Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
अध्याय तेरावा आतां असंगा साक्षिभूता । देहीं चैतन्याची जे सत्ता । तिये नांव पंडुसुता । चेतना येथें ॥134॥ जे नखौनि केशवरी । उभी जागे शरीरीं । जे तिहीं अवस्थांतरी । पालटेना ॥135॥ मनबुद्ध्यादि आघवीं । जियेचेनि टवटवीं । प्रकृतिवनमाधवीं । सदांचि जे ॥136॥ जडाजडीं अंशीं । राहाटे जे सरिसी । ते चेतना गा तुजसी । लटिकें नाहीं ॥137॥ पैं रावो परिवारु नेणे । आज्ञाचि परचक्र जिणे । कां चंद्राचेनि पूर्णपणें । सिंधू भरती ॥138॥ नाना भ्रामकाचें सन्निधान । लोहो करी सचेतन । कां सूर्यसंगु जन । चेष्टवी गा ॥139॥ अगा मुखमेळेंविण । पिलियाचें पोषण । करी निरीक्षण । कूर्मी जेवीं…
हिमाली मुदखेडकर भाग – 7 चार वर्षे… एका न्यायालयीन प्रकरणासाठी हा कालावधी कदाचित फार मोठा नव्हता. पण अनिकेतसाठी मात्र ती चार वर्षे म्हणजे एक अखंड युग होतं. अपघातानंतरची दोन वर्षे अंथरुणावर आणि मानसिक तणावात… आणि त्यानंतरची चार वर्षे न्यायालयाच्या पायऱ्यांवर… एकूण सहा वर्षे! सहा वर्षांपासून एक छोटासा भ्रूण प्रयोगशाळेतील क्रायो-स्टोरेजमध्ये गोठलेल्या अवस्थेत त्याची वाट पाहत होता. आणि आज… त्या प्रतीक्षेचा निर्णय होणार होता. 0000 खंडपीठात त्या दिवशी खूप गर्दी जमली होती. अनेक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. IVF क्षेत्रातील तज्ज्ञ होते… कायद्याचे अभ्यासक आले होते. अनेकांना माहीत होतं की, आजचा निकाल फक्त एका व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम करणार नव्हता, तो भविष्यात अशाच…
अध्याय तेरावा तरि भूतलें आठवे । कां बोलें कानु झांकवे । ऐसियावरि चेतवे । जे गा वृत्ती ॥122॥ इंद्रियाविषयांचिये भेटी- । सरसीच वेगें उठी । कामाची बाहुटी । धरूनियां ॥123॥ जियेचेनि उठिलेपणें । मना सैंघ धावणें । न रिगावें तेथ करणें । तोंडें सुती ॥124॥ जिये वृत्तीचिया आवडी । बुद्धी होय वेडी । विषयां जिया गोडी । ते गा इच्छा ॥125॥ आणी इच्छिलिया सांगडें । इंद्रियां आमिष न जोडे । तेथ जोडे ऐसा जो डावो पडे । तोचि द्वेषु ॥126॥ आतां यावरी सुख । तें एवंविध देख । जेणें एकेंचि अशेख । विसरे जीवु ॥127॥ मना वाचे काये । जें…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 जुलै 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 15 आषाढ शके 1948; तिथि : षष्ठी 13:46 ; नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 16:06; योग : सौभाग्य 15:50 ; करण : विष्टि 25:40; सूर्य : मिथुन; चंद्र : कुंभ 09:56; सूर्योदय : 06:05; सूर्यास्त : 19:20; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष प्राच्यविद्या संशोधक रामकृष्ण गोपाळ भांडारकर टीम अवांतर थोर प्राच्यविद्यासंशोधक संस्कृतचे प्रकांड पडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक आणि समाजसुधारक रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म 6 जुलै 1837 साली मालवण येथे झाला. मुंबई विद्यापीठाच्या बीए आणि एमए या परीक्षा ते उत्तीर्ण झाले. मुंबई तसेच पुणे येथील जुन्या विद्वान शास्त्री-पंडितांजवळ न्याय, व्याकरण, वेदान्त इत्यादींचा चांगला अभ्यास केला. संस्कृतची दोन शालेय पाठ्यपुस्तके (प्रथम इंग्रजी आणि नंतर…
मेष सुखदायक आठवडा आहे. नोकरदारांसाठी बढतीचे योग आहेत. मित्रांबरोबर पैशांचे व्यवहार टाळणे हिताचे ठरेल. मातृचिंता मिटेल. वाहन किंवा वास्तू खरेदीचा योग आहे. गुरुच्या दृष्टीमुळे व्यावसायिक वर्गाला आईचे आशीर्वाद उपयोगी येतील. कामाच्या जागेत बदल होण्याची शक्यता आहे. पैशांची आवक वाढेल. मनाप्रमाणे खर्च करू शकाल. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी. त्या मनाप्रमाणे खर्च करू शकतील. विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढवून अभ्यास करावा लागेल. वृषभ सर्वार्थाने उत्तम आठवडा आहे. नोकरदारांनी कामावर लक्ष केंद्रीत करावे. वरिष्ठांशी वाद घालू नका. घर किंवा इतर काही खरेदी करताना कागदपत्रे नीट तपासून घ्या. व्यावसायिक वर्गाला नवीन प्रकल्प हाती घेता येतील. पैशांची बचत करू शकाल. कामासाठी लहान-मोठे प्रवास घडतील. महिलांचे भावंडांबरोबरचे संबंध…
