Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026

    September 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, September 6
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेSeptember 6, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी, साप्ताहिक राशीभविष्य, प्राजक्ता काथे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    • या आठवड्यात वास्तुविषयक समस्या सुटतील. नोकरदारांच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणचे वातावरण अनुकूल असेल. मात्र, त्याचबरोबर जास्त काम अंगावर पडेल. तुमच्या कामगिरीवर वरिष्ठ खूश राहतील. व्यावसायिक वर्गाची उलाढाल वाढून नफ्यात वाढ होईल. घरासाठी खर्च कराल. ऑफिससाठी नवीन जागा घेऊ शकाल. घरामध्ये सुशोभीकरण करण्यात महिला पुढाकार घेतील. विद्यार्थ्यांना कामामध्ये भावंडांची मदत होईल.

    वृषभ

    • या आठवड्यात तुमचा राशीस्वामी ग्रह शुक्र तुळ राशीत आला आहे. नोकरदारांचे वरिष्ठांबरोबरचे संबंध ताणले जाऊ शकतात. त्यामुळे सांभाळून बोला आणि वागा. दुसरीकडे, संततीचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक वर्गाची धंद्यात प्रगती होईल. वादग्रस्त वसुली होईल. नवीन संकल्पना राबवू शकाल. आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. महिला घरात एखादा धार्मिक कार्यक्रम ठरवू शकतील, त्यातून आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकेल. शिक्षणही आवडीच्या क्षेत्रात घेऊ शकाल.

    मिथुन

    • तुमचा राशीस्वामी बुध या आठवड्यात स्वतःच्या कन्या राशीत येत आहे. नोकरदारांच्या बाबतीत अनपेक्षित घटना घडतील. आजपर्यंत केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. प्रमोशन, पगारवाढ होऊ शकते. व्यावसायिक वर्गाकडून अर्धवट राहिलेली कामे पूर्ण केली जाऊ शकतात. स्थावर मालमत्तेविषयीचे प्रश्न सुटतील. महिलांचे आर्थिक प्रश्न सुटतील; मनाप्रमाणे खर्च करू शकाल. विद्यार्थ्यांनी कुसंगत टाळावी. स्वतःचे वाहन कुणाला चालवायला देऊ नका.

    कर्क

    • या आठवड्यात मेहनत करून यश खेचून आणू शकाल. नोकरदारांनी वरिष्ठांशी सुसंवाद साधावा. सहकारी आणि इतर स्टाफशी बोलून, त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर काम करा. प्रकृतीची काळजी घ्या. व्यावसायिक वर्गाकडून उत्पन्नाचा नवीन मार्ग शोधून काढला जाऊ शकतो. कुटुंबात प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. अशावेळी कुटुंबाला प्राधान्य द्या. महिलांच्या बाबतीत घरात छोट्या कुरबुरी होण्याची शक्यता आहे; माहेरी जायला मिळेल. विद्यार्थ्यांनी वाहने जपून वापरावीत, वेगावर नियंत्रण ठेवावे.

    सिंह

    • राशीस्वामी सूर्य स्वतःच्या राशीत म्हणजे सिंह राशीत आहे. नोकरदारांना कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या पूर्ण करणे शक्य होईल. त्याचबरोबर अपेक्षाभंग होण्याचीही शक्यता आहे, मात्र त्याचा जास्त विचार करू नका. व्यावसायिक वर्गाला स्वतःच्या जागेत व्यवसाय सुरू करता येईल. नवीन संकल्पना राबवू शकाल. व्यापारानिमित्त लांबचा प्रवास होईल. ऐषआराम आणि चैनीच्या वस्तू खरेदीसाठी खर्च होईल. महिलांकडून घरातील भौतिक गरजांसाठी नवीन खरेदी केली जाईल. विद्यार्थी मित्र-मैत्रिणींवर खर्च करतील, पार्टी देऊ शकतात.

    हेही वाचा – जातकांचे ज्योतिष ज्ञान

    कन्या

    • राशीस्वामी बुध 8 तारखेला कन्या राशीत येत आहे. नोकरदारांच्या बाबतीत अपेक्षित घटना घडतील. तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. मौल्यवान वस्तू जपून ठेवा. सामाजिक स्तरावर मान-सन्मान मिळेल. व्यावसायिक वर्गाने अतिउत्साह दाखवू नये. बेकायदेशीर कामे टाळावीत, शॉर्टकट वापरू नका. काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. व्यवासायात आत्मविश्वास वाढेल, अपेक्षा पूर्ण होतील. महिलांना आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करता येईल. विद्यार्थ्यांनी वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करावे, चोरांपासून सावध राहा.

