Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: रविंद्र परांजपे
लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून गेल्या 25 वर्षांपासून ते नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. जानेवारी 2015पासून ते ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला आणि पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ व ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवर्जून संपर्क करावा. मोबाइल - 9850856774
‘अवांतर’ या मुक्त व्यासपीठावर ‘आरोग्य’ या सदराखाली आत्तापर्यंत मी एकावन्न लेख लिहिले. आरोग्य सदरातील माझा हा शेवटचा लेख असून मागील सर्व लेखांचा थोडक्यात आढावा साधकांना सादर करणे, असा या लेखाचा उद्देश आहे. निरामय आरोग्य संकल्पना मानवाच्या तीन मूलभूत गरजा : अन्न, वस्त्र आणि निवारा; यामध्ये आता ‘निरामय आरोग्य’ या वाढत्या गरजेची भर पडली आहे. वास्तविक, निरामय आरोग्य ही आपली उपलब्धी नसून आपली मूलभूत गरज आहे, ही बाब ध्यानात घेऊन आपण निरामय आरोग्यप्राप्ती आणि संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील रहायला हवे. ‘निरामय’ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ ‘निरोगी’ असा आहे. निरामय म्हणजे सात्त्विक आणि सकारात्मक, असेही म्हणता येईल. तर, ‘आरोग्य’ म्हणजे शारीरिक,…
मागील लेखात आपण हर्निया विकारासाठी योगाभ्यास तसेच आहार मार्गदर्शन घेतले. आता या लेखात आपण व्हेरिकोज व्हेन्स विकार या विषयावर मार्गदर्शन घेऊयात. व्हेरिकोज व्हेन्सविषयी थोडक्यात सतत बराच वेळ एकाच ठिकाणी उभे राहिल्याने पायांना होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो. कालांतराने पायांच्या शिरा फुगणे आणि निळ्या होणे, असे त्रास उद्भवतात. अशा वेळेस पायातील अशुद्ध रक्त हृदयाकडे आणणे गरजेचे असते. यासाठी योगाभ्यास अतिशय उपयुक्त ठरतो. आता आपण व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी उपयुक्त योगाभ्यास मार्गदर्शन घेऊयात. योगासने अभ्यास सूक्ष्म व्यायाम पदसंचालन कदमताल शयनस्थितीतील आसने उत्तानपादासन पवनमुक्तासन मर्कटासन सर्वांगासन मत्स्यासन अनंतासन शवासन विपरीत शयनस्थितीतील आसने शलभासन धनुरासन मकरासन बैठक स्थितीतील आसने पद्मासन वज्रासन उग्रासन भद्रासन शवासन दंड स्थितीतील…
मागील लेखात आपण थायराइड विकारासाठी योगाभ्यास तसेच आहार मार्गदर्शन घेतले. आता या लेखात आपण हर्निया विकार या विषयावर मार्गदर्शन घेऊयात. हर्निया (आंत्रवृध्दी) विषयी थोडक्यात हर्निया विकारात पोटाचे स्नायू शिथिल झाल्याने आतड्याचा भाग स्नायूबंधनातून बाहेर येतो. आता आपण हर्निया विकारासाठी उपयुक्त योगाभ्यास मार्गदर्शन घेऊयात. योगासने अभ्यास शयनस्थितीतील आसने उत्तानपादासन परिपूर्ण नावासन / द्रोणासन सर्वांगासन मत्स्यासन अनंतासन शवासन बैठक स्थितीतील आसने उष्ट्रासन सुप्त वज्रासन उग्रासन भद्रासन शवासन योगाभ्यास करताना शवासन हे विश्रांतीदायक आसन अवश्य घ्यावे. हेही वाचा – आम्लपित्तासाठी योगाभ्यास मार्गदर्शन… प्राणायाम अभ्यास कपालभाती अनुलोम-विलोम प्राणायाम हस्त मुद्रा प्राण मुद्रा आता आपण हर्निया विकारासाठी आहार तसेच घरगुती उपाय याबाबत उपयुक्त मार्गदर्शन घेऊयात. आहार मार्गदर्शन…
