Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: प्रणाली वैद्य
प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.
भाग – 41 आराध्या शांतपणे उठून उभी राहिली. ती समोरच्या खिडकीजवळ गेली. मनात नवनवीन गुंतागुंतीचं काहूर होतं… शर्वाय तिच्याजवळ येत हलक्या स्वरात म्हणाला, “माझ्या आयुष्यात जर कोणाला मी माझ्या पत्नीचा दर्जा देईन, तर ती फक्त एकच व्यक्ती आहे — आणि ती माझ्या समोर उभी आहे.” दिवाकर त्या दोघांनाही जवळ घेत ते म्हणाले, “तुमचा पुढचा काळ युद्धाचा आहे. या रणभूमीवर दोघांनी एकमेकांच्या साथीने लढायचं आहे. एकमेकांच्या वरचा विश्वास कधी कुठे डळमळला, तर सावरून घ्यायचं आणि पुढे जात रहायचं आहे…” त्यांनी त्या दोघांसमोर एक योजना मांडली… दिवाकर यांनी थोडं थांबून, दोघांकडे पाहत गंभीरपणे बोलायला सुरुवात केली, “शर्वाय, आराध्या… तुम्ही दोघं जसं मला सगळं प्रामाणिकपणे…
भाग – 40 त्या क्षणी व्हिलाच्या शांततेत एक निर्धार उमटलेला होता — एक संघर्ष उडण्याच्या आधीची निश्चिंती, आणि दोन मनांची एकवटलेली ताकद उद्दिपीत झाली होती. प्रोजेक्ट क्षितिज 9 आता केवळ एक फाइल नव्हती — ती दोघांच्या एकत्र लढाईची सुरुवात ठरली होती. शर्वायला आनंद वाटतं होता, पहिल्यांदा भेटलेली आराध्या आणि आताची आराध्या वेगळी जाणवत होती. इथे पहिली आराध्या असती तर, आपल्या नशिबाला कोसत बसली असती, हार मानून घेतली असती. आता मात्र तिला लढताना पाहून त्याला बरं वाटलं. ती नुसती लढायला तयार नव्हती तर तिने कल्पकतेने, एकटीने स्वतः पुढे होऊन अगदी बारीकसारीक सगळे तपशील जाणून घेऊन ते जसेच्या तसे शर्वायसमोर मांडले होते.…
भाग – 39 आराध्याने खिडकीबाहेर पाहिलं, थोडं पुढं वाकून… “हां… हाच तो व्हिला?” — तिच्या मनात विचार आला. शहराच्या बाहेरून जाताना दिसणारा हा व्हिला… नेहमी प्रश्नच पडायचा — कोण राहत असेल इथे? इतक्या उंचीवर, इतक्या एकांतात? आज मात्र तिची कॅब थेट त्या व्हिलाकडे जात होती. क्षणभर तिला असंही वाटलं, की कदाचित चुकून ही वाट निवडली गेली आहे. पण समोरच बसलेला कॅब ड्रायव्हर शांत होता. गेटजवळ गाडी येताच सेन्सरवरून ते आपोआप उघडलं. कॅब आत गेली आणि तिच्या छातीत एक अनाम धडधड सुरू झाली. व्हिलाच्या दरवाज्यापाशी येताच कॅब थांबली. आराध्या बाहेर उतरली — कदाचित काही बोलण्याच्या आधीच, दार उघडलं गेलं आणि समोर…
भाग – 38 शर्वाय तिच्या समोर आला, त्याच्या नजरेत प्रश्न नव्हता — फक्त एक ओळखीचा विश्वास होता. “मला माहिती आहे, तू नाहीस यामागे. पण माझ्या सावलीतून चालणाऱ्यांनी ही चूक का केली, हे शोधण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन करावं लागेल, आराध्या.” ती त्याच्याकडे पाहत राहिली… तो शर्वाय होता — रागात असलेला, पण अजूनही तिच्यावर विश्वास ठेवणारा! त्या क्षणी तिच्या मनात उमटलेलं फक्त एकच वाक्य होतं… “ज्याने आपल्यावर एवढा विश्वास दाखवलाय, त्याच्यासाठी मी आता स्वतःला सिद्ध करणारच…” ती पुन्हा आपल्या डेस्कवर परतली. शर्वायनं एकदा सांगितलं होतं – “जे घडतं त्याच्या पाठीमागे कारणं असतात, पण ती शोधणं आपल्याच हातात असतं.” संपूर्ण प्रोजेक्ट ‘क्षितिज 9’…
भाग – 37 दिवाकर उठून त्याच्या शेजारी येऊन बसले. तेव्हा शर्वाय विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला. त्यांनी शर्वायच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं — “आराध्या तयार आहे का? आणि या निर्णयाच्या परिणामांची कल्पना आहे ना तुम्हाला?” शर्वाय ठामपणे म्हणाला, “तिला मी कधीच जबरदस्तीने काहीच सांगितलं नाही. तिचं मत, तिचा आदर — हे माझं पहिलं कर्तव्य आहे… आणि परिणाम… तो स्वीकारायला मी तयार आहे. तिच्यासोबत असल्यास काहीही कठीण वाटणार नाही.” दिवाकर आणि आजींचा नजरेचा एक छोटासा संवाद झाला — जणू काळजाच्या एका कोपऱ्यात आधीच त्यांनी हे नातं मान्य केलं होतं, फक्त वेळेची वाट पाहत होते. “मग एक करा,” आजी म्हणाल्या, “तिच्या घरीही तुम्ही…
