Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…

    June 5, 2026

    ती म्हणाली, “काळाप्रमाणे update होत नाही तो…”

    June 5, 2026

    सहावे इंद्रिय… मन

    June 5, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 5
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…
    ललित

    आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…

    प्रणाली वैद्यBy प्रणाली वैद्यJune 5, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, प्रेमकथा, लव्हस्टोरी, भेटशी नव्याने, आराध्याचा नवा अध्याय, आराध्या आणि शर्वाय जहागीरदार, शर्वायची आराध्यावर मर्जी, माधवची आराध्यावर नजर, आराध्याकडील बॉक्सचे गूढ, माधवचे कटकारस्थान, निशा माधवचे कटकारस्थान, शर्वाय आराध्या प्रेमकहाणी, शर्वायचे आराध्यावर प्रेम
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 28

    शर्वायने आराध्याच्या डोळ्यांत पाहत उत्तर दिलं, “कारण कदाचित हेच खरं आहे. तुझं साधं हसणं, तुझी कष्टाळू वृत्ती… सगळंच वेड लावतं. तुझ्याभोवती असणारी निरागसता मला माझ्या आयुष्याच्या गुंतागुंतीतून दूर नेते.”

    आराध्याच्या गालावर हलकीशी लाली आली.

    “शर्वाय… मला हे सगळं नवीन आहे. कधीच असं वाटलं नव्हतं की, माझ्या साध्या आयुष्यात असा कुणी येईल जो मला इतकं महत्त्व देईल.”

    शर्वायने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, “माझं मन सांगतंय की, तुझा माझ्यावर एक हक्क आहे. तुझं सुख, तुझी सुरक्षितता, सगळी  माझी जबाबदारी आहे.”

    त्या पावसात दोघंही न बोलता एकमेकांच्या नजरेत हरवून गेले. पाऊस त्यांना चिंब करत होता, पण त्या क्षणी दोघांच्या मनात प्रेमाचा अंकुर फुलू लागला होता. शर्वायच्या नजरेत जिव्हाळा आणि आराध्याच्या डोळ्यांत ओलसर चमक होती.

    त्या गारव्यात शर्वायने आपली जॅकेट काढून आराध्याच्या खांद्यावर घातले,

    “चल, आता भिजणं पुरे. तुझी तब्येत बिघडली तर मलाच दोष दिला जाईल.”

    आराध्या हलकंसं हसली आणि दोघं परत गाडीकडे निघाले.

    त्या पावसात दोघांच्या हृदयात प्रेमाचा सागर उफाळून येत होता. पण त्यांच्या प्रेमाचं हे नवं वळण अजून कुणालाच माहीत नव्हतं… आणि पुढे काय होईल, हे नियतीनेच ठरवलं होतं.

    0000

    दिवाकर कामानिमित्त काही दिवस बाहेर गेले होते. परतल्यावर त्यांनी सुमित्रा आजींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. आजींच्या चेहऱ्यावर एक समाधानाची झलक होती.

    “आई, कसं काय सगळं? घरी सगळे ठीक आहेत ना?” दिवाकरने विचारलं.

    “हो रे, सगळं व्यवस्थित आहे. पण एक गोष्ट आहे… तुला सांगायचं होतं,” सुमित्रा आजी म्हणाल्या.

    दिवाकर थोडासा गोंधळला, “काय झालं आई? काही समस्या आहे का?”

    सुमित्रा आजी हसत म्हणाल्या, “अरे, काहीच समस्या नाही. उलट आनंदाची बातमी आहे. आपल्या घरात आराध्या आली आहे. प्राजक्ता आणि सुशांतची मुलगी माझी बालमैत्रीण लक्ष्मीची नात.”

    हेही वाचा – ट्रेनिंगदरम्यान आराध्याला एक फाइल सापडली…

    “आराध्या? म्हणजे… ती इथे का?” दिवाकरने आश्चर्याने विचारलं.

    “गुरुजींनीच तिला इथे आणायला सांगितलेलं. काही संकट जरी आलं  तरी पण ती इथे येऊन आपल्या कुटुंबाला मदत करेल… गुरुजींनी तिला आशीर्वाद दिलाय आणि सांगितलं की, ती आपल्या घराची ओळख पुनः प्रस्थापित करेल.”