मागील दोन लेखांमधून आपण मधुमेह नियंत्रणासाठी योगाभ्यास तसेच आहार मार्गदर्शन घेतले. आता या लेखात आपण थायरॉइड विकार या विषयावर मार्गदर्शन घेऊयात. थायरॉइड विषयी थोडक्यात थायरॉइड या अंतःस्त्रावी ग्रंथीतून तयार होणार्या स्त्रावांना संप्रेरके किंवा हार्मोन्स म्हणतात. या हार्मोन्समुळे शरीरातील चयापचय प्रक्रिया नियंत्रित केली जाते आणि यातून शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. शरीराची गरज आणि चयापचय गती यामध्ये असंतुलन झाल्यास थायरॉइड विकार उद्भवतो. आता आपण थायरॉइड विकारासाठी उपयुक्त योगाभ्यास मार्गदर्शन घेऊयात. योगासने अभ्यास कंठ संचालन मानेचे सूक्ष्म व्यायाम शयनस्थितीतील आसने विपरीत करणी सर्वांगासन हलासन मत्स्यासन शवासन विपरीत शयनस्थितीतील आसने भुजंगासन धनुरासन मकरासन बैठक स्थितीतील आसने मार्जारासन उष्ट्रासन सुप्त वज्रासन सिंहासन/ सिंह मुद्रा शवासन…
मागील लेखात मधुमेह नियंत्रणाविषयी थोडक्यात माहिती घेताना आपण मधुमेहाची लक्षणे आणि कारणे जाणून घेतली. तद्नंतर आपण मधुमेह नियंत्रणासाठी योगाभ्यास मार्गदर्शन घेतले. तर, या लेखात आपण मधुमेह नियंत्रणासाठी योग्य आहार तसेच घरगुती उपाय, याबाबत उपयुक्त मार्गदर्शन घेणार आहोत. आहार मार्गदर्शन पथ्याहार – काय खावे? कोंडायुक्त कणीक मोड आलेली कडधान्य मूग, मूगडाळ मेथी, पालक, कारले, कोबी, दोडका, पडवळ, दुधी भोपळा सफरचंद, द्राक्षे आवळा, जांभूळ आक्रोड, बदाम, मनुका तंतूमय पदार्थ अपथ्याहार – काय खाऊ नये? पिष्टमय पदार्थ, गोड फळे, गूळ, साखर, तळलेले पदार्थ, आंबट पदार्थ हेही वाचा – मधुमेह नियंत्रणासाठी योगाभ्यास मार्गदर्शन घरगुती उपाय लिंबू पाणी, ओव्याचे पाणी, सुंठेचे पाणी पिणे. गाजर, कारले, पालक,…
मागील दोन लेखांमधून आपण वातविकारासाठी योगाभ्यास तसेच आहार मार्गदर्शन घेतले. आता या लेखात आपण मधुमेह या विषयावर मार्गदर्शन घेऊयात. मधुमेहाविषयी थोडक्यात… मधुमेह या आजारात रक्तातील साखरेचे (Glucose) प्रमाण खूप जास्त वाढते. इन्सुलिन हे रक्तातील साखर ऊर्जा म्हणून शरीरातील पेशींपर्यंत पोहोचण्याचे कार्य करत असते. जेव्हा स्वादुपिंड आवश्यकतेनुसार इन्सुलिन तयार करत नाही किंवा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा मधुमेह ही समस्या भेडसावते. थोडक्यात, इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शरीरातील पेशींना ग्लुकोज मिळत नाही आणि त्यांचे कार्य मंदावते आणि यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. मधुमेहाची लक्षणे सतत तहान लागणे. थकवा आणि अशक्तपणा जाणवणे. अचानक वजन कमी होणे. डोळ्यांना अस्पष्ट किंवा धूसर…
