Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » संकर्षण… राखेतून उरलेला श्वास
    ललित

    संकर्षण… राखेतून उरलेला श्वास

    Team AvaantarBy Team AvaantarJune 15, 2026Updated:June 16, 20261 Comment4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, अनिकेत पुरंदरेचा अपघात, पुरंदरेचे कुटुंब उद्ध्वस्त, सृष्टी पुरंदरेचा मृत्यू, सानिका पुरंदरेचा मृत्यू, आयव्हीएफमार्फत भ्रूण, अनिकेत सानिकाचा अंश, अनिकेत सानिकाची आयव्हीएफ ट्रीटमेन्ट
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    हिमाली मुदखेडकर

    भाग – 1

    पावसाचे थेंब खिडकीच्या काचांवर सतत आदळत होते. बाहेरचं आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी भरून गेलं होतं. जणू निसर्ग कोणत्या तरी न संपणाऱ्या शोकात स्वतःला बुडवू पाहत होता. अनिकेत खिडकीजवळच्या खुर्चीत निश्चल बसला होता…

    दोन वर्षे. संपूर्ण दोन वर्षे तो जन्म आणि मृत्यू मधल्या एका अंधाऱ्या दरीत अडकून पडला होता. अपघातानंतरचे पहिले सहा महिने त्याला फारसे आठवतही नव्हते. रुग्णालय, ऑपरेशन थिएटर, औषधांचा वास, डॉक्टरांचे आवाज… सगळं काही धूसर होतं. पण प्रत्येक श्वासागणिक आठवत होती… सानिका! त्याची प्राणाहून प्रिय पत्नी… त्यांची एक वर्षांची मुलगी, सृष्टी… आणि तो भीषण अपघात…

    तो दिवस, ती आठवण अजूनही त्याच्या काळजात ताजी होती. जखम भळभळत होती. गाडी महामार्गावरून जात होती. सानिका मागच्या सीटवर सृष्टीला खेळवत होती. दोघी मायलेकी आपल्याच मजेत धमाल करत होत्या, खूश होत्या.

    तेवढ्यात समोरून येणारा एक ट्रक… गाडीचं पुलावर असणं… ट्रकची धडक बसू नये, यासाठी अनिकेतचा आटोकाट प्रयत्न, जिवाच्या आकांताने केलेला… पण धडक बसलीच, शेवटी एका बाजूने! तो धक्का एवढा जोरदार होता की, गाडी पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली… अनिकेतची काहीही चूक नसताना!

    एक प्रचंड मोठा धक्का…

    आणि एक भयावह किंकाळी…

    … …

    जेव्हा तो शुद्धीवर आला, तेव्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या गराड्यात… सगळेच अनोळखी. डॉक्टरांचा पडलेला चेहरा… भिजलेला कातर स्वर… न सांगताच सगळे जाणवून देणारा…

    “I am sorry Mr Purandare, आम्ही फक्त तुम्हालाच वाचवू शकलो. गाडीतील इतर दोन्ही जण अति रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू पावले.  तुम्ही पूर्ण बरे होईपर्यंत तुम्हाला ICUमध्ये राहावे लागणार आहे…”

    त्याचं संपूर्ण आयुष्य त्या एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं.

    “तू वाचलास, हेच खूप आहे.”

    त्याचे नातेवाईक आणि जवळचे लोक त्याला म्हणत. पण त्याला मात्र सतत वाटायचं…

    “मीच का वाचलो?”

    त्या अपघातात त्याचं शरीर मोडलं होतं. पण त्याहून जास्त त्याचं मन छिन्नविछिन्न झालं होतं.

    हेही वाचा – जानेवारीत रंगणारी जंगी भरीत पार्टी… गोल्डन डेज ऑफ वरोरा!

    दोन वर्षांच्या उपचारांनंतर डॉक्टरांनी त्याला पूर्णपणे बरा घोषित केलं. आता तो चालू लागला होता… स्वतःची कामं स्वतः करू शकत होता.

    पण जगण्याचं कारण?

    ते अजूनही त्याला सापडलं नव्हतं.

    त्याच्या घरात सानिकाचे फोटो अजूनही तसेच होते. कपाटात तिचे कपडे… आवडीचे टॉप्स… जीन्स होत्या. शेल्फवर अजूनही सृष्टीची छोटी खेळणी ठेवलेली होती…

    त्याने काहीच हलवलं नव्हतं. जणू तो अजूनही त्यांच्या परत येण्याची वाट पाहत होता. त्या दोघींच नसणं त्याला अजूनही मान्य नव्हतं. खरंतर, तो स्वतःच एका आठवणीसारखा जगत होता!

    तेवढ्यात त्याचा मोबाइल वाजला.

    अनोळखी नंबर.

    त्याने पहिल्यांदा दुर्लक्ष केलं. फोन वाजून वाजून थांबला. पुन्हा वाजू लागला… त्याने वैतागून उचलला.

    “हॅलो?”

    “मिस्टर अनिकेत पुरंदरे?”

    “हो.”

    “मी डॉ. मृणालिनी पाटील बोलते आहे. जीवनसृष्टी फर्टिलिटी सेंटरमधून.”