    दिवाकरच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव उमटला… “आई, गुरुजींनी असं का सांगितलं? म्हणजे काही मोठं कारण आहे का?”

    सुमित्रा आजीने हलकं हसून उत्तर दिलं, “हे मलाही पूर्ण समजलेलं नाही, पण गुरुजींच्या शब्दांवर मला विश्वास आहे. आराध्या साधी मुलगी नाही. तिच्यात एक विलक्षण ताकद आहे, जी अजून तिच्या लक्षातही आलेली नाही.”

    दिवाकर विचारमग्न झाला…. “आई, आराध्याला काही त्रास तर नाही ना? ती इथे येऊन सुखरूप आहे का?”

    “हो, अगदी ठीक आहे. शर्वाय तिचा खूपच सांभाळ करतोय. ऑफिसमध्येही तिची काळजी घेतोय,” सुमित्रा आजी अभिमानाने म्हणाल्या.

    दिवाकरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, “आई, गुरुजी काही चुकीचं बोलत नाहीत. जर त्यांनी तिच्याबाबत  अस काही  सांगितलं असेल, तर नक्कीच काही गंभीर आहे. आपणही तिची पूर्ण काळजी घेऊ.”

    सुमित्रा आजीने समाधानाने मान डोलावली. “हो बेटा, तू बरोबर म्हणतोस. पण तुला अजून एक सांगायचं आहे… माधव काहीसा विचित्र वागतोय. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.”

    दिवाकर गंभीरपणे म्हणाला, “आई, मी लक्ष ठेवतो. आराध्याच्या सुरक्षिततेला काहीही बाधा येऊ देणार नाही.”

    त्या रात्री दिवाकर विचारमग्न होता. आराध्याचं आगमन आणि गुरुजींचं मार्गदर्शन यात नक्कीच काही गूढ होतं. त्याला वाटत होतं की, हे सर्व एका मोठ्या रहस्याच्या अंगभूत घटकांचा भाग असू शकतं.

    दिवाकर गुरुजींना भेटायला त्यांच्या आश्रमातील कुटीरमध्ये गेले. गुरुजी ध्यानस्थ होते. दिवाकरने थोडा वेळ शांतपणे थांबून त्यांची प्रतीक्षा केली. काही वेळानंतर गुरुजींनी डोळे उघडले आणि मंद स्मित करून म्हणाले,

    “ये दिवाकर, तुझीच वाट पाहत होतो.”

    दिवाकरने नम्रपणे नमस्कार केला आणि गुरुजींना विचारलं, “गुरुजी, आराध्याबाबत काही कळलं का? आईने सांगितलं की तुम्ही तिला आशीर्वाद दिला आहे आणि ती आमच्या घराची ओळख पुनः प्रस्थापित करेल असं म्हणालात.”

    गुरुजींच्या चेहऱ्यावर एक गहन शांत भाव आला. ते हळू आवाजात म्हणाले, “दिवाकर, काही गोष्टी नियतीच्या नियमानुसार घडत असतात.”

    “आराध्या म्हणजे केवळ एक साधी मुलगी नाही. तिच्या अंगी एक अद्भुत शक्ती आहे. ती शक्ती सध्या सुप्त अवस्थेत आहे, पण योग्य वेळ आली की, ती प्रकट होईल.”

    दिवाकर थोडासा गोंधळला… “गुरुजी, म्हणजे नक्की काय?”

    गुरुजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, “शर्वाय आणि आराध्या हे दोघे नियतीने एकत्र बांधलेले आहेत. त्यांच्यातील नातं केवळ मानवी नाही, तर आध्यात्मिक बंध आहे.”

    “आराध्याच्या शक्तीचा योग्य उपयोग शर्वायच्या साहाय्यानेच होऊ शकतो. त्याची हुशारी आणि तिच्या ताकदीचं संयोग म्हणजेच त्यांच्या कुटुंबाचं रक्षण.”

