Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अंतर्मुख होऊन करावी स्वामींची सेवा

    September 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये

    September 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी
    फिल्मी

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारSeptember 14, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, अस्मिता हवालदार, डॉ अस्मिता हवालदार, The Intouchable, जगावेगळी कहाणी, विकलांग फिलिप, Bookshelf, बेधडक द्रिस, फ्रेंच चित्रपट,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    The Intouchable हा खूप गाजलेला, सगळे रेकोर्ड तोडणारा फ्रेंच भाषेतला सिनेमा मी पाहिला, तेव्हापासून विचारचक्र सुरू झालं आहे. मानेखाली संवेदना नसलेला फिलिप आणि त्याला सांभाळायला नेमलेला द्रिस यांची ही कहाणी. जगावेगळी कहाणी. या सिनेमातले सर्वात महत्त्वाचे वाक्य म्हणजे, ‘त्याच्या भूतकाळाशी माझं देणघेण नाही. तो मला सहानुभूती दाखवत नाही, हेच मला हवंय.’

    हे वाक्य कानावर आदळले आणि अक्षरशः डोळे उघडले. अपंग व्यक्तींना सहानुभूती नको असते, त्यांना बरोबरीची वागणूक हवी असते. अजाणतेपणे, निश्चितच चांगल्या हेतूने, आपण त्यांना सहानुभूती दाखवत असतो, त्यामुळे त्यांना सतत त्यांच्यातल्या कमतरतेची जाणीव होत राहते. त्यांचा स्वाभिमान दुखावतो. फिलिपच्या बाबतीत हेच घडत होते. फिलिपला adventure sports ची आवड असते. त्यात अपघात होऊन त्याचा तिसरा, चौथा मणका तुटतो. त्यामुळे मानेखालची संवेदना जाते. तो अतिश्रीमंत असल्यामुळे नोकरचाकर, सोयीसुविधा असतात. त्याला सांभाळण्यासाठी एक पुरुष नेमायचा असतो. त्यात द्रिस हा कृष्णवर्णीय मुलगा अर्ज करतो. त्याला नोकरीत रस नसतो… इथून नकार मिळाला की, सरकारकडून दिले जाणारे फायदे मिळत राहतील आणि तो पुन्हा मजेत जगेल, हाच उद्देश असतो.

    तो घरी गेल्यावर त्याची आई त्याला रागावून घराबाहेर काढते. दुसरीकडे, फिलिपला तो आवडलेला असतो, त्यामुळे ट्रायलसाठी त्याला कामावर ठेवून घेतले जाते. द्रिस आनंदी असणारा बेफिकीर मुलगा असतो. तो फिलिपबरोबर विनोद करतो, त्याला हसवतो, त्याच्या व्यंगासकट आनंदाने जगण्याचा मार्ग दाखवतो. फिलिप कलासक्त असतो. तो पेंटिंग्जचा जाणकार असतो, ऑपेरा, काव्य, साहित्य यात रस असतो.

    हेही वाचा – Rental family… आयुष्यातील गाळलेल्या जागा भरणारे!

    एका पेंटिंगची अवाढव्य किंमत ऐकून द्रिस स्वतः पेंटिंग करायचे ठरवतो आणि ते अकरा हजार युरोत विकले जाते. तो फिलीपबरोबर ऑपेरात जातो, तेव्हा रंगमंचावर झाडाच्या अवतारात एक माणूस गात असतो. ते पाहून पोट धरून हसतो. फिलिपला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्यावर पहाटे बाहेर फिरायला घेऊन जातो. फिलिप एका बाईला साहित्यिक भाषेत काव्यात्म खुली पत्रे लिहित असतो, ते पाहून तो त्याला तिला फोन करायला सांगतो. फिलिप तयार नसतानाही तिच्याशी बोलायला लावतो.

