मागील दोन लेखांमधून आपण मधुमेह नियंत्रणासाठी योगाभ्यास तसेच आहार मार्गदर्शन घेतले. आता या लेखात आपण थायरॉइड विकार या विषयावर मार्गदर्शन घेऊयात.
थायरॉइड विषयी थोडक्यात
थायरॉइड या अंतःस्त्रावी ग्रंथीतून तयार होणार्या स्त्रावांना संप्रेरके किंवा हार्मोन्स म्हणतात. या हार्मोन्समुळे शरीरातील चयापचय प्रक्रिया नियंत्रित केली जाते आणि यातून शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. शरीराची गरज आणि चयापचय गती यामध्ये असंतुलन झाल्यास थायरॉइड विकार उद्भवतो. आता आपण थायरॉइड विकारासाठी उपयुक्त योगाभ्यास मार्गदर्शन घेऊयात.
योगासने अभ्यास
कंठ संचालन
- मानेचे सूक्ष्म व्यायाम
शयनस्थितीतील आसने
- विपरीत करणी
- सर्वांगासन
- हलासन
- मत्स्यासन
- शवासन
विपरीत शयनस्थितीतील आसने
- भुजंगासन
- धनुरासन
- मकरासन
बैठक स्थितीतील आसने
- मार्जारासन
- उष्ट्रासन
- सुप्त वज्रासन
- सिंहासन/ सिंह मुद्रा
- शवासन
योगाभ्यास करताना शवासन व मकरासन ही विश्रांतीदायक आसने अवश्य घ्यावीत.
हेही वाचा – आम्लपित्तासाठी योगाभ्यास मार्गदर्शन
प्राणायाम अभ्यास
- कपालभाती
- अनुलोम-विलोम प्राणायाम
हस्त मुद्रा
- शून्य मुद्रा
- शंख मुद्रा
साधारणपणे हायपर आणि हायपो थायरॉइडसाठी योगाभ्यास एकाच प्रकारचा आहे.
आता आपण थायरॉइड विकारासाठी आहार तसेच घरगुती उपाय याबाबत उपयुक्त मार्गदर्शन घेऊयात.
आहार मार्गदर्शन – काय खावे?
- गाईचे दूध
- मुळा, आवळा
- खडीसाखर, बत्तासे
- जुना गूळ
- मध
घरगुती उपाय
- सुंठपूड आणि आवळापूड पाण्यात टाकून घेणे.
- कोबीची वाफ घेणे.
- गरम पाणी गरम असताना पिणे.
- रात्री पुरेशी झोप घेणे.
अशा रितीने आपण थायरॉइड विकारासाठी योगाभ्यासातील उपयुक्त योगासने, प्राणायाम आणि हस्त मुद्रा तसेच आहार आणि घरगुती उपाय याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन घेतले. माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ या पुस्तकात वरील सर्व अभ्यासाची कृती आणि आरोग्य लाभ याबाबत सविस्तररीत्या मार्गदर्शन केले आहे. शिवाय, वरील सर्व अभ्यासाची प्रत्यक्ष कृती माझ्या युट्यूब चॅनेलवरील Yoga for Thyroid या व्हिडीओत पाहता येतील आणि यामुळे योगाभ्यास मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरेल. सदर व्हिडीओची लिंक लेखाअंती दिली आहे. तसेच माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ या पुस्तकात या विषयावर सविस्तररीत्या मार्गदर्शन केलेले आहे.
थायरॉइड विकारासाठी नियमित योगाभ्यास नक्कीच उपयुक्त आहे. तसेच नियमित सात्त्विक आहार सेवन देखील अत्यंत गरजेचे आहे.
हेही वाचा – आम्लपित्तासाठी आहार मार्गदर्शन
या संदर्भात इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत संबंधित विषयांवर उपयुक्त सर्वसमावेशक सविस्तर मार्गदर्शनपर वस्तुपाठ सादर केले असून त्यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे निरामय आरोग्याचा परिपाक होय.
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


