ॲड. अमोल दोरवट
नमस्कार मित्रांनो,
ग्रहांची शुभत्व-अशुभत्वाची संकल्पना अनेकदा गुंतागुंतीची वाटते. पण खालील मुद्दे लक्षात ठेवले तर सोपे होईल.
अशुभ (पाप/ क्रूर) ग्रह कोणते?
- सूर्य, शनी, मंगळ
- क्षीण होणारा चंद्र (कृष्ण पक्ष)
- राहू आणि केतू
शुभ ग्रह कोणते?
- उर्वरित ग्रह म्हणजे गुरू, शुक्र, शुक्ल पक्षातील चंद्र.
- विशेष म्हणजे, बुध हा सहसा शुभच, पण तो अशुभ ग्रहासोबत असेल तर तोही अशुभ होऊ शकतो.
महत्त्वाचे बारकावे (बळ आणि परिणाम)
- वाढता चंद्र (शुक्ल पक्ष) → शुभ
- ओसरता चंद्र (कृष्ण पक्ष) → अशुभ
(अपवाद : एखाद्या शुभ ग्रहाची संगत किंवा दृष्टी असेल तर क्षीण चंद्रही शुभ होतो.)
चंद्र कोणत्या स्थितीत बलदायी?
सूर्यापासून 120° ते 240° अंतर → अतिशय शुभ
सूर्यापासून 240° ते 0° → बलहीन
प्राचीन मते
पराशर मुनींच्या सूचनांनुसार, क्षीण चंद्र + बुध एकत्र असतील तर दोघेही शुभ मानले जातात.
हेही वाचा – ज्योतिषशास्त्र सोप्या भाषेत
ग्रहांची रहस्यमय कार्यक्षेत्रे
तुमच्या आयुष्यावर कोणता ग्रह राज्य करतो? जाणून घ्या…
ग्रहमंडळ (ग्रहांचा दरबार)
- सूर्य आणि चंद्र → राजा
- मंगळ → सेनापती
- बुध → युवराज
- गुरू आणि शुक्र → मंत्री
- शनी → सेवक
- राहू आणि केतू → ग्रहसेना
वैशिष्ट्ये
- सूर्य – सर्वांचा आत्मा
- चंद्र – मनाचा कारक
- मंगळ – सामर्थ्याचा स्वामी
- बुध – वाणीचा दाता
- गुरु – ज्ञान आणि आनंद देणारा
- शुक्र – वीर्य (शक्ती, प्रजनन सामर्थ्य) याचा कारक
- शनी – दुःखाचा कारक
हेही वाचा – ज्योतिष, मनोविज्ञान आणि वेदांत
महत्त्वाची टीप
ग्रहाच्या बळावर त्याचे शुभ परिणाम अवलंबून असतात.
- बळकट सूर्य = परिपक्व आत्मा, आध्यात्मिक प्रगती
- बळकट गुरू = उत्तम ज्ञान आणि आनंद
- बळकट शनी = दुःखाचा अनुभव नाही!
असे असले तरी, संपूर्ण कुंडली, इतर ग्रहांची स्थिती आणि योग यावरच अंतिम फलित अवलंबून असते.
(संदर्भ ग्रंथ : बृहत् पराशरी होरा शास्त्र)
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


