Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
डॉ. विवेक वैद्य ये हुकुमत, ये दौलत, ये शोहरत, हमेशा नहीं रहते… ये घर बदलते रहते हैं… आणि हे सर्व गमावल्यानंतर त्या व्यक्तीच्या स्वभावात नक्कीच फरक पडतो. पण हे कायम असूनही काही व्यक्ती बदलतात, त्याचे कारण वय असावे का? की आणखी काही? कारण अलीकडेच घडलेले दोन प्रसंग… मी शिक्षणासाठी बाहेरगावी होतो, तेव्हा आम्हाला एक प्राध्यापक होते. खूप रागीट. वर्गात त्यांना थोडीही कुजबूज सहन व्हायची नाही. विद्यार्थ्यांना वाटेल ते बोलायचे. अगदी गाढव पण म्हणायचे. त्यामुळे साहजिकच ते विद्यार्थ्यांमध्ये अप्रिय होते. पण तो काळ शिक्षकांना उलटून बोलण्याचा नव्हता. मुले पाठीमागून तक्रारी करायचे, पण सरांसमोर निमूट बसायचे. शिक्षण संपल. गावी परत आलो. सर…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा येणें वेगळालेपणें पांडवा । करिती ज्ञानयज्ञु बरवा । जे न भेदती जाणिवा । जाणते म्हणउनि ॥253॥ ना तरी जेधवां जिये ठायीं । देखती कां जें जें कांहीं । तें मीवांचूनि नाहीं । ऐसाचि बोधु ॥254॥ पाहें पां बुडबुडां जेउता जाये । तेउतें जळचि एक तया आहे । मग विरे अथवा राहे । तऱ्ही जळाचिमाजि ॥255॥ कां पवनें परमाणु उचलले । ते पृथ्वीपणावेगळे नाहीं गेले । आणि माघौतें जरी पडले । तरी पृथ्वीचिवरी ॥256॥ तैसें भलतेथ भलतेणें भावें । भलतेंही न हो अथवा होआवें । परि तें मी ऐसें आघवें । होऊनि ठेलें ॥257॥ अगा हे जेव्हडी…
दर्शन कुलकर्णी विनायक चतुर्थी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायात नफा होईल. कीर्ति, मान आणि सन्मानात वाढ होईल. सरकारी कामात तुम्हाला यश मिळेल, परंतु कुटुंबातील काही सदस्यांचे वर्तन निराशाजनक असेल. आज आहाराची काळजी घ्या अन्यथा पचन बिघडू शकते, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर अस्वस्थ वाटेल. जोडीदाराचे आरोग्य हे देखील चिंतेचे एक कारण बनेल. वृषभ – तुमच्या योग्य निर्णयामुळे व्यवसायात चांगला नफा होईल. कुटुंब आणि मित्रांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. योजनेनुसार काम केल्याने यश मिळेल, परंतु तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. काळजीपूर्वक वाहन चालवा. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. मिथुन – आजचा दिवस संमिश्र असेल.…
प्रणाली वैद्य भाग – 13 निशा पुन्हा म्हणाली… “कोणी विचारलं की म्हणायचं, माझे क्लास आहेत, प्रोजेक्ट्स आहेत, मी जाऊ शकत नाही. आणि हो… त्या आराध्यासारखा गोंधळ घालायचा नाही. तिनं किती गुण मिळवलेत ते कौतुकाचं नाही…” “तिचं मार्क मिळवणं तेवढंच सगळ्यांना दिसतंय. पण काही दिवस थांब… तू काय आहेस, हे सगळ्यांना दाखवून दे!” अन्वी शांत होती, पण तिच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती. तिच्या मनात एक कट तयार होत होता… आराध्या जणू तिच्या आयुष्यावर सावलीसारखी पसरलीय, आणि आता ती सावली पुसून टाकण्याची वेळ आली होती… त्या रात्री, खोलीच्या चार भिंतींमध्ये एक बिघडलेली विचारधारा खोलवर रूजत होती… आणि भविष्यात एक वादळ नक्कीच…
प्रणाली मंगेश महाशब्दे असे म्हणतात की, तुमचं राहणं तुमची श्रीमंती दाखवते आणि तुमचं वागणं तुमचे संस्कार दाखवते… एका गावात एक छोटे कुटुंब रहात होते. नवरा, बायको आणि त्यांच्या सुमन आणि मीनल या दोन मुली. दोन्ही मुली शाळेत जात होत्या. मुली खूप हुशार असल्यामुळे प्रत्येक परीक्षेत त्यांना यश हमखास मिळत होते. वडिलांना खूप पगार नव्हता, पण आईने कधी त्याबद्दल तक्रार केली नाही. एकेदिवशी शाळा तपासणीसाठी काही अधिकारी शाळेत आले. अधिकारी प्रत्येक वर्गातील प्रत्येक मुलाबरोबर बोलत होते, प्रश्न विचारत होते. गावातील काही बड्या लोकांची मुलं पण या शाळेत शिकत असल्यामुळे अधिकाऱ्यांबरोबर असलेले इतर कर्मचारी त्या मुलांची आवर्जून ओळख करून देत होते. ही…
