Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: प्रणाली वैद्य
प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.
भाग – 21 समुद्राच्या लाटा लांबवर किनाऱ्यावर आदळत होत्या. सूर्यप्रकाश त्या लाटांवर चमकत होता, आणि तिच्या डोळ्यांत एक अनामिक चमक निर्माण करत होता. तिचं मन क्षणभर सगळी शंका, सगळं अस्वस्थतेचं सावट विसरून त्या दृश्यात हरवून गेलं… पण हाच क्षण, जिथून गोष्टी अचानक कलाटणी घेणार होत्या! आराध्याचं अंतर्मन तिला काहीसं सावध करायचा प्रयत्न करत होतं, पण त्या भव्यतेच्या मोहात ती हलक्याच सुरात हरवलेली होती… आराध्या फ्रेश होण्याकरिता म्हणून बाथरूममध्ये गेली. नाही म्हणायला दीड तास प्रवास करून ते इथे आले होते… थोड्या वेळाने ती बाथरूममधून बाहेर आली… चेहऱ्यावर पाण्याचे थेंब, कपाळावरची बट अलगद बाजूला करत ती हसतच बोलू लागली — “अन्वी, शेखर,…
भाग – 20 “आई, मला बोलावणं आलंय एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूला जायला!” ती उत्साहाने ओरडली. “बापरे, मोठ्या कंपनीत! वा गं अन्वी…” प्राजक्ता आनंदाने म्हणाली. पण निशाच्या डोळ्यांत एक विचित्र चमक दिसली… ती लगेच अन्वीच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, “खूप छान गं! आता आपल्यालाही अभिमान वाटेल… एक काम कर, उद्या इंटरव्ह्यूला जाताना आराध्यालाही घेऊन जा. तुझ्याबरोबर तिचाही इंटरव्ह्यू होतो का बघ!” बोलताना तिचा सूर अगदी सहज होता, पण आतल्या आत तिचा डाव शिजलेला होता — आराध्याला सोबत नेताना काही तरी घडवायचं होतं… एक असं जाळं पसरायचं होतं जिथून आराध्या सहज बाहेर पडू शकणार नाही… निशा अन्वीला म्हणाली, “उद्या तू इंटरव्ह्यूला जातेस…
भाग – 19 निशा हळूवारपणे आराध्याच्या उशाखाली हात घालण्याचा प्रयत्न करत होती… तेवढ्यात एक विचित्र गोष्ट घडली! खिडकीतून अचानक थंड वाऱ्याचा जोरदार झोत खोलीत घुसला, आराध्याच्या बेडशेजारी ठेवलेला दीपस्तंभासारखा एक मोठा दिवा अचानक खाली कोसळला — जोरात आवाज झाला! निशा घाबरली, ताडकन मागे झाली… आणि तितक्यात आजींच्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला… ती घाबरून धावतच बाहेर पडली… निशा आणि माधव दोघंही त्या रात्री गुपचूप भेटले. कॉफीचे कप हातात घेऊन, ते वाड्याच्या मागच्या अंगणातल्या अंधाऱ्या झाडाखाली बसले होते. माधवने कप खाली ठेवत निशाकडे त्रासिक चेहरा करत पाहिलं. “काय मूर्खपणा केलास गं निशा?” तो पुटपुटला… “झोपलेली वाटली म्हणून तुझी घाई झाली… पण…
भाग – 18 आराध्याने आपल्या हातातला बॉक्स दादा गुरुजींसमोर धरला. गुरुजी म्हणाले, “तू कुणालाही या बॉक्सबद्दल काहीही सांगायचं नाही. जरी विश्वासू वाटले तरी नाही. काहीही झालं, कोणी कितीही विचारलं, भीती घातली तरी… शांत राहायचं. वेळ आली की, मी स्वतः तुला सांगेन — कधी, कसे आणि कुठे हा बॉक्स शर्वायच्या हाती द्यायचं.” आराध्या गप्प झाली. गुरुजींच्या चेहऱ्यावरचा गहन गंभीर भाव तिला समजावून सांगत होतं की, हा खेळ फार मोठा आहे! गुरुजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांत आवाजात आशीर्वाद दिला… “देव तुझं रक्षण करो. तुला धैर्य आणि चातुर्य देवो.” आराध्याने डोळे मिटले. त्या क्षणी तिला जाणवलं — आता तिचं आयुष्य आधीपेक्षा…
भाग – 17 “आराध्या, तुझं येणं काही योगायोग नाही. तुला इथे आणणं हा ‘पूर्वनियोजित प्लॅन’ आहे… शर्वाय! त्याच्यापासून तुला दूर ठेवायचंय… कारण तू जर त्याच्या जवळ आलीस, तर माझं हे सगळं फसणार आहे…” माधव पुटपुटतो, दुसऱ्या दिवशी सकाळी… आनंदी आणि सुमित्रा आजी आराध्यासोबत देवपुजेला बसल्या होत्या. घरात शांतता होती… तेवढ्यात माधव मागून येतो, अगदी सौम्य आवाजात… माधव : “आराध्या, तुला इथे चांगलं वाटतंय ना?” आराध्या (हसून) : “होSS खूप.” तो तिच्याकडे अशा नजरेनं पाहतो, जणू त्या डोळ्यांत प्रेम नाही, पण काहीतरी वेगळेच भाव आहेत. आता आराध्या काही गोष्टी ओळखू लागली होती… वाड्याच्या त्या जुन्या भिंती, गुप्त दालनं… आणि शर्वायचं येणं!…
