दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 30 ऑक्टोबर 2025; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 08 कार्तिक शके 1947; तिथि : अष्टमी 10:05; नक्षत्र : श्रवण 18:32
- योग : शूल 07:20, गंड 30:14; करण : बालव 22:10
- सूर्य : तुळ; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:36; सूर्यास्त : 18:07
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
दुर्गाष्टमी
गोपाष्टमी
कुष्मांड नवमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. कामाच्या नवीन संधी निर्माण होतील. प्रवासाचीही शक्यता आहे. नवीन योजनांमुळे फायदा होईल. तथापि, घाईघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे नुकसान होऊ शकते. हवामान बदलामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे तब्येतीसोबत आहाराचीही काळजी घ्या.
वृषभ – आजचा दिवस चांगला जाईल. जुन्या गुंतवणुकीतून, जुन्या मित्रांकडून किंवा नातेसंबंधांमधून फायदा होऊ शकतो. शेअर्स आणि मालमत्तेतील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. भागीदारी व्यवसायात लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती प्रतिकूल असेल. कौटुंबिक समस्या देखील डोकं वर काढतील.
मिथुन – कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात, मानसिक ताण येऊ शकतो. व्यवसायात इतरांवर अवलंबून राहणे हानिकारक ठरू शकते. म्हणून, कठोर परिश्रम करून तुमची कामे स्वतः पूर्ण करा. अर्थात आवश्यकतेनुसार सहकाऱ्यांची मदत घेऊ शकता. मालमत्तेशी संबंधित कामामुळे फायदा होईल.
कर्क – आजचा दिवस संमिश्र असेल. व्यवसाय नेहमीप्रमाणेच राहील. कामाची गती कायम ठेवा. अनावश्यक चिंता टाळा. शेअर बाजारातून नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक सध्या टाळा. जुन्या गुंतवणुकीमुळे नफा होईल. विरोधक शांत राहतील. जोडीदाराच्या मदतीने आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरदार लोकांना विरोधकांकडून त्रास होईल.
सिंह – व्यावसायिकांना दिवस चांगला जाईल. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. व्यवसाय विस्तारासाठी काही नवीन योजना बनवू शकता. वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. कायदेशीर अडथळे दूर होतील. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होतील. मात्र तुमचा राग नियंत्रित करा आणि बोलण्यावर संयम ठेवा. गुंतवणूक टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
हेही वाचा – थ्रिल… आयुष्याला कलाटणी देणारं!
कन्या – आजचा दिवस शुभ आणि फलदायी असेल. व्यवसायातील जुन्या गुंतवणुकीमुळे नफा होईल, तसेच आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील. अडकलेले पैसे परत मिळतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. तुमच्यातील क्षमतेमुळे अडचणींवर मात करण्यास मदत होईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनावश्यक वाद टाळा, अन्यथा अडचणीत सापडाल.
तुळ – आजचा दिवस सामान्य राहील. अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय चांगला चालेल. व्यावसायिक प्रवास फायदेशीर होतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत नवीन योजना फायदेशीर ठरतील. पण त्याचबरोबर विचारपूर्वक काम करा, अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. जुने मित्र भेटू शकतात.
वृश्चिक – दिवस चांगला जाईल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतील. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळेल. कठोर परिश्रम यशस्वी होतील. सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल, ज्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. मात्र, शब्द आणि चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवा, अन्यथा कामाच्या ठिकाणी संघर्षाची स्थिती उद्भवू शकते.
धनु – कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम केल्यानंतरच सर्व कामांमध्ये यश मिळेल. व्यवसायात विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील, योजना यशस्वी होतील. व्यवसायासाठी किंवा ऑफिसच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.
मकर – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जास्त असेल, परंतु कठोर परिश्रम यशस्वी होतील. प्रवास फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्च वाढू शकतात, ज्यामुळे आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे. तसेच, इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा, कारण यामुळे त्रास होऊ शकतो. कुटुंबात क्षुल्लक कारणाने कलह निर्माण होऊ शकतो.
