Author: प्रणाली वैद्य

Avatar photo

प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.

भाग – 31 “मी माधवला म्हणाले खरी की, मी शर्वायशी बोलेन… पण  अजूनपर्यंत मला त्याच्याशी बोलायला जमलं नाही… आणि तुम्हीही टूरवर गेला होता…” आनंदीला शर्वायच्या लग्नाची कल्पनाच सुखावणारी वाटली. ती कल्पनेत हरवली — आपली सून, घरात लगबग, आनंदी क्षण… तिच्या डोळ्यांत चमक दिसू लागली… दिवाकर ते शांतपणे पाहात होते… मात्र आनंदीचे समर्थन मिळवणाऱ्या माधवचा आत्मविश्वास वाढला होता. तो स्वतःशीच म्हणाला… “आराध्या आणि शर्वायच्या नात्यात फूट पाडण्यासाठी पहिली चाल यशस्वी ठरतेय. आता फक्त शर्वायचं मन वळवायचं आहे!” आनंदीचं बोलणं ऐकून दिवाकर थोडे गोंधळले. पण आनंदीच्या चेहऱ्यावर एक विचित्र उत्सुकता दिसून येत होती. ती आराध्याबाबत फारसे काही म्हणत नाही, उलट माधवने दाखवलेल्या…

Read More

भाग – 30 माधवने ऑफिसमधल्या काही कर्मचाऱ्यांना गुपचूप बोलावून घेतलं. माधव ने  तत्काळ आपला सुप्त कट रचायला घेतला. आराध्या नवीन असल्यामुळे समारंभात काहीतरी चूक करेलच, याची त्याला खात्री होती. म्हणून त्याने त्या  कर्मचाऱ्यांना सांगितलं, “तुम्ही तिला मदत करत असल्याचं दाखवा आणि तिच्याकडून काही चूक घडेल असं बघा…” माधवने तिच्या नवखेपणाचा वापर करून, तिच्याच विरोधात कट आखला… समारंभ सुरू होण्याअगोदरच समारंभाच्या मुख्य टेबलावर ठेवलेला महत्त्वाच्या फाइल सेट गायब झाल्याचं ध्यानात आलं. ही बातमी ऐकून शर्वाय गंभीर झाला… “हा फाइलचा सेट कुणी हलवला?” त्याने तिथे उपस्थित असलेल्या ऑफिसमधल्या माणसांना विचारलं. माधव  जणूकाही या गोष्टी करताच तयार होता… “शर्वाय, मला वाटतं, आराध्या तिथे गेली…

Read More

भाग – 29 माधव विचार करू लागला, “शर्वाय आराध्याला  काहीच कसं बोलला नाही? उलट तिच्यावर विश्वास दाखवला… हे असं झालंच कसं?” कामात जराही चूक झालेली जराही चालत नसणारा  शर्वाय तिला काहीच  बोलला नाही, याचेच त्याला आश्चर्य  वाटत होते. माधव मनातून नुसता चरफडत होता. आपला  हा डाव फसला, आता अजून एका डावाची योजना करावी लागेल, अशाच विचारात तो होता. शर्वायच्या त्या शांत राहण्यामुळे आणि विश्वासामुळे आराध्याच्या मनात शर्वायविषयीची ओढ वाढू लागली. तिला आता वाटू लागतं की, शर्वाय फक्त एक यशस्वी व्यावसायिकच नाही, तर एक आदर्श प्रमुख आणि उत्तम माणूसही आहे. माधवला शर्वाय आणि आराध्या यांच्या नात्यात काहीतरी खास फुलू लागतंय, हे…

Read More

भाग – 28 शर्वायने आराध्याच्या डोळ्यांत पाहत उत्तर दिलं, “कारण कदाचित हेच खरं आहे. तुझं साधं हसणं, तुझी कष्टाळू वृत्ती… सगळंच वेड लावतं. तुझ्याभोवती असणारी निरागसता मला माझ्या आयुष्याच्या गुंतागुंतीतून दूर नेते.” आराध्याच्या गालावर हलकीशी लाली आली. “शर्वाय… मला हे सगळं नवीन आहे. कधीच असं वाटलं नव्हतं की, माझ्या साध्या आयुष्यात असा कुणी येईल जो मला इतकं महत्त्व देईल.” शर्वायने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, “माझं मन सांगतंय की, तुझा माझ्यावर एक हक्क आहे. तुझं सुख, तुझी सुरक्षितता, सगळी  माझी जबाबदारी आहे.” त्या पावसात दोघंही न बोलता एकमेकांच्या नजरेत हरवून गेले. पाऊस त्यांना चिंब करत होता, पण त्या क्षणी…

Read More

भाग – 27 शर्वायचा नवा प्लॅन सुरू होतो — आतल्या माणसाला शोधणं. त्याच्या कॉर्पोरेट सिस्टममध्येच कुणीतरी माहिती लीक करत होतं. तो आराध्याला न सांगता, तिच्यावर नजर ठेवण्याचा आणि तिला सावध ठेवण्याचा निर्णय घेतो. ट्रेनिंगदरम्यान आराध्याला एक फाइल सापडली… जी आजवर कोणाच्याही हाती लागली नव्हती आणि पूर्वकल्पना नसताना तिच्या हाती ती सहज लागली होती आणि इथेच सुरुवात झाली एक नवा गूढ धागा वीणायला… ती फाइल पहिल्यांदा पाहिल्यावर आराध्याला काहीच विशेष वाटलं नाही. पण जसजशी तिने  ती फाइल वाचण्यास सुरुवात केली, तिच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या. फाइलमध्ये काही पुरावे  होते — अशा प्रोजेक्ट्सचे संदर्भ, जे अधिकृतपणे कंपनीमध्ये सुरूच नव्हते. काही नावं, काही…

