Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: तृप्ती देव
मी भिलाई (छत्तीसगड) येथे वास्तव्यास असलेली गृहिणी आणि हौशी लेखिका आहे. मला स्वयंपाक, वाचन आणि लेखनाची विशेष आवड आहे. खाद्यसंस्कृती, सामाजिक विषय, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन जीवनातील अनुभवांवर मी ब्लॉग लेखन करते. कथाविश्व तसेच इतर विविध व्यासपीठांवर माझे लेख प्रकाशित होत असतात. एखादा विषय मनाला भिडला की, त्यावर सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून लिहिण्याचा मी प्रयत्न करते. भिलाई वनवासी महिला संघटनेची सदस्य म्हणून सामाजिक कार्यातही माझा सहभाग आहे. शब्दांच्या माध्यमातून सकारात्मक विचार, संस्कार आणि जीवनमूल्ये वाचकांपर्यंत पोहोचवणे हेच माझ्या लेखनाचे उद्दिष्ट आहे.
झाडावरची नैसर्गिक कच्ची केळी जेव्हा अनैसर्गिक पद्धतीने पिकवून बाजारात येतात, तेव्हा गृहिणीच्या मनात एकच प्रश्न असतो… “ही केळी लवकर खराब तर होणार नाहीत ना?” घरी आणलेली ती टपोऱ्या रंगाची केळी रोज माझ्याकडे पाहत असतात आणि मी त्यांच्याकडे! “आज कोण खाणार?” “उद्या खाऊ…” “अजून आहेत की!” असा संवाद घरात सुरू असतो. हेही वाचा – शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका” दोन-तीन दिवसांतच केळी आपला रंग बदलायला लागतात. आधीच घाईघाईत पिकवलेली असल्यामुळे घरी आल्यावर ती आणखी भराभर मऊ पडतात आणि मग घरातल्या प्रत्येकाचा एकच सूर… “मला नको केळं!” खरं सांगायचं तर, केळं आजकाल फारसं कुणाचं आवडतं फळ राहिलेलं नाही. मग अशा वेळी…
आजकाल शुगर हा विषय इतका कॉमन झाला आहे की, चार लोक जमले की त्यात एक तरी शुगरचा पेशंट नक्की असतो. मग चर्चा सुरू होते… “हे खायचं नाही…” “ते खाणं बंद…” “गोड तर अजिबात नाही…” “पोळ्या कमी करा…” ऐकून असं वाटतं की आता खायला काहीच उरलं नाही! खरंतर, आजार कोणाला व्हावा किंवा होऊ नये, हे आपल्या हातात नसतं. पण तो झाल्यानंतर स्वतःची काळजी कशी घ्यायची, हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं. माझ्या एका मैत्रिणीच्या मिस्टरांना डायबिटिसचं निदान झालं, तेव्हा डॉक्टरांनी एक वेगळाच सल्ला दिला… गव्हाच्या पोळ्या कमी करा किंवा बाद करा आणि आहारात ज्वारी, बाजरी, नाचणीबरोबर जवाची पोळी / भाकरी सुरू…
कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे दिसायला अगदी साधे असतात; पण त्यात दडलेल्या भावना आयुष्यभर मनात घर करून राहतात. “पाहणं” हा शब्द उच्चारला की, घरात एक वेगळंच वातावरण तयार होतं. उत्सुकता… धडधड… संकोच… आनंद… आणि भविष्याची एक हळवी चाहूल… पण या सगळ्यांच्या मध्यभागी कायम असतो एक साधासुधा पदार्थ — कांदेपोहे! त्या दिवशी सुमनच्या घरात सकाळपासूनच लगबग सुरू होती. आई कधी पडदे नीट करत होती, तर कधी टेबलावर ठेवलेली फुलदाणी सरळ करत होती. बाबा पाहुण्यांच्या येण्याची वेळ पुन्हा पुन्हा घड्याळात पाहत होते. स्वयंपाकघरातून फोडणीचा खमंग सुगंध संपूर्ण घरभर दरवळत होता. थोड्याच वेळात दारावरची बेल वाजली. मुलाकडची मंडळी आली. स्वागत…