कुंभ – आजचा दिवस सामान्य असेल. मालमत्तेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नोकरीत आणि व्यवसायात अचानक नफा मिळण्याची शक्यता आहे, परंतु काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. काही गोष्टींमध्ये गोंधळ आणि अनिश्चितता असेल. किरकोळ अडचणींवर मात केली तर नक्कीच यश मिळेल. आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
हेही वाचा – लग्नाची बेडी अन् स्वच्छंद आयुष्य!
मीन – नोकरी किंवा व्यवसाय यासंदर्भात अचानक मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. मात्र कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. व्यवसाय मंदावेल आणि खर्च वाढेल. तथापि, कामाच्या नवीन संधी निर्माण होतील. काही कामांसाठी अनावश्यक पैसे खर्च होऊ शकतात. जास्त रागामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा.
दिनविशेष
अणुउर्जेच्या शांततामय उपयोगाचे पुरस्कर्ते होमी भाभा
टीम अवांतर
अणुउर्जेच्या शांततामय उपयोगाचे पुरस्कर्ते. भारतातील अणुसंशोधन व अवकाश – संशोधन कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार होमी जहांगीर भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबई येथे सधन पारशी कुंटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेजात आणि इन्स्टिटयूट ऑफ सायन्समध्ये झाले. 1934 मध्ये त्यांना केंब्रिज विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळाली. भाभा यांचे पहिले संशोधन इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन गणनेसंबंधी असून हे प्रकीर्णन त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. 1939 मध्ये भाभा सुट्टीकरिता भारतात आले होते, परंतु त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्यामुळे नंतर ते भारतातच राहिले. 1945 मध्ये भाभा यांच्या पुढाकाराने मुंबई येथे टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे ते संचालक आणि सैद्धांतिक भौतिकी विषयाचे प्राध्यापक होते. 1948मध्ये भारत सरकारच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून भाभा यांची नेमणूक झाली. ऑगस्ट 1954 मध्ये स्वतंत्र अणुऊर्जा खात्याची स्थापना करण्यात आली. या खात्याचे सचिवपद भाभा यांच्याकडेच होते. 1956मध्ये भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे येथे रशियाव्यतिरिक्त आशिया खंडातील पहिली अणुभट्टी सुरू करण्यात आली. भारतामध्ये अवकाश संशोधन कार्यक्रम सुरू करण्यात भाभा यांचा मोठा वाटा आहे. 1962 मध्ये अवकाश संशोधनासाठी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या समितीची स्थापना झाली. 1944 मध्ये म्हणजे हिरोशिमा शहरावरील अणुस्फोटाच्याही पूर्वी भाभा यांनी अणुऊर्जेचा वापर फक्त शांततामय उपयोगांकरिता व्हावा, असे विचार मांडले होते. 1955 मध्ये जिनीव्हा येथे संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या अणुऊर्जेच्या शांततामय उपयोगांवरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे भाभा अध्यक्ष होते. भाभा यांना 1942मध्ये केंब्रिज विद्यापीठाचे अँडम्स पारितोषिक आणि 1948मध्ये केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटीचे हॉपकिन्स पारितोषिक मिळाले. 1954साली त्यांना पद्मभूषण हा बहुमान भारत सरकारतर्फे देण्यात आला. 1951मध्ये भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. भाभा हे एक उत्तम चित्रकार होते आणि संगीत, वास्तुशिल्प इत्यादी कलांचेही ते चांगले जाणकार होते. 24 जानेवारी 1966 स्वित्झर्लंडमधील माँ ब्लाँ (माँट ब्लांक) या उंच शिखरावर झालेल्या भयंकर विमान अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ 12 जानेवारी 1967 रोजी तुर्भे येथील अणुसंशोधन केंद्राचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ असे नामकरण करण्यात आले.


