Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    October 5, 2026

    मायेचा ओलावा

    October 5, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – सुप्त गुण, आध्यात्मिक गुरू

    October 5, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, October 6
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 ऑक्टोबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 ऑक्टोबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 5, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 05 ऑक्टोबर 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 13 आश्विन शके 1948; तिथि : दशमी 26:07; नक्षत्र : पुष्य 23:08;
    • योग : शिव 09:50; करण : वणिज 14:58;
    • सूर्य : कन्या; चंद्र : कर्क ; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:25;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    दशमी श्राद्ध

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    लेखक, विचारवंत यदुनाथ थत्ते

    टीम अवांतर

    पत्रकार, लेखक, संपादक, समाजवादी विचारवंत यदुनाथ थत्ते यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1922 रोजी नाशिक येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच त्यांनी 1942 च्या चले जाव आंदोलनात भाग घेतला. त्यासाठी सहा महिन्यांचा कारावासही भोगला. स्वातंत्र्योत्तर काळात साने गुरुजी आणि आचार्य विनोबांची शिकवण उराशी घेऊन ती आचरणात आणली. गुरुजींच्या अखेरच्या काळात त्यांची साथसोबत केलेले थत्ते साने गुरुजी यांचे शिष्य म्हणूनच ओळखले जाऊ लागले.

    ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक आणि लोकप्रिय समाजवादी नेते म्हणून देखील थत्ते प्रसिद्ध होते.‌ साधना साप्ताहिकाला मराठी वृत्तपत्रसृष्टीत वैचारिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. मात्र साधना साप्ताहिकामधील पत्रकारिता सांभाळून त्यांनी इतरही पुष्कळ लेखन केले. त्यांची एकूण दीडशे पुस्तके प्रकाशित झाली. त्यात लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांपासून विचारवंतांना मार्गदर्शक ठरणारे ग्रंथ यांचा समावेश होता. महाराष्ट्राला आज माहिती असलेली आणि त्यांच्या आदर तसेच अभिमानाचा विषय झालेली कितीतरी माणसे थत्ते यांनीच आपल्या लेखनाद्वारे समाजासमोर पहिल्यांदा आणली.

    हेही वाचा – रोजच परीक्षा…

    आनंदवन आणि बाबा आमटे यांच्यापासून नरहर कुरुंदकर, हमीद दलवाई, शरणकुमार लिंबाळे, रझिया पटेल, यांच्याबरोबरच परिवर्तनाच्या चळवळी रुजवत खेड्यापाड्यांत ठाण मांडून बसलेले शेकडो लहानमोठ्या कार्यकर्ते थत्ते यांच्यामुळेच महाराष्ट्राला ज्ञात झाले.

    मुस्लीम समाजाच्या प्रश्नांपासून युवकांच्या चळवळींशी संबंध असणारी बरीच अप्रसिद्ध पुस्तकेही त्यांनी लिहिली. माणसे शोधण्याचा, निवडण्याचा, जोडण्याचा आणि त्यांचे कर्तृत्व समाजापुढे मांडताना ते खुलवण्या-फुलवण्याचा त्यांचा स्वभाव होता. प्रसंगी मागे उभे राहून अशा माणसांची पाठराखण देखील त्यांनी केली होती.

    त्यांनी लिहिलेली डॉ. होमी भाभा, नील्स बोहर, सी. व्ही. रमण, जगदीश्चंद्र बोस यांची चरित्रं खूप गाजली. ऑरिसन स्वेट मार्डेनच्या ‘पुशिंग टू दी फ्रंट’ या पुस्तकावर आधारित थत्ते यांनी लिहिलेली ‘पुढे व्हा’ ही तीन भागांतली पुस्तकमाला प्रचंड लोकप्रिय ठरली होती. साने गुरुजी, यशाची वाटचाल, आटपाट नगर होते, आपला वारसा, चिरंतन प्रकाश देणारी ज्योत महात्मा गांधी, समर्थ व्हा, संपन्न व्हा, आपला मान आपला अभिमान, विनोबा भावे ही त्यांची इतर पुस्तकेदेखील वाचकप्रिय ठरली.