    अनिकेत काही क्षण गप्प राहिला. ते नाव ऐकताच त्याच्या मनातली जुनी जखम पुन्हा उघडली.

    IVF सेंटर… तो आणि सानिका अपघाताच्या काही महिन्यांपूर्वी तिथे जात होते. सृष्टीला एक भावंड असावे, यासाठी ते दोघे IVF माध्यमाचा वापर करून दुसर्‍या बाळाचा विचार करत होते.

    मध्यंतरीच्या अपघातानंतर त्याला या सगळ्याचा विसर पडला होता.

    “हो… सांगा.”

    “आपण प्लीज सेंटरमध्ये येऊ शकाल का? एक महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते गरजेचे आहे.”

    “कसली प्रक्रिया?”

    “फोनवर सांगत येणार नाही. प्लीज उद्या भेटू शकाल का?”

    खरंतर, तो वैतागला… पण मनाविरुद्ध त्याने होकार दिला.

    “ठीक आहे. येतो.”

    फोन कट झाला.

    दुसर्‍या दिवशी ठरलेल्या वेळी तो सेंटरमध्ये पोहोचला.

    तेच रिसेप्शन… तेच कॉरिडॉर… तोच निर्जंतुकीकरण औषधांचा वास… पण सानिका नव्हती. एकेकाळी तिच्या हातात हात घालून तो इथे यायचा. आज मात्र एकटा होता.

    डॉ. मृणालिनी त्यांच्या केबिनमध्ये बसल्या होत्या. त्यांनी त्याला बसायला सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते.

    “मिस्टर पुरंदरे ही गोष्ट आम्ही आपल्याला खूप आधी सांगायला हवी होती, पण तुम्ही स्वतः अपघातातून बरे होई पर्यंत आम्हाला थांबावे लागले.”

    डॉक्टरांनी एक फाइल समोर सरकवत शांत संयत आवाजात सांगण्यास सुरुवात केली…

    “आपल्या आणि सानिकाच्या IVF प्रक्रियेदरम्यान अनेक भ्रूण तयार करण्यात आले होते. त्यांपैकी बहुतेक अयशस्वी ठरले. पण…”

    त्या थांबल्या.

    “एक भ्रूण पूर्णपणे यशस्वी आहे. तो अजूनही आमच्या क्रायो-स्टोरेजमध्ये सुरक्षित आहे.”

    अनिकेत स्तब्ध झाला. त्याला काही क्षण आपण काय ऐकतोय हे कळलेच नाही! पण ज्या क्षणी त्याच्या लक्षात आले, तो जवळ जवळ ओरडला…

    “काssय…?”

    हेही वाचा – 26/11 : उरल्या केवळ श्रेयसच्या आठवणी

    “तो भ्रूण अजूनही जिवंत आणि सक्षम आहे,” डॉक्टर पुढे बोलत होत्या,

    “मात्र सानिकाच्या मृत्यूनंतर कायद्यानुसार आम्हाला त्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आम्हाला आपली परवानगी हवी आहे…”

    अनिकेतचा जवळ जवळ श्वास अडकला.

    “कशासाठी?”

    डॉक्टरांनी नजर खाली करत म्हणाल्या,

    “…तो भ्रूण नष्ट करण्यासाठी.”

    त्या क्षणी अनिकेतच्या भोवतालचे जगच जणू थांबले. सानिकाचा चेहरा… सृष्टीचं हसू… अपघात… दोन वर्षांचं दुःख… सगळं त्याच्या डोळ्यांसमोरून झरझर गेलं… आणि मग पहिल्यांदाच… दोन वर्षांत पहिल्यांदाच… किंचित हसू त्याच्या चेहर्‍यावर उमटलं… त्याने डॉक्टरांकडे पाहिलं.

    त्याच्या डोळ्यांत अचानक एक वेगळी चमक होती.

    “डॉक्टर…”

    “तो भ्रूण नष्ट न करता…”

    तो थोडा थांबला.

    “…त्याला जन्म देणं शक्य आहे का?”

    डॉक्टरांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले…

    …आणि अनिकेतच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या लढाईची इथे सुरुवात झाली.

    क्रमश:

    (Disclaimer : ही कथा काल्पनिक असून याचा कोणत्याही घटना अथवा व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026 ललित

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026 ललित

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026 ललित

    1 Comment

    1. Nishad Nanasaheb Joshi on June 16, 2026 9:22 am

      खुपच सुंदर कथा.. अगदी रंजक वर्णन. प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने आणि अभ्यासपूर्ण मांडली आहे

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    By प्रदीप केळुस्करAugust 1, 2026

    भाग – 2 आज शूटिंग नसल्याने वंदना सकाळी निवांत आठ वाजता उठली. गेले पाच दिवस…

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026

    कहाणी सकिना अन् खुशबूची

    July 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    ज्योतिषशास्त्र… तुमच्या नावात दडला आहे तुमचा ग्रहाधिदेवता!

    August 1, 2026

    हर्निया (आंत्रवृद्धी) विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु क्षेत्र गुरु देवता, गुरु माय गुरु पिता

    August 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 380
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 515
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 821
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.