भाग – 36 सुमित्रा आजी आणि वडील दिवाकर यांनी शर्वाय आणि आराध्याचं नातं मान्य होते. शर्वाय आता एकटा नव्हता. त्याच्या पाठीशी त्याच्या माणसांची मान्यता होती — आणि त्याचं प्रेम, आराध्या… त्याची ताकद होती. त्याला ती रात्र पुन्हा डोळ्यासमोर आली… त्या रात्री आराध्याने हळूच हात पुढे केला. तिच्या मुठीत एक छोटी चांदीची डबी होती… “ही… मी खूप दिवसांपासून देणार होते तुम्हाला,” ती म्हणाली. शर्वाय डबी पाहतो — ती अगदी जुनी, कोरलेली, अनेक वर्षांपूर्वीची वाटली… “कुठून मिळाली ही?” त्याने शांत स्वरात विचारलं. “मी सुमित्रा आजीसोबत त्यांच्या घरी गेले होते तेव्हा…” आराध्या सांगू लागली… मी पुस्तक वाचत बसली होती. इतक्यात तुमच्या आई घाईघाईने…
भाग – 35 पावसाच्या सरी अजूनही खिडकीवर हलक्या थेंबांनी वाजत होत्या. खोलीच्या कुशीमध्ये मंद पिवळसर प्रकाश होत होता — ना फार उजळ, ना फार गडद. त्या प्रकाशात आराध्या शर्वायसाठी कपडे उघडून ठेवत होती, आणि बाजूला ठेवलेला टॉवेल उचलून ती त्याचं डोकं हलक्याने पुसत होती… शर्वाय काही बोलत नव्हता. त्याचे डोळे तिच्याकडे स्थिर होते… आराध्याचं मन मात्र क्षणाक्षणाला धडधडत होतं… तरीही तिचे हात कोमलतेने काम करत होते. “इतकं भिजून का आलात?” ती पुटपुटली. शर्वायने मंद स्मित केलं आणि म्हणाला… “तू समोर होतीस… आणि पाऊस होता. दुसरं काही सुचलंच नाही.” त्याच्या त्या एका वाक्यानं आराध्याचा श्वास अडखळला… त्या दोघांच्या नजरा एकमेकांना विचारत…
भाग – 34 फोन ठेवताना तिने नंदिनीकडे पाहिलं, आणि दोघींमध्ये एक समजूतदार हसू उमटलं. “आईचं काय?” नंदिनीने डोळ्यांनीच खुणावलं. आराध्याने डोळे मिचकावत उत्तर दिलं, “नेहमीसारखी काळजी, पण आज ती फार समाधानात होती… बहुधा मी शांत आवाजात बोलले म्हणून.” त्या क्षणी, नंदिनीच्या हातात असलेल्या फोनवर एक मेसेज हलकासा चमकला — “Safe arrival confirmed. Good work. – S” आराध्याने घरी आईला कॉल केला होता तेव्हा… तिचा आवाज शांत होता, पण शब्दांतून एक नकळतपणे काळजी दिसत होती… “आई… हो गं, मी पूर्णपणे सुरक्षित आहे. नंदिनी सोबत आहे मी. तू काळजी करू नकोस. काही दिवस इथेच राहणार आहे…” ती पुढे काही सांगणार, इतक्यात तिच्या…
भाग – 33 आराध्या गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहात होती, पण तिच्या मनात फक्त शर्वाय होता. त्याने तिच्यावर दाखवलेला विश्वास, त्याची ती सावलीसारखी साथ, आणि नजरेतला निरलस जिव्हाळा… तिचं मन पुन्हा पुन्हा त्याच्याकडे खेचलं जात होतं. शर्वायसाठी आराध्या आता केवळ एक सहकारी नव्हती, ती त्याच्या आयुष्यात नकळत स्थिरावलेली एक भावना होती — शांत, सच्ची आणि अनमोल. त्या दोघांनी एकमेकांना न स्पर्श करता, न सांगता, काहीतरी मौल्यवान गवसलं होतं — विश्वासाचं, आपुलकीचं, आणि निर्माण होणाऱ्या प्रेमाचं एक हळवं नातं. त्या मौनातही एक संवाद होता, आणि त्या क्षणात — त्या दोघांनी जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट शोधून काढली होती… ती म्हणजे प्रेम जे एकमेकांच्या…
भाग – 32 “आपला बॉस खरंच बदलतोय…” शर्वायच्या सहकाऱ्यांपैकी एक म्हणतो, “बदल नाही रे दत्ता… प्रेमाच्या झुळुकीने माणूसही फुलतो असं म्हणतात ना, अगदी तसंच काहीसं वाटतंय.” दत्ता डोळे मिचकावतो, “म्हणजे हे सगळं आराध्या मॅडममुळे?” तो फाइल हातात घेतो आणि स्वतःशीच हसतो — “बॉस, तुम्ही कुणाचं ऐकत नाही म्हणता… पण यावेळी मनाचं ऐकायला लागलात असं दिसतंय!” हळूहळू दत्ताच्या मनातही आदर निर्माण होतो — शर्वायच्या बदलासाठी आणि त्याच्या त्या शब्दात न मांडलेल्या, पण स्पष्ट उमटणाऱ्या भावना पाहून… आजपासून दोन दिवसांच्या कॉन्फरन्सकरिता शर्वायला निघायचं होतं… पण आज का कोणास ठावूक मन अस्वस्थ झालं होतं. त्या मनाला अस्वस्थ असण्याचं कारण कळलं आणि डोक्यात वीज…

