Author: प्रणाली वैद्य

Avatar photo

प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.

भाग – 18 आराध्याने आपल्या हातातला बॉक्स दादा गुरुजींसमोर धरला. गुरुजी म्हणाले, “तू कुणालाही या बॉक्सबद्दल काहीही सांगायचं नाही. जरी विश्वासू वाटले तरी नाही. काहीही झालं, कोणी कितीही विचारलं, भीती घातली तरी… शांत राहायचं. वेळ आली की, मी स्वतः तुला सांगेन — कधी, कसे आणि कुठे हा बॉक्स शर्वायच्या हाती द्यायचं.” आराध्या गप्प झाली. गुरुजींच्या चेहऱ्यावरचा गहन गंभीर भाव तिला समजावून सांगत होतं की, हा खेळ फार मोठा आहे! गुरुजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांत आवाजात आशीर्वाद दिला… “देव तुझं रक्षण करो. तुला धैर्य आणि चातुर्य देवो.” आराध्याने डोळे मिटले. त्या क्षणी तिला जाणवलं — आता तिचं आयुष्य आधीपेक्षा…

Read More

भाग – 17 “आराध्या, तुझं येणं काही योगायोग नाही. तुला इथे आणणं हा ‘पूर्वनियोजित प्लॅन’ आहे… शर्वाय! त्याच्यापासून तुला दूर ठेवायचंय… कारण तू जर त्याच्या जवळ आलीस, तर माझं हे सगळं फसणार आहे…” माधव पुटपुटतो, दुसऱ्या दिवशी सकाळी… आनंदी आणि सुमित्रा आजी आराध्यासोबत देवपुजेला बसल्या होत्या. घरात शांतता होती… तेवढ्यात माधव मागून येतो, अगदी सौम्य आवाजात… माधव : “आराध्या, तुला इथे चांगलं वाटतंय ना?” आराध्या (हसून) : “होSS खूप.” तो तिच्याकडे अशा नजरेनं पाहतो, जणू त्या डोळ्यांत प्रेम नाही, पण काहीतरी वेगळेच भाव आहेत. आता आराध्या काही गोष्टी ओळखू लागली होती… वाड्याच्या त्या जुन्या भिंती, गुप्त दालनं… आणि शर्वायचं येणं!…

Read More

भाग – 10 आई तिच्याकडे पाहत होती, अशा नजरेनं जणू तिने मुलीला नव्यानं ओळखायला सुरुवात केली होती. “कुठे होतीस गं एवढे दिवस?” आईचा आवाज हळू, पण गंभीर होता. आराध्या तिच्याजवळ गेली, तिचा हात हातात घेत म्हणाली, “जिथं स्वतःला शोधता आलं… आणि जिथून तुला बाबांना या घरातून बाहेर काढायची ताकद मिळाली.” आईचं मन भरून आलं. डोळे पाणावले. पण आता ती कधीच रडणार नव्हती… कारण, तिला समजलं होतं, तिची मुलगी आता कोलमडणारी नाही. आराध्याने डोळे मिटून विचार केला — “शिवा… हे तूच केलंस. माझ्या आत मी होती, पण तू मला स्वतःला दाखवलंस. आता मी लढेन… आणि जिंकून दाखवेन.” सकाळचं वातावरण थोडं तणावपूर्ण…

Read More

भाग – 9 शिवाने मचाण सुंदर बनवलं होतं… “आज इथेच राहायचं का…?” तिने विचारलं. ” हो…” उत्तर देताना त्याचं लक्ष मात्र दुसरीकडेच असल्याचं तिच्या लक्षात आलं. “शिवा, काय झालं? तुम्ही असे इथे का पाहताय?” “काही नाही… असंच…” “काहीतरी असं आहे, ते शिवा माझ्यापासून लपवत आहेत…” ती मनातच विचार करत होती. रात्रीच्या त्या दाट सावलीत, तळ्याच्या पलीकडच्या झाडीत त्याने बांधलेलं ते उंचच उंच लाकडी मचाण, झाडावर उभारलेल्या सिंहासनासारखं भासत होतं. हेही वाचा – सर्वांनी हिणवल्यावर आराध्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आणि…. आराध्या शहरातली मुलगी, तिच्यासाठी हा अनुभवच नवा होता. त्या बांबूच्या आणि वेलींच्या सहाय्याने केलेल्या जिन्यावरून वर चढताना तिच्या मनात थोडा संभ्रम…

Read More

भाग – 8 “आराध्या,” त्याने हलक्याच आवाजात म्हटलं, “आपण जिथे त्या तळ्यावर बसतो, तिथे उद्या तुला काही दाखवायचंय…” तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं… “काय?” तो फक्त हसला. “तुझ्यासारख्या एखाद्या लढवय्याला काय दिलं जाऊ शकतं, ते सांगणं अवघड आहे… पण प्रयत्न करतो.” …आता ही कहाणी एका नवीन दिशा घेणार होती. नातं, जे दया किंवा सवयीवर नव्हे, तर समजुतीवर उभं राहत होतं. सकाळी आराध्या जरा लवकरच उठली होती. तिने झोपेतून उठताच अंगावर स्वच्छ शाल चढवली आणि आजूबाजूला नजर टाकली. झाडांमधून येणारा धुरकट सूर्यप्रकाश, पक्ष्यांचे आवाज आणि थोडक्याच अंतरावरून ऐकू येणाऱ्या पाण्याच्या सळसळीत एक वेगळीच ओढ होती. आज काही वेगळं घडणार आहे, हे…

