Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    मैत्रीण

    September 5, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, September 6
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मैत्रीण
    ललित

    मैत्रीण

    प्रदीप केळुस्करBy प्रदीप केळुस्करSeptember 5, 2026No Comments13 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रदीप केळुस्कर, लेखक प्रदीप केळुसकर, वासंतीताईंची मैत्रीण, सुधाताईंची मैत्रीण, वासंतीताईंची कहाणी, वासंतीताईंचा मुलगा कपिल, वासंतीताईंची सून सुजाता, सुधाताईंची मुलगी प्रज्ञा, वासंतीताईंची प्रॉपर्टी, वासंतीताई आणि आशा, आशाची अरेरावी,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    वासंतीताई सैरभैर झाल्या होत्या… ‘आत्ता जाऊन येते,’ म्हणून सांगून गेलेली आशा दीड तास उलटला तरी आली नव्हती! काळोख पसरू लागला होता आणि वासंतीताईंना टॉयलेटला जायचं होतं. त्यांना मदतीशिवाय चालता येत नव्हतं. परत परत त्त्यांचे लक्ष पार्कच्या गेटकडे जात होतं… आशा येईल आणि आपल्याला टॉयलेटला नेईल म्हणून त्या गेटकडे पाहात होत्या. मोठा नि:श्वास सोडत होत्या… त्यांची ही परिस्थिती पाहून त्यांच्याच वयाची एक स्त्री पुढे आली…

    “तुम्हाला काही हवं आहे काय?”

    त्या स्त्रीचा त्यांना एकदम आधार वाटला…

    “होय हो… मला आधाराशिवाय चालता येत नाही. माझी मदतनीस आशा… ‘पाच मिनिटांत येते, म्हणून गेली ती आलेलीच नाही. मला टॉयलेटला जायचंय हो… नाहीतर गडबड होईल…”

    “चला, मी तुम्हाला नेते…”

    ती स्त्री पटकन पुढे आली आणि तिने वासंतीताईचा हात पकडला आणि त्यांना ती हळूहळू टॉयलेटकडे घेऊन गेली.

    दोघी टॉयलेटमधून बाहेर आल्यावर वासंतीताई म्हणाल्या…

    “सहा महिन्यांपूर्वी मला पॅरॅलिसिसचा अटॅक आला आणि डावी बाजू लंगडी झाली. त्यातून मी आता सावरतेय… एक बाई ठेवली मी, माझ्यासाठी… मुलगा, सून माझ्या घरातच राहतात. पण ती दोघे नोकरी करतात. सुनेचे हिडीस-फिडीस चालू असतेच… पण मी माझ्या पैशातून ही बाई ठेवली. मला नवऱ्याची अर्धी पेन्शन मिळते ना! हल्ली थोडी थोडी फिरते मी… संध्याकाळी त्या बाईबरोबर या पार्कमध्ये थोडा वेळ येते… जरा बदल होतो…”

    “पण गेली कुठे बाई तुमची?”

    “हल्ली ती अशीच करते. मला इथे सोडते आणि जरा जाऊन येते, असे सांगून नाहीशी होते. तिचे खूप नखरे पाहिले मी… आता तिला हाकलूनच लावणार?”

    “कुठे राहता तुम्ही?”

    “त्या अश्वमेघ सोसायटीत, दोनशेएक नंबरमध्ये…”

    “माझा पण बंगला त्याच भागात आहे. चला मी सोडते तुम्हाला…”

    त्या स्त्रीने वासंतीबाईचा हात पकडला आणि हळूहळू त्याना पार्कबाहेर आणले.

    हेही वाचा – रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!

    “तुमचे नाव?”

    “मी सुधा… सुधा नाईक. बँकेत नोकरी करायची मी. माझे मिस्टर प्रोफेसर होते पुण्यात. मला एकच मुलगी, डॉक्टर आहे ती. जावई वकील आहेत. दोघे माझ्यासोबत राहतात. माझी मुलगी आमच्याच बंगल्याच्या तळमजल्यावर प्रॅक्टिस करते. जावई इथल्या कोर्टात. चला माझ्या घरी… तुम्हाला आमचे घर दाखवते.”

    वासंतीताईचा हात पकडून सुधाताई आपल्या घरी घेऊन आल्या.

    येताना वासंतीबाईंना आशा दिसलीच. एका झाडामागे एका पुरुषाला खेटून थट्टामस्करी जोरात सुरू होती… वासंतीबाईचा जळफळाट झाला… तिला हाकलून लावायचेच, असे त्यांनी ठरविले.

    सुधाताईंनी वासंतीताईचा हात पकडून आपल्या घरात आणले… बंगल्यात आत जाता जाता उजव्या बाजूला त्यांच्या मुलीचा, प्रज्ञाचा दवाखाना दिसत होता. तिचे पेशन्ट बाकावर बसले होते.

    “या, ताई. बसा…”

    त्या घरात गेल्याबरोबर का कोण जाणे, पण वासंतीताईंना समाधान आणि शांती वाटली. वासंतीताई कोचवर बसताच सुधाताई किचनमध्ये गेल्या आणि दोन सरबताचे ग्लास घेऊन आल्या…

    “घ्या, बाहेरून आल्यावर तहान लागते ना, म्हणून प्रज्ञा सरबत तयार ठेवते.”

    वासंतीताईंना कौतुक वाटले… नाहीतर आपल्या घरी सकाळी गारढोण झालेला चहा… संध्याकाळी आशाच्या मनात असेल तर चहा.. नाहीतर दोन बटर…

    एवढ्यात डॉ. प्रज्ञा घरात आली. ती म्हणाली, “मी केबिन मधून पाहिले… आई तुझ्यासोबत कोण ग या बाई?”

    “ही माझी मैत्रीण… वासंती.”

    वासंतीबाईंनी चमकून पाहिले… जेमतेम पंधरा मिनिटांपूर्वी आपली ओळख झाली आणि ही चक्क म्हणाली, “ही माझी मैत्रीण..”

    वासंतीताईच्या डोळ्यात पाणी आले. नवरा गेल्यावर हल्ली बरेच दिवसांत कोणी प्रेमाचे दोन शब्द कधी बोलले नाही… आणि ही सुधा पटकन बोलून गेली… “ही माझी मैत्रिण.”

    वासंतीताई इतक्या भावूक झाल्या, हे पाहून सुधा त्यांच्याजवळ आली.

    “माझे काही चुकलं काय वासंती?”

    “नाही गं सुधा, असं प्रेमाने माझ्याशी कोण बोलत नाही गं… सगळे हिडीस-फिडीस…”

    “तुझ्या घरी मुलगा आणि सून आहेत ना?”

    “आहेत… पण आहेत म्हणायचे. दोघेही नोकरी करतात. पण मुलाचा पगार कमी, त्यामानाने सुनेचा जास्त… म्हणून सून जाता-येत सुनावत असते मला आणि आपल्या नवऱ्याला. माझा मुलगा पण तसाच.. आईपेक्षा सासूवर प्रेम करणारा! जोपर्यंत मी खमकी होते, तोपर्यंत सुनेचे काही चालत नव्हते… पण मला अटॅक आला आणि मी परावलंबी झाले. पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये होते. माझी भाची आली धावून सांगलीहून… आपल्या छोटया मुलाला सासूकडे ठेवून… उपकार झाले त्या वसूचे… वसुमती… तिनेच केले माझे. पंधरा दिवस रात्रंदिवस राहिली माझ्यासोबत. हॉस्पिटलचे बिल भरायला माझ्याकडे पैसे होते गं… पण मायेचे कुणी हवे का नको? त्यावेळी माझ्या सुनेने चक्क मला रजा मिळत नाही म्हणून सांगितले… मुलगा कपिल दोन दिवस येत होता, पण वसू आली म्हटल्यावर तो पण येईनासा झाला!”

    “मग हॉस्पिटलमधून तू घरीच गेलीस ना?”

    “हो. शेवटी माझे घर ना ते! बिल्डिंगमध्ये कामाला बाई येते, तिच्या ओळखीने ही आशा मिळाली. जवळजवळ सहा महिने आहे सोबत. घटसफोटीत आहे. सुरुवातीला बरी होती, पण सुजाताच्या नादाला लागून आता बिघडली. गेले आठ दिवस मला पार्कमध्ये सोडते आणि नाहीशी होते… आता आपण येताना दिसली ती… कुणा पुरुषाला चिकटून बसली होती. असले धंदे हिचे?”

    “पण हा आशा गेली तर, पुन्हा तुला प्रॉब्लेम नाही होणार?”

    “मी मुलाला सांगते, कुणीतरी दुसरी बाई बघ… नाहीतर, तुझ्या बायकोला थोडे दिवस रजा घ्यायला सांग. बघू आईसाठी काय करतो ते!”

    “बरं. वासंती, तुझा मोबाइल दे, त्यात माझा नंबर सेव्ह करते. काहीही प्रॉब्लेम आला तर, मला फोन कर. मी धावत येईन किंवा प्रज्ञाला पाठवीन. चल, तुला आता तुझ्या घरी सोडते.”

    सुधाबाईंनी आपला फोन नंबर वासंतीबाईच्या मोबाइलमध्ये सेव्ह केला आणि हात देऊन त्यांना उठवले आणि हळूहळू त्यांच्या घराच्या दिशेने निघाल्या. लॅचने घर उघडून त्यांच्या बेडरूममध्ये त्यांना बसवले आणि पुन्हा दार व्यवस्थित बंद करून त्या माघारी आल्या.

    आशा पार्कमध्ये गेली, तेव्हा वासंतीताई तिथे नव्हत्या. ती घाबरली आणि घरी आली. किल्लीने दार उघडले तर, बाई बेडरूममध्ये खुर्चीत बसलेल्या होत्या. त्या कडाडल्या…

    “कुठे फिरत होतीस?”

    “कुठ न्हाई…”

    “मग पार्कच्या बाहेर कुणाला चिकटून उभी होतीस?”

    “माजा भाव व्हता…”

    “मग भावाला काय चिकटून बसायचं? मी बघितलं तुला… चालती हो… किल्ली ठेव आणि परत मला तोंड दाखवू नकोस…”

    “मला सुजाताबायने काम दिलाया… तेसनी बोलली तर, मी जाईन.” त्यांना जेवण न देताच ती निघून गेली.

    वासंतीबाईंना आशाचा भयंकर राग आला होता. आपण हिला पगार देतो आणि ही उलट बोलते… ‘मला सुजाताताईंनी काम दिलंय… बेशरम.. मला पार्कमध्ये सोडून याराला चिकटते? पुन्हा तोंड पहाणार नाही हीच!’ वासंतीबाईंची चिडचिड सुरू होती.

    लॅचने दार उघडले आणि त्यांची सून सुजाता आत आली. चप्पल काढून सरळ सासूच्या खोलीत आली.

    “तुम्ही आशाला उद्यापासून कामावर येऊ नको, अस सांगितलंत? मग कोण करणार तुमचं? मी घरी राहू शकत नाही. माझ्या पागरावर हे घर चाललंय… तुमच्या मुलाचा पगार तो किती?”

    “अगं, पण ती मला पार्कमध्ये एकटं सोडून तिच्या याराबरोबर चाळे करत होती…”

    “मग काय झालं? ती घटस्फोटीत आहे, माहिती आहे ना? तिला पण काही भावना असतील… मुंबईसारख्या शहरात बाई मिळत नाही… तुमचे काही चालू देणार नाही मी. आशा उद्याही येईल… तिच्यामुळे मला घरकामात मदत होते, भांडी कपडे होतात…”

    “तू थोडे दिवस रजा घे. तुझ्या आईच्या आजारपणात घेतलीस तशी…”

    “माझ्या आईच्या आजारपणात रजा संपली माझी, आता नाही मिळायची. उद्या आशा येईल, तिच्याचकडून काय ती सेवा करून घ्या.”

    वासंतीबाईचा नाईलाज झाला. थोड्यावेळाने त्यांचा मुलगा कपिल आला आणि गार झालेले जेवण टेबलावर ठेऊन गेला. त्या मुलाशी काही बोलू पहात होत्या, पण त्यांचे न ऐकता तो बाहेर गेला. दहा वाजता सून आली. त्यांना एकदा बाथरूमला नेऊन आणलं आणि ती झोपायला गेली.

