Author: तृप्ती देव

Avatar photo

मी भिलाई (छत्तीसगड) येथे वास्तव्यास असलेली गृहिणी आणि हौशी लेखिका आहे. मला स्वयंपाक, वाचन आणि लेखनाची विशेष आवड आहे. खाद्यसंस्कृती, सामाजिक विषय, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन जीवनातील अनुभवांवर मी ब्लॉग लेखन करते. कथाविश्व तसेच इतर विविध व्यासपीठांवर माझे लेख प्रकाशित होत असतात. एखादा विषय मनाला भिडला की, त्यावर सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून लिहिण्याचा मी प्रयत्न करते. भिलाई वनवासी महिला संघटनेची सदस्य म्हणून सामाजिक कार्यातही माझा सहभाग आहे. शब्दांच्या माध्यमातून सकारात्मक विचार, संस्कार आणि जीवनमूल्ये वाचकांपर्यंत पोहोचवणे हेच माझ्या लेखनाचे उद्दिष्ट आहे.

मालती नावाची एक साधी, परंतु मेहनती स्त्री छोट्याशा घरात राहणारी. चार-पाच घरांत कामं करत होती. तिच्या जीवनाची साधी ओळख म्हणजे ती दोन मुलांची आई आणि धुणं-भांडी, लादी पुसणारी कामवाली बाई! आपल्या मुलांची भूक भागवण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी ती मेहनत करत होती आणि तिच्या डोक्यावर घराचं ऋणाचही ओझं होतंच. आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य आपल्या मुलांना देण्यासाठी ती सदैव कामाच्या शोधात असायचे. एकेदिवशी ती जिथे काम करत होती त्या देशपांडे कुटुंबीयांनी एका समारंभासाठी घरातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम लॉकरमधून बाहेर काढली होती. ते सर्व सांभाळून एका कपाटात ठेवले होते… कुटुंबीयांना याची फार काळजी होती. संध्याकाळी सर्वजण बाहेर गेले होते, आणि मालती आपले नेहमीचे…

Read More

मुलाच्या लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात केली आणि एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश झाला. एकीकडे काही मुलींच्या पालकांच्या अपेक्षा वाचून चकित झालो – “CTC, वार्षिक मूलभूत पगार (Basic Pay) किमान 20 लाख असावा, स्वतःचं घर असावं, गाडी असावी, विदेश प्रवास केलेला असावा…” माझ्या मनात प्रश्न उमटला – लग्नासाठी ‘वर’ शोधतोय की ‘इन्व्हेस्टमेंट प्लॅन’? पण त्याच वेळेस काही पालक भेटले, ज्यांचं म्हणणं खूप साधं आणि मनाला स्पर्शून जाणारं होतं – “आम्हाला फक्त चांगला मुलगा हवा, जो आमच्या मुलीला समजून घेईल, तिला सुरक्षित ठेवेल, आणि खंबीर साथ देईल.” त्यांच्या डोळ्यांत अपेक्षांपेक्षा विश्वास जास्त होता. मुलाच्या पगारापेक्षा त्याच्या स्वभावात त्यांना घरपण दिसलं. पालकांची भीती समजते…

Read More

रविवारचा दिवस. संपूर्ण आठवड्याच्या धावपळीनंतर एक निवांत श्वास घेण्याचा दिवस. घरात सगळे जमलेले असतात. कुणाला उठायला उशीर होतो, कुणी पेपर वाचत असतो, कुणी चहा घेऊन टेरेसवर बसलेलं असतं. पण एक गोष्ट ठरलेली असते – आज जेवण स्पेशल असणार! हॉटेलिंग? ऑनलाइन फूड? छे! आमच्यासारख्या मध्यमवर्गीय घरांमध्ये या ‘लक्झरी’ गोष्टी फार कमीच परवडतात. त्यात आजीचं वाक्य आठवतं – “हॉटेलात पैशाने स्वाद मिळतो, पण घरात मनाचे प्रेम!” म्हणूनच आज आईच्या हातचा बटाट्याचा रस्सा, पापड, कोशिंबीर, गरमागरम पोळ्या आणि एखादं गोड – कधी श्रीखंड तर कधी फक्त गुलाबजाम! बाबा रेडिओवर गाणी लावतात – ‘मेरे सपनों की रानी कब आएगी तू…’ आणि स्वयंपाकघरातून येणारा फोडणीचा…

