Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 सप्टेंबर 2026

    September 22, 2026

    विभक्त

    September 21, 2026

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 सप्टेंबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 सप्टेंबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 22, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 22 सप्टेंबर 2026; वार : मंगळवार
    • भारतीय सौर : 31 भाद्रपद शके 1948; तिथि : एकादशी 21:42; नक्षत्र : उत्तराषाढा 07:06;
    • योग : अतिगंड 16:28; करण : वणिज 08:55;
    • सूर्य : कन्या; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:37;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    परिवर्तिनी एकादशी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    विडंबनकार दत्तू बांदेकर

    टीम अवांतर

    मराठीतील प्रसिद्ध विडंबनकार, कथाकार दत्तू बांदेकर उर्फ सख्याहरी यांचा जन्म 22 सप्टेंबर 1909 रोजी कर्नाटकातील कारवार येथे झाला. कानडी भाषेत जेमेतेम सात ’बुकं’ शिकून मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविणारे एक आगळ्या प्रतिभेचे आणि वेगळ्याच प्रकृतीचे मराठी लेखक म्हणून देखील ते ओळखले जात होते. काही काळ पुण्यात घालवल्यावर पुढे मुंबईत स्थायिक झाले. त्यांचे सारे जीवन कष्टात गेले, पण त्यांच्या स्वभावात त्याचा कडवटपणा कधी उतरलेला कुणी पाहिला नाही. मोठमोठ्या विद्वानांपासून ते अगदी सामान्यातल्या सामान्य वाचकांपर्यंत सगळ्यांनाच त्यांच्या लिखाणाने भुरळ घातली होती.

    1934 साली आचार्य अत्रे, दत्तू बांदेकर, सुंदर मानकर आणि कॅप्टन मा.कृ.शिंदे यांनी ’साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळ’ नावाचे साहित्यावर चर्चा करणारे मंडळ काढले होते. मंडळाची पहिलीच सभा विभावरी शिरूरकर यांच्या वाङ्‍मयावर मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झाली. तेव्हापासून अत्रे आणि बांदेकरांची मैत्री सुरू झाली. इतकंच नव्हे तर पुढे ते आचार्य अत्रे यांचे उजवे हात बनले.

    हेही वाचा – वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – व्यसनांची प्रवृत्ती, वारसागत गुण

    चित्रपट विषयाला वाहिलेल्या ’चित्रा’ साप्ताहिकात बांदेकर प्रूफ रीडर म्हणून लागले. काही काळाने त्यांनी ‘चित्रा’तूनच ‘तो आणि ती, आजकालचे गुन्हेगार, सख्याहरी’ यांसारखी  सदरे लिहिली. त्यातील ‘सख्याहरीला’ त्याच्या ‘प्रेयसीने लिहिलेली पत्रे’ असे स्वरूप होते. त्यातून सामान्य माणसांचे दैनंदिन जीवन, त्यांच्या भानगडी यासंबंधी चटपटीत भाष्य असे. टवाळकीच्या ढंगात लिहिलेले सदर जितके लोकप्रिय झाले तितकेच टीकेचेही धनी झाले. पुढे अत्र्यांच्या ‘नवयुग’ मध्ये ते दाखल झाले आणि अखेरपर्यंत तेथेच राहिले.

    जुलै 1940 पासून बांदेकर आचार्य अत्रे यांच्या साप्ताहिक नवयुगमध्ये ’रविवारचा मोरावळा’ नावाचे सदर लिहीत. ’सख्या हरी’ या टोपणनावाखाली प्रकाशित होणाऱ्या बांदेकरांच्या सदरामुळे ते महाराष्ट्राचे लाडके लेखक झाले. अत्र्यांच्या नवयुगमधून बांदेकरांनी लिहिलेली ‘अक्काबाईचा कोंबडा’, ‘जग ही रंगभूमी’, ‘घारुअण्णांची चंची’ ही सदरे लोकप्रिय झाली. याशिवाय ‘नवयुग’मधून चित्रपट परीक्षणे, नाट्यपरीक्षणेही त्यांनी लिहिली. संगीत सौभद्र, संगीत मानापमान अशा नाटकांचा आधार घेऊन, त्यातील एखादा प्रसंग घेऊन बांदेकरांनी विडंबनातून आपले विचार मांडले. काही विनोदी लघुकथाही त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा संदर्भ डोळ्यापुढे ठेवून लिहिल्या.

    दत्तू बांदेकर स्वतः प्रसिद्धिपराङ्‍मुख होते. ते इतके लाजरे होते की ते कधीही वाचकांसमोर आले नाहीत की त्यांनी कुणालाही आपली मुलाखत घेऊ दिली नाही, आपला फोटो काढू दिला नाही.