Read More

भाग – 26 त्या रात्री, ट्रेनिंगनंतर थकून आराध्या बसलेली होती. शर्वाय तिच्या शेजारी येऊन बसतो. “तुझ्या डोळ्यांत मी ते वादळ पाहिलंय, आराध्या… आणि ते वादळ जेव्हा योग्य दिशेने वाहतं, तेव्हा इतिहास घडतो.” तेवढ्यात, शर्वायच्या फोनवर एक मेसेज झळकला — “माधव काहीतरी हालचाल करत आहे. निशाला आराध्याच्या मागे लावलं आहे.” शर्वायचे डोळ्यांत क्षणभर कठोर भाव उमटतात. तो स्वतःशी म्हणतो, “खरा डाव आता सुरू होतोय…” त्याच्या हातात एक जुना, पोतडीत गुंडाळलेला फोटो होता… “आराध्या, तुझ्या डोक्यात अनेक प्रश्न असतील… मी कोण आहे, का मदत करतोय आणि तुला हे सगळं का शिकवतोय? तुला उत्तरं मिळणं गरजेचं आहे.” तो फोटो  त्याने आराध्याच्या हातात दिला.…

Read More

भाग – 25 संध्याकाळचे साडेसात वाजले होते. ऑफिसमधल्या इनफॉर्मल मीटिंगसाठी ठरवलेली जागा म्हणजे शहराच्या एका नामांकित स्काय लाऊंजचा टॉप फ्लोअर. मोठ्या काचांमधून वेगवेगळ्या दिव्यांच्या प्रकाशाने न्हालेला मुंबईचा नजारा दिसत होता. हलकासा संगीताचा स्वर, टेबलांवर टप्प्याटप्प्याने मांडलेले स्नॅक्स, आणि हलकीशी उत्साही कुजबूज वातावरणात भर घालत होती. आराध्या थोड्या संकोचानेच तिथे पोहोचली. आज तिच्या पोशाखातही थोडासा बदल होता – एक सॉफ्ट पिच कलरचा कुर्ता, खाली स्ट्रेट फिट पँट आणि हलकीशी लिपस्टिक आणि झुमके – साधं, पण उठावदार. शर्वाय तिला लांबून पाहतो आणि थोडसं आश्चर्य वाटल्यासारखा तिच्याकडे येतो. माधव आणि निशा लांबूनच त्यांच्याकडे नजर ठेवून असतात. निशाच्या डोळ्यांत स्पष्ट असूया आणि चिडचिड मिसळलेली…

Read More

भाग – 24 समोर स्क्रीनवर प्रेझेंटेशन सुरू होतं आणि आराध्या ते लक्षपूर्वक ऐकत होती… कृत्तिकाने तिला काही मुद्दे लिहून घ्यायला सांगितले, तेवढ्यातच दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. दरवाज्यातून माधव आत आला… माधव तिच्याकडे पाहतो… पण चेहऱ्यावर ओळखीचा कोणताही भाव नाही. तो अगदी व्यावसायिक थाटात, शांतपणे बोलतो, “या टीमसोबत मी काम करणार आहे. मी नवीन COO – माधव राजाध्यक्ष!” आराध्याचं मन क्षणभर सुन्न होतं… पण तिने संयम राखत सहजपणे ‘नमस्कार’ केलं. माधवने फक्त मान हलवली. तिच्या मनात प्रश्न गडद होतो – हा इथे का आहे? आणि त्याचं उद्दिष्ट नक्की काय आहे? तिचा चेहरा तसा शांत… पण डोळ्यांमध्ये एक गूढ अस्वस्थता होती. कॉन्फरन्स…

Read More

भाग – 23 काहीतरी चुकल्याचे आराध्याला जाणवले… एक लहर गेली — निशा काकी नसावी तेव्हाच का मी घरात आले? चेहऱ्यावरील भाव जरी स्थिर असले तरी तिच्या मनात विचारांची साखळी सुरू होती… निशा खरोखर काकाकडेच गेली आहे की…? आणि का? तिला आता जाणवत होतं – निशा एकटी नाही आणि खेळ अजून गडद होत चालला आहे. रात्रीचे नऊ वाजून गेले होते. घरात शांतता होती, पण आराध्याच्या मनात वादळ होतं… ती आपल्या खोलीत असली तरी, तिचं लक्ष सतत दाराकडे लागलं होतं… निशा अजून आली नव्हती… आई प्राजक्ता, शांताबाई, सुशांत — सगळ्यांनी तिच्या जॉबबद्दल आनंद व्यक्त केला होता, थोडा वेळ गप्पाही झाल्या होत्या, पण…

Read More

भाग – 22 तो तिला आतल्या खोलीत घेऊन गेला, आणि एका सुंदरशा सोफ्यावर बसायला सांगितलं. ती अजूनही सावध होती, कानासमोर कुठलाही आवाज आला की दचकायची… तो तिच्यासमोर शांतपणे बसला… पण नजरेत एक वेगळीच उत्सुकता होती – कसली असेल ती उत्सुकता तिला फसवण्याची की, तिला समजून घेण्याची? तो तिच्यासमोर बसलेला, हातात पाण्याचा ग्लास घेत हलक्या आवाजात म्हणाला, “आता थोडं बरं वाटतंय का? घाबरू नकोस, मी इथे आहे. पण मला सांग, नक्की काय झालं?” आराध्याने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेतला संयम, काळजी आणि कोणताही अडथळा न आणणारा संयोजित शांतपणा तिच्या मनाला हळूहळू आधार देऊ लागला. तिने थोडा खोल श्वास घेतला, थरथर थोडी कमी…

Read More