Author: विशाल कुलकर्णी

Avatar photo

विशाल विजय कुलकर्णी राहणार - मु.पो. चिंचवड, पुणे - 33. शिक्षणाने इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, व्यवसायाने विक्री आणि विपणन (Sales & Marketing) क्षेत्रातील अनुभवी. साहित्य आणि सर्जनशील लेखन ही माझी खरी ओळख आहे. शब्दांशी असलेली नाळ जपत मी कथा, कविता, ललित लेख, सामाजिक विषयांवरील लेखन आणि वैचारिक अभिव्यक्ती अशा विविध साहित्यप्रकारांत सातत्याने लेखन करत आलो आहे. माझ्या ‘Beyond Thresholds’ या इंग्रजी पुस्तकासह ‘यलगार’ आणि ‘ओलेत्या ओळी पावसाच्या...’ ही ई-पुस्तके (अमेझॉन केडीपी) आहेत. काही वेबसाइट्स तसेच फेसबुक सारखी विविध सामाजिक माध्यमे, वृत्तपत्रे, मासिके आणि ‘ऐसी अक्षरे मेळवीन’, ‘कविता माझी सखी’, ‘माझी भटकंती’ या माझ्या वैयक्तिक ब्लॉग्सवर नियमितपणे लेखन करतो. लेखन ही केवळ आवड नसून संवाद घडवण्याचे, विचारांना दिशा देण्याचे आणि ब्रँड्सना प्रभावी शब्दांची ताकद देण्याचे माध्यम आहे, या विश्वासातून मी VKS Storycraft Media या मालकी हक्काच्या (Proprietary) संस्थेची स्थापना केली आहे. VKS Storycraft Media ही संस्था कॉपीरायटिंग, कंटेंट रायटिंग, ब्रँड स्टोरीटेलिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि व्यवसायाभिमुख आशय निर्मिती (Business Content Creation) या क्षेत्रात व्यावसायिक सेवा प्रदान करते.

बंगाली चित्रपटसृष्टी ही एक निराळेच जग आहे. सत्यजित रे, मृणाल सेन, ऋत्विक घटक, तपन सिन्हा, ऋतुपर्णो घोष, अपर्णा सेन, श्रीजीत मुखर्जी, बुद्धदेव दासगुप्त यासारख्या मनस्वी दिग्दर्शकांनी भारतीय सिनेसृष्टीला अगदी भरभरून दिलेले आहे. या यादीत अजून एक नाव जोडायचे आहे मला. दिग्दर्शक म्हणून त्यांचा एकच चित्रपट आला, तोही बंगाली भाषेत. पण एक कला दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडबरोबरच तामिळ, मल्याळम, बंगाली आणि इतरही भाषांमधून त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. ते म्हणजे श्रीयुत समीर चंदा! त्यांनी बॉलीवूडमधील अनेक भव्य आणि ऐतिहासिक चित्रपटांचे सेट डिझाइन केलेले आहेत, ज्यासाठी त्यांना चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळालेला आहे. रंग दे बसंती (2006), ओमकारा (2006), गुरू (2007), दिल…

Read More

एका विकांताला (बऱ्याच काळानंतर) उंडगायला बाहेर पडलो होतो, सहकुटुंब! ‘पाऊस’ असा छान बरसत होता की, जणू काही एखादे व्रात्य पोर आईची नजर चुकवून घराबाहेर पळावे आणि अंगणात साचलेल्या पाण्याच्या डबर्‍यांतून, ओहोळातून त्याने मजेत फतक-फतक करत नाचायला सुरुवात करावी. तितक्यात त्याचे इतर सवंगडीही जमा व्हावेत आणि त्यांनी फेर धरावा.. पावसाचा तो अधीरेपणा सांभाळत, जणूकाही मेघांचा निरोप घेऊन पृथ्वीकडे झेपावणार्‍या त्याच्या थेंबा थेंबातून त्याची आतुरताच झळकत असावी. त्याचे थेंब पृथ्वीवर पोहोचले रे पोहोचले, की त्यांच्या स्पर्शाने ओलावलेले रस्ते तो गंध घेऊन सगळीकडे पसरवण्याच्या कामात व्यग्र झालेले दिसत होते. वेस लांघूनी क्षितीजाची घन सावळे बरस बरसले प्रिया बावरी धरा नटावी नभांत ओले रंग…