    त्यांच्या अनेक ग्रंथांना केंद्र आणि राज्य शासनाचे साहित्य पुरस्कार मिळाले. त्यांच्या एका ग्रंथाला सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर सुवर्णपदकही लाभले. प्रेस कौन्सिलचे ते काही काळ अध्यक्षही होते. 10 मे 1998 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आज तुम्ही अनेक कामांमुळे दिवसभर व्यस्त राहाल. तुमच्यावर अचानकपणे अनेक जबाबदाऱ्या येतील, मात्र घाबरून जाण्याऐवजी प्राधान्यक्रम ठरवून पुढे जा. संततीसंबंधीची एखादी चांगली बातमी आनंद घेऊन येईल. तुमची दीर्घकाळापासूनची एखादी इच्छा पूर्ण झाल्याने समाधान मिळेल. जुनी अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला उत्साह वाटेल. घरातील एखाद्या कार्यक्रमाच्या तयारीमुळे वातावरणातील ताण कमी होऊ शकतो.

    वृषभ – आळस झटकून उत्साहाने आपल्या कामावर आज लक्ष केंद्रित कराल. नवीन जबाबदाऱ्या सुरुवातीला आव्हानात्मक वाटू शकतात, मात्र सहकाऱ्यांचा योग्य वेळी मिळणारा पाठिंबा तुम्हाला बळ देईल. बोलताना आपले शब्द काळजीपूर्वक निवडा, कारण अगदी लहानसहान शब्दांमधूनही संघर्ष निर्माण होऊ शकतो. कुटुंबात मतभेद होऊ शकतात, जे संयमाने सोडवता येतील. घराचे नूतनीकरण करण्याचा किंवा ते सुशोभित करण्याचा विचारही आज केला जाऊ शकतो.

    मिथुन – नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या एखाद्या उपक्रमाला पुढे नेण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. जोडीदारासोबतचे जुने गैरसमज संभाषणातून दूर होतील आणि तुमचे नाते पुन्हा गोड होईल. दूर राहणाऱ्या एखाद्या खास व्यक्तीच्या आठवणीने तुम्ही भावुक होऊ शकता. वाहनासंबंधी अनपेक्षित खर्च येऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. इतरांच्या संभाषणात गुंतण्याऐवजी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.

    कर्क – इतरांना मदत करण्याची आणि गरजूंना साहाय्य करण्याची इच्छा तुम्हाला आज होईल. यामुळे तुम्हाला आंतरिक समाधान मिळेल. संततीसोबत वेळ घालवण्याची किंवा सहलीला जाण्याची संधी मिळू शकते. एखादा प्रलंबित व्यवहारही मार्गी लागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी संयम बाळगा आणि वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा. प्रवासादरम्यान मिळालेली महत्त्वाची माहिती भविष्यात खूप उपयुक्त ठरू शकते.

    सिंह – आज तुमच्या मेहनतीला सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता आहे, पण कामाच्या ठिकाणी तुमचा कोणाशीतरी किरकोळ वाद होऊ शकतो. अशा परिस्थितीत शांत राहणेच उत्तम. संततीला दिलेले वचन पूर्ण करण्याची संधी मिळेल. आज वडिलांकडून तुमच्यावर एक नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते. घरात एखाद्या धार्मिक कार्यक्रमांमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होईल. प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवणे टाळा. आज आर्थिक चिंता निर्माण होऊ शकतात, पण संयमाने परिस्थिती हाताळू शकाल.

    कन्या – आज एखादी चांगली बातमी तुमचा दिवस खास बनवू शकते. व्यवसायात केलेल्या बदलांमुळे सकारात्मक परिणाम दिसू लागतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठांसोबत असलेले तुमचे नाते अधिक दृढ होऊ शकते. घराची सजावट, शॉपिंग किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याबद्दल उत्साह वाटेल. उधार दिलेले पैसे परत मिळण्याचीही आशा आहे. भावनेच्या भरात कोणताही अविचारी निर्णय घेणे टाळा, कारण यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.

    तुळ – आज, कोणतीही कृती करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे महत्त्वाचे आहे. भूतकाळातील चुकांमधून शिकणे ही तुमची सर्वात मोठी ताकद ठरू शकते. विनाकारण सल्ला देणे टाळा आणि आपल्या सभोवतालची परिस्थिती समजून घेतल्यानंतरच पुढे जा. प्रवासादरम्यान आवश्यक आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. आर्थिक अडचण निर्माण झाली तर भावाकडून किंवा जवळच्या मित्राकडून तुम्हाला मदत मिळू शकते, ज्यामुळे तुमची चिंता लक्षणीयरीत्या कमी होईल.

