Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    दिनूचा वाढदिवस साजरा करायला सर्व सोसायटीच सरसावली!

    June 11, 2026

    गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

    June 10, 2026

    फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?

    June 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?
    आरोग्य

    फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरJune 10, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, मधुमेहींची तक्रार, साखर खाणे बंद करणे, विनासाखरेचे पदार्थ, ग्लुकोज निर्माण करणारे पदार्थ, हानीकारक बेकरी उत्पादाने, हानीकारक बेकरी प्रॉडक्ट, मधुमेहींची जीवनशैली, शरीर समजून घेणे,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “डॉक्टर विनासाखरेचा चहा पितोय, मिठाई बंद, बाहेरचं काहीच खात नाही, कोल्ड्रिंकला हात लावत नाही… तरी रिपोर्टमध्ये शुगर 230!” पेशंटनं ओपीडीत आल्या आल्या वकिली थाटात रिपोर्ट टेबलवर आदळत विचारलं. हा प्रश्न आजकाल इतक्यांदा ऐकायला मिळतो की, अनेकदा पेशंटच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहूनच हसू येतं…

    टीटीचं इंजेक्शन म्हणजे गंजलेलं लोखंड लागल्यास, रेबिजचं इंजेक्शन म्हणजे फक्त श्वान चावल्यास तसंच आपल्याकडं बहुतेकांना वाटतं ‘साखर’ म्हणजे फक्त किराणा दुकानातून आणलेली पांढरी साखर!

    खरी गोष्ट अशी आहे की, आपल्या शरीराला ‘ग्लुकोज’ मिळवण्यासाठी फक्त साखरेच्या डब्यावर अवलंबून राहावं लागत नाही; शरीराकडं स्वतःची एक भन्नाट ‘साखर निर्मिती यंत्रणा’ असते! मानवी शरीर हा एक अत्यंत बुद्धिमान कारखाना आहे. त्याला मेंदू चालवण्यासाठी, हृदय धडधडण्यासाठी, स्नायूंना ऊर्जा देण्यासाठी थोडक्यात प्रत्येक गोष्टीसाठी सतत ‘इंधन’ लागतं. हे इंधन म्हणजे ‘ग्लुकोज’. म्हणूनच साखर खाणं बंद केलं तरी शरीर म्हणतं “काही हरकत नाही, मी स्वतःच तयार करतो…”

    पेशंट म्हणतो, ”मी अजिब्बात साखर खात नाही…” पण मग पोळ्या? भात? बटाटा? ब्रेड? बिस्किटं? फरसाण? शेव? उपमा? पोहे? इडली? डोसा? उत्तप्पा? हे सगळे पदार्थ शरीरात गेल्यावर शेवटी ग्लुकोजमध्येच बदलतात!

    हेही वाचा – बीपी आणि शुगरच्या गोळ्या सुरू आहेत…

    उदाहरणार्थ एक मोठी पोळी म्हणजे शरीरासाठी साखरेचाच स्रोत, एक वाटी साधा भात म्हणजे झटकन मिळणारा साखरेचा स्रोत, बटाटा म्हणजे स्टार्चचा मोठा साठा आणि बेकरी आयटम्स म्हणजे ग्लुकोजचे गुप्त बॉम्बच. तुम्ही चमचाभर साखर टाळली, पण दोन पोळ्या आणि वाटीभर भात खाल्ला तरी शरीराला ग्लुकोज मिळालंच म्हणून समजा…

    आपल्या शरीरातलं यकृत म्हणजे एक अत्यंत हुशार ‘स्टोअर मॅनेजर’; आपण जे काही खातो त्यातील ग्लुकोज हे ‘ग्लायकोजन’ स्वरूपात हा मॅनेजर अडीअडचणीसाठी साठवून ठेवतो. जेव्हा बराच वेळ काही खाल्लं जात नाही, शरीरावर कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त ताण येतो, तेव्हा यकृत हा साठा पुन्हा ग्लुकोजमध्ये बदलून रक्तात सोडतं म्हणूनच सकाळी उपाशीपोटी आणि जेवणानंतर रक्तशर्करा तपासतात; कारण रात्री शरीर शांत झोपलेलं असलं तरी यकृताची ‘ग्लुकोज सप्लाय सर्व्हिस’ सुरूच असते!

    शरीराची ‘इमर्जन्सी साखर फॅक्टरी’ म्हणजे ‘ग्लुकोनिओजेनेसिस’… हे नाव थोडं अवघडंय पण प्रकार फार रंजक आहे. जेव्हा शरीराला अन्नातून पुरेशी ऊर्जा मिळत नाही, तेव्हा ते प्रथिनं आणि चरबीपासूनही ग्लुकोज तयार करू लागतं. या प्रक्रियेला ‘ग्लुकोनिओजेनेसिस’ असं म्हणतात.