Read More

अकरावी-बारावीत असताना स्व. नानामामांच्या (आईचे मोठे बंधू) तोंडी पहिल्यांदा ‘रंग और नूर की बारात किसे पेश करू…’ ऐकलं, तेव्हा मदन मोहन नावाचा एक विलक्षण संगीतकार हिंदी चित्रसृष्टीत होऊन गेला हे प्रथमच कळलं. त्यानंतर एकदा असंच आईच्या तोंडून ‘माई रीSS, मैं कासे कहूं…’ ऐकलं आणि मग मात्र मदन मोहन या माणसाने पछाडून टाकलं मला. मी लिस्ट बनवली आणि मदन मोहन यांची गाणी रेकॉर्ड करून आणायला कॅसेटवाल्याकडे गेलो. तेव्हा कोऱ्या कॅसेट्स घेऊन त्यावर आपल्याला हवी ती गाणी रेकॉर्ड करून मिळायची. आता इंटरनेटवर हवे ते सगळे मिळते. तेव्हा मात्र, “अरे, लष्करमध्ये नको, तिकडे नव्या पेठेत तो अमुक कॅसेटवाला आहे ना, तो तुला अगदी…

Read More

भारतीय समांतर चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा काही चित्रपट केवळ कलाकृती म्हणून नव्हे, तर काळाने दिलेल्या जखमांवर ठेवलेले संवेदनशील हात म्हणून स्मरणात राहतील. बुद्धदेव दासगुप्ता यांचा ‘तहादेर कथा’ हा असाच एक चित्रपट आहे. 1992 साली प्रदर्शित झालेला हा बंगाली चित्रपट केवळ एका अज्ञात स्वातंत्र्यसैनिकाची कथा न सांगता; तो एका पिढीच्या भंगलेल्या स्वप्नांचा, अपेक्षाभंगाचा, विस्मृतीत गेलेल्या त्यागाचा आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या अंतर्मनात दडलेल्या वेदनेचा जिवंत दस्तऐवज बनून जातो. कमलकुमार मजुमदार यांच्या साहित्यकृतीवर आधारित असलेला हा चित्रपट पाहताना असे वाटत राहते की, आपण एखादी कथा, एखादा चित्रपट पाहात नसून, इतिहासाच्या विस्मरणात गेलेल्या पानांमधून उठणारा एक दीर्घ, उदास नि:श्वास ऐकत आहोत. चित्रपटाचा नायक शिबनाथ…

Read More

काही गाणी आपण ऐकतो. काही गाणी आपल्याला गुणगुणावीशी वाटतात. पण काही निवडक गाणी अशी असतात की ती ऐकताना नकळत डोळे मिटतात, श्वास संथ होतो आणि मन एका वेगळ्याच शांत प्रदेशात पोहोचते. “मन आनंद आनंद छायो…” हे असेच एक गीत आहे. 1982 साली प्रदर्शित झालेल्या ‘विजेता’ या चित्रपटातील हे गाणे. गोविंद निहलानी दिग्दर्शित आणि शशी कपूर निर्मित हा चित्रपट एका तरुणाच्या आत्मशोधाची कथा सांगतो. जीवनातील गोंधळ, अपयश, आत्मविश्वासाचा अभाव आणि त्यानंतर स्वतःचा शोध घेत पुन्हा उभे राहण्याचा हा प्रवास आहे. या प्रवासातील अंतर्मनाचा उजेड म्हणजे हे गीत. या गीताचे शब्द लिहिले आहेत कवी वसंत देव यांनी. त्यांच्या लेखणीत साहित्य, अध्यात्म आणि…

Read More

उत्तरार्ध जुम्मन चाचा, अब्दुल आणि जगदाळे मास्तर हे तिघेही असेच एकटेपणाचा शाप घेऊन जगत असलेले समदुःखी. आपल्या रोजच्या नित्यक्रमाने बांधलेले. जगण्यासाठी आयुष्याशी झगडत रहाणे, हाच एकमेव नित्यक्रम होता त्यांचा. पण आजचा दिवस काही वेगळेच प्राक्तन घेऊन आला होता. दुपारच्या जेवणापर्यंत सगळे नेहमीप्रमाणे सुरू होते. दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास अचानक एक घोळका वेशीकडे जाताना दिसला. थोड्या वेळाने अजून काही लोक पळत वेशीकडे जाताना दिसले. असेल काही तरी म्हणत चाचाने सुरुवातीला दुर्लक्ष केले. पण गर्दी वाढ़ायला लागली तसे चाचाने एकाला हटकले, “क्या हुआ रे मारती? येवडी गर्दी कशापाय जमली रे?” “पानी आ रा चिच्या. वडे (ओढे) में पानी आ रा भोत. वरल्या धरणाचं…

