) या व्याप्तीलेखात दिली आहे. शिवाय, मध्य प्रदेश भागातील तसेच कोरकू, गोंड जमातींतील मृतांची स्मारके इत्यादींचा परामर्श त्यांनी घेतला.

    हिंदू धर्माच्या अंतर्गत किती वैविध्ये दडली आहेत, याने ते स्तिमित झाले आणि सर्वांचा एकत्र विचार करून हिंदू धर्म म्हणजे काय आहे, तो कसा समजून घेता येईल याविषयीची त्यांनी तार्किक मांडणी केली. प्रथमच त्यांनी स्पष्ट केले की, ख्रिश्‍चन, इस्लाम वा ज्यू धर्मांप्रमाणे हिंदू धर्माला संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, संघटना नाही. त्यांच्या मते हिंदू धर्म हा एक विशाल, काहीसा अथांग असा प्रवाह आहे. यात वेळोवेळी मतमतांचे अनेक झरे येऊन मिसळले आहेत. या सर्वांना सामावून घेऊन हा प्रवाह अविरत पुढे चालला आहे. याचे अत्यंत विस्तृत आणि उदाहरणांसहित वर्णन व चर्चा सोन्थायमर यांनी हिंदुइझ्म : द फाईव्ह कम्पोनन्ट्स अँड देअर इंटरॅक्शन (त्याचीच सुधारित आवृत्ती हिंदुइझ्म रिकंसिडर्ड- 1997) या निबंधात केली आहे. 2 जून 1992 रोजी त्यांचे अल्पशा आजाराने दॉसनहिम (राइन-नेकर) येथे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – भावंडांशी तुमचे तीव्र मतभेद होऊ शकतात. नोकरदार जातक काहीसे हट्टीपणाने निर्णय घेतील, ज्यामुळे ऑफिसमधील तणाव वाढू शकतो. कौटुंबिक जीवनातील जुनी कटुता पुन्हा उफाळून येण्याचा धोका आहे, त्यामुळे जोडीदाराशी वाद घालणे टाळावे. आरोग्याबाबत गाफील राहू नका. मान किंवा खांद्यांमधील तीव्र वेदना त्रासदायक ठरू शकते.

    वृषभ – आज मोठ्या कौटुंबिक वादाची शक्यता आहे. त्यामुळे सावध रहा. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होईल, व्यवसायाची भरभराट होईल. मात्र हितशत्रूंकडून प्रगतीत व्यत्यय येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी असलेले गुप्त शत्रू तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुमच्या योजना गुप्त ठेवा. डोकं शांत ठेवून काम करत राहा.

    मिथुन – नोकरदार जातकांच्या कामात विलंब होऊ शकतो. समाजात आदर आणि सन्मान मिळेल. तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात दुरावा निर्माण होण्याचा धोका आहे. नकारात्मक विचार आणि निद्रानाश हे तणावाचे कारण ठरू शकतात. त्यामुळे ध्यानधारणा करा.

    कर्क – अनावश्यक खर्च अचानक वाढेल. त्यामुळे आर्थिक नियोजनाचे पालन करा. आज एखाद्या कायदेशीर अडचणीत सापडाल. व्यावसायिक प्रयत्नांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने विचारांमध्ये नकारात्मकता येऊ शकते. नात्यात अविश्वास निर्माण होईल, काही जातकांचे जोडीदार विभक्त होण्याची शक्यता आहे.

    सिंह – उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील, परंतु एखाद्या अप्रिय घटनेमुळे चिडचिडे व्हाल. नोकरी करणाऱ्या जातकांना वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. जोडीदाराच्या बोलण्याने खूप दुःख होऊ शकते, ज्यामुळे दिवसभर अस्वस्थता जाणवेल. पोटाचे जुनाट आजार अचानक पुन्हा उद्भवू शकतात, ज्यामुळे अस्वस्थता जाणवेल. त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

    कन्या – कामाच्या ठिकाणी उच्चपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. काही जातकांना कामाचा ताण असह्य होईल. व्यावसायिकांच्या हातून एक मोठा व्यावसायिक करार निसटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होईल. जोडीदारासोबत गंभीर मतभेद आणि वैचारिक संघर्षाचे संकेत मिळत आहेत.

    तुळ – भाग्याची मोठी साथ मिळेल. मात्र काही कारणांनी घरच्या एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकणार नाही. करिअरचा विचार करता आज नोकरीच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकता. अशावेळी जाणकराचे किंवा वरिष्ठांचीच मदत घेणे आवश्यक आहे. जोडीदाराच्या आरोग्याबद्दल चिंतित असाल.

    वृश्चिक – नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी अचानक येणाऱ्या अडथळ्यांमुळे कामात व्यत्यय येऊ शकतो, यामुळे आर्थिक नुकसानही होऊ शकते. एखाद्या मोठ्या षडयंत्राचे बळी ठरण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून होणारा विश्वासघात किंवा खोटेपणामुळे वैवाहिक नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरणार आहे.

    धनु – करिअर बदलण्याचा विचार मनात अनेक दिवसांपासून अहे, पण सध्याची नोकरी सोडणे महागात पडू शकते. व्यवसायातील भागीदारी फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवनात पेल्यातील वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे मानसिक शांतता भंग पावेल. संततीशी संबंधीत काही वाईट बातमी येऊ शकते.

    हेही वाचा – लव यू बाबा फॉर एव्हर…!

    मकर – आज हितशत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबतचे तणावपूर्ण संबंध मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडवतील.  व्यावसायिकांवरील कर्जाचा दबाव वाढू शकतो. जोडीदाराच्या मागण्यांमुळे मानसिक त्रास होऊ शकतो. त्वचारोग किंवा संसर्ग रोगाचा त्रास होण्याची शक्यता आहे.

    कुंभ – तुमच्या ज्ञानात आणि बुद्धिमत्तेत आज भर पडेल. नोकरी, व्यवसायाच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञान शिकून घ्याल. जोडीदारासोबतची एक छोटीशी चर्चा मोठ्या वादात बदलू शकते. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे, त्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी.

    मीन – घरात लहानसहान कारणांवरून कलह होऊ शकतो. अत्यंत आक्रमक भूमिका घ्याल ज्यामुळे तुमच्याच कामात अडथळा येईल. अतिशय संयमाने प्रत्येक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. छातीत जळजळ किंवा फुफ्फुसांच्या समस्यांमुळे अडचणी वाढू शकतात.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जून 2026

    June 22, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 21 ते 27 जून 2026

    June 21, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    By Team AvaantarJune 23, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 जून 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  02…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जून 2026

    June 22, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 21 ते 27 जून 2026

    June 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 21 जून 2026

    June 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आजची ती…

    June 23, 2026

    Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 337
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 464
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 23
    • ललित 725
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आजची ती…

    June 23, 2026

    Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026
    Most Popular

    बेटर हाफ

    June 22, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.