भाग – 10 आई तिच्याकडे पाहत होती, अशा नजरेनं जणू तिने मुलीला नव्यानं ओळखायला सुरुवात केली होती. “कुठे होतीस गं एवढे दिवस?” आईचा आवाज हळू, पण गंभीर होता. आराध्या तिच्याजवळ गेली, तिचा हात हातात घेत म्हणाली, “जिथं स्वतःला शोधता आलं… आणि जिथून तुला बाबांना या घरातून बाहेर काढायची ताकद मिळाली.” आईचं मन भरून आलं. डोळे पाणावले. पण आता ती कधीच रडणार नव्हती… कारण, तिला समजलं होतं, तिची मुलगी आता कोलमडणारी नाही. आराध्याने डोळे मिटून विचार केला — “शिवा… हे तूच केलंस. माझ्या आत मी होती, पण तू मला स्वतःला दाखवलंस. आता मी लढेन… आणि जिंकून दाखवेन.” सकाळचं वातावरण थोडं तणावपूर्ण…
भाग – 9 शिवाने मचाण सुंदर बनवलं होतं… “आज इथेच राहायचं का…?” तिने विचारलं. ” हो…” उत्तर देताना त्याचं लक्ष मात्र दुसरीकडेच असल्याचं तिच्या लक्षात आलं. “शिवा, काय झालं? तुम्ही असे इथे का पाहताय?” “काही नाही… असंच…” “काहीतरी असं आहे, ते शिवा माझ्यापासून लपवत आहेत…” ती मनातच विचार करत होती. रात्रीच्या त्या दाट सावलीत, तळ्याच्या पलीकडच्या झाडीत त्याने बांधलेलं ते उंचच उंच लाकडी मचाण, झाडावर उभारलेल्या सिंहासनासारखं भासत होतं. हेही वाचा – सर्वांनी हिणवल्यावर आराध्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आणि…. आराध्या शहरातली मुलगी, तिच्यासाठी हा अनुभवच नवा होता. त्या बांबूच्या आणि वेलींच्या सहाय्याने केलेल्या जिन्यावरून वर चढताना तिच्या मनात थोडा संभ्रम…
भाग – 8 “आराध्या,” त्याने हलक्याच आवाजात म्हटलं, “आपण जिथे त्या तळ्यावर बसतो, तिथे उद्या तुला काही दाखवायचंय…” तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं… “काय?” तो फक्त हसला. “तुझ्यासारख्या एखाद्या लढवय्याला काय दिलं जाऊ शकतं, ते सांगणं अवघड आहे… पण प्रयत्न करतो.” …आता ही कहाणी एका नवीन दिशा घेणार होती. नातं, जे दया किंवा सवयीवर नव्हे, तर समजुतीवर उभं राहत होतं. सकाळी आराध्या जरा लवकरच उठली होती. तिने झोपेतून उठताच अंगावर स्वच्छ शाल चढवली आणि आजूबाजूला नजर टाकली. झाडांमधून येणारा धुरकट सूर्यप्रकाश, पक्ष्यांचे आवाज आणि थोडक्याच अंतरावरून ऐकू येणाऱ्या पाण्याच्या सळसळीत एक वेगळीच ओढ होती. आज काही वेगळं घडणार आहे, हे…
भाग – 7 प्राजक्ता (आराध्याची आई) सासरी आल्यानंतर अगदी घरात मिसळून गेली. कामांची रेलचेल, नणंदेचा हट्ट, मोठ्या वहिनीच्या नाजूक मनाचा समतोल… या साऱ्याचा भार तिच्या खांद्यावर अलगदपणे टाकला गेला. शांताबाई (सासू) तिचं कौतुक करत असल्या तरी, मुलीच्या वाढत्या अस्वस्थतेचा त्यांना अंदाज येत होता. पण मग एक दिवस, मोठ्या भावाने आपला संसार वेगळा केला. मुळातच त्याच्या बायकोला एकत्र कुटुंब नको होतं. भांड्याला भांडं लागत होतंच, हे निमित्त ठरलं. दुसरीकडे नणंद, सुमती. तिच्याही मनात ‘आपलं वेगळं घर’ हे स्वप्न होतंच. ती सतत कुरकुर करत होती. “मुलीचं घर असायला हवं… वडिलांकडे तर मी राहणार नाही.” शांताबाईंना तिच्या बाळांची तगमग पाहवत नव्हती. पैशांची चणचण…
भाग – 6 आराध्याच्या घरच्यांचा विषय काढला, पण… शिवा शांत झाला. त्याला जाणवलं की, त्याच्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आहे. क्षणभर त्या दोघांत नीरव शांतता होती… फक्त आजूबाजूचा निसर्ग आणि मनातल्या उसळणाऱ्या भावना… आराध्याने अलगद श्वास घेतला आणि नजर न उचलता फक्त एवढंच पुटपुटली — “शिवा, काही वेळ शांत बसू शकतोस का? मी सांगेन… पण थोडा वेळ लागेल…” शिवाने फक्त मान हलवून होकार दिला. आता त्या गुहेबाहेर, त्या शांत निसर्गात, एक हळवं… पण थरारक सत्य उलगडण्याच्या उंबरठ्यावर होतं. आराध्याचं मौन आता झाकोळलेल्या आभाळासारखं होतं… क्षणभर ती फक्त त्याच्याकडे पाहात राहिली, त्या नजरेत अपराधगंड नव्हता. पण त्यात काहीतरी खोल, जखमी……