    सकाळ झाली. वासंतीताई जाग्या झाल्या आणि चहाची वाट पहात राहिल्या. आठ वाजता सून आली आणि त्यांना बाथरूमला घेऊन गेली. नंतर ती गेली ती गेलीच. त्या चहा-नाश्त्याची वाट पहात राहिल्या. थोड्यावेळाने त्यांना दार बंद केल्याचा आवाज आला. त्यांनी ओळखले, दोघे नोकरीवर गेले. आता आपण…

    साडेनऊला आशाने दार उघडले आणि ती घरात काम करत राहिली. त्यांना भूक लागली होती… तहान लागली होती… त्या हाक मारत राहिल्या.. ‘आशा… आशा…’

    पण आशा बाहेर ढिम्म होती. मोबाइलवर गाणी ऐकत होती.

    बारा वाजले. आज वासंतीताईंची आंघोळ राहिली. तहान लागली, पण पाणी मिळत नव्हते. भूक लागली होती. त्यांना बाथरूमला जायचे होते… घाई लागली होती.

    त्या हाक मारत राहिल्या… ‘आशा… आशा गं… मला बाथरूमला ने गं… नाहीतर…’

    एक वाजला. आता वासंतीताईंना सहन होईना. अचानक त्यांना काल सुधाने मोबाइलमध्ये सेव्ह केलेला नंबर आठवला. त्यांनी कॉल लावला… पलीकडे सुधा…

    “काय झाले वासंती?”

    “सुधा, तुझ्या मुलीला इथे ताबडतोब पाठव… मला बाथरूमला जायचे आहे.”

    काय झाले असेल, हे सुधाताईंनी ओळखले. त्यानी फोन खाली ठेवला आणि प्रज्ञासह स्वतः हजर झाल्या. बेल वाजवली. मोबाइलवर गाणी ऐकणाऱ्या आशाने दार उघडले… दोघी आत गेल्या. सुधाताईंनी बेडरूम पाहिली होतीच… त्यांनी वासंतीताईंचा हात पकडला आणि बाथरूमला घेऊन गेल्या. बाहेर आल्यावर त्या सुधाताईंना म्हणाल्या, “सुधा.. मला इथे राहायचे नाही… मला नेशील तुझ्याकडे?”

    “हो चल ना… म्हणूनच प्रज्ञाला सोबत आणलंय. तुझे डॉक्टर रिपोर्ट्स, औषधे, थोडे कपडे बरोबर घेऊ. कुठे ठेवले आहेत ते दाखव.” वासंतीबाईंनी जे जे दाखवले ते प्रज्ञाने एका बॅगेत भरले आणि त्यांच्या हाताला धरून बाहेर आणले आणि गाडीत बसवून घरी घेऊन गेली. तोंड उघडे टाकून आशा सारे बघत राहिली आणि तिने सुजाताला फोन लावला…

    सुजाता आशाला म्हणाली, “जाऊ दे.. जाऊन जाऊन कुठे जाईल? तिचे आहे कोण? एक भाची वसू… ती सांगलीला… कोणी नेली ती संध्याकाळी आणून पोहोचवणार.”

    0000

    सुधाताईंनी हाताला धरून वासंतीताईना घरात आणलं. खुर्चीवर बसवलं. तोपर्यंत पटकन प्रज्ञा घरात गेली आणि गरम भात, त्यावर तूप ओतून घेऊन आली. वासंतीताई त्या गरम भातावर तुटून पडल्या. सकाळपासून त्या उपाशी होत्या. त्यांचे जेवण होईपर्यत प्रज्ञाने त्यांच्यासाठी सुधाताईंच्या खोलीत बेड घातला होता.

    दोन घास खाऊन वासंतीताई शांत झाल्या. मग प्रज्ञा त्यांना तिच्या आईचा खोलीत घेऊन गेली.

    “तू आराम कर वासंती. संध्याकाळी बोलू. असे म्हणत सुधाताईंनी एक पुस्तक उघडले. चांगला दोन-अडीच तास आराम करून वासंतीताई जाग्या झाल्या. सुधाताईंनी दोघींसाठी कॉफी करून आणली…

    “मघा बाहेरच्या खोलीत गाणी ऐकत बसलेली आशा की नवीन बाई?”

    “आशाच ती! मी सुजाताला सांगितले तिला बोलावू नकोस… तरी सुजाता म्हणाली, आशाच येणार, तिच्याकडूनच तुमचे काय ते करून घ्या.”