Read More

आयुष्याचा खरा प्रवास कधी सुरू होतो, हे कळतच नाही. पण जेव्हा एखादा जुना फोटो हातात येतो, तेव्हा जाणवतं – आपण किती दूर आलो आहोत! लग्नाचे फोटो, मुलाच्या बारशाचे फोटो, त्याच्या जावळाचे फोटो… आणि कुटुंबातल्या विविध समारंभांचे फोटो – प्रत्येक क्षणात आठवणी रुजलेल्या असतात. फोटो बघताना, त्या आठवणी नकळत मनाच्या कपाटातून बाहेर येतात आणि आपण क्षणभर भूतकाळात हरवून जातो. आज माझ्यासमोर दोन फोटो आहेत – ‘एक माझ्या लग्नाचा आणि दुसरा माझ्या मुलीच्या लग्नाचा!’ दोन्ही फोटो सारखेच वाटतात – पारंपरिक साडी… नऊवारी… वधू-वर… वधूने केसात माळलेला गजरा… मखराचं शुभचिन्ह… फुलांनी सजवलेली मांडवाची पार्श्वभूमी… आणि डोळ्यांत लपलेला हर्षवायू… पण तरी एक फरक स्पष्ट…

Read More

गणपतराव आणि रमाबाई काळे यांचं छोटंसं पण प्रेमळ जग होतं. गावाच्या शाळेत दोघंही शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांचं घर म्हणजे ज्ञान, साधेपणा आणि मायेचा संगम. आर्थिकदृष्ट्या फारशी सुस्थिती नव्हती, पण नात्यातली श्रीमंती त्यांच्याकडे मनसोक्त होती. एक साधा आयुष्य पण आनंदाने जगत होते. आनंदाचा कारण म्हणजे, त्यांच्या संसारातील. दोन गोंडस मुली  – संध्या आणि नीला. पण गणपतरावांच्या मनात मात्र एक सल होती – “मुलगाच नाही आपल्याला… म्हातारपणाचं काय?” पण रमाबाई त्यांना सावरत म्हणायच्या, “आपल्या मुलीच आपला आधार बनतील. आपण त्यांना घडवूया असं की, जग आपल्याला म्हणेल – धन्य आहेत ही पोरं आणि त्यांचे आईवडील!” संध्या आणि नीला यांच्या लहानपणी घर…

Read More

हाजमोलाची ती टीव्हीवरील जुनी जाहिरात आठवली की, आजही चेहऱ्यावर नकळत हसू फुलतं. रात्रीच्या अंधारात हॉस्टेलच्या बेडवर लपूनछपून ती चटपटीत गोळी खाणारी मुलं, आणि अचानक गुरुजी आल्यावर घाबरून “हाजमोला, सर!” म्हणणारा तो निरागस चेहऱ्याचा मुलगा… हाजमोला म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची आणि तोंडाला चव आणणारी एक मज्जाच होती. पण आज सकाळी जेव्हा चहाचा घोट घेत घेत मी हातात वर्तमानपत्र घेतलं आणि बातम्या वाचायला सुरुवात केली, तेव्हा ती जुनी आठवण आणि शेजारीच डायनिंग टेबलवर ठेवलेली हाजमोलाची बाटली एका वेगळ्याच वास्तवात घेऊन गेली. वर्तमानपत्रात बातमी एका मोठ्या, नामांकित ब्रँडची होती — ज्या ‘डाबर’ कंपनीवर पिढ्यानपिढ्या लोकांनी डोळे बंद करून विश्वास ठेवला, जी कंपनी…

