दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 29 ऑक्टोबर 2025; वार : बुधवार
भारतीय सौर : 07 कार्तिक शके 1947; तिथि : सप्तमी 09:22; नक्षत्र : उत्तराषाढा 17:28
योग : धृति 07:50; करण : विष्टी 21:49
सूर्य : तुळ; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:36; सूर्यास्त : 18:08
पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवसाची सुरुवात योग साधनेने केली तर, संपूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. आपल्या करिअरसंबंधी निर्णय स्वत:च घ्या, त्याचा मोठा फायदा मिळेल. टॅक्स न भरणारे मोठ्या संकटात फसू शकतात. संततीला पुरेसा वेळ देता येत नसल्याने संध्याकाळचा काही वेळ त्यांच्यासाठी राखून ठेवा. विवाहेच्छुकांसाठी दिवस सकारात्मक ठरेल.
वृषभ – मानसिक शांततेसाठी, तणाव दूर करण्यासाठी प्राणायामाचा खूप उपयोग होईल. दोन ओळींमध्ये दडलेला छुपा अर्थ समजल्याशिवाय कोणत्याही व्यावसायिक, कायदेशीर कागदपत्रांवर सही करू नका. घरातील कामे पूर्ण करण्यासाठी मुलांची मोठी मदत होईल. एखाद्या अप्रिय विषयावरून जोडीदार तुमच्यावर नाराज शक्यता आहे.
मिथुन – सामाजिक स्नेहसंमेलन किंवा सहली यामुळे आनंदी आणि रिलॅक्स असाल. पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. गरजेच्या नसलेल्या वस्तुंवर पैसे खर्च केल्याने जोडीदार अस्वस्थ होईल. घरातील लहान सदस्यांसाठी काही काळ राखून ठेवा.
कर्क – भागीदारीतील प्रकल्पातून सकारात्मक फळ मिळण्यापेक्षा अनेक प्रश्न निर्माण होतील. समोरच्याला तुमच्या स्वभावाचा फायदा घेऊ देऊ नका, अन्यथा मोठे नुकसान सोसावे लागेल. तथापि, व्यवसायासाठी लागणारे भांडवल सहजपणे उभे करता येईल. थकीत उधारी परत मिळेल. कुटुंबातील सदस्य एखादे मोठे सरप्राइज देण्याची शक्यता आहे.
सिंह – कार्यालयातून लवकर बाहेर पडून स्वतःच्या विरंगुळ्यासाठी थोडा वेळ खर्च करा. माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. अनपेक्षित कामामुळे दिवसभरातील बाकीचे बेत रखडतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वागताना सावध राहा. हुशारी आणि संयमाने काम करा. वाचनाचा छंद असलेल्या जातकांना काहीतरी नवीन वाचायला मिळेल.
हेही वाचा – बनगरवाडी… लहानसे खेडं पूर्ण विश्वाचे प्रतिनिधी
कन्या – शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. लहानसा प्रवास करावा लागेल. मात्र, प्रवासात सावध राहा. कामानिमित्त नवीन मित्रांची भेट होईल. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्या कोणालाही घेऊ देऊ नका. जोडीदारासोबत संध्याकाळी एखाद्या घरगुती कार्यक्रमात सहभागी व्हाल.
तुळ – मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध राहा, हुशारी आणि संयम ठेवा. घरात कोणतेही बदल करायचे असतील तर आधी घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. एखादे नवीन पुस्तक खरेदी त्याचे वाचन कराल, मात्र त्यामुळे पुरेसा वेळ न दिल्याने कुटुंबीयांचा राग ओढवून घ्यावा लागेल.
वृश्चिक – आज निवांतपणे कामे उरकण्याची गरज आहे. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा खूप फायदेशीर ठरते, त्यामुळे नवीन गुंतवणूक करू शकता. जुन्या गुंतवणुकीतूनही आज उत्तम नफा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांचा फायदा होईल.