मागील लेखात वातविकाराविषयी थोडक्यात माहिती घेताना आपण वातविकाराची लक्षणे आणि कारणे जाणून घेतली. तद्नंतर आपण वातविकार निवारणार्थ योगाभ्यास मार्गदर्शन घेतले. या लेखात आपण वातविकारासाठी योग्य आहार तसेच घरगुती उपाय याबाबत उपयुक्त मार्गदर्शन घेणार आहोत. आहार मार्गदर्शन आहार सेवनाची वेळ ठराविक असावी. पथ्याहार – काय खावे? गाईचे दूध आणि तूप गव्हाची चपाती हिरव्या पालेभाज्या मूगडाळ डाळिंब, पपई, सफरचंद आले, सुंठ, ओवा ओली आणि सुकी हळद अपथ्याहार – काय खाऊ नये? वातुळ पदार्थ हेही वाचा – वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन घरगुती उपाय आहारात योग्य प्रमाणात तेलाचा आणि तुपाचा समावेश असावा. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबूरस टाकून पाणी पिणे. पोट साफ होण्यासाठी एरंडेल तेल…
मागील दोन लेखांमधून आपण आम्लपित्तासाठी योगाभ्यास तसेच आहार मार्गदर्शन घेतले. आता या लेखात आपण वातविकार या विषयावर मार्गदर्शन घेऊयात. वातविकाराविषयी थोडक्यात… आयुर्वेदानुसार शरीरातील वात दोष असंतुलित झाल्यास निर्माण होणाऱ्या शारीरिक तथा मानसिक विकारांना वातविकार म्हणतात. वात म्हणजे वायू… शरीरातील श्वास, पचन, रक्तप्रवाह, मज्जासंस्था आदी हालचालींना नियंत्रित करतो. मात्र, याचे असंतुलन वातविकारास कारणीभूत ठरते आणि शरीरातील विविध अवयवांमध्ये वेदना जाणवतात. वाताचे असंतुलन झाल्यास पुढील लक्षणे दिसून येतात – संधीवात, सांधेदुखी, आमवात, कंबरदुखी, गुडघेदुखी, कंपवात इत्यादी. याशिवाय बद्धकोष्ठता, पोटात गॅस, हातपाय सुन्न पडणे, चिंता, भीती, निद्रानाश ही देखील वातविकाराची मुख्य लक्षणे आहेत. आहाराच्या अनियमित आणि अयोग्य सवयी, अनियमित झोप तसेच विसंगत जीवनशैली…
मागील लेखात आम्लपित्ताविषयी थोडक्यात माहिती घेताना आपण आम्लपित्ताची लक्षणे आणि कारणे जाणून घेतली. तद्नंतर आपण आम्लपित्त निवारणार्थ योगाभ्यास मार्गदर्शन घेतले. या लेखाचा विषय आम्लपित्तासाठी आहार मार्गदर्शन असा असला तरी विषयाची व्याप्ती वाढवून आपण पचनसंस्था सशक्त, निरोगी करण्यासाठी देखील योग्य आहार तसेच घरगुती उपाय याबाबत उपयुक्त मार्गदर्शन घेणार आहोत. आहार मार्गदर्शन आहार सेवनाची वेळ यथायोग्य तसेच नियमित असावी. त्यात वारंवार बदल करू नयेत. आहार सात्त्विक असावा आणि त्यात पुढील पदार्थांचा समावेश असावा. गाईचे दूध, दही, लोणी, ताक आणि तूप मुगाची खिचडी फळभाज्या तंतूमय पदार्थ कोशिंबिरी ऋतूमानानुसार उपलब्ध फळे अपथ्याहार – जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये. अपथ्याहार – रात्रीच्या…
मागील लेखात आपण आरोग्य बिघडण्याची मूलभूत कारणे थोडक्यात जाणून घेतली. त्या लेखात नमूद केल्यानुसार आपण या लेखापासून ‘शारीरिक व्याधी-विकार नियंत्रणासाठी मार्गदर्शन’ या मूळ विषयावर विवेचन करणार आहोत. आता या लेखात आपण आम्लपित्त या विषयावर मार्गदर्शन घेऊयात. आम्लपित्ताविषयी थोडक्यात… पित्ताचा प्रामुख्याने पचनसंस्थेशी संबंध येतो. शरीरातील पित्त आवश्यकतेपेक्षा कमी अथवा अधिक झाल्यास पित्ताचे विकार उद्भवतात. पोटात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल तयार होणे म्हणजे आम्लपित्त होय. हेही वाचा – शारीरिक व्याधी-विकार नियंत्रणासाठी मार्गदर्शन – प्रस्तावना अपचन, पोटात मळमळणे, आंबट ढेकर येणे, छातीत आणि घशात जळजळ होणे, ही आम्लपित्ताची प्रमुख लक्षणे आहेत. मानसिक ताणतणाव, जागरण, अनियमित वेळेस आहारसेवन तसेच जास्त तेलकट आणि मसालेदार अन्नसेवन ही आम्लपित्त…

