Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    August 13, 2026

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, August 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आई लहान की मुलगी?
    ललित

    आई लहान की मुलगी?

    तृप्ती देवBy तृप्ती देवAugust 13, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, तृप्ती देव, लेखिका तृप्ती देव, आई मुलगी नाते, वयाचे सौंदर्य, वयपरत्वे सौंदर्य, आईची परिपक्वता, आईचे संस्कार, आई हीच सगळ्यात सुंदर स्टाईल, आईचे काळाचे भान, आईचा मुलीसमोर आदर्श,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    काल एका मैत्रिणीच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर नजर गेली. एक सुंदर फोटो – नवरा, बायको, आणि तीन वर्षांची गोड मुलगी. दोघींनी फ्रॉक घातले होते – गुडघ्याच्या थोडं वरचे. फोटोमध्ये सर्वकाही हसतमुख, प्रसन्न. पण तो फोटो पाहून डोळ्यांत एक प्रश्न झिरपत राहिला – लहान कोण? आई की मुलगी?

    आता नवीनच युग आहे. आई हे एक ‘टायटल’ आहे, वयाचा किंवा परिपक्वतेचा मुद्दा नाही. आई हे ‘लूक’ आहे, इंस्टाग्रामवर फिल्टर लावून फिट बसवायचा! आणि या लूकला अनुसरून सगळे ड्रेसकोडही अपडेट होत आहेत.

    पूर्वी मुलगी फ्रॉक घालायची, आईने साडी किंवा सलवार-कुर्ता घालायचा. आज, आईही फ्रॉकमध्ये आणि मुलगीही! फरक इतकाच – आईचा ब्रँडेड, मुलीचा कार्टून प्रिंटेड… मुलगी शृंगार करते, पण आईचा शृंगार – ‘री-टच’ आणि ‘फेस फिल्टर’चा!

    आई ही आता ‘आई’ कमी, इन्स्टा मॉम जास्त. ‘क्यूट दिसावं’ ही गरज आता लहानग्यांपुरती मर्यादित नाही, तर आईच्या हक्काची झाली आहे. कपडे आपल्याला शोभतात का? हा विचार मागे पडून, हे कपडे मला किती लहान दाखवतात? असा विचार पुढे आला आहे.

    वयाला शोभेल असं काही उरलं आहे का?

    म्हणजे आता 35-40 वयाच्या महिला – ज्यांनी घर, ऑफिस, बाळंतपण सगळं पार केलं आहे – त्या पुन्हा ‘प्ले-स्कूल’मधल्या स्टाईलमध्ये का?

    हेही वाचा – पोळी बदलली… आणि विचारही!

    कोणी म्हणतील – “का नाही? स्वातंत्र्य आहे!” बरोबर आहे. पण स्वातंत्र्याचा अर्थ जर फॅशनच्या नावाखाली परिपक्वतेचा पराभव असेल, तर हे ‘स्टायलिश’ नसून गोंधळलेलं वाटतं.

    बाळगोपाळांसोबत फ्रॉक घालणं हे आता bonding नव्हे, ब्रँडिंग झालं आहे. फ्रॉक लहान मुलींना शोभतो, कारण त्यांच्या वयाला, त्यांच्या चंचल चालण्या–बोलण्याला तो सहज सुंदर वाटतो. पण आईने जर तोच फ्रॉक मुलीसोबत घातला, तर प्रश्न निर्माण होतो – आई लहान झाली की, आईला मुलीसारखं दिसायचं आहे?

    ‘आई होणं’ ही जबाबदारी आहे, शोभा नव्हे.

    थोडे पांढरे केस यावेत, थोडा थकवा जाणवावा, हे सौंदर्य आहे. मुलांनीही आईकडून यथायोग्य वाढण्याची शैली, कपड्यांची नीटपणा, वागण्याची शिस्त – हे शिकावं. पण आज आई शिकतेय – लहान दिसायचं! काहीही करून, वय लपवायचं. मग मुलगी काय शिकणार?

    आई आणि मुलगी यांच्यातील सीमारेषा जेव्हा ‘ड्रेस साईज’वर ठरू लागतात, तेव्हा संस्कारांचं काय? म्हणूनच, फ्रॉक कोणाला शोभतो यापेक्षा, कशामुळे कोण शोभून दिसतो हे समजून घेणं महत्त्वाचं.