    त्यांचे मित्र मा.कृ.शिंदे यांना दत्तू बांदेकरांच्या नृत्याभिनयाच्या गुणाची चांगली कल्पना होती. पण शिंदे यांनी कितीही आटापिटा केला तरी बांदेकरांना ते रंगमंचावर आणू शकले नाहीत. दत्तू बांदेकर यांनी लिहिलेले ’विचित्र चोर’ हे नाटक रंगमंचावर आले खरे, पण पहिल्याच प्रयोगात आपटले. त्याचा धसका घेऊन नाटकाच्या सर्व उपलब्ध प्रती बांदेकरांनी जाळून टाकल्या.

    दत्तू बांदेकरांच्या ’जावई शोध’ या दुसऱ्या नाटकाचे मात्र काही प्रयोग झाले. या नाटकाची भाषा कोकणीमिश्रित मराठी असून त्यात बांदेकरांनी कारवारमधील काळू नदीचे आणि निसर्गसौंदर्याचे वर्णन केले आहे. 1951 साली कारवारला अ.का. प्रियोळकर यांच्या अध्यक्षतेखाली जे मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्यात या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.

    दत्तू बांदेकर हे चित्रपट-नाट्य समीक्षणे अशा स्वरूपाचाही मजकूर लिहीत. राजकीय व वाङमयीन क्षेत्र हा बांदेकरांच्या विनोदाचा विषय असे. उपरोध तरल कल्पकता, हजरजबाबी कोटिबाजपणा आणि रंजकता ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि लेखन कार्याचा आढावा घेणारे ‘कारुण्याचा विनोदी शाहीर’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. 3 ऑक्टोबर 1959 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आजचा दिवस तुमच्या नात्यात असा गोडवा आणेल की त्याचा प्रभाव दिवसभर जाणवेल. व्यवसायात चढ-उतार येतील, पण तुम्ही  प्रत्येक परिस्थिती हाताळाल. एक मोठा आर्थिक निर्णय भविष्यातील नफ्याचा मार्ग मोकळा करू शकतो. लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या हेतूंचा विचार करण्याचा प्रयत्न करा; दिवस खूप शांततेत जाईल.

    वृषभ – आजच्या दिवसात अनेक संधी उपलब्ध होतील. एका मोठ्या व्यावसायिक करारामुळे उत्साह वाढेल आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. घराशी किंवा मालमत्तेशी संबंधित मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-वडिलांचा आशीर्वाद  मदत करेल. कामाच्या तुमची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडाल. सामाजिक कार्यांमधील सक्रिय सहभागामुळे तुमची ओळख अधिक दृढ होईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होतील.

    मिथुन – आज, तुमची प्रतिभा आणि सर्जनशीलता लोकांना आकर्षित करेल.  तुम्ही मांडलेल्या नवीन कल्पना कामाच्या ठिकाणी चर्चेचा विषय बनू शकतात. कला, लेखन किंवा सर्जनशील कामांचा आनंद घ्याल. एखाद्या सहकाऱ्याचे बोलणे थोडे त्रासदायक ठरू शकते, परंतु संयम हाच तुमचा सर्वात मोठा आधार असेल. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आशेचा किरण दिसू शकेल.

    कर्क – आज मनात नकारात्मक विचार घोळतील, ज्यामुळे तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते. अशा वेळी घाईत निर्णय घेणे टाळा, विशेषतः पैशांसंबंधीचे, कारण एक छोटीशी चूकसुद्धा अडचणी निर्माण करू शकते. कुटुंबात वाद होऊ शकतात, पण प्रेम आणि संवादामुळे परिस्थिती शांत होईल. एखादे प्रलंबित सरकारी प्रकरण पुढे सरकू शकते. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी तुम्ही उत्साही असाल.

    सिंह – आज तुमच्यात आत्मविश्वास, उत्साह आणि ऊर्जा दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीबद्दल वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असेल. शेअर बाजारात असलेल्यांसाठी आशादायक संधी दिसू शकतात. आज कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न कराल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने दुरावा कमी होईल आणि नातेसंबंध पुन्हा दृढ होतील.

    कन्या – आज एक लहानसा निष्काळजीपणासुद्धा मोठ्या संकटात टाकू शकतो, त्यामुळे प्रत्येक निर्णयाचा काळजीपूर्वक विचार करणे महत्त्वाचे ठरेल. भागीदारीमध्ये विशेष सावधगिरी बाळगावी लागेल. कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. एखादे प्रलंबित काम पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. स्वतःच्या आरोग्याबाबत सावध राहणे महत्त्वाचे आहे. महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्तऐवज सुरक्षित ठेवा. काही आर्थिक व्यवहार निकाली निघण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे तुमच्यावरचा भार हलका होईल.