    म्हणजेच शरीर म्हणतं, ”तू काहीच खात नाही, साखर अजिब्बात नाही? काही हरकत नाही, मी चरबी आणि स्नायूंमधूनच बनवतो म्हणूनच काही लोकांची उपाशी राहूनही शुगर वाढलेली असते आणि वजन खालावत जातं… राग, चिंता, अपुरी झोप, मानसिक ताण हे फक्त मनावर परिणाम करत नाहीत, ते थेट रक्तातील साखर वाढवू शकतात.

    ताण आला की शरीर ‘कॉर्टिसोल’ आणि ‘अॅड्रेनालिन’ सारखी संप्रेरकं सोडतं ही संप्रेरकं यकृताला सांगतात, “अरे, शरीर संकटात आहे पटकन जास्त ग्लुकोज तयार कर.” म्हणूनच अनेकांची रक्तशर्करा ऑफिसचा ताण, कौटुंबिक चिंता किंवा अपुऱ्या झोपेमुळंही वाढते!

    शरीरातील स्नायू हे ग्लुकोजचे मोठे ग्राहक असतात. तुम्ही चाललात, व्यायाम केला, जिने चढलात तर स्नायू रक्तातील ग्लुकोज वापरतात, पण दिवसभर खुर्चीत बसून राहिलात तर? साखर रक्तातच फिरत राहते म्हणूनच “मी गोड खात नाही” या इतकंच महत्त्वाचंय “मी हालचाल करतो.”

    हेही वाचा – आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    मग फक्त साखर बंद करून उपयोग होतो का? अगदी नाही; डायबेटीस नियंत्रण म्हणजे फक्त गोड बंद करणं नव्हे. त्यात आहाराचं प्रमाण – कर्बोदकांचं नियोजन – नियमित व्यायाम – पुरेशी झोप – ताणतणाव नियंत्रण – वजन नियंत्रण आणि वेळेवर औषधं घेणं हे सगळं येतं.

    ‘शुगर’ म्हणजे फक्त गोड पदार्थ नव्हेत हा गैरसमज जितक्या लवकर दूर होईल तितकं चांगलं… कारण अनेकदा “मी साखर खात नाही” म्हणणारा माणूस दिवसातून 2 वेळा बेकरी, 2 वेळा डेअरी, 1 वेळ फर्मेंटेड (चहा-बिस्कीट, भरपूर भात, फरसाण, दाक्षिणात्य पदार्थ) खात असतो आणि मग शरीरात ग्लुकोजचा पूर येतो…

    लक्षात ठेवा आपलं शरीर हे विलक्षण बुद्धिमान आहे. त्याला जगण्यासाठी ऊर्जा हवीच असते म्हणून तुम्ही बाहेरून साखर बंद केली तरी, शरीर विविध मार्गांनी ग्लुकोज तयार करत राहतं. म्हणूनच डायबेटीसकडे पाहताना फक्त “साखर खाल्ली का नाही?” एवढाच प्रश्न पुरेसा नसतो.. खरं गणित असतं, तुमच्या संपूर्ण जीवनशैलीचं! आणि म्हणूनच डॉक्टर वारंवार सांगतात, ”साखर कमी करा, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपलं शरीर समजून घ्या.”

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    …अखेर त्या शापित खुर्चीचं रहस्य उलगडलं!

    June 6, 2026 आरोग्य

    शारीरिक व्याधी-विकार नियंत्रणासाठी मार्गदर्शन – प्रस्तावना

    June 6, 2026 आरोग्य

    त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’

    June 3, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    …अखेर त्या शापित खुर्चीचं रहस्य उलगडलं!

    By डॉ. प्रज्ञावंत देवळेकरJune 6, 2026

    एक गृहस्थ पाठदुखीसाठी ओपीडीत आले होते, खिशावरच्या बिल्ल्यावरनं ते रिक्षाचालक असल्याचं लक्षात आलं, लक्षणजन्य औषधं…

    शारीरिक व्याधी-विकार नियंत्रणासाठी मार्गदर्शन – प्रस्तावना

    June 6, 2026

    त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’

    June 3, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    दिनूचा वाढदिवस साजरा करायला सर्व सोसायटीच सरसावली!

    June 11, 2026

    गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

    June 10, 2026

    फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?

    June 10, 2026

    Bookshelf : ‘सेपियन’… वेगवेगळ्या कोनांतून घडते आपलेच दर्शन

    June 10, 2026

    Dnyaneshwari : जें चळे ना ढळे, सरे ना मैळे

    June 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जून 2026

    June 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 324
    • अवांतर 190
    • आरोग्य 119
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 449
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 220
    • मैत्रीण 20
    • ललित 692
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    दिनूचा वाढदिवस साजरा करायला सर्व सोसायटीच सरसावली!

    June 11, 2026

    गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

    June 10, 2026

    फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?

    June 10, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.