सततचा स्ट्रेस, टेन्शन म्हणजेच चिंता आणि कौटुंबिक / कामाचा ताण फक्त मनालाच नाही तर रक्तातील साखरेच्या (Blood Sugar) बाबतीतही धोकादायक ठरू शकतो!
असं का होतं?
तणावाच्या वेळी शरीरात Adrenaline आणि Cortisol हे हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स यकृताला (Liver) जास्त प्रमाणात Glucose रक्तात सोडण्यास सांगतात.
परिणाम…
- Blood Sugar अचानक वाढते.
- Insulin चा प्रभाव कमी होतो.
- Insulin Resistance वाढू शकतो.
म्हणूनच, सतत टेन्शनमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची…
- शुगर नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.
- औषधांची गरज वाढू शकते.
- आणि दीर्घकाळात मधुमेहाचा धोकाही वाढू शकतो.
हेही वाचा – HbA1c… मधुमेह नियंत्रणाचं प्रतिबिंब
शुगर नियंत्रणात ठेवायची असेल तर…
- टेन्शन कमी करा.
- रोज 30 मिनिटे चालणे/ व्यायाम करा.
- 7–8 तास शांत झोप घ्या.
- सकारात्मक विचार करा.
- साखर, मैदा आणि जंक फूड कमी करा.
- ताजे, हलके आणि घरचे अन्न सेवन करा.
- नियमित शुगर तपासणी करा.
Allopathic औषधांबद्दल…
- डॉक्टरांनी दिलेल्या शुगरच्या गोळ्या किंवा इन्सुलिन हे शुगर नियंत्रणासाठी महत्त्वाचे असतात.
- डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे कमी किंवा बंद करू नयेत.
- अचानक औषध बंद केल्यास शुगर धोकादायकरीत्या वाढू शकते.
औषधांमध्ये बदल करायचा असल्यास डॉक्टरच तपासून याबाबतचा निर्णय घेतात.
शुगर जास्त असल्यास काय धोके?
दीर्घकाळ शुगर नियंत्रणात नसल्यास शरीराच्या विविध अवयवांवर परिणाम होऊ शकतो.
- डोळ्यांवर परिणाम
- किडनीचे नुकसान
- पायातील नसांवर परिणाम
- हृदयविकाराचा धोका
म्हणूनच शुगर नियंत्रण सर्वात महत्त्वाचे आहे. योग्य उपचार + योग्य आहार + नियमित व्यायाम + निरोगी जीवनशैली यामुळे मधुमेह चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवता येतो.
हेही वाचा – शरीरात वात आणि पित्त वाढवण्याचे एक कारण — अहंकार!
आयुर्वेद आणि नैसर्गिक उपायांची भूमिका
- आयुर्वेदिक काढे
- वनौषधी
- आहार सुधारणा
- जीवनशैलीतील बदल
हे काही बाबतीत सहाय्यक (Supportive) ठरू शकतात, जसे की –
- पचन सुधारण्यासाठी
- वजन नियंत्रणासाठी
- शरीराची ऊर्जा आणि आरोग्य सुधारण्यासाठी
लक्षात ठेवा… “मन शांत… तर शुगरही नियंत्रणात!”
(सौजन्य – समर्थ आरोग्य फाऊंडेशन)
संपर्क – 9150014545