    फ्रॉक लहान मुलीसाठी ठेवा. आईसाठी ‘आई’ हीच सगळ्यात सुंदर स्टाईल आहे – प्रेमळ, सजग, आणि स्वतःच्या वयाचा अभिमान बाळगणारी.

    अर्थात, इथे फॅशनवर आक्षेप नाहीये. बदल स्वीकारणं हे गरजेचं आहे, पण तो बदल स्वतःचा चेहरा पुसून टाकणारा नको! फॅशन करताना, स्वतःचं वय, स्थान आणि जबाबदारी विसरू नये. मुलींसोबत फ्रॉक घालणं क्यूट (Cute) वाटतं, पण त्यात आईपणाची थोडी गंमत हरवते. कारण, बाळाच्या वाढीचं अनुकरण आई करते, हे जग थोडं उलट झालं का?

    शेवटी एकच सांगावंसं वाटतं. आई कधीच लहान होत नाही, ती मोठी होते – प्रेमात, काळजीत, आणि प्रत्येक पावलागणिक वयात! ‘आई’ ही संज्ञा ही काळाच्या एका टप्प्यावर न थांबता, अनुभवांच्या पायऱ्यांवर चढत राहते.

    ती फ्रॉकमध्ये दिसो किंवा साडीत – तिचं खरं सौंदर्य हे तिच्या वयात आहे, लूक्समध्ये नव्हे! आईने तिच्या वयाचं गोडपण अंगीकारलं, तरच मुलगी मोठं होण्याचं स्वप्न पाहू शकेल. आईसाठी, तिच्या परिपक्वतेचं सौंदर्य – हेच सर्वात मोठं सौंदर्य आहे.

    हेही वाचा – कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    अगदी लहान मुलींसारखा ड्रेस घालून जर “मी अजूनही कॉलेजला जाते,” असं दाखवायचा प्रयत्न असेल, तर त्यात खोटेपणा येतो. फॅशन ही वय लपवण्यासाठी नसून, वय स्वीकारून साजेसं काही परिधान करण्यासाठी असावी. ‘क्लासिक सौंदर्य’ हे टिकून राहतं – जे ट्रेंडनुसार नाही, तर संस्कारांनुसार घडतं.

    म्हणूनच, आईने फॅशनेबल नक्की व्हावं, पण परिपक्व फॅशनेबल… अहंकाराने नाही, आत्मभानाने! फॅशनेबल कपडे जरूर घालावेत, पण आईच्या स्वरूपाला शोभेल असेच घालावेत.

    – “वयाच्या रेषा लपवता येतात, पण परिपक्वतेचा प्रकाश डोळ्यातून झळकतोच!”


    हे माझे वैयक्तिक विचार आहे, त्यामुळे याच्याशी सगळे सहमत असतील, असं नाही.

    Avatar photo
    तृप्ती देव

    मी भिलाई (छत्तीसगड) येथे वास्तव्यास असलेली गृहिणी आणि हौशी लेखिका आहे. मला स्वयंपाक, वाचन आणि लेखनाची विशेष आवड आहे. खाद्यसंस्कृती, सामाजिक विषय, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन जीवनातील अनुभवांवर मी ब्लॉग लेखन करते. कथाविश्व तसेच इतर विविध व्यासपीठांवर माझे लेख प्रकाशित होत असतात. एखादा विषय मनाला भिडला की, त्यावर सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून लिहिण्याचा मी प्रयत्न करते. भिलाई वनवासी महिला संघटनेची सदस्य म्हणून सामाजिक कार्यातही माझा सहभाग आहे. शब्दांच्या माध्यमातून सकारात्मक विचार, संस्कार आणि जीवनमूल्ये वाचकांपर्यंत पोहोचवणे हेच माझ्या लेखनाचे उद्दिष्ट आहे.

    Related Posts

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026 ललित

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    August 13, 2026 ललित

    सुधीरचे वास्तव अन् जुई!

    August 12, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    शार्वीची वेगळी खेळी

    By Team AvaantarAugust 13, 2026

    पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 10 पार्थने दिलेला नकार शार्वीला पचता पचत नव्हता. तिचं त्याच्यावर…

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    August 13, 2026

    सुधीरचे वास्तव अन् जुई!

    August 12, 2026

    एआयच्या पलीकडे…

    August 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    August 13, 2026

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026

    आई लहान की मुलगी?

    August 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे

    August 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 ऑगस्ट 2026

    August 13, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 394
    • अवांतर 204
    • आरोग्य 138
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 531
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 847
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    August 13, 2026

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.