Author: हर्षा गुप्ते

Avatar photo

मालिका, सिने, नाट्य अभिनेत्री

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. सध्या वातावरण खूप मस्त आहे. श्रावण सुरू होतानाच वेध लागतात सणांचे. हा श्रावण सरलाय, आता मात्र आतुरता बाप्पाच्या आगमनाची! बाजारात अगदी धांदल उडालीय, तऱ्हेतऱ्हेच्या सजावटी, मखर, खरी-खोटी फुलं-पान, वेली. रस्त्याच्या कडेला उभारलेले मांडव ज्यात विक्रीसाठी ठेवलेल्या बाप्पांच्या सुंदर सुबक मूर्ती. त्या पाहताना लहानपण आठवलं. आजोबा, वडील, काका, आत्या आणि आम्ही भावंड बाप्पाला घरी आणायला जायचो. छान टाळ, घंट्या, टाळ्यांच्या आणि ‘बाप्पा मोरया’च्या गजरात बाप्पा घरी यायचे. तेव्हा आतासारखं डीजेच्या गोंधळात बाप्पा येत नव्हते. टाळ वाजवत, फार तर फार ताशा, कोंबडी बाजा, मग कच्ची आणि बेंजो या वाद्यांवर सार्वजनिक गणपतींचं आगमन व्हायचं.…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… आज भेटुयात आपल्या मुंबईला! मुंबई मेरी जान… मी मुंबईकर… खरंतर, मुंबई खरंच महान आहे. अठरा पगड जातीच्या आणि धर्माच्या लोकांना एकत्र जगवते, ती माझी मुंबई. अडल्या-पडल्याला मदत करते, स्वतःमध्ये सामावून घेते… ती आमची मुंबई. अव्याहत धावत असते, माणसांनी ओतप्रोत भरलेली, कधीही न थांबणारी, न थकणारी माझी मुंबई. मुंबई माझी जन्मभूमी आणि कर्म भूमी! बाहेरगावाहून कोणीही यावं… शिक्षणासाठी, पोटापाण्यासाठी… मुंबई त्यांना आपलंसं करतेच. हाताला काम, भुकेल्याला दाणा देते, डोक्यावर छप्पर सुद्धा देते. अशी ही माझी मुंबई. अगदी घातपातानंतर सुद्धा ताठ उभी राहते. एकदा एक हिंदी सीरियलच्या सेटवर एक मुलगा म्हणाला की, “आपकी…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. मी अकरावीला असताना ‘हीरो’ सिनेमा रीलीज झाला. खूप सारे नावाजलेले कलाकार त्यात होते. शिवाय, दोन नवीन कलाकार – जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री. ब्लॉक बस्टर फिल्म ठरली. जॅकी आणि मीनाक्षीच्या प्रेमात पडलेली तरूणाई. जॅकीसाठी मुली तशाही वेड्याच झाल्या होत्या. मी म्हणायचे, ‘त्यात काय एवढं फक्त हँडसम आहे. ॲक्टर तर यथातथाच…’ पण ‘परिंदा’ रीलीज झाला आणि जॅकीने सिद्ध केलं की, तो ॲक्टर पण चांगलाच आहे! त्याच्या इतर भूमिका बघता बघता मलाही तो आवडायला लागला. मधे खूप वर्षे गेली. विक्रोळीला दहीहंडीच्या कार्यक्रमाला मला चीफ गेस्ट म्हणून बोलावलं होतं. तिथे हा बाबा भेटला. लांबूनच…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. हनी ट्रॅप (Honey trap)… जरा वेगळा आणि चर्चेसाठी तसा धाडसी विषय. काही बोल्ड किंवा कडक शब्द वापरले गेले, तर आज मला माफ करा. मी एक मराठी सीरियल करत होते. पाच-सहा तरुण मुली होत्या, त्या सीरियलमध्ये. तिथे जो सगळ्यात मोठा जबाबदार माणूस होता, खूप उत्कृष्ट काम करणारा ‘एक्स’ म्हणूयात त्याला. हल्लीच्या ट्रेंडप्रमाणे सगळ्या मुली सेटवर आल्या की, ‘दादा’ म्हणून त्याला मिठी मारायच्या. तोही तेवढ्याच प्रेमाने त्या मुलींना ‘Good morning’ म्हणायचा. नवीनच लग्न झालं होतं त्याचं. नेमकं काही काळासाठी आमचं नाइट शूट लावावं लागत होतं. प्रत्येक जण आपापल्या कामात असायचे. हा ‘एक्स’ त्याचं…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आपल्या आयुष्यात कितीतरी नाती जुळून येतात… काही नाती खूप जवळीक साधून असतात… अगदी प्राणांहून जास्त! माझ्यासाठी असंच एक नातं – जे नव्हतं जणू माझ्या आयुष्यात – आजोबा आणि नातीच नातं. मला दोन्हीकडे आजोबा नव्हते. आई आणि आप्पा दोघांचेही वडील त्यांच्या लहानपणीच गेले. पण आजी या नात्याने मी मात्र खूप समृद्ध होते. आई आणि आप्पा, दोघांच्या आई तर होत्याच. आईकडून एक मामाची मोठी आई म्हणजे आईची आई, एक काकी आजी, मामी आजी, मावशी आजी होत्या… तर आप्पांकडून त्यांची आई म्हणजे आप्पांची मोठी आई, खूप लाडकी… खेतवाडीतली मामी आजी म्हणजे नानी मामी मला…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. खरंतर आजकाल घराघरात कलाकार जन्माला येत असतो. प्रत्येकाला सुपरस्टार व्हायचं असतं. एखाद्याला छोटं-मोठं काम मिळालंच तर, स्वतःला ‘सुपरस्टार’ समजायला लागतात.   