    दिवाकरला हे ऐकून धक्का बसला. “गुरुजी, याचा अर्थ आराध्या आणि शर्वायचं नातं आधीच ठरलेलं आहे का?”

    गुरुजी मंद हसले… “अगदी तसंच! पण त्यांच्या आत्म्यांचा बंध प्राचीन आहे. दोघे एकत्र आल्यासच कुटुंबाच्या हितासाठी ते लढू शकतात. मात्र, माधवसारखे लोक या नात्याला धक्का लावू पाहतील. म्हणून शर्वाय आणि आराध्याला एकत्र ठेवणं गरजेचं आहे.”

    दिवाकर विचारात पडला… “माधवचं धोकादायक वागणं मला जाणवलं आहे. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावं लागेल.”

    गुरुजींनी डोळे मिटून आशीर्वाद दिला, म्हणाले, “शर्वायला आराध्याचा सांभाळ करायला सांग. तिच्या भोवतीचा धोका अजून संपलेला नाही. हे दोन तरुण एकमेकांच्या आधारानेच संकटांचा सामना करतील.”

    दिवाकर गुरुजींचं म्हणणं समजून घेत होता. त्याने गुरुजींना वचन दिलं की, तो शर्वाय आणि आराध्याला सुरक्षित ठेवेल.

    दिवाकर घरी परतताना  त्यांच्या मनात विचारांचं वादळ होतं. शर्वाय आणि आराध्याचं नातं, त्यांच्यातील आध्यात्मिक बंध आणि माधवचा वाढता धोका… सगळ्याचा एका धाग्यात गुंफलेला गूढपट उलगडत होता.

    0000

    इथे माधवने आपल्या नव्या डावाचा पहिला टप्पा आखला — आराध्याला शर्वायसमोर कसं अपमानित करता येईल, चुकीची  दाखवता येईल, त्यासाठी त्याने प्लॅन केला.

    ऑफिसचमध्ये आराध्या आपल्या टेबलावर बसून कामात गढलेली असताना माधव तिच्याजवळ आला. आवाजात सौम्यता ठेवत तो म्हणाला,  ” आराध्या, ही फाइल शर्वायला दे. त्याने या प्रोजेक्टच्या कागदपत्रांची मागणी केली होती.”

    आराध्या हसतच… “ठीक आहे, मी देईन…”

    आराध्या फाइल घेऊन मीटिंग करता शर्वायच्या केबिनकडे निघाली.

    केबिनमध्ये आराध्याने फाइल देताच शर्वाय ने ती उघडून पाहिली. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि थोडं नाराजीचं भाव उमटलेले आराध्याला दिसले.

    शर्वाय थोड्या गंभीर आवाजात म्हणाला…

    “आराध्या, ही फाइल चुकीची आहे. यात प्रोजेक्ट  ‘उत्तन’चे नाही तर ‘गुहाघर’ प्रोजेक्टचे कागद आहेत.”

    आराध्या हे ऐकूनच थक्क  झाली…  “पण… मला तर माधव सरांनीच दिली.”

    शर्वाय शांतपणे म्हणाला, ” काही हरकत नाही. तुझी चूक नाहीये. तू एक काम कर, माधव सरांना सांग की, मला ‘उत्तन’ प्रोजेक्टची फाइल हवी.”

    आराध्या परत  मागे  फिरली. तिने येऊन माधवला चुकीची फाइल दिली गेल्याचं सांगितलं.

    माधव खोटं हसत, “अरेरे! माझीच चूक झाली का? खरंच सॉरी आराध्या, मीच  न पाहता घाईत दिली. ही घे, ही खरी फाइल आहे,” असं  म्हणत त्याने आणखी एक फाइल काढून तिला दिली.

    आता मात्र आराध्याने फाइल हातात घेताच उघडून नीट पाहिली. हीच ती फाइल आहे, याची खात्री होताच आराध्या पुन्हा फाइल घेऊन शर्वायच्या केबिनकडे निघून गेली.

    आता आणलेली फाइल शर्वायच्या हातात देताना आराध्याने माफी मागितली. “आपण ती फाइल न पाहताच घेऊन आलो होतो. ती योग्य फाइल आहे की नाही, याची मी खात्री करायला हवी होती,” असं ती म्हणाली.

