Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, September 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » भूक लागत नाही?
    आरोग्य

    भूक लागत नाही?

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरAugust 19, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, डॉ प्रज्ञावंत देवळेकर, डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर, लेखक प्रज्ञावंत देवळेकर, भूक न लागणे, भूकेबाबत तक्रीर, भूक महत्त्वाची, शरीरातील रासायनिक यंत्रणांचा समन्वय, भूक न लागण्याची कारणे, शरीर आणि मन यांच्यातील संवाद,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “डॉक्टर, भूकच लागत नाहीये,” ओपीडीत आल्या आल्या बसण्याआधीच पेशंटनं तक्रार केली. आपल्याकडं हे असं मोघम बोललं जातं; ‘भूक लागत नाहीये’ म्हणजे काय? जेवावसं वाटत नाही? खाल्लं की पोट गच्च होतं? थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं? इच्छा होते, पण जात नाही की भावनाच उडाली? संकल्पनात्मक पातळीवर हे वाटतं तितकं सहज साधं प्रकरण नाही…

    आपल्याला भूक लागत नाही म्हणजे नेमकं काय होतं? कधीपासून सुरू झालं? त्याचे शरीरावर काय परिणाम झाले? याची ढोबळ का होईना कारणमीमांसा गरजेची असते. पेशंट जेव्हा म्हणतो, “भूक लागत नाही” तेव्हा डॉक्टरच्या डोळ्यांसमोर फक्त रिकामं ताट नसतं, तर तो मेंदू-पोट-संप्रेरके-भावना यांचा गुंतागुंतीचा खेळ उलगडत असतो.

    भूक न लागणं म्हणजे फक्त जेवायची इच्छा नसणे नव्हे; तो आपल्या शरीरातील जैविक, मानसिक आणि रासायनिक यंत्रणांचा समन्वय बिघडल्याचा इशारा असतो.

    सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूक ही पोटात नाही, तर मेंदूत जन्म घेते! यातला मुख्य सूत्रधार असतो ‘मोगॅम्बो’ म्हणजे मेंदूतील ‘भूक केंद्र’ अर्थात ‘हायपोथॅलॅमस’ आणि त्याचे तीन साथीदार डागा-राका-तेजा अर्थात भूक वाढवणारं संप्रेरक घर्लिन, “आता पुरे” सांगणारं संप्रेरक लेप्टिन आणि पोट तसेच मेंदू यांच्यातील खबरी अर्थात व्हॅगस नर्व्ह…

    पोट रिकामं झालं की, घर्लिन कामाला लागतो आणि मेंदूला संदेश जातो, “चल, आता जेवायला बस.” पण जेव्हा या साखळीत कुठंही बिघाड होतो, तेव्हा पोट म्हणतं “रिकामं आहे” आणि मेंदू उत्तर देतो, “मला भूक नाही.”

    भूक न लागण्याची शास्त्रोक्त कारणं म्हणजे जंतूसंसर्ग जसं ताप, टायफॉइड, लघवीत संसर्ग, क्षयरोग इत्यादी. संसर्ग शरीर जगण्यासाठी ऊर्जा वळवतं, त्यामुळं जेवण बाजूला रहातं… सायटोकाइन्स नामक दाहकारी रसायनं भूक केंद्र दाबून ठेवतात.

    काही औषधांमुळंही भूक जाते; जसं प्रतिजैवकं, वेदनाशामक, केमोथेरपी यामुळं पोटात जळजळ, मळमळ होऊन मेंदूला ‘खाणं धोकादायक’ असा संदेश जातो.

    हेही वाचा – मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!

    मानसिक कारणांमुळंही भूक हरवते जसं तणाव, चिंता, नैराश्य यात मेंदू सतत सर्व्हायवल मोडमध्ये असतो; सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टिम सक्रिय होते, यामुळं पचन थांबतं आणि भूक गायब होते.

    पचनसंस्थेचे काही आजार – जसे जठरदाह, आम्लपित्त, यकृताला सूज, अग्न्याशयाला सूज असल्यास पोट म्हणतं, “आधी यांचं दुखणं बघ, मगच जेव.”

    हायपोथायरॅाडीजम, मधुमेह आणि काही आजारात संप्रेरकीय गोंधळ उडतो, संप्रेरक म्हणजे शरीराचा वाद्यसंचालक. त्याची एक चुकीची नोट किंवा हालचाल सगळं रागरंग बिघडवून टाकते.

    भूक न लागण्याचं हल्ली सापडणारं मुख्य कारण म्हणजे बिघडलेली मानसिकता! जसं वजन वाढण्याची तीव्र भीती, शरीराच्या प्रतिमