Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संकर्षण… अनिकेतने कोर्टात मांडली ‘पित्या’ची भूमिका!

    June 30, 2026

    Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या

    June 30, 2026

    आजच्या भाजीचा बेत…

    June 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 जून 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 जून 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJune 30, 2026Updated:June 30, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जून महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 30 जून 2026; वार : मंगळवार
    • भारतीय सौर : 09 आषाढ शके 1948; तिथि : प्रतिपदा अहोरात्र ; नक्षत्र : पूर्वाषाढा अहोरात्र;
    • योग : ब्रह्मा 15:18; करण : बालव 18:33;
    • सूर्य : मिथुन;  चंद्र : धनु;  सूर्योदय : 06:03;  सूर्यास्त : 19:19;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव

    टीम अवांतर

    भारतातील प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म बंगलोर येथे 30 जून 1934 रोजी झाला. सेंट्रल कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन ते 1951मध्ये बी. एस्‌सी. झाले.  त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठाची एम्. एस्‌सी. आणि अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठाची पीएच्.डी. या पदव्या त्यांनी संपादन केल्या.

    राव यांनी रासायनिक वर्णपटविज्ञान, रेणवीय संरचना, घन अवस्था रसायनशास्त्र आणि  पृष्ठविज्ञान या आपल्या संशोधन विषयांत नवनवीन तंत्रे वापरली. मुक्त रेणूंच्या इलेक्ट्रॉन अवस्थांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी जंबुपार फोटोइलेक्ट्रॉन वर्णपटविज्ञानाचा उपयोग केला. घन अवस्था रसायनशास्त्रात त्यांनी प्रावस्था रूपांतरण, दोषयुक्त घन पदार्थ, जटिल धातवीय ऑक्साइडांचे इलेक्ट्रॉनीय आणि चुंबकीय गुणधर्म तसेच घन पदार्थांचे वर्णपटविज्ञान या शाखांत महत्त्वपूर्ण कार्य केले. जटिल घन पदार्थांच्या गुणधर्मांचे रासायनिक बंधांच्या तत्त्वावर आधारलेले एकीकृत स्पष्टीकरण मांडण्यासाठी राव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळेत विविध ऑक्साइडे आणि नावीन्यपूर्ण संरचनेची इतर द्रव्ये कृत्रिमरित्या तयार करण्यात आली आहेत. क्ष-किरण आणि जंबुपार फोटोइलेक्ट्रॉन वर्णपटविज्ञान, ऑगर वर्णपटविज्ञान वगैरे आधुनिक तंत्रे उपयोगात आणणारी भारतातील पहिली पृष्ठविज्ञानीय प्रयोगशाळा त्यांनी विकसित केली.

    राव यांनी आपल्या संशोधन विषयांसंबंधी 12 ग्रंथ आणि 350 हून अधिक संशोधनात्मक निबंध लिहिलेले आहेत. रासायनिक भौतिकी, वर्णपटविज्ञान आणि घन अवस्था रसायनशास्त्र या विषयांवरील 12 आंतरराष्ट्रीय नियतकालिकांच्या संपादकीय मंडळांचे ते सदस्य होते.

    हेही वाचा – Rental family… आयुष्यातील गाळलेल्या जागा भरणारे!

    भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विज्ञान सल्लागार समितीचे सदस्य, भारत सरकारच्या पहिल्या विज्ञान आणि तंत्रविद्याविषयक राष्ट्रीय समितीचे सदस्य, इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे उपाध्यक्ष तसेच सचिव, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमीचे उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान मंडळाचे सदस्य यांशिवाय इतर  राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध संस्थांच्या महत्त्वाच्या पदांवर ते कार्यरत होते. जानेवारी 1988मध्ये पुणे येथे भरलेल्या भारतीय विज्ञान परिषदेच्या पंचाहत्तराव्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले.

    राव यांना यांच्या कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेले आहेत. त्यांत  फॅराडे सोसायटीचे मार्लो पदक, शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक, इंडियन केमिकल सोसायटीचे येडेनापल्ली पदक व पारितोषिक, जवाहरलाल नेहरू अधिछात्रवृत्ती, सर सी. व्ही. रामन पुरस्कार, अमेरिकन केमिकल सोसायटीची अधिछात्रवृत्ती, एस्. एन्. बोस पदक,  लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे पदक व पुरस्कार, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार यांचा समावेश आहे. 1985 मध्ये पद्मविभूषण तर 2013 साली भारत सरकारने भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित केले‌. सी.व्ही.रमन आणि माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यानंतर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे चिंतामणी नागेश रामचंद्र राव हे तिसरे शास्त्रज्ञ आहे.


     

    आजचे राशिभविष्य

    मेष – स्वतःच्या आरोग्याला आज प्राधान्य द्या. जर तुम्ही पूर्वीच्या एखाद्या समस्येकडे दुर्लक्ष केले असेल, तर ती पुन्हा उद्भवू शकते. एखादी जुनी चिंता हळूहळू दूर होत असल्याचे दिसेल.  प्रवासादरम्यान किंवा सहलीदरम्यान मिळालेली एखादी छोटीशी माहिती दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकते. आज गरजू लोकांना मदत करण्याकडे तुमचा कल असेल.

    वृषभ – आज, तुमचेच शब्द तुमचे सर्वात मोठे मित्र आणि सर्वात मोठे आव्हान दोन्ही बनू शकतात. त्यामुळे, बोलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. लहानसहान गोष्टींना अवाजवी महत्त्व देणे टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना आज उत्साहवर्धक बातमी मिळण्याची शक्यता आहे.