    शर्वाय मात्र न चिडता मधुर आवाजात म्हणाला, “काही हरकत नाही, आराध्या. प्रत्येकाकडून चुका होतात. तू टेन्शन नको घेऊ. पण यातून एक मात्र शिकलीस कोणत्याही वस्तू किंवा  घटनेची प्रथम खात्री करून घेणं गरजेचं असतं.  सहज विश्वास ठेऊन मोकळं होऊ नये.”

    तो तिच्याकडे पाहत हलकसं हसतो…

    आराध्या ही हलकसं हसत… “धन्यवाद सर…” म्हणून तिथून निघाली.

    शर्वायने दाखवलेल्या त्या विश्वासाने आराध्याच्या मनात त्याच्याविषयी आदर अजून वाढला.

    हेही वाचा – शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    इथे मात्र आराध्याला हसत येताना पाहून माधवचा संताप झाला.

    ती समोर येताच माधव ने आराध्याला ‘शर्वायकडून काही बोलणी खावी लागली का?’ असे विचारले.

    आराध्यानेही गंभीरपणे ‘नाही’ सांगितले. “सर काहीही बोलले नाही. उलट, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, मला समजून घेतले,” असे ती म्हणाली.

    हे ऐकून तर माधवच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला… तो विचार करू लागला,

    “शर्वाय आराध्याला  काहीच कसं बोलला नाही? उलट तिच्यावर विश्वास दाखवला… हे असं झालंच कसं?”

    कामात जराही चूक झालेली जराही चालत नसणारा  शर्वाय तिला काहीच  बोलला नाही, याचेच त्याला आश्चर्य  वाटत होते. माधव मनातून नुसता चरफडत होता. आपला  हा डाव फसला, आता अजून एका डावाची योजना करावी लागेल, अशाच विचारात तो होता.

    शर्वायच्या त्या शांत राहण्यामुळे आणि विश्वासामुळे आराध्याच्या मनात शर्वायविषयीची ओढ वाढू लागली. तिला आता वाटू लागतं की, शर्वाय फक्त एक यशस्वी व्यावसायिकच नाही, तर एक आदर्श प्रमुख आणि उत्तम माणूसही आहे.

    क्रमशः
    Avatar photo
    प्रणाली वैद्य

    प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.

    Related Posts

    ती म्हणाली, “काळाप्रमाणे update होत नाही तो…”

    June 5, 2026 ललित

    सहावे इंद्रिय… मन

    June 5, 2026 ललित

    धोंडा माझा भला…

    June 4, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    ती म्हणाली, “काळाप्रमाणे update होत नाही तो…”

    By डॉ. विवेक वैद्यJune 5, 2026

    त्याने तिला रात्री त्या निर्जनस्थळी भेटावयास बोलावले. समुद्रकिनारा.. मंद चंद्रप्रकाश… त्यामुळे चमकणारी वाळू .. आणि…

    सहावे इंद्रिय… मन

    June 5, 2026

    धोंडा माझा भला…

    June 4, 2026

    शर्वरीने राहुलला खूप मोठं गिफ्ट दिलं!

    June 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…

    June 5, 2026

    ती म्हणाली, “काळाप्रमाणे update होत नाही तो…”

    June 5, 2026

    सहावे इंद्रिय… मन

    June 5, 2026

    Recipe : कढीगोळे… विदर्भातील एक आवडता पदार्थ!

    June 5, 2026

    Dnyaneshwari : कां उदय न कीजे तेजाकारें, तंव गगनचि होऊनि असे आंधारें

    June 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 05 जून 2026

    June 5, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 319
    • अवांतर 189
    • आरोग्य 116
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 443
    • फिल्मी 51
    • फूड काॅर्नर 219
    • मैत्रीण 20
    • ललित 680
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…

    June 5, 2026

    ती म्हणाली, “काळाप्रमाणे update होत नाही तो…”

    June 5, 2026

    सहावे इंद्रिय… मन

    June 5, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.