Read More

पूर्वार्ध जुम्मन चाचाच्या ‘फायुस्टार हाटेला’तल्या तडे गेलेल्या भिंतीवरच्या एकुलत्या एक जुनाट लाकड़ी फळीवरच्या जीर्ण झालेल्या, धूळकट काचेच्या बरणीत ठेवलेले तेलकट चुरमुऱ्याचे लाडू काढताना ती जुनाट फळी एखाद्या शंभरी उलटलेल्या म्हातारीसारखी कुरकुरली. “क्या चिच्चा, अबी कित्ता परेशान करींगे ये बुढ्ढी फल्ली को? पंदरा रुपय में दूसरी बिठा को देता बोल्या मई तो सुनतेच नै तुमें? कित्ता चिंगुसपना करींगे होर?” दुकानासमोर, एक बाजू लिंबाच्या झाडाच्या खोडाला बांधलेल्या बाकड्यावर टेकता टेकता अब्दुल मनापासून हसला… “क्या करींगे रे फल्ली बदल को? मेरी बेगमकू थोडीच बिठाना उसपे? छोड़ उनो, चा पियेगा क्या?” जुम्मनचाचा स्वतःच्याच विनोदावर हासत स्टोव्हचा पंप मारायला लागले. “अपनी म्हतारी को बिठाव तो.…

Read More

किसको सुनाएं हाले-दिले जोर ए, अदा, आवारगी मै हमने जमाने की सैर की। काबे में जा के भूल गया राह दैर की, ईमान बच गया, मेरे मौला ने खैर की। बारावीत असेन बहुदा तेव्हा. नुकतंच उर्दूचं वेड लागलं होतं. सोलापूरातल्या सिद्धेश्वर मंदिरापाशी असलेल्या पीरबाबाच्या दर्ग्यात बंदगी अदा करणार्‍या मौलवीसाहेबांकडून जमेल तसे उर्दू शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू होता. तशाच एकदा कुठल्या तरी डाळ–तांदूळ बांधून आलेल्या पुडीच्या कागदावर वरील ओळी वाचनात आल्या आणि मी थोडा चकितच झालो. ज्या कुणी शायराने हे लिहिलं होतं, “कमाल की उमदा चीज लिखी थी, फिर भी दुसरा शेर मुझे हैरत में डाल रहा था…” ‘काबे में जा…

Read More

सन 1977 सालचा स्वामी हा वरवर पाहता एक साधी, सरळ कौटुंबिक प्रेमकथा वाटते. पण प्रत्यक्षात तो प्रेक्षकांना मानवी मनाच्या अतिशय सूक्ष्म अशा विविध स्तरांवर घेऊन जाणारा चित्रपट आहे. शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘स्वामी’ याच नावाच्या कादंबरीवर आधारित बासुदांचा हा अत्यंत सुंदर चित्रपट. काही योग जुळूनच यावे लागतात. शरतचंद्रांची भावनिक खोली, बासुदांसारखा संवेदनशील दिग्दर्शक आणि गिरीश कर्नाड, शबाना आझमी, उत्पल दत्त यांच्यासारखी ताकदवान कलाकारांची फळी. त्यावर राजेश रोशन यांचे संगीत आणि किशोरदा, लतादिदी, आशाताई, येसुदास यासारख्या दिग्गजांचे स्वर. परिणाम अर्थातच विलक्षणच होणार होता! त्या वर्षी उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनेत्री आणि उत्कृष्ट कथा अशी तीन मानाची फिल्मफेअर पारितोषिके या चित्रपटाला मिळाली. कर्नाड आणि…

Read More

उत्तरार्ध रोहन सधन घरचा. वडिलांचा छोटासाच, पण स्वतःचा कारखाना होता. घरी लक्ष्मी पाणी भरत होती. पण या वेड्याला मुंबईची ओढ लागलेली. वडिलांच्या मागे लागून त्याने मुंबईत कॉलेजला प्रवेश घेतला होता.  कॉलेजमध्ये पहिल्याच दिवशी ओळख झालेल्या राजेश जगतापने त्याला आपली रूम (आणि भाडेही अर्थातच) शेअर करण्याची ऑफर दिली आणि त्याने ती सहज स्वीकारली. गेले सहा महिने राजा त्याचा सभ्यपणा अनुभवत होता. त्यांच्याच क्लासमधली कल्याणी देशमुख, भावी कॉलेज क्वीन हात धुवून रोहनच्या मागे लागली होती. पण रोहन काही तिला दाद द्यायला तयार नव्हता. त्या पार्श्वभूमीवर रोहनची चमेलीशी असलेली मैत्री जवळच्या सगळ्या मित्रांमध्ये चर्चेचा विषय होऊ पाहत होती. राजाला एकच भीती वाटत होती, ती…

Read More