नाश्त्यात अनेकांना ब्रेड खायला आवडतो. काहींना ब्राऊन ब्रेड आवडतो, तर काहींना व्हाइट ब्रेड. पण हे कितपत आरोग्यदायी आहे, हे खूप कमी लोकांना माहिती असेल. नकळत कमी दर्जाचा ब्रेड खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ब्रेडच्या क्वालिटीबाबत जाणून घ्यायचं असल्यास ब्रेड पॅकेटवरील लेबल नक्की वाचा. पॅकेज्ड ब्रेड आणि त्याच्या ब्रँडबद्दल अनेक महत्त्वाची माहिती या लेबलवर दिलेली असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही दुकानातून ब्रेड खरेदी कराल, तेव्हा पॅकेटवरील लेबल नक्की चेक करा.
ब्रेड घेताना या 6 गोष्टी लक्षात ठेवा –
- साखरेचे प्रमाण
- सोडियम / मीठाचे प्रमाण
- Ingredients List
- Best Before / Expiry Date
- Preservatives / Additives
- Dietary Fiber
साखरेचे प्रमाण तपासा
ब्रेड बनवण्याच्या प्रक्रियेत यीस्ट सक्रिय करण्यासाठी साखरेचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे ब्रेड खरेदी करताना त्यात साखर किंवा इतर स्वीटनर किती प्रमाणात आहे, हे लेबलवर तपासा.
हेही वाचा – टेंशन आहे? मग शुगर तपासून घ्या!
मीठ / सोडियमचे प्रमाण तपासा
साखरेप्रमाणेच ब्रेडमध्ये मीठाचाही वापर केला जातो. काही ब्रेडमध्ये चव वाढवण्यासाठी सोडियमचे प्रमाण तुलनेने जास्त असू शकते. त्यामुळे Nutrition Facts / Nutritional Information मध्ये दिलेले Sodium (सोडियम) आणि Salt (मीठ) यांचे प्रमाण नक्की तपासा.
ब्रेडमध्ये कोणते पीठ वापरले आहे, ते पाहा
ब्राऊन ब्रेड, गव्हाचा ब्रेड आणि मल्टी-ग्रेन ब्रेड हे आरोग्यासाठी फायदेशीर असतीलच असे नाही. काही उत्पादनांमध्ये गव्हाच्या पिठासोबत इतर प्रकारचे पीठ किंवा रिफाइंड पीठ वापरलेले असू शकते. त्यामुळे Ingredients (घटकांची यादी) नक्की वाचा.
एक्सपायरी / Best Before तारीख तपासा
ब्रेड खरेदी करताना सर्वप्रथम त्यावरील Expiry / Best Before तारीख तपासा. तारीख उलटल्यानंतर ब्रेड खाऊ नका.
हेही वाचा – HbA1c… मधुमेह नियंत्रणाचं प्रतिबिंब
प्रिझर्वेटिव्ह आणि ॲडिटिव्हकडे लक्ष द्या
ब्रेडचा ताजेपणा आणि टिकण्याचा कालावधी वाढवण्यासाठी काही उत्पादनांमध्ये Preservatives आणि Food Additives वापरले जाऊ शकतात. त्यामुळे Ingredients List वाचून तुम्ही काय खरेदी करत आहात हे समजून घ्या.
फायबरचे प्रमाण तपासा
फायबर हे आहारातील महत्त्वाचे पोषक घटक आहे. त्यामुळे ब्रेड खरेदी करताना Nutrition Factsमध्ये दिलेले Dietary Fiberचे प्रमाण नक्की तपासा.
फक्त ‘Brown’, ‘Multigrain’ किंवा ‘Healthy’ असे नाव पाहून ब्रेड खरेदी करू नका. पॅकेटवरील लेबल वाचा आणि माहितीपूर्ण निवड करा!
(सौजन्य – समर्थ आरोग्य फाऊंडेशन)
संपर्क – 9150014545