    “मग?”

    “सकाळी नेहेमीसारखी आशा आली, पण आज ती माझ्या खोलीत येईना. तिने सुजाताची कामे उरकली आणि ती बाहेर गाणी ऐकत बसली. मी तिला किती हाका मारल्या… पण ती ढिम्म. काल रात्री मी तिला बोलले… कामावरून काढते म्हणाले ना म्हणून. माझा पगार घेते आणि त्या काळात नको ते धंदे हिचे… मला असले सहन होत नाही गं सुधा.”

    “पण मी तुला इथे आणलं, मग तुझा मुलगा, सून काही म्हणायची नाहीत ना?”

    “मला वाटतं नाही तसं. त्यांना आनंदच वाटेल. म्हातारी माणसं कुणाला हवी असतात? आज बघू, न्यायला येतात का!”

    “वासंती, मी तुला माझी मैत्रीण मानलंय. तुला वाटेल तितके दिवस राहा. तुला तुझ्या मुलाकडे जायचे असेल तेव्हा सांग…”

    “खरंच सुधा, आपली कालची ओळख… पाच मिनिटांच्या ओळखीवर तू मला मैत्रीण केलंस?”

    “याचे क्रेडिट माझ्या नवऱ्याला मी देईन. तो नाही या जगात… पण चेहेऱ्यावरून कसे माणूस ओळखायचे, हे त्याने मला शिकवले. त्याने अनेक विद्यार्थ्यांना असेच घरात आणले. त्यांना शिकवले आणि मार्गाला लावले. तुला आसरा हवा होता, हे काल माझ्या लक्षात आले. मुलगा-सून आणि तुझे आजारपण या बेचकीत तू सापडली आहेस… वाटेल तेवढे दिवस इथे राहा.. कायमची राहिलीस तरी माझी मुलगी तुझं सर्व करेल… कारण बापाचे तिच्यावर तसे संस्कार आहेत!”

    “तुझे कसे उपकार फेडू सुधा…”

    “अग उपकार कसले? उलट मी कंटाळते… मुलगी आणि जावई कामात असतात, माझ्याशी बोलायला कोण नसतं. आता तू आलीच आहेस… आपण गप्पा तरी मारू.”

    एवढ्यात प्रज्ञा दवाखान्यातून आली. तशा सुधा आणि वासंती तयार झाल्या आणि सुधाने वासंतीचा हात पकडला आणि दोघी पार्कमध्ये फिरायला गेल्या.

    वासंतीताईचा मुलगा आणि सून घरी आले आणि त्यांनी दार उघडले. आशाने त्यांना फोन करून कुणीतरी दोन बायका सासूला घेऊन गेल्याचे सांगितले होतेच. पण त्यांना वाटले एवढ्यात त्यांना आणून पोहोचवले असेल… त्यांनी वाकून बेडरूममध्ये पाहिले… सामसूम होती.

    “आई आलेली दिसत नाही,” कपिल म्हणाला.

    “जाऊदे. नाहीतरी त्यांचे नाच बघायला कुणाला वेळ आहे? ही बाई नको… ती नको… कुठे आहे तिथे सुखाने राहा म्हणावं… आमच्या संसारात लुडबूड नको. तू अजिबात फोन करू नकोस. ती सांगून गेली का? नाही ना! मग आपण चौकशी का करायची?”

    कपिल गप्प बसला.

    0000

    पार्कमधून फिरून दोन मैत्रिणी घरी आल्या. प्रज्ञाने सरबत करून ठेवले होतेच. तोपर्यंत सुधाताईचा जावई प्रवीण आला. सुधाताईंनी त्याच्याशी ओळख ‘माझी मैत्रीण वासंती’ म्हणून करून दिली. त्याने हाताने नमस्ते केले आणि तो आपल्या रूममध्ये गेला.

