Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ‘माई’मुळे जुळले मेरठच्या पायलशी स्नेहबंध
    फिल्मी

    ‘माई’मुळे जुळले मेरठच्या पायलशी स्नेहबंध

    हर्षा गुप्तेBy हर्षा गुप्तेMay 4, 2026Updated:May 5, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, लागी तुझसे लगन सीरियल, लागी तुझसे लगनमधली माई, माई हीच ओळख, दत्ताभाऊच्या माई, माई आणि पायलचे स्नेहबंध, पायलशी जुळले स्नेहबंध, पायलची बनली आई, मेरठला राहणारी पायल
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.

    कलर्स हिंदीवर माझी एक सीरियल सुरू होती, ‘लागी तुझसे लगन’. खूप छान विषय होता. माझा रोल पण मस्त होता. त्या सीरियलला सगळे दत्ता भाऊची सीरियल म्हणायचे. आधीच खूप पॉप्युलर होती. माझी मध्यात एन्ट्री झाली. मलाही त्या सीरियलमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. एवढ्या वर्षांनंतर सुद्धा लोक मला ‘माई’ म्हणून ओळखतात. आजही लोक रस्त्यात थांबवून विचारतात की, “तुम्ही ‘दत्ताभाऊच्या माई’ ना?” खूप छान वाटतं. खरंतर, त्यानंतर ‘माई’ या नावाच्या कितीतरी भूमिका केल्या. पण ‘दत्ताभाऊची माई’ काही लोक विसरायला तयार नाहीत!

    तेव्हाच्या तर कितीतरी गोष्टी किस्से… बापरे! म्हणजे पार्लरवाल्या मुली पण म्हणायच्या की, “माई आम्ही तुमच्या घरी येऊन ब्युटी थेरपी देऊ का?” काही जण विचारायचे की, “तुम्हाला काय आवडत? आम्ही घरी डबा पाठवू.” आपापल्या घरी कार्यक्रमांना आमंत्रण द्यायला लागले. बरं, मला हेही माहीत नव्हतं की, माझ्या नावाने ‘माई लेडीज क्लब’ सुरू झाला होता. एका फेसबुक फ्रेंडकडून समजल्यावर जाम खूश होते मी… पण जेव्हा कळलं की, हा क्लब पाकिस्तानात आहे, तेव्हा मी सगळं नीट चेक करून पाकिस्तानी फेसबुक फ्रेंडना ब्लॉक करून टाकलं!

    हेही वाचा – सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    एका मुलीने तर, “माझ्या शाळेत ओपन हाऊसला याल का? मला आई, बाबा नाहीयेत ना. दोन भाऊ आहेत. खूप चांगले आहेत पण आई हवीच नं.” खूपच भावनिक क्षण होता तो!

    कितीही अडकायचं नाही म्हटलं तरी, मी अडकतेच. अशीच एका मुलीमध्ये अडकले… अगदी गुरफटले. तिची कथा व्यथा वेगळीच! ती तिच्या आईमुळे माझी सीरियल बघायची, त्या मुलीचं नाव पायल. माझ्याशी फेसबुकवर बोलायची, फेसबुक कॉल करायची. बरं चाललं होतं. एक दिवस कळलं की, तिची आई गेली… अचानक! तिने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं. नंतर भावाने तिच्या त्या खोलीत टीव्ही आणून ठेवला होता. तिचा आणि तिच्या आईचा आवडता शो ‘लागी तुझ से लगन’ सतत बघत बसायची.

    हळूहळू आई गेल्याच्या दुःखातून ती सावरायला लागली. त्या पायलची मी आई झाले. ती माझ्याशी हळूहळू बोलायला लागली. मेरठला राहणारी मुलगी माझ्याशी बोलून, दुःख मागे सारून पुन्हा उभी राहिली. ती गव्हर्नमेंट स्कूलमध्ये ड्रॉइंग शिक्षिका म्हणून जॉइन झाली. हळूहळू प्रगती करत गेली. आज ती मुलगी शाळेत मुख्याध्यापिका झालीय. मला आई, माझ्या नवऱ्याला बाबा, मुलाला दादा म्हणते. माझी मुलगी कॉलेजच्या पिकनिकला गेली होती.  मध्यरात्री दोन-अडीचच्या सुमारास दिल्लीला ट्रेन थांबली. तेव्हा या बाईने 15-20 मुली खातील एवढी गरम गरम पुरी-भाजी स्वतः बनवून आणली होती. तिने ती माझ्या लेकीला आणि तिच्या मैत्रिणींना दिली.

    हेही वाचा – हिंदी सीरियलची ऑडिशन अन्…

    आजही दरवर्षी ती माझ्या वाढदिवसाला मुंबईला येते. खूप गिफ्ट आणते, म्हणजे साडी असते, ड्रेस असतो, अगदी हेयर पिन, सेफ्टी पिना, बांगड्या, कानातले किंवा काहीही… तिला एखादी वस्तू दिसली, आवडली आणि वाटलं की, हे मम्मीसाठी घ्यावं की, ते ती आता माझ्यासाठी म्हणजे आईसाठी घेते. एक मोठं पार्सल बनवते आणि मला भेटायला येते. वर म्हणते की, मी माझा एकटेपणा विसरायला तुमच्या फॅमिलीमध्ये येते. ती येते तेव्हा आम्ही खूप धम्माल करतो. अगदी मी तिच्या हातावर मेहेंदी काढण्याचे उद्योग पण करते. मीही तिला साजेस म्हणजे एक टीचरच नाही तर, एक मुलगी वापरू शकेल, अशा असंख्य गोष्टी तिच्यासाठी घेऊन ठेवलेल्या असतात. इस्कॉन मंदिर, जुहू बीच, पिझ्झा, कानातले झुमके, वाळूचा डोंगर, लाटांवर स्वारी. अगदी काहीही येडचापगिरी करतो. ते दोन-तीन दिवस आमचे दोघींचे असतात.

    हल्ली मात्र ती सकाळी विमानाने येते आणि संध्याकाळी परत जाते. तिच्या घरी तिची चार पायांची दोन लेकरं (कुत्रे) आहेत. या आईला भेटून त्या लेकरांची आई धावत पळत पुन्हा मुंबई मेरठ फ्लाइट पकडून रिटर्न जाते. पुढल्या वर्षी परत अशीच धावपळ करण्यासाठी…

    Love you Principal Payal beta…

    Avatar photo
    हर्षा गुप्ते

    मालिका, सिने, नाट्य अभिनेत्री

    Related Posts

    मला कायम जपणारे स्नेहबंध…

    June 15, 2026 फिल्मी

    मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    June 8, 2026 फिल्मी

    देह शुद्ध करूनी भजनी भजावे…

    June 2, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    मला कायम जपणारे स्नेहबंध…

    By हर्षा गुप्तेJune 15, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. शूटिंग दरम्यान मला अजून एक मुलगा…

    मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    June 8, 2026

    देह शुद्ध करूनी भजनी भजावे…

    June 2, 2026

    सेटवरची एनर्जी म्हणजे हरहुन्नरी साईराज!

    June 1, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026

    चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य

    June 22, 2026

    Dnyaneshwari : कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी

    June 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जून 2026

    June 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 336
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 463
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 22
    • ललित 725
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026
    Most Popular

    बेटर हाफ

    June 22, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.