Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती

    September 3, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तें देवाचें मनोगत, दावित आहासी तूं मूर्त

    September 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 सप्टेंबर 2026

    September 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, September 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सत्य नाकारणं सोपं, पण…
    आरोग्य

    सत्य नाकारणं सोपं, पण…

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरSeptember 2, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, डॉ प्रज्ञावंत देवळेकर, डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर, लेखक प्रज्ञावंत देवळेकर, Self-Serving Bias, आजार नाकारणे, डायबेटिस नाकारणे, स्वत:ची फसवणूक, सायलेंट आजार, मधुमेह लक्षणे, मधुमेह नाकारणे,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सकाळीच ओपीडीत एक पन्नाशी ओलांडलेले गृहस्थ आले. व्यवस्थित कपडे, देहबोलीत आत्मविश्वास… “डॉक्टर, बाकी सगळं ठीक आहे, फक्त रिपोर्टमध्ये थोडी साखर वाढलेली दाखवली आहे…” त्यांनी माझ्या हातात त्यांचे रिपोर्ट सुपूर्द करत सांगितलं.

    मी रिपोर्ट पाहिला Fasting, PP, HbA1c सगळेच स्पष्टपणे मधुमेहाकडं इशारा करत होते.

    “तुम्हाला डायबिटिस आहे,” मी शांतपणं सांगितलं. ते लगेच हसले, “नाही नाही डॉक्टर, आमच्या घरात कुणालाच नाही. मी चालतो-फिरतो, काम करतो मला डायबिटिस कसा असेल?”

    इथे सुरू झाली एक वेगळीच कथा… ही होती Denialची (नाकारण्याची) आणि त्यामागं लपलेली मानसिक प्रक्रिया Self-Serving Bias…

    Self-Serving Bias म्हणजे काय तर फक्त आपल्याला अनुकूल असलेली माहिती स्वीकारणं आणि नको असलेली माहिती नाकारणे! आपल्या ‘self-image’ ला जपण्यासाठी मेंदू हा छोटासा खेळ खेळतो…

    हेही वाचा – फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?

    या गृहस्थांच्या काही ठाम समजुती होत्या, जसं मी ॲक्टिव्ह आहे, म्हणजे मी हेल्दी (healthy) आहे… घरात हिस्ट्री (history) नाही, म्हणजे मला होणार नाही आणि मला काही लक्षणंही नाहीत म्हणजे आजार नाही!

    ही सगळी वाक्यं ऐकायला तार्किक वाटत असली तरी, ती फक्त स्वतःच्या सोयीचा निष्कर्ष असतात. Denial अनेकांकडून होतं, कारण डायबिटिस म्हणजे आयुष्यभर औषधं – आहारावर नियंत्रण – जीवनशैलीत बदल हे सगळं स्वीकारणं कठीण असतं, म्हणून मन स्वतःला वाचवण्यासाठी म्हणतं, “काही नाही सगळं ठीक आहे.”

    यातला धोका म्हणजे डायबिटिस हा ‘सायलेंट’ (silent) आजार आहे, तो प्रत्यक्ष आजारापेक्षा प्रत्येक आजाराचा जिगरी मित्र आहे. सुरुवातीला लक्षणं नसतात, पण आतून नुकसान चालू असतं; डोळे, किडनी, मज्जातंतू (nerves), हृदय… आणि जेव्हा लक्षणं दिसतात, तेव्हा बराच उशीर झालेला असतो.

    मी या गृहस्थांना थेट विरोध केला नाही. फक्त विचारलं, “तुम्हाला वाटतं तुम्ही हेल्दी आहात, मग हे रिपोर्ट्स असं का सांगताहेत?”

    ते काहीही बोलले नाहीत.

    थोडा विचार केला आणि म्हणालो, “कदाचित लॅबची चूक असेल? चला, आपण टेस्ट रीपिट करूया आणि तोपर्यंत काही छोटे बदल करून बघू…”

    आता मात्र त्यांचा सूर जरा निवळला आणि खरा संवाद सुरू झाला, “दुसऱ्या रिपोर्टमध्येही तेच निष्कर्ष येतील मग? डॉक्टर, म्हणजे खरंच मधुमेह आहे का?” त्यांनी विचारलं.

    मी म्हणालो, “रिपोर्टमध्ये जे काही असेल ती good news असेल, कारण नसेल तर नसेलच आणि असेल तर आपण वेळेत त्याला पकडू…”

    तुमच्यातही असा Self-Serving Bias आहे का? (नाही म्हणू नका, चेक करा) यावर मात करणं सहज शक्य आहे. थेट विरोध न करता हळूहळू सत्य जाणून घ्या, रिपोर्ट्स आणि संवाद दोन्ही सारखेच महत्त्वाचे, “तुम्हाला आजार आहे,” यापेक्षा “तुम्ही हे मॅनेज करू शकता,” हे बिंबवणं!

    हेही वाचा – बीपी आणि शुगरच्या गोळ्या सुरू आहेत…

    इथं ‘आजार’ हा शब्द भीतीचा नव्हे, तर ती आहे नियंत्रित करण्याची संधी… यासाठी काही बदल करणं रॉकेट सायन्स नाही… जसं आहारात छोटे बदल, नियमित तपासणी, थोडा व्यायाम गरजेचा आहे.

    काही महिन्यांनी हेच गृहस्थ जेव्हा परत येतील, त्यावेळी त्यांच्या हातात नवीन रिपोर्ट असेल त्यात रिपोर्ट पूर्वीपेक्षा थोडा बरा असला तरी चेहऱ्यावरचं समाधान मोठं असेल. शूगर नसेलच असं नाही, पण तुलनेत अधिक नियंत्रित असेल आणि ते स्वत:च म्हणतील, “मीच स्वतःला फसवत होतो.”

    Self-Serving Bias हे आपल्याला ‘तत्काळ सुख’ देते पण ‘दीर्घकालीन नुकसान’ करते. सत्य नाकारणं सोपं असतं, पण त्याचा सामना करणं प्रसंगी कठिण असलं तरी आवश्यक असतं; कारण आजार मान्य केल्यावरच उपचार सुरू होतो आणि उपचार सुरू झाल्यावरच नियंत्रण मिळतं!

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    कावीळसाठी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट… काही घरगुती उपाय

    August 29, 2026 आरोग्य

    कृत्रिम आणि नैसर्गिक उपाय…

    August 26, 2026 आरोग्य

    भूक लागत नाही?

    August 19, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    कावीळसाठी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट… काही घरगुती उपाय

    By Team AvaantarAugust 29, 2026

    कावीळ हा आजार एक धोकादायक आजार आहे. ज्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर तो जीवघेणा…

    कृत्रिम आणि नैसर्गिक उपाय…

    August 26, 2026

    भूक लागत नाही?

    August 19, 2026

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    August 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती

    September 3, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तें देवाचें मनोगत, दावित आहासी तूं मूर्त

    September 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 सप्टेंबर 2026

    September 3, 2026

    एक्झिट

    September 2, 2026

    सौरभला भेटला देव!

    September 2, 2026

    वास्तुशास्त्र आणि नातेसंबंधातील ऊर्जा

    September 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 420
    • अवांतर 206
    • आरोग्य 143
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 563
    • फिल्मी 65
    • फूड काॅर्नर 253
    • मैत्रीण 28
    • ललित 891
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती

    September 3, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तें देवाचें मनोगत, दावित आहासी तूं मूर्त

    September 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 सप्टेंबर 2026

    September 3, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.