माधवी जोशी माहुलकर कोणाच्या रंगरुपावर जाऊ नये, कारण ते काही कोणाच्या हातात नसतं! व्यक्तीमधले गुणविशेष पाहावे, चांगले गुण असतील तर ते निश्चितच दखलपात्र ठरतात. माझ्याकरिता माझ्या घरकाम करणाऱ्या बायका महत्त्वाच्या व्यक्ती आहेत! गेल्या 14 वर्षांपासून माझ्या घरी एक बाई कामाला आहे, त्यामुळे ती आता आमच्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखी आहे! खरंतर, पहिल्यांदा ती जेव्हा माझ्या घरी कामाला आली, तेव्हा तिला महिन्यावारी घरकामाला बोलावण्याचे माझे काही निश्चित नव्हते. तिला मी केवळ डस्टिंगकरिता बोलावले होते. डस्टिंग करायचे काम म्हणजे काय असतं, हे देखील तिला माहीत नव्हतं! उलट तिला ते काम शिकवताना माझीच अवस्था “आ बैल (नव्हे गाय) मुझे मार…” अशी झाली होती. परंतु…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते । एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥15॥ तरी ज्ञानयज्ञु तो एवंरूपु । तेथ आदिसंकल्पु हा यूपु । महाभूतें मंडपु । भेदु तो पशु ॥239॥ मग पांचांचे जे विशेष गुण । अथवा इंद्रियें आणि प्राण । हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान धृत ॥240॥ तेथ मनबुद्धीचिया कुंडा- । आंतु ज्ञानाग्नि धडफुडा । साम्य तेचि सुहाडा । वेदि जाणें ॥241॥ सविवेकमतिपाटव । तेचि मंत्रविद्यागौरव । शांति स्रुकस्रुव । जीव यज्वा ।।242॥ तो प्रतीतीचेनि पात्रें । विवेकमहामंत्रें । ज्ञानाग्निहोत्रें । भेदु नाशी ॥243॥ तेथ अज्ञान सरोनि जाये । आणि यजिता यजन हें ठाये । आत्मसमरसीं न्हाये । अवभृथीं…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – अनावश्यक चिंता तुमच्या मनात नकारात्मक विचार निर्माण करू शकते. मात्र, मनोरंजन आणि प्रवासाचा बेत यामुळे उत्साह निर्माण होईल. भावनिक नात्यांमध्ये विश्वासाची कमतरता जाणवेल. आर्थिक संघर्षांनंतर इच्छित यश दृष्टीपथात येईल. वृषभ – विचारपूर्वक कृती केली तर, लगेच त्याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. इतरांना मदत केल्याने तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. आर्थिकदृष्ट्या इतरांवर जास्त अवलंबून राहण्याचे टाळा. भावंडांसोबतचे जुने प्रश्न सुटतील. मिथुन – कुठल्याही वादाच्या प्रसंगी संयम बाळगणे आवश्यक आहे. कायदेशीर अडचणी टाळा. बँकिंग आणि गुंतवणूक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी. रागावर नियंत्रण ठेवा. तसेच, बाहेरचे खाद्यपदार्थ टाळा, आरोग्याची काळजी घ्या. कर्क…
दीपक तांबोळी “शुभा, ए शुभा, उठ लवकर… अगं किती वेळ झोपून रहाणार आहेस?” संगीता आपल्या लेकीला ओरडून म्हणाली. “झोपू दे ना आई. रात्री दोनपर्यंत मी झोपले नव्हते!” “माहितेय मला दोनपर्यंत तू काय केलं असशील ते! फेसबुक नाहीतर व्हॉटस्ॲप वर चॅटिंग या व्यतिरिक्त करतेस तरी काय तू? चल उठ लवकर. नऊ वाजलेत…” “तू ना बाई अशीच आहे. माहितेय माझ्या मैत्रिणी दहापर्यंत झोपलेल्या असतात!” “चांगल्या मुलींशी तर तू मैत्रीच नको करू. आपल्या कामवालीची मुलगी बघ. सगळं आवरून सकाळी सात वाजता आपल्याकडे हजर असते.” “ए बाई, नको लेक्चर देऊ सकाळी सकाळी… आणि कुणाचीही उदाहरणं नको देत जाऊस. उठते मी.” शुभा धुसफूस करतच उठली.…
सतीश बर्वे गेल्या महिन्यातली गोष्ट. मी पुण्याला गेलो होतो, आमच्या कुटुंबातील एका मंगलकार्याला उपस्थित राहण्यासाठी. मुहूर्त उशिराचा होता. लग्न लागून जेवणं आटपून आम्ही नुसत्या गप्पा मारत बसलो असताना डोळ्यांवर पेंग यायला लागली म्हणून मी आणि मामेभाऊ त्याच्या स्कूटरवरून कार्यालयापासून दूर पौड रोडला मोरे विद्यालयाच्या जवळच्या एका चहाच्या टपरीवर गेलो होतो. संध्याकाळी साडेपाच-सहाची वेळ होती. तरुणाईची बऱ्यापैकी गर्दी होती तिथे. महाराष्ट्रातल्या सध्याच्या खमंग राजकारणावर चर्चा सुरू होती. इतक्यात एका मुलाच्या तोंडून अजब शब्द ऐकले… “अरे यार, तुमचा काही का पक्ष असेना आमचा सध्या एकच पक्ष आणि तो म्हणजे पोरींवर लक्ष!” ते ऐकून मी दचकून त्या घोळक्याकडे पाहिले. बहुतेक नोकरी धंद्याला नुकतीच…