    प्रज्ञा घरात आली, तीच वासंतीताई समोर बसली. तिने त्यांना व्यवस्थित तपासले. त्यांचे रिपोर्ट्स पाहिले… त्यांच्या डॉक्टरनी दिलेली औषधे पाहिली… त्यांना थोडे चालवून पाहिले… मग म्हणाली,

    “मावशी, तुला फिजिओ करायची गरज आहे. माझ्या ओळखीची मुलगी आहे, मी तिला बोलावते… ती व्यायाम करून घेईल. एक मावशी रोज येतात, त्या आंघोळ घालतील. बाकी पूर्ण दिवसभर आई आहेच आणि बाहेर मी दवाखान्यात आहे. काही वाटलं तर, ही बेल वाजवायची. मी एक मिनिटात हजर! आमची म्हणजे माझ्या बाबांची छोटी लायब्ररी आहे, भरपूर पुस्तके आहेत. हवे ते पुस्तक घे आणि वाच. धार्मिक वाचायला आवडत असेल तरी पण ग्रंथ, पुस्तके आहेत. या तुमच्या बेडरूमला लागून गॅलरी आहे. तिथे दोघी बसलात तर रस्त्यावरील रहदारी दिसते आणि आमची छोटी बाग पण दिसते. तेव्हा कसलीच काळजी करायची नाही… एन्जॉय आणि मस्त रहा.”

    वासंतीताई तोंड उघडे ठेऊन ऐकत राहिल्या… आपली मुले एवढी आपली काळजी घेऊ शकतात? त्यांना मुलगा कपिल आणि सून सुजाता आठवली आणि त्यांचे तोंड कडू झाले.

    वासंतीबाईंना मुलाचा किंवा सुनेचा फोन आला नाही, पण सांगलीच्या भाचीचा एक दिवसआड फोन येत राहीला. मावशी एका मैत्रिणीकडे आनंदात आहे, हे ऐकून तिला समाधान वाटले. मधेच घाईघाईत ती मुंबईला आली आणि मावशीला पाहून गेली. तिची सुधाताई आणि प्रज्ञाबरोबर ओळख झाली.

    रोजची फिजिओ आणि व्यायाम यामुळे वासंतीताई स्वतः पाऊल टाकायला लागल्या. हळूहळू चालू लागल्या. चांगले जेवण आणि विश्रांती यामुळे त्यांच्या अंगात शक्ती आली. सुधा आणि त्यांचे मैत्री घट्ट झाली होती. सुधा त्यांना कथा, कविता वाचून दाखवी आणि दोघी चर्चा करत… हळूहळू दोघी रिक्षा करून नाटके, संगीताच्या कार्यक्रमांना जाऊ लागल्या. हे सर्व सुख असले तरी, वासंतीताईंना आपला मुलगा आणि सून आपली साधी चौकशीही करत नसल्याने वाईट वाटतं होत… आणि त्यांना त्यांचा राग पण येत होता. खरेतर, मुलगा आणि सून रहात असलेली जागा त्यांच्या नावावर होती. दोघांना चांगली अद्दल घडवायला हवी, असे त्यांना वाटतं होते.

    एक दिवस त्या सुधाचा जावई आणि प्रज्ञाच्या नवऱ्यासमोर आल्या…

    “प्रवीण, जर कुणी माझ्या जागेत मला भाडे न देता रहात असेल, तर मी काय करू शकते?”

    “त्याला नोटीस द्यायची, घरी रिकामं कर म्हणून…”

    “आणि तरी तो घर सोडत नसेल तर?”

    “कोर्टात जायचे. तुम्हा ज्येष्ठ मंडळींसाठी वेगळे नियम आहेत. तुमचा निर्णय शीघ्र गतीने लागणार.”

    “मग मला नोटीस काढायची आहे. माझ्या जागेत माझ्या परवानगीशिवाय एक माणूस रहात आहे…”

    “कोण गं? कुणाला नोटीस काढणार तू?” तिथे बसलेल्या सुधाने विचारले.

    “माझ्या मुलाला नोटीस देणार मी?”

    “काय? मुलाला नोटीस?”

    “होय, माझा मुलगा असला तरी काय झाले? जो मुलगा आईच्या म्हातारपणी तिची साधी चौकशी करत नाही, त्याने आई-वडिलाच्या प्रॉपर्टीवर तरी हक्क का सांगावा?”

    “खरे आहे वासंती. आता आपण वृद्धांनी सजग व्हायला हवे. अशा मुलांना धडा शिकवायलाच हवा. पण काय होते, आपण इमोशनल होतो… आपण मुलांना जन्म दिलेला असतो… त्यांनी काही केले तरी त्यांच्या करणीवर आपण पांघरूण घालतो.”