Read More

काल एका मैत्रिणीच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर नजर गेली. एक सुंदर फोटो – नवरा, बायको, आणि तीन वर्षांची गोड मुलगी. दोघींनी फ्रॉक घातले होते – गुडघ्याच्या थोडं वरचे. फोटोमध्ये सर्वकाही हसतमुख, प्रसन्न. पण तो फोटो पाहून डोळ्यांत एक प्रश्न झिरपत राहिला – लहान कोण? आई की मुलगी? आता नवीनच युग आहे. आई हे एक ‘टायटल’ आहे, वयाचा किंवा परिपक्वतेचा मुद्दा नाही. आई हे ‘लूक’ आहे, इंस्टाग्रामवर फिल्टर लावून फिट बसवायचा! आणि या लूकला अनुसरून सगळे ड्रेसकोडही अपडेट होत आहेत. पूर्वी मुलगी फ्रॉक घालायची, आईने साडी किंवा सलवार-कुर्ता घालायचा. आज, आईही फ्रॉकमध्ये आणि मुलगीही! फरक इतकाच – आईचा ब्रँडेड, मुलीचा कार्टून प्रिंटेड… मुलगी…

Read More

“अभिनंदन! यंदाच्या राज्यस्तरीय भव्य कथालेखन स्पर्धेसाठी तुमची मुख्य अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.” सकाळी सकाळी मोबाइल स्क्रीनवर चमकलेला तो अनपेक्षित संदेश वाचून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. चहाचा गरम कप तसाच हातात धरून मी तो संदेश एकामागून एक दोन-तीनदा वाचला. चेहऱ्यावरचं हसू ओसंडून वाहत होतं आणि कित्येक दिवसांची माझी कठोर मेहनत आज फळाला आली, असं मला वाटत होतं. मी मनातून खूप सुखावले, पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही, कारण पुढच्याच मिनिटाला कमिटीकडून दुसरा एक सविस्तर मेसेज आला… त्या नव्या संदेशात पुढची अट आणि नियम लिहिले होते. त्यात लिहिलं होतं, “यंदाच्या अंतिम फेरीचा मुख्य विषय – मर्डर मिस्ट्री म्हणजेच…

Read More

फ्रीज बिघडला… टीव्ही बंद… वाय-फाय डाऊन… शनिवारी सकाळपासून घरात अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखं वातावरण होतं. “आता यालाही काहीतरी झालं वाटतं!” – तो कपाळावर हात मारत फ्रीजकडे पाहात होता. सहा वेळा प्लग काढून लावला… टीव्हीचा रिमोटही चालेनासा झाला… नेट कनेक्शन गायब… सगळीकडे जणू “No Signal”. तो चिडून म्हणाला, “हे घर आहे की, संकट केंद्र? दर आठवड्याला काहीतरी बिघडतंय.” त्या आवाजावर ती स्वयंपाकघरातून बाहेर आली. ओढणी खांद्यावर टाकत, केस मानेवरून बाजूला करत तिने विचारलं, “काय झालं?” हेही वाचा – कार्यक्रम कांदेपोह्यांचा! “काय झालं? बघ ना, फ्रीज बंद, टीव्ही बंद, वाय-फाय नाही… म्हणजे मी इथे घरात राहत आहे की, तुटक वस्तूंमध्ये?” ती थोडं हसली.…

Read More

A few words of appreciation uplift the other person’s spirits ‘कौतुक’… एक जादुई शब्द तृप्ती देव “अगं सुनबाई, तांदूळ थोडे कमी घे, कालचा भात उरलाय अजून,” सासूबाई म्हणाल्या, “ओट्यावर भांडी आहेत, ती पण लावून ठेव.” “हो आई, लक्षात ठेवलंय…” सुनबाईने सौम्यपणे हसून उत्तर दिलं. ती अजूनही स्वयंपाकघरात फुरसतीनं स्थिरावत नव्हती. चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. नवीन घर, नवीन माणसं, आणि त्या सगळ्यांच्या सवयी समजून घेताना ती आपल्याच विचारात हरवून जात होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ती स्वतःसाठी थांबत नसे. स्वयंपाक, आवराआवरी,  सासूचं सासऱ्याचं वेळवर जेवण, नवऱ्याची तयारी… सगळं सुरळीतपणे व्हावं म्हणून ती धडपडत राहायची. पण या सगळ्यात एक गोष्ट कायम…

Read More