    वृश्चिक – आज, आत्मविश्वासाने यश आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. कुटुंबातील वडीलधाऱ्या सदस्यांच्या भावना समजून घेतल्याने आणि त्यांचा आदर केल्याने नातेसंबंध अधिक दृढ होतील. मालमत्ता किंवा घराच्या विभागणीबाबत चर्चा होऊ शकते, परंतु घाई करू नका. सध्या काही  चिंतांमुळे थोडी अस्वस्थता येऊ शकते. संततीच्या शिक्षणाविषयी किंवा भविष्याविषयी घेतलेले महत्त्वाचे निर्णय भविष्यात सकारात्मक परिणाम देऊ शकतात.

    हेही वाचा – बत्तीस गुण जुळणारी पत्रिका!

    धनु – आज, सुज्ञ आणि संतुलित निर्णयांमुळे दिलासा मिळेल. संततीसोबत वेळ घालवल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. काही काळापासून तुम्हाला सतावणारी कामाची चिंता हळूहळू कमी होईल. पाहुण्यांच्या आगमनाने घरातील आनंदात भर पडू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. एखादी मोठी इच्छा पूर्ण झाल्याने आनंद मिळू शकतो. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

    मकर – आज घरीआणि कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येऊ शकतात. कुटुंबात नवीन पाहुण्याच्या आगमनाने आनंदी वातावरण निर्माण होईल. गुंतवणुकीतून किंवा शेअर बाजारातून नफा मिळण्याची शक्यता आहे, मात्र कोणाच्यातरी सल्ल्यानुसार घाईचे निर्णय घेणे टाळा. तुमच्या कामाची प्रशंसा तुमची ओळख आणि आत्मविश्वास दोन्ही वाढवेल. भागीदारीत केलेल्या कामातून अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमचे मन ताजेतवाने करेल.

    कुंभ – आज तुम्ही उत्साहाने परिपूर्ण असाल. तुम्हाला एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे लोकांमध्ये तुमची ओळख आणि आदर वाढेल. आईला दिलेले वचन पूर्ण करण्याचा आज प्रयत्न कराल. संतती त्यांच्या करिअर किंवा नोकरीशी संबंधित एखाद्या महत्त्वाच्या बाबतीत तुमचा सल्ला घेऊ शकतात. व्यवसायात काही चढ-उतार येतील, परंतु तुमचे शहाणपण आणि अनुभव तुम्हाला परिस्थिती हाताळण्यास मदत करतील.

    मीन – आज कुटुंबासोबत आनंदी आणि निवांत क्षण घालवण्याची संधी मिळेल. संभाषणातून जुने मतभेद मिटतील आणि नातेसंबंध पुन्हा सुधारतील. इतरांबद्दल मत्सर किंवा नकारात्मकता बाळगण्याऐवजी, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जा. तुम्हाला प्रवासासाठी किंवा तुमच्या आवडत्या छंदांसाठी वेळ मिळू शकेल. शासकीय योजनांचे लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात, मात्र त्यांच्या आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष देणे योग्य ठरेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – सुप्त गुण, आध्यात्मिक गुरू

    October 5, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 04 ते 10 ऑक्टोबर 2026

    October 4, 2026 पंचांग आणि भविष्य

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रवृत्ति पेललें पोट, निवृत्ति ते पाठी नीट

    October 4, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – सुप्त गुण, आध्यात्मिक गुरू

    By ज्योतिषी हृषिकेश पानकरOctober 5, 2026

    जीवनप्रवास उलगडणारे 100 ज्योतिषीय मार्गदर्शक सूत्रे – 66) आयुष्यभर – आकलन क्षमता आणि शिक्षणातील अडथळे…

    साप्ताहिक राशीभविष्य : 04 ते 10 ऑक्टोबर 2026

    October 4, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रवृत्ति पेललें पोट, निवृत्ति ते पाठी नीट

    October 4, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 04 ऑक्टोबर 2026

    October 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    October 5, 2026

    मायेचा ओलावा

    October 5, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – सुप्त गुण, आध्यात्मिक गुरू

    October 5, 2026

    ‘कुब्जा’… कृष्णप्रेम माझ्यास्तव!

    October 5, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं उंचानीचा डाहाळिया, विषमा वेगळालिया

    October 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 ऑक्टोबर 2026

    October 5, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 459
    • अवांतर 215
    • आरोग्य 155
    • पंचांग आणि भविष्य 615
    • फिल्मी 70
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 973
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    October 5, 2026

    मायेचा ओलावा

    October 5, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – सुप्त गुण, आध्यात्मिक गुरू

    October 5, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.