Read More

भाग – 7 प्राजक्ता (आराध्याची आई) सासरी आल्यानंतर अगदी घरात मिसळून गेली. कामांची रेलचेल, नणंदेचा हट्ट, मोठ्या वहिनीच्या नाजूक मनाचा समतोल… या साऱ्याचा भार तिच्या खांद्यावर अलगदपणे टाकला गेला. शांताबाई (सासू) तिचं कौतुक करत असल्या तरी, मुलीच्या वाढत्या अस्वस्थतेचा त्यांना अंदाज येत होता. पण मग एक दिवस, मोठ्या भावाने आपला संसार वेगळा केला. मुळातच त्याच्या बायकोला एकत्र कुटुंब नको होतं. भांड्याला भांडं लागत होतंच, हे निमित्त ठरलं. दुसरीकडे नणंद, सुमती. तिच्याही मनात ‘आपलं वेगळं घर’ हे स्वप्न होतंच. ती सतत कुरकुर करत होती. “मुलीचं घर असायला हवं… वडिलांकडे तर मी राहणार नाही.” शांताबाईंना तिच्या बाळांची तगमग पाहवत नव्हती. पैशांची चणचण…

Read More

भाग – 6 आराध्याच्या घरच्यांचा विषय काढला, पण… शिवा शांत झाला. त्याला जाणवलं की, त्याच्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आहे. क्षणभर त्या दोघांत नीरव शांतता होती… फक्त आजूबाजूचा निसर्ग आणि मनातल्या उसळणाऱ्या भावना… आराध्याने अलगद श्वास घेतला आणि नजर न उचलता फक्त एवढंच पुटपुटली — “शिवा, काही वेळ शांत बसू शकतोस का? मी सांगेन… पण थोडा वेळ लागेल…” शिवाने फक्त मान हलवून होकार दिला. आता त्या गुहेबाहेर, त्या शांत निसर्गात, एक हळवं… पण थरारक सत्य उलगडण्याच्या उंबरठ्यावर होतं. आराध्याचं मौन आता झाकोळलेल्या आभाळासारखं होतं… क्षणभर ती फक्त त्याच्याकडे पाहात राहिली, त्या नजरेत अपराधगंड नव्हता. पण त्यात काहीतरी खोल, जखमी……

Read More

भाग – 4 त्या अज्ञात व्यक्तीने मग एकदा तिच्याकडे नजर टाकली, एक गूढ शांतता तिच्या चेहऱ्यावर पाहिली… आणि मग सावधपणे गुहेच्या झडपेकडे वळला. त्याने ती झडप नीट बंद केली, बाहेरच्या कोणत्याही आवाजांच्या कर्कशपणाचा थेट आत प्रवेश होऊ नये याची खात्री करून घेतली. गुहेच्या आत एक गूढ आणि सुरक्षित रात्र उतरू लागली होती… आणि त्या दोघांच्या अनोख्या भेटीची पहिली रात्र होती ती… मध्यरात्रीच्या त्या भयगर्भ शांततेत गुहेबाहेरून येणाऱ्या श्वापदांच्या घरघराटांनी, गुरगुराटांनी आणि अधूनमधून येणाऱ्या सादांनी ‘आराध्या’ची झोप चक्क मोडली. झोपेतून जागी होताच क्षणभर तिला आपण कुठे आहोत, हेच लक्षात आलं नाही. भोवती अंधाराचा भस्मासूर… नीरव शांतता आणि त्यामध्ये धडधडतं मन… पण…

Read More

भाग – 2 त्याच्या छातीत धडधड अजूनही सुरूच होती… प्रत्येक श्वास खोल, घाईघाईचा होता आणि शरीर घामाने डबडबलेले… त्या अनोळखी, पण आश्वासक व्यक्तीने ते जाणलं… आणि मग त्याने हळूहळू गुहेच्या प्रवेशद्वारावरचं मजबूत आच्छादन, जणू काळजीपूर्वक लपवलेला दरवाजा, अलगद बाजूला केला आणि गुहा उघडीली… थोडासा बाहेरचा प्रकाश दिसला… पण आता तोही झपाट्याने कमी होत चालला होता. सूर्य मागे सरकून अंधार आपली चादर पसरण्यास सिद्ध झाला होता. युवक पटकन उठून उभा राहिला. चेहरा विचारांमध्ये हरवलेला… तो बाहेर पडून थांबला… समोर फक्त काळोख आणि गूढ झाडांची रांग. जंगल आता दिवसाच्या ओळखीचं नव्हतं, ते परकं, पण जिवंत वाटणाऱ्या अस्तित्वाने व्यापलेले होते. “आता काय? इथून…

Read More

भाग – 1 घनदाट जंगलात एक प्रकारची रहस्यमय शांतता पसरलेली आहे. सूर्यकिरण झाडांच्या गर्द फांद्यांतून झिरपत जमिनीवर सोनेरी छटा निर्माण करत आहे. आजूबाजूला कुठेही मानवी हालचाल नाही… सर्वत्र निसर्गाचीच सत्ता. पानांमधून हवेच्या मंद झुळकीने हलकासा आवाज होतोय. पक्ष्यांचा किलबिलाट आणि अधूनमधून एखाद्या प्राण्याचा आवाज या शांततेला अजून जिवंत करतोय… कधी एखादा वानर टाळ्या वाजवतो, तर कधी एखादे हरण आवाज करून आपल्या टोळीला सावध करते… थोडे पुढे गेल्यावर नदीच्या खळखळाटाचा आवाज ऐकू येतो. त्याच नदीवर एक छोटा, पण सुंदर असा धबधबा कोसळतोय. पाण्याचे थेंब हवेत उडत असून त्या थेंबांमध्ये इंद्रधनुष्याच्या रंगांची हलकीशी झलक दिसतेय. संपूर्ण परिसर निर्मनुष्य असून, फक्त निसर्ग आणि…

Read More