    तुळ

    • या आठवड्यात तुमचा राशीस्वामी शुक्र आधीच स्वतःच्या राशीत आहे. प्रसन्न वातावरण राहील. नोकरदारांच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील. कामात ज्या अडचणी येत होत्या, त्या आता संपतील, नवीन मार्ग सापडतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यावसायिक वर्गाचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करा. सर्वच क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसतील. महिलांच्या बाबतीत घरात मुलांचे लग्न ठरू शकेल. त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळू शकेल. क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थी तसेच कलाकारांना प्रसिद्धी मिळेल, मानधनात वाढ होईल.

    वृश्चिक

    • या आठवड्यात महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. नोकरदारांचे राहत्या घराचे प्रश्न सुटतील. कुटुंबासाठी खर्च करावा लागेल. भाग्याची साथ मिळेल. व्यावसायिक वर्गाला जोडधंदा सुरू करता येईल. उधारी वसूल होईल आणि उत्पन्नात वाढ होईल. हितशत्रूंवर मात करू शकाल. महिलांच्या दृष्टीने घरात आनंदी वातावरण असेल. नवीन वाहन खरेदी करू शकाल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील.

    धनु

    • राशीस्वामी गुरू कर्क राशीत आहे. अडचणी संपुष्टात येतील. नोकरदारांची अपेक्षित कामे पूर्ण होतील. महत्त्वाच्या करारांवर सही करू शकाल. स्थावर संपत्तीबाबतची कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. कोणतेही काम हाती घेताना विचारपूर्वक हाती घ्या. व्यावसायिक वर्गाने घाईगडबडीत निर्णय घेऊ नये. सरकारी नियम आणि कायदे यांचे काटेकोर पालन करावे. महिलांच्या बाबतीत घरात माहेरवाशिणी येतील. म्हणून आनंदी वातावरण असेल. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करावे, वादविवाद टाळावेत.

    मकर

    • राशीस्वामी शनि मीन राशीत वक्री आहे. नोकरदारांना कामाचा ताण कमी झालेला जाणवेल. तरीही, कामाबद्दल जागरूक राहा आणि कामाविषयीचे ज्ञान अद्ययावत ठेवा. व्यावसायिक वर्गाने कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये. नवीन योजना सुरू करू शकाल. जुनी येणी वसूल होतील. त्याचबरोबर खर्चातही वाढ होईल. महिलांना असमाधानी वाटण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मेडिटेशन करा. नकारात्मक बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मनात असूनही विद्यार्थी कामे पूर्ण करू शकणार नाहीत. छोट्या अडचणी येतील.

    कुंभ

    • या आठवड्यात जपून बोलावे. नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळावेत. तुम्ही केलेल्या नियोजनामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पण त्यातून मार्ग काढू शकाल. यासंदर्भात सहकारी आणि वरिष्ठ मदत करतील. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत फॅशन, डिझाइन, मॉडेलिंग, पर्यटन या क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. व्यापारात वाढ होईल. महिलांनी जपून बोलावे, कुणालाही दुखवू नका. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावेत, त्याचा पुढे फायदा होईल.

    हेही वाचा – वास्तुशास्त्र आणि नातेसंबंधातील ऊर्जा

    मीन

    • तुमच्या राशीत शनी वक्री झाला आहे. म्हणून विचित्र चिंता सतावेल. नोकरदारांनी राजकारण आणि गटबाजीपासून लांब रहावे. कामात शिस्त ठेवावी. कामाचे ज्ञान अद्ययावत ठेवावे लागेल. प्रवास करावा लागू शकतो. व्यावसायिक वर्गाने प्रवासात महत्त्वाची कागदपत्रे तसेच वस्तू जपून ठेवाव्यात. व्यापारासाठी आर्थिक मदत लगेच मिळू शकेल. महिलांच्या बाबतीत घरात कापणे, भाजणे अशा दुखापती होऊ शकतात. अशा वेळी औषधे घरात आणून ठेवावीत. कोणताही निर्णय घेताना विद्यार्थ्यांनी घरातील मोठ्यांशी विचारविनिमय  करावा.

    prajaktakathe3970@gmail.com

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026

    September 6, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 सप्टेंबर 2026

    September 5, 2026 पंचांग आणि भविष्य

    जातकांचे ज्योतिष ज्ञान

    September 4, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026

    By Team AvaantarSeptember 6, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 सप्टेंबर 2026; वार : रविवार भारतीय सौर : 15…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 सप्टेंबर 2026

    September 5, 2026

    जातकांचे ज्योतिष ज्ञान

    September 4, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 सप्टेंबर 2026

    September 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    मैत्रीण

    September 5, 2026

    नातवाचा ‘ध चा मा’ अन् आबा!

    September 5, 2026

    HbA1c… मधुमेह नियंत्रणाचं प्रतिबिंब

    September 5, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 423
    • अवांतर 206
    • आरोग्य 144
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 568
    • फिल्मी 65
    • फूड काॅर्नर 254
    • मैत्रीण 28
    • ललित 899
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026

    September 6, 2026
    Most Popular

    जातकांचे ज्योतिष ज्ञान

    September 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.