Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
गजानन देवधर पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात 12 ऑक्टोबर 2008 रोजी कॉमनवेल्थ यूथ गेम्सचे भव्य उद्घाटन होणार होते. कॉमनवेल्थ गेम्सच्या तत्कालीन Queen’s Baton Relay प्रमाणेच, या वेळेस Youth Baton Relay ही नवी संकल्पना अमलात आणली जाणार होती. बॅटन रिले ही केवळ औपचारिक धाव नव्हे, तर तिच्यामागे शिस्त, नियोजन आणि प्रत्येक टप्प्यावर असणारी जबाबदारी, यांचा एक अखंड प्रवास असतो. त्या काळी मी शिकवत असलेल्या ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान हे महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे उपाध्यक्ष होते आणि बॅटन रिले ऑर्गनायझिंग कमिटीचे चेअरमनही होते. बॅटन रिलेची सुरुवात दिल्लीपासून होऊन नऊ राज्यांतून, तब्बल आठ हजार किलोमीटरचा प्रवास करत 190 गावांतून जात ती बालेवाडी, पुणे…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाच नादत्ते कस्यचित् पापं न चैव सकृतं विभुः । अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥15॥ पापपुण्यें अशेषें । पासींचि असतु न देखे । आणि साक्षीही होऊं न ठके । येरी गोठी कायसी ॥80॥ पैं मूर्तीचेनि मेळें । तो मूर्तचि होऊनि खेळे । परि अमूर्तपण न मैळे । दादुलयाचें ॥81॥ तो सृजी पाळी संहारी । ऐसे बोलती जे चराचरीं । ते अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा ॥82॥ ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।…
दर्शन कुलकर्णी दुर्गाष्टमी गोपाष्टमी कुष्मांड नवमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. कामाच्या नवीन संधी निर्माण होतील. प्रवासाचीही शक्यता आहे. नवीन योजनांमुळे फायदा होईल. तथापि, घाईघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे नुकसान होऊ शकते. हवामान बदलामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे तब्येतीसोबत आहाराचीही काळजी घ्या. वृषभ – आजचा दिवस चांगला जाईल. जुन्या गुंतवणुकीतून, जुन्या मित्रांकडून किंवा नातेसंबंधांमधून फायदा होऊ शकतो. शेअर्स आणि मालमत्तेतील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. भागीदारी व्यवसायात लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती प्रतिकूल असेल. कौटुंबिक समस्या देखील डोकं वर काढतील. मिथुन – कामाच्या ठिकाणी काही अडचणी…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड बनवतानाच्या काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसा, छोले भटुरे, सॉफ्ट इडली, खमंग धिरडी… हेही वाचा – Kitchen Tips : दहीवडा, सँडविचची चटणी अन् रगडा पॅटीस बनवताना हे करून पाहा (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
दीपक तांबोळी ऑफिसमधून घरी येताना कोपऱ्यावरच्या पानटपरीवरून मी वळलो, तेव्हा सुऱ्या मला तिथे उभा असलेला दिसला. मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे गेलो. त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं… “काय सुऱ्या, कसं काय चाललंय?” मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं. तसा सुरेश ऊर्फ सुऱ्या एकदम गडबडला. हातातली सिगरेट त्याने पाठीमागे लपवली. मला त्याच्याकडे बघून एकदम गंमत वाटली. टाईट जिन्सची फाटलेली पँट, इन केलेला लालभडक शर्ट, डोळ्यावर काळा सडकछाप गॉगल… टपोरी व्याख्येला एकदम साजेसा होता त्याचा अवतार. “नको लपवू सिगरेट. मी पाहिलंय तुला पिताना…” मी म्हटलं तशी हातातली सिगरेट त्याने दूर फेकून दिली आणि माझ्याकडे ओशाळवाणं हसून म्हणाला, “सॉरी प्रशांतदादा. प्लिज घरी सांगू नका…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा जें मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे । तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज ॥67॥ जें शब्दातीत स्वभावें । तें बोलींचि जरी फावे । तरी आणिकें काय करावें । सांगे कथा ॥68॥ हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृतीचा । म्हणे संवादु दोघांचा । परिसोनि परिसा ॥69॥ मग कृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें । सांगेन तुज निरुतें । चित्त देई ॥70॥ युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 ऑक्टोबर 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 07 कार्तिक शके 1947; तिथि : सप्तमी 09:22; नक्षत्र : उत्तराषाढा 17:28 योग : धृति 07:50; करण : विष्टी 21:49 सूर्य : तुळ; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:36; सूर्यास्त : 18:08 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवसाची सुरुवात योग साधनेने केली तर, संपूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. आपल्या करिअरसंबंधी निर्णय स्वत:च घ्या, त्याचा मोठा फायदा मिळेल. टॅक्स न भरणारे…
चंद्रकांत पाटील यंदाचा उन्हाळा काही वेगळाच होता. उन्हानं जमीन पार भाजून निघाली होती. जनावरं होरपळत होती, माणसं पार किरवांजली होती. आड, विहीरी आटायला लागल्या होत्या, नदीचं पाणी आटून वाळू दिसायला लागली होती. धरणातल्या पाण्याचा साठा कमी झाल्याच्या बातम्या येत होत्या. अजून पावसाला अवकाश होता. नुकत्याच रोहिण्या निघाल्या होत्या, पण जुन्या परंपरेनुसार वाळल्या मातीत भात पेरायचं धाडस कोण करीत नव्हतं. हिरव्यागार आमराईत बसून पावशा पक्षी शेतकर्याना “पेरते व्हा!” “पेरते व्हा!!” म्हणून साद घालीत होता. सुनीलनेही यंदा रानं तयार ठेवली होती. सर्या सोडून ठेवल्या होत्या पहिला पाऊस झाला की, भोंड्यावर सोयाबीन, भुईमुग आणि मोकळ्या वावरात भात पेरायचा त्याचा विचार होता… सुनील हा…
कामिनी व्यवहारे खिचडी वेगवेगळ्या प्रकारे बनविली जाते. डाळ तांदळाची, मूगाच्या खिचडीपासून अगदी विविध भाज्या घालून खिचडीला पुलावाचे स्वरूप दिले जाते. डाळिंब्या घालून खिचडी छान लागते. पाहूयात त्याची रेसिपी… साहित्य हेही वाचा – Recipe : कुरकुरीत ब्रेड रोल्स… कृती हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का? टीप पुरवठा संख्या : 3 ते 4 व्यक्तींसाठी तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा देखें बुद्धीची भाष नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे । ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥51॥ हेंच मराठें परियेशीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी । योगिये कर्में करिती तैशीं । केवळा तनू ॥52॥ मग पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असे निदेलें । तेथ मनचि राहाटे एकलें । स्वप्नीं जेवीं ॥53॥ नवल ऐकें धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा । देहा होऊं नेदी उजगरा । परी सुखदुःखें भोगी ॥54॥ इंद्रियांचां गांवीं नेणिजे…