तसे तर, आजकाल काम मिळवून देणारे कितीतरी एजंट्स आहेत. 20 टक्के – 25 टक्के घेऊन ते लोक काम मिळवून देतात. पण काम करणारे खरंच कलाकार आहेत का, स्वतःला फक्त समजणारे आहेत. त्यामुळे काम मिळण्याआधी पैसे घेणारे आणि देणारे आहेत. मग त्यात कितीतरी जण फसवले जातात. मधे एक मुलगा मला भेटला होता. म्हणाला, मॅडम तुमच्यासोबत मी नवीन सिनेमा करतोय. मला आश्चर्य वाटलं. माझं तर कोणाशी बोलणं पण सुरू नव्हतं, नव्या सिनेमाबाबत! वर…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. तुम्ही जेव्हा सीरियल किंवा सिनेमा बघता, त्यात किचनचा सीन असला की, त्यात तुम्हाला भाज्या दिसत असतीलच. ताज्या ताज्या हिरव्यागार पालेभाज्या, लालभडक टोमॅटो… या अणि अशा मस्त भाज्या… डोळ्यांना सुखावणाऱ्या! त्या सीनसाठी या भाज्या सेटवर आणल्या जातात. दिवसअखेर या भाज्या सुकतात, खराब होतात. दुसऱ्या दिवशी जर सीन कंटिन्यू होणार असेल तर, पुन्हा सगळ्या भाज्या तशाच्या तशा विकत आणाव्या लागतात… सीन संपल्यानंतर त्या भाज्यांचं काय करत असतील? हा गहन, महान प्रश्न मला कायम भेडसावयचा. जेव्हा हा सीन करणं माझ्या वाट्याला आला, तेव्हा मी विचारलं, की “काय रे आता सीन तर झाला… या भाजीचं…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. माझी एक मैत्रीण आहे… छोटी मैत्रीण, सहकलाकार, मुलगी… सगळंच. खूप छान अभिनेत्री, सशक्त निर्माती, धडाडीची राजकारणी, उत्तम मैत्रीण आणि परफेक्ट आई! अजून एक महत्त्वाची ओळख – मराठी ‘बिग बॉस’ पहिल्या सीझनची विजेती!! अशी माझी लाडकी व्यक्ती म्हणजे मेघा धाडे. तशी ती खूप लहान असताना घर, शहर सोडून करिअर करण्यासाठी मुंबईत आली. खूप मेहनत केली. तेव्हा कुठे ती ‘The Megha Dhade’ म्हणून नावारूपाला आली. स्वभावाने कडक, शिस्तप्रिय आणि फटकळ. गोरीपान, देखणी, कमी वयाची आणि एकटी मुलगी, काही बेशिस्त आणि अव्यवहारी लोकांशी जराशी दोन हात लांब राहूनच नावारूपाला आली… शिवाय, लहान वयातच सिंगल…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. नुकतीच वटपौर्णिमा झाली. माझा भलताच आवडता सण. अगदी लहान असल्यापासून! आईसोबत पूजेचं समान आणणे. तिला पूजेचं तबक भरायला मदत करणे… यात मी पुढे असायची. कधी कधी नव्हे तर, बरेचदा आईचा ओरडा खायची, चापट किंवा धपाटा सुद्धा खाल्ला… ‘सारखी लुडबूड करू नकोस’ असं म्हणून! सकाळ उजाडली की, मी तिला घरकामात मदत करून तयार व्हायचे. आई मात्र वर्षानुवर्षे एकच, मामाच्या मोठ्याईची (तिच्याच आईची) अंजिरी रंगाची (सोन्याची जर असलेली) जरीकाठी नऊवारी नेसायची (तिच्याकडे एकच नऊवारी साडी होती). वडाची पूजा झाल्यावर खेतवाडी आठवी गल्लीमध्ये नाना आजोबांच्या घरी जायचा शिरस्ता होता. तिथे जाऊन मामी आजी आणि…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. माझ्या आयुष्यात आलेली ही ‘बेबी’, म्हणजे ‘स्नेहलता प्रभाकर गुप्ते’… माझ्या सासूबाई! म्हणजे मी त्यांना आईच म्हणते; पण त्यांची भावंडं त्यांना ‘बेबी’ म्हणायची आणि माझा मुलगा पण त्यांना बेबी म्हणायचा. खरंतर, सगळ्या नातवंडांची ती ‘ओबा आजी’. ओबा म्हणजे माझे सासरे. माझ्या भाच्याने बाबा + आजोबा = ओबा असे त्यांचं नामकरण केलं आणि त्यांची बायको म्हणजे ओबा आजी हे माझ्या लेकाने केलेल नामकरण! तर अशा या माझ्या सासूबाई. म्हणजे आमच्या आई. गोऱ्यापान, देखण्या, कुरळे केस, सुगरण, टिपीकल सीकेपी… म्हणजे मसाल्याचं पाणी जरी उकळवून दिलं तरी ते चविष्टच लागणार. बरं, फक्त सुगरण नाही तर,…

Read More