Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : योगिये तोही करिती, परी कर्में तेणें न बंधिजती…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : योगिये तोही करिती, परी कर्में तेणें न बंधिजती…

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 28, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.

    अध्याय पाचवा

    देखें बुद्धीची भाष नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे । ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥51॥ हेंच मराठें परियेशीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी । योगिये कर्में करिती तैशीं । केवळा तनू ॥52॥ मग पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असे निदेलें । तेथ मनचि राहाटे एकलें । स्वप्नीं जेवीं ॥53॥ नवल ऐकें धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा । देहा होऊं नेदी उजगरा । परी सुखदुःखें भोगी ॥54॥ इंद्रियांचां गांवीं नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे । तो केवळ गा म्हणिजे । मानसाचा ॥55॥ योगिये तोही करिती । परी कर्में तेणें न बंधिजती । जे सांडिली आहे संगती । अहंभावाची ॥56॥ आतां जाहालिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त । मग इंद्रियांचें चेष्टित । विकळु दिसे ॥57॥ स्वरूप तरी देखे । आळविलें आइके । शब्दु बोले मुखें । परी ज्ञान नाही ॥58॥ हें असो काजेंविण । जें जें कांहीं कारण । तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचें ॥59॥ मग सर्वत्र जें जाणतें । ते बुद्धीचें कर्म निरुतें । वोळख अर्जुनातें । म्हणे हरी ॥60॥ ते बुद्धी धुरे करुनी । कर्म करिती चित्त देउनी । परी ते नैष्कर्म्यापासुनी । मुक्त दिसती ॥61॥ जे बुद्धीचिये ठावूनि देही । तयां अंहकाराची सेचि नाहीं । म्हणोनि कर्मेंचि करितां पाहीं । चोखाळले ॥62॥ अगा करितेनवीण कर्म । तेंचि तें निष्कर्म । हें जाणती सवर्म । गुरुगम्य जें ॥63॥ आतां शांतरसाचें भरितें । सांडीत आहे पात्रातें । जे बोलणें बोलापरौतें । बोलवलें ॥64॥ एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु । तयासीचि आथि लागु । परिसावया ॥65॥ हा असो अतिप्रसंगु । न संडी पां कथालागु । होईल श्लोकसंगतिभंगु । म्हणोनियां ॥66॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : देखें आकाशा आणि अवकाशा, भेदु नाहीं जैसा…

    अर्थ

    पाहा, जे कर्म बुद्धीला समजण्याच्या पूर्वी आणि मनात विचार उद्भवण्याच्या अगोदर होते, त्या (कर्माच्या) व्यवहाराला ‘कायिक’ व्यवहार म्हणतात. ॥51॥ हेच स्पष्ट पाहिजे असेल तर, ऐक. ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाची हालचाल असते, त्याप्रमाणे योगी केवळ शरीरानेच कर्मे करतात. ॥52॥  मग हे पाच भूतांचे बनलेले शरीर ज्या वेळेला झोपलेले असते, त्यावेळेला ज्याप्रमाणे एकटे मनच स्वप्नात व्यवहार करते ॥53॥ अर्जुना, एक आश्चर्य पाहा. या वासनेचा विस्तार केवढा आहे? ती देहाला जागे होऊ देत नाही, पण सुखदु:खाचा भोग भोगवते. ॥54॥ अरे, इंद्रियांना ज्याचा पत्ता नसतो, असे जे कर्म उत्पन्न होते, त्याला केवळ ‘मानसिक’ कर्म म्हणतात. ॥55॥ योगी तेही कर्म करतात, पण ते त्या कर्माने बांधले जात नाहीत. कारण त्यांनी अहंकाराची संगती टाकलेली असते. ॥56॥ आता ज्याप्रमाणे भूतसंचार झाल्यामुळे चित्त भ्रमिष्ट होते, मग त्या माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया अमेळ दिसतात ॥57॥ त्यास रूप तर दिसते, हाका मारलेले ऐकू येते, तो तोंडाने शब्दांचा उच्चारही करतो, परंतु हे सर्व केल्याची जाणीव नसते. ॥58॥ हे राहू दे, तो प्रयोजनावाचूनच जे जे काही करतो, ते ते सर्व केवळ इंद्रियांचे कर्म आहे, असे समज. ॥59॥ मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व ठिकाणी जाणण्याचे जे काम आहे, ते खरोखर बुद्धीचे आहे, असे ओळख. ॥60॥ ते (कर्मयोगी) बुद्धी पुढे करून मन:पूर्वक कर्मे करतात, पण ते नैष्कर्म्य स्थितीस प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षाही मुक्त दिसतात. ॥61॥ कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरणच नसते, म्हणून अशा कर्मांचे आचरण करीत असताही ते शुद्धच असतात, असे समज. ॥62॥ अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म, तेच निष्कर्म होय. ही गुरूकडून कळणारी मर्माची गोष्ट (प्राप्त पुरुष) समजतात. ॥63॥ आता (माझ्या बोलण्यातील) शांतरसाचा पूर मर्यादा सोडून उचंबळत आहे. कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टींचे व्याख्यान करता आले. ॥64॥ ज्यांचा इंद्रियांविषयींचा पराधीनपणा चांगल्या तर्‍हेने नाहीसा झाला आहे, त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे. ॥65॥ (या ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यावर संत श्रोते म्हणतात) हे विषयांतर करणे पुरे. कथेचा संबंध सोडू नकोस. कारण तसे करण्याने श्लोकाच्या संगतीचा बिघाड होईल. ॥66॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : जे पार्था तया देहीं, मी ऐसा आठऊ नाहीं…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    By Team AvaantarApril 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा देवा गंधर्वनगरीची वस्ती । सोडूनि निघालों लक्ष्मीपती । होतों उदकाचिया आर्ती…

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 101
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 557
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026
    Most Popular

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.