    फिलिप त्याच्या हृदयातले दुख त्याच्यापाशी उघडे करतो आणि म्हणतो, पत्नीच्या मृत्यूचे दुख या अपंगत्वापेक्षा जास्त आहे. द्रिस त्याला त्याच्या आयुष्याबद्दल सांगतो. फिलिपचे अपंगत्व पाहून द्रिस म्हणतो, मी स्वतःला गोळी मारून घेतली असती. त्यावर फिलीप म्हणतो, मला तेही शक्य नाही. या वाक्यातली अगतिकता ऐकून सुन्न व्हायला होते. त्याच्या परिस्थितीबद्दल कणव यायला हवी, दया वाटायला हवी, असे वारंवार मनात येऊनही द्रिसचा दृष्टीकोन आपल्याला आवडायला लागतो, पटायला लागतो. त्याच्याकडे माणूस म्हणून पाहायला लागतो आणि त्याच्या सगळ्या गरजा शारीरिक आणि मानसिक सामान्य व्यक्तीसारख्याच आहेत याची जाणीव होते.

    द्रिस फिलिपची महागडी कार बेफाम वेगाने चालवत आहे, पोलीस त्याला अडवतात, तेव्हा फिलिप आजारी पडल्याचे नाटक करतो. पोलीस त्याच्यापाठोपाठ हॉस्पिटलमध्ये येतात आणि फिलिप द्रिसला म्हणतो, आता काय करायचे? द्रिस नेहमीच्या बेफिकीरीने म्हणतो, मी कार पुन्हा बेफाम चालवतो… या प्रसंगाने सिनेमाची सुरुवात होते.

    हेही वाचा – Movie : Whiplash जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन?

    सिनेमात इतर काही पात्रे आहेत. त्यांच्या भूमिका लहानशा आहेत. मुलाखत घेणारी स्त्री द्रिसला आवडलेली असते. पण ती त्याला सतत नकार का देते, याचा शेवटी उलगडा होतो. फिलिप पत्र लिहित असलेली स्त्री त्याला भेटते का? द्रिस सोडून गेल्यावर फिलिपचे काय होते? वगैरे प्रश्नांची उत्तरे मिळत जातात.

    ही सत्य घटनेवर आधारित कहाणी आहे. खऱ्या फिलिप आणि द्रिसची मैत्री आयुष्यभर टिकून राहिली. दोघांच्या भूमिका म्हणजे जुगलबंदी आहे. फिलिपला फक्त चेहऱ्यावर भाव दाखवण्याची मुभा आहे. या सिनेमाचे इतर भाषेत रीमेक झाले आहेत. मी मूळ फ्रेंच सिनेमा Subtitle वाचून पाहिला. मला फारच आवडला.

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    ‘तहादेर कथा’… आदर्शांच्या मृत्यूची कथा

    September 13, 2026 फिल्मी

    मन आनंद आनंद छायो… आत्मशोधाची संगीतमय अनुभूती

    September 6, 2026 फिल्मी

    भूतकाळ न विसरलेला भिडुजी!

    August 31, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    ‘तहादेर कथा’… आदर्शांच्या मृत्यूची कथा

    By विशाल कुलकर्णीSeptember 13, 2026

    भारतीय समांतर चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा काही चित्रपट केवळ कलाकृती म्हणून नव्हे, तर काळाने…

    मन आनंद आनंद छायो… आत्मशोधाची संगीतमय अनुभूती

    September 6, 2026

    भूतकाळ न विसरलेला भिडुजी!

    August 31, 2026

    जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें…

    August 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अंतर्मुख होऊन करावी स्वामींची सेवा

    September 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये

    September 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026

    अविघ्न

    September 14, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – आरोग्याच्या समस्या, मैत्रीची गुणवत्ता

    September 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 435
    • अवांतर 208
    • आरोग्य 146
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 582
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 919
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अंतर्मुख होऊन करावी स्वामींची सेवा

    September 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये

    September 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.