अध्याय तेरावा जें प्रवृत्तीसि मूळ । कामा जयाचे बळ । जें अखंड सूये छळ । अहंकारासी ॥111॥ जें इच्छेतें वाढवी । आशेतें चढवी । जें पाठी पुरवी । भयासि गा ॥112॥ द्वैत जेथें उठी । अविद्या जेणें लाठी । जें इंद्रियांतें लोटी । विषयांमाजी ॥113॥ संकल्पें सृष्टी घडी । सवेंचि विकल्पूनि मोडी । मनोरथांचिया उतरंडी । उतरी रची ॥114॥ जें भुलीचें कुहर । वायुतत्त्वाचें अंतर । बुद्धीचें द्वार । झाकविलें जेणें ॥115॥ तें गा किरीटी मन । या बोला नाहीं आन । आतां विषयाभिधान । भेदू आइकें ॥116॥ तरी स्पर्शु आणि शब्दु । रूप रस गंधु । हा विषयो पंचविधु…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 05 जुलै 2026; वार : रविवार भारतीय सौर : 14 आषाढ शके 1948; तिथि : पंचमी 13:30; नक्षत्र : शततारका 15:11; योग : आयुष्मान 16:39; करण : गरज 25:43; सूर्य : मिथुन; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:04; सूर्यास्त : 19:20; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष चित्रपट संकलक रेणू सलुजा टीम अवांतर पुरुषांचे वर्चस्व असलेल्या चित्रपट संकलन क्षेत्रात आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या रेणू सलुजा यांचा जन्म 5 जुलै 1952 रोजी पंजाबी हिंदू कुटुंबात…
डॉ. किशोर महाबळ विद्यार्थी अज्ञानी, अननुभवी असतात. त्यांचा स्वभाव चंचल असतो, एकाग्रता कमी असते. चांगले काय, वाईट काय… हे त्यांना नेहमीच सांगावे लागते. त्यांना स्वतःतील गुण, अवगुण, बौद्धिक क्षमता, कुवत, उणीवा यांची जाणीव नसते. विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करण्याची गरज असते, असा बहुतांश शिक्षक आणि पालकांचा समज असतो. या समजामुळे मग या विद्यार्थ्यांनी किती आणि कोणते शिक्षण घ्यावे, कोणती नोकरी किंवा व्यवसाय करावा, अशा सर्व बाबतीत सर्व निर्णय शाळेत शिक्षक तर घरी पालकच घेऊ लागतात. अनेकदा तर आपल्या म्हणण्यानुसार वागायला भाग पाडतात. आपल्या पाल्याशी वेळोवेळी चर्चा करून त्याची आवडनिवड, स्वभाव, प्रवृत्ती, मनोभूमिका, कल, प्रेरणा, इच्छा आकांक्षा यांचा शोध घेण्याचा प्रयत्नही करीत…
अध्याय तेरावा तरि श्रवण नयन । त्वचा घ्राण रसन । इयें जाणें ज्ञान- । करणें पांचें ॥98॥ इये तत्त्वमेळापंकीं । सुखदुःखाची उखिविखी । बुद्धि करिते मुखीं । पांचें इहीं ॥99॥ मग वाचा आणि कर । चरण आणि अधोद्वार । पायु हे प्रकार । पांच आणिक ॥100॥ कर्मेंद्रियें म्हणिपती । तीं इयें जाणिजती ।आइकें कैवल्यपती । सांगतसे ॥101॥ पैं प्राणाची अंतौरी । क्रियाशक्ति जे शरीरीं । तियेचि रिगिनिगी द्वारीं । पांचे इहीं ॥102॥ एवं दाहाही करणें । सांगितलीं देवो म्हणे । परिस आतां फुडेपणें । मन तें ऐसें ॥103॥ जें इंद्रियां आणि बुद्धि । माझारिलिये संधीं । रजोगुणाच्या खांदीं । तरळत…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 04 जुलै 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 13 आषाढ शके 1948; तिथि : चतुर्थी 12:39; नक्षत्र : धनिष्ठा 13:43; योग : प्रीति 17:00; करण : कौलव 25:08; सूर्य : मिथुन; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:04; सूर्यास्त : 19:20; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष विनोदी साहित्यिक वि. आ. बुवा टीम अवांतर मराठी भाषेत विनोदी शैलीत तब्बल 150हून अधिक पुस्तके लिहिणारे साहित्यिक विनायक आदिनाथ अर्थात वि. आ. बुवा यांचा जन्म 4 जुलै 1926 रोजी…