    मिथुन – आजचा दिवस सुखद आश्चर्ये घेऊन येऊ शकतो.  विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, परंतु सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे त्यांना यश मिळेल.   कुटुंबातील सदस्यांशी बोलताना संयम बाळगा, कारण तुमच्या बोलण्याने कोणालातरी वाईट वाटू शकते. सध्या नवीन भागीदारी पुढे ढकलणे चांगले राहील.

    कर्क –  रागाच्या भरात घेतलेला एखादा छोटासा निर्णयसुद्धा आज मोठ्या संकटात टाकू शकतो. जोडीदाराचा सल्ला गांभीर्याने घ्या, कारण त्यांच्या शब्दांमध्ये काही महत्त्वाचे संकेत असू शकतात. यश मिळवण्यासाठी, तुम्हाला स्वतःच्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. तुमची कठोर मेहनतच तुमची सर्वात मोठी साथीदार ठरेल.

    सिंह – आजचा दिवस आनंदी क्षणांनी भरलेला असू शकतो. मात्र, या आनंदात महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका. आपले उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेली पावले भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. मालमत्तेसंबंधी एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कामाच्या ठिकाणी काही मतभेद निर्माण झाल्यास, शांत राहा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा.

    कन्या – आज तुमच्या सुप्त सर्जनशीलतेला उजाळा मिळेल. नवीन कल्पना आणि योजना कामाला नवी दिशा देण्यास मदत करतील. अनुभवी सहकाऱ्याचा सल्ला देखील फायदेशीर ठरू शकतो. तुमचे काही पैसे कुठे अडकले असतील, तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून रखडलेल्या सरकारी कामाला आज गती मिळू शकते, त्यामुळे मोठा दिलासा मिळेल.

    तुळ – गाडी चालवताना आज अधिक सावधगिरी बाळगा. ज्या प्रकल्पाबद्दल तुम्ही बऱ्याच काळापासून चिंतीत होतात, त्यात प्रगतीची चिन्हे दिसू शकतात. आज आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे उत्तम. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. उच्च शिक्षणाच्या नवीन संधींमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होऊ शकतो.

    वृश्चिक – आज सुखसोयींमध्ये वाढ जाणवू शकते. भेडसावणाऱ्या चिंता हळूहळू कमी होतील. कुटुंबातील वडीलधारी मंडळी आज असा सल्ला देऊ शकतात, जो भविष्यात मोलाचा ठरेल. कामाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळू शकतो. भूतकाळातील चुकांमधून शिकत पुढे जाणे, ही आजची सर्वात मोठी शिकवण असेल.

    हेही वाचा – कोरोना काळातील ‘बावर्ची’

    धनु – कामात काही अडथळे असल्यास, ते आता दूर होण्याची शक्यता आहे. तुमची मेहनत आणि समर्पण यामुळे यशाच्या नव्या उंचीवर जाऊ शकता. आरोग्यात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. कोणत्याही दीर्घकालीन समस्या कमी होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात.

    मकर – आर्थिक बाबतीत ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत. संपत्ती आणि समृद्धी वाढण्याची चिन्हे आहेत, तसेच व्यवसायात नफा होण्याची शक्यता कायम आहे. नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि त्यापैकी काही जण तुमच्या व्यवसायाला नवीन दिशा देऊ शकतात. अनोळखी व्यक्तीवर अति विश्वास ठेवणे टाळावे.

    कुंभ – आजचा दिवस नात्यांमध्ये शांतता आणि गोडवा आणू शकतो. जोडीदारासोबत काही दुरावा किंवा मतभेद असतील, तर ते दूर होतील. आईच्या प्रकृतीबद्दलची चिंता कायम राहू शकते. महत्त्वाच्या बाबतीत वडिलांचा सल्ला अत्यंत उपयुक्त ठरेल. संततीकडून आलेली चांगली बातमी संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते.

    मीन – आज स्वतःच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित कराल. कुटुंबासोबतच्या संभाषणात संयम ठेवा. पटकन प्रतिक्रिया देणे टाळा. कोणतेही काम घाईघाईने करू नका. वैयक्तिक आणि महत्त्वाच्या गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवणे उत्तम. शासकीय कामात दीर्घकाळ येणारे अडथळे दूर होऊ शकतात.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 जून 2026

    June 29, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 28 जून ते 04 जुलै 2026

    June 28, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 28 जून 2026

    June 28, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 जून 2026

    By Team AvaantarJune 29, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 जून 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 08…

    साप्ताहिक राशीभविष्य : 28 जून ते 04 जुलै 2026

    June 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 28 जून 2026

    June 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    June 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    संकर्षण… अनिकेतने कोर्टात मांडली ‘पित्या’ची भूमिका!

    June 30, 2026

    Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या

    June 30, 2026

    आजच्या भाजीचा बेत…

    June 30, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : रोमां कवण पेरी, कोण समुद्र भरी

    June 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 जून 2026

    June 30, 2026

    बेबी स्वामीचरणी रुजू झाली…

    June 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 344
    • अवांतर 192
    • आरोग्य 124
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 472
    • फिल्मी 54
    • फूड काॅर्नर 229
    • मैत्रीण 23
    • ललित 747
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    संकर्षण… अनिकेतने कोर्टात मांडली ‘पित्या’ची भूमिका!

    June 30, 2026

    Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या

    June 30, 2026

    आजच्या भाजीचा बेत…

    June 30, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.