    तुळ – आज विवेकबुद्धी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढू शकते. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग खुले होतील, मात्र एखाद्या आर्थिक बाबीमुळे थोडी चिंता निर्माण होऊ शकते. भूतकाळातील चुका उघडकीस येण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधगिरीने पुढे जा. परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. आपले  काम इतरांवर सोपवण्याऐवजी, त्याची जबाबदारी स्वतः घ्या. संततीच्या यशामुळे आज तुम्हाला अभिमान आणि आनंद दोन्ही वाटेल.

    वृश्चिक – आज तुमची सामाजिक प्रतिष्ठा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. घरी पूजा किंवा धार्मिक कार्यक्रमाची तयारी सुरू असू शकते. सततच्या धावपळीमुळे थकवा जाणवेल, म्हणून पुरेशी विश्रांती अवश्य घ्या. तुमचा बेफिकीर स्वभाव कधीकधी समस्या निर्माण करू शकतो, म्हणून बोलण्यात आणि वागण्यात संतुलन राखा. वैयक्तिक गोष्टी सर्वांना सांगणे टाळा. जर  कुटुंबासमोर एखादी चूक उघड झाली, तर अहंकार बाजूला ठेवून ती मान्य केल्याने नातेसंबंध अधिक दृढ होतील.

    हेही वाचा – एकटं टाकून…

    धनु – आज तुम्हाला प्रचंड उत्साह आणि नवी ऊर्जा जाणवेल. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित कराल.  एक नवीन सुरुवात करण्यासाठी उत्सुक असाल. उत्तम आरोग्य राखण्यासाठी स्वतःच्या दैनंदिन दिनचर्येत योग आणि व्यायामाचा समावेश करणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील कोणतेही वाद चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करा.

    मकर – आज संयम आणि समजूतदारपणाची गरज आहे. एखादी दीर्घकालीन आरोग्य समस्या तुम्हाला पुन्हा त्रास देत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. कुटुंब आणि काम यांच्यात संतुलन राखणे अत्यावश्यक असेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक पैलूचा विचार करा, कारण घाईमुळे नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. जर तुम्ही शांतपणे  परिस्थितीला सामोरे गेलात तर परिस्थिती हळूहळू तुमच्या नियंत्रणात येईल, अवघड कामेसुद्धा सोपी वाटू लागतील.

    कुंभ – आज समाजात तुमची ओळख आणि प्रभाव दोन्ही वाढू शकतो. तुमच्या कल्पना आणि कामाचे कौतुक होईल. चांगली आर्थिक परिस्थिती समाधान देईल. मात्र, इतरांच्या वैयक्तिक बाबींमध्ये जास्त हस्तक्षेप करणे टाळा. जर तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल काही नाजूक भावना असतील, तर त्या व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस एक विशेष संधी ठरू शकतो. काही जातकांचे मन भक्ती आणि अध्यात्माकडे आकर्षित होईल. काही अत्यावश्यक खर्चांमुळे थोडी चिंता वाटू शकते.

    मीन – आज, तुमचे आरोग्य आणि ऊर्जा तुम्हाला पूर्णपणे साथ देतील. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक उत्साही आणि सकारात्मक वाटेल. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी सहकारी किंवा कनिष्ठ व्यक्तीची मदत उपयुक्त ठरू शकते. नशिबाची साथ असल्यामुळे, अनेक प्रलंबित कामे सहजपणे पूर्ण होतील. दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत समाधान आणि शांती नांदेल. शिवाय एक सकारात्मक भावना अनुभवायला मिळेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – व्यसनांची प्रवृत्ती, वारसागत गुण

    September 21, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 सप्टेंबर 2026

    September 21, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 20 ते 26 सप्टेंबर 2026

    September 20, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – व्यसनांची प्रवृत्ती, वारसागत गुण

    By ज्योतिषी हृषिकेश पानकरSeptember 21, 2026

    जीवनप्रवास उलगडणारे 100 ज्योतिषीय मार्गदर्शक सूत्रे – 53) कोणत्याही वयात – सर्जनशील अडथळे ज्योतिषीय सिद्धांत…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 सप्टेंबर 2026

    September 21, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 20 ते 26 सप्टेंबर 2026

    September 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 20 सप्टेंबर 2026

    September 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 सप्टेंबर 2026

    September 22, 2026

    विभक्त

    September 21, 2026

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – व्यसनांची प्रवृत्ती, वारसागत गुण

    September 21, 2026

    एकटं टाकून…

    September 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : दीपकाची अर्ची, राहाटी वाहे घरींची

    September 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 442
    • अवांतर 208
    • आरोग्य 149
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 593
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 934
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 सप्टेंबर 2026

    September 22, 2026

    विभक्त

    September 21, 2026

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.