धनु – व्यावसायिक उद्दीष्टे गाठण्यासाठी आपली ऊर्जा योग्य प्रकारे खर्च करण्यासाठी अत्यंत योग्य काळ आहे. विनाकारण चिंताग्रस्त होऊ नका. सकारात्मक विचार करा. आधी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा आज मिळू शकतो. मनातील समस्या बाजूला सारा आणि घरातील सदस्य तसेच मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्याचे लक्ष द्या.
मकर – आज आर्थिक बाजू मजबूत राहील. नोकरीच्या ठिकाणी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची गरज आहे अथवा वरिष्ठांच्या नजरेत तुमची नकारात्मक प्रतिमा बनण्याची शक्यता आहे. तथापि, दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील, त्याचा योग्य तो फायदा घ्या.
कुंभ – इच्छाशक्ती कमी पडत असल्याने तुम्ही भावनिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकता. शक्य असेल तितकी बचत करण्याचा प्रयत्न करा. पालकांना विश्वासात घेऊन तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी कल्पना द्या. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. बऱ्याच काळापासून ते वाट पाहात असलेली कीर्ति आणि मान्यता मिळेल.
हेही वाचा – रेबीज… दुर्लक्ष बेतलं जीवावर!
मीन – कुटुंबातील काही सदस्यांच्या वर्तनामुळे तुम्ही त्रासून जाल. परंतु, राग अनावर होऊ देऊ नका अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. ज्यावर उपाय करणे शक्य नाही, ते शांतपणे सहन करा. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आज धन लाभ होण्याची शक्यता आहे.
दिनविशेष
स्वातंत्र्यसेनानी कमलादेवी चट्टोपाध्याय
टीम अवांतर
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, संगीत नाटक अकादमी, सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज एम्पोरियम आणि क्राफ्ट्स कौन्सिल ऑफ इंडिया यासारख्या संस्था ज्यांच्या कल्पनेतून साकार झाल्या त्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म 3 एप्रिल 1903 रोजी एका सारस्वत कुटुंबात झाला. एक स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या आणि राजकारणी म्हणून कमलादेवी ओळखल्या जातात. त्यांचे वडील मंगळुरूचे जिल्हाधिकारी होते, तर त्यांची आई कर्नाटकातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील होती. महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, ॲनी बेझंट यासारखे महान स्वातंत्र्यसैनिक आणि विचारवंत यांना भेटण्याची संधी कमलादेवींना लहानपणीच मिळाली. या सर्वांचा कमलादेवींवर खूप प्रभाव होता. कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी 1926 मध्ये मद्रास प्रांतीय विधानसभेच्या एका जागेसाठी निवडणूक लढवली, परंतु केवळ 200 मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र, भारतातील निवडणूक लढवणारी पहिली महिला म्हणून त्यांचे नाव इतिहासात नोंदवले गेले. कमलादेवी यांचा सहकार चळवळीवर खूप विश्वास होता. त्यामुळे भारताच्या फाळणीनंतर निर्वासितांसाठी त्यांनी इंडियन को-ऑपरेटिव्ह युनियनची स्थापना केली. कमलादेवी यांनी लोकांच्या सहभागातून फाळणीतील निर्वासितांसाठी एक शहर वसवण्याचा विचार केला. त्यासाठी त्यांनी एक प्लॅन देखील तयार केला आणि तो प्लॅन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर ठेवला. जवाहरलाल नेहरूंनी हा प्लॅन स्वीकारला, परंतु या शहरासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. कमलादेवींनी इंडियन को-ऑपरेटिव्ह युनियनच्या मार्फत फाळणीनंतर भारतात आलेल्या निर्वासितांचं दिल्लीजवळ पुर्नवसन केलं. त्याला आज फरिदाबाद म्हणून ओळखलं जातं. कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे 29 ऑक्टोबर 1988 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले.