    “पण मी नाही घालणार पांघरूण. मी माझ्या मुलाला सुनेला धडा शिकवणार…”

    “एवढी मनाने घट्ट कशी झालीस वासंती?”

    “तू पाठी आहेस म्हणून सुधा. तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली म्हणून…”

    “काय तो निर्णय घे. पण त्याच्याबद्दल फर्म रहा. मुलाचा पुळका येऊ शकतो…”

    “नाही. माझा निर्णय पक्का आहे.”

    वासंतीताईंनी आपल्या मुलाला नोटीस पाठवली – ‘एक महिन्यात जागा खाली करावी’ म्हणून.

    नोटीस मिळताच मुलाचा फोन आला…

    “माझी जागा खाली करा. ती माझ्या माहेरहून मला मिळालेली आहे… तुझ्या बाबाकडून नाही…” असे वासंतीताईंनी ठणकवले.

    मग मुलगा आणि सून भेटायला आले. दोघे रडू लागले, “आम्ही दुसरी जागा घेऊ शकत नाही.. आमची परिस्थिती नाही,” असे सांगू लागले.

    वासंतीबाई खंबीर होत्या. त्यानी मुलाला, सुनेला ठणकवले…

    “जर तुम्हाला आजारी आईची देखभाल करता येत नसेल, तर तिच्या प्रॉपर्टीवर हक्क का सांगता? तुम्ही जागा खाली करा… नाहीतर, ज्येष्ठाच्या कोर्टात जाऊन मी तुम्हाला बाहेर काढेन…”

    हेही वाचा – सारं काही रंगभूमीसाठी!

    चार दिवसांत कपिलने जागा खाली केली. जागेची किल्ली वासंतीताईच्या हातात आली.

    “वासंती… काय करणार या जागेत आता?”

    “काहीही करेन. मी राहीन काही काळ किंवा माझ्यासारख्या ज्येष्ठ लोकांना देईन किंवा माझी सांगलीची भाची वसू, तिला देईन. तिचा मुलगा दोन वर्षांत दहावी पास होईल. त्याला मेडिकलला जायचे आहे, तो शिकेल येथे राहून.”

    “खरंच वासंती, मला पार्कमध्ये टॉयलेटला जाण्यासाठी आशाची वाट पहात हवालदिल झालेली वासंती आठवते आणि आज स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढणारी खंबीर वासंती माझ्यासमोर बसली आहे!”

    “हे तुझ्यामुळे सुधा. तुझ्यासारखी लाखमोलाची मैत्रीण मिळाली ना… तिने माझ्यात आत्मविश्वास भरला. श्रेय त्या मैत्रिणीला… आणि त्या मैत्रीला…!”

    Avatar photo
    प्रदीप केळुस्कर

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299

    Related Posts

    नातवाचा ‘ध चा मा’ अन् आबा!

    September 5, 2026 ललित

    श्रीकृष्णाचे आपल्या जीवनातील स्थान

    September 5, 2026 ललित

    शर्वायचा माधवविरुद्ध नवा डाव

    September 4, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    नातवाचा ‘ध चा मा’ अन् आबा!

    By पराग गोडबोलेSeptember 5, 2026

    ऑफिसमध्ये होते, आम्ही सगळ्याजणी मिळून डबे खाण्यात गुंग होतो, तोच फोन वाजला.  लेकाचा होता. साधारण…

    श्रीकृष्णाचे आपल्या जीवनातील स्थान

    September 5, 2026

    शर्वायचा माधवविरुद्ध नवा डाव

    September 4, 2026

    सर्वकाही बाळासाठी!

    September 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    मैत्रीण

    September 5, 2026

    नातवाचा ‘ध चा मा’ अन् आबा!

    September 5, 2026

    HbA1c… मधुमेह नियंत्रणाचं प्रतिबिंब

    September 5, 2026

    श्रीकृष्णाचे आपल्या जीवनातील स्थान

    September 5, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 423
    • अवांतर 206
    • आरोग्य 144
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 567
    • फिल्मी 65
    • फूड काॅर्नर 254
    • मैत्रीण 28
    • ललित 899
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    मैत्रीण

    September 5, 2026
    Most Popular

    जातकांचे ज्योतिष ज्ञान

    September 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.