मागील लेखात मधुमेह नियंत्रणाविषयी थोडक्यात माहिती घेताना आपण मधुमेहाची लक्षणे आणि कारणे जाणून घेतली. तद्नंतर आपण मधुमेह नियंत्रणासाठी योगाभ्यास मार्गदर्शन घेतले. तर, या लेखात आपण मधुमेह नियंत्रणासाठी योग्य आहार तसेच घरगुती उपाय, याबाबत उपयुक्त मार्गदर्शन घेणार आहोत.
आहार मार्गदर्शन
पथ्याहार – काय खावे?
- कोंडायुक्त कणीक
- मोड आलेली कडधान्य
- मूग, मूगडाळ
- मेथी, पालक, कारले, कोबी, दोडका, पडवळ, दुधी भोपळा
- सफरचंद, द्राक्षे
- आवळा, जांभूळ
- आक्रोड, बदाम, मनुका
- तंतूमय पदार्थ
अपथ्याहार – काय खाऊ नये?
- पिष्टमय पदार्थ, गोड फळे, गूळ, साखर, तळलेले पदार्थ, आंबट पदार्थ
हेही वाचा – मधुमेह नियंत्रणासाठी योगाभ्यास मार्गदर्शन
घरगुती उपाय
- लिंबू पाणी, ओव्याचे पाणी, सुंठेचे पाणी पिणे.
- गाजर, कारले, पालक, कोथिंबीर यांचा रस घेणे.
- मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी कुस्करून खाणे आणि पाणी पिणे.
- गरम पाणी चावून चावून पिणे.
- वजन नियंत्रणात ठेवणे
अशा रितीने आपण मधुमेह नियंत्रणासाठी आहार आणि घरगुती उपाय याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन घेतले. माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ या पुस्तकात सदर विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले आहे. मधुमेह नियंत्रणासाठी नियमित योगाभ्यासाबरोबर नियमित सात्त्विक आहार सेवन देखील अत्यंत गरजेचे आहे.
हेही वाचा – आम्लपित्तासाठी आहार मार्गदर्शन
पुढील लेखात आपण अशाच एका शारीरिक व्याधी-विकार निवारणार्थ उपयुक्त मार्गदर्शन घेणार आहोत.
या संदर्भात इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत संबंधित विषयांवर उपयुक्त सर्वसमावेशक सविस्तर मार्गदर्शनपर वस्तुपाठ सादर केले असून त्यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे निरामय आरोग्याचा परिपाक होय.
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


