Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    July 25, 2026

    थायरॉइड विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    July 25, 2026

     ज्योतिषशास्त्र… शुभ-अशुभ ग्रहांची माहिती

    July 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, July 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : वारियाची धांव, तैसे सरळ भाव
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : वारियाची धांव, तैसे सरळ भाव

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 25, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    तरी आर्जव तें ऐसें । प्राणाचें सौजन्य जैसें । आवडे तयाही दोषें । एकचि गा ॥354॥ कां तोंड पाहूनि प्रकाशु । न करी जेवीं चंडांशु । जगा एकचि अवकाशु । आकाश जैसें ॥355॥ तैसें जयाचें मन । माणुसाप्रति आन आन । नव्हे आणि वर्तन । ऐसें पैं तें ॥356॥ जे जगेंचि सनोळख । जगेंसीं जुनाट सोयरिक । आपपर हें भाख । जाणणें नाहीं ॥357॥ भलतेणेंसींहि मेळु । पाणिया ऐसा ढाळु । कवणेविखीं आडळु । नेघे चित्त ॥358॥ वारियाची धांव । तैसे सरळ भाव । शंका आणि हांव । नाहीं जया ॥359॥ मायेपुढें बाळका । रिगतां न पडे आवांका । तैसें मन देतां लोकां । नालोची जो ॥360॥ फांकलिया इंदीवरा । परिवारु नाहीं धनुर्धरा । तैसा कोनकोंपरा । नेणे जीव ॥361॥ चोखाळपण रत्नाचें । रत्नावरी किरणाचें । तैसें पुढां मन जयाचें । करणें पाठीं ॥362॥ आलोचूं जो नेणे । अनुभवचि जोगावणें । धरी मोकळी अंतःकरणें । नव्हेचि जया ॥363॥ दिठी नोहे मिणधी । बोलणें नाहीं संदिग्धी । कवणेंसीं हीनबुद्धी । राहाटीजे ना ॥364॥ दाहीही इंद्रियें प्रांजळें । निष्प्रपंचें निर्मळें । पांचही पालव मोकळे । आठही पाहर ॥365॥ अमृताची धार । तैसें उजूं अंतर । किंबहुना जो माहेर । या चिन्हांचें ॥366॥ तो पुरुष सुभटा । आर्जवाचा आंगवटा । जाण तेथेंचि घरटा । ज्ञानें केला ॥367॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जें आपुलें सर्वस्व द्याल, मग इयेतें सोडवुनि न्याल

    अर्थ

    अर्जुना, तर ज्यास आर्जव म्हणून म्हणतात, ते असे की, ज्याप्रमाणे प्राणांचे प्रेम कोणासंबंधीही असेना का ? ते सर्वांवर एकसारखेच असते ॥354॥ अथवा सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश करीत नाही किंवा आकाश जसे सर्व जगाला सारखीच जागा देते. ॥355॥ त्याप्रमाणे ज्याचे मन निरनिराळ्या माणसांशी निरनिराळे नसते आणि ज्याची वागणूकही अशा प्रकारची असते ॥356॥ की, सर्व जगच त्याच्या ओळखीचे आहे, त्याचे जगाशी फार जुने नाते आहे आणि आपले व परके, ही भाषा त्याच्या ठिकाणी नसते ॥357॥ त्याचे वाटेल त्याच्याशी पटते आणि पाण्यासारखी ज्याची वागण्याची रीत असते आणि कोणाही विषयी त्याचे चित्त विकल्प घेत नाही ॥358॥ वार्‍याचे वाहणे जसे सरळ असते, तसे ज्याच्या मनातील विचार सरळ असतात आणि ज्याला संशय व लोभ नसतात, ॥359॥ आईपुढे येण्यास मुलास जशी शंका वाटत नाही, त्याप्रमाणे आपल्या मनातील विचार लोकांस सांगतांना जो मागेपुढे पाहात नाही. ॥360॥ ज्याप्रमाणे उमलेल्या कमलाला आपला सुवास जसा मर्यादित जागेत दाबून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे ज्याचा जीव कोनाकोपरा जाणतच नाही. (म्हणजे ज्याच्या अंत:करणाला गुप्त जागा माहीत नाही) ॥361॥ रत्नांचा निर्मळपणा असतो, (पण) त्यांच्यापेक्षा त्याच्या किरणांचा निर्मळपणा त्याच्यापुढे असतो, त्याप्रमाणे ज्याचे मन पुढे असते व करणे पाठीमागून असते. ॥362॥ जो कोणत्याही बाबतीत संकल्प करण्याचे जाणतच नाही व जो आत्मानुभावात तृप्त असतो, जो आपल्या मनाने कशाशी चिकटतही नाही व कशाचा मुद्दाम त्यागही करत नाही ॥363॥ ज्याची दृष्टी कपटी (अथवा ओशाळी) नसते व ज्याचे बोलणे संशययुक्त नसते आणि जो कोणाशीही क्षुद्र बुद्धीने वागत नाही ॥364॥ ज्याची दहाही इंद्रिये सरळ, निष्कपट आणि शुद्ध असतात, ज्याचे पंचप्राण सदासर्वदा मोकळे असतात ॥365॥ अमृताच्या धारेप्रमाणे त्याचे अंत:करण सरळ असते. फार काय सांगावे! जो या चिन्हांचे माहेर असतो ॥366॥ अर्जुना, तो पुरुष आर्जवाची मूर्तीच आहे व तो पुरुष ज्ञानाने आपले राहावयाचे ठिकाण केले आहे, असे समज. ॥367॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : अपेक्षित पावे, तें जेणें तोषें मानवें

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : अपेक्षित पावे, तें जेणें तोषें मानवें

    July 24, 2026 अध्यात्म

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : जें आपुलें सर्वस्व द्याल, मग इयेतें सोडवुनि न्याल

    July 23, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : अपेक्षित पावे, तें जेणें तोषें मानवें

    By Team AvaantarJuly 24, 2026

    अध्याय तेरावा अगाध सरोवरीं । कमळिणी जियापरी । कां सदैवाचां घरीं । संपत्ति जैसी ॥340॥…

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जें आपुलें सर्वस्व द्याल, मग इयेतें सोडवुनि न्याल

    July 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : काइसा वासु कापुरा, मंद जेथ अवधारा

    July 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    July 25, 2026

    थायरॉइड विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    July 25, 2026

     ज्योतिषशास्त्र… शुभ-अशुभ ग्रहांची माहिती

    July 25, 2026

    विठ्ठल विठ्ठल… दोन बहिणींची पंढरीची वारी

    July 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : वारियाची धांव, तैसे सरळ भाव

    July 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जुलै 2026

    July 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 372
    • अवांतर 199
    • आरोग्य 133
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 504
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 241
    • मैत्रीण 24
    • ललित 804
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    July 25, 2026

    थायरॉइड विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    July 25, 2026

     ज्योतिषशास्त्र… शुभ-अशुभ ग्रहांची माहिती

    July 25, 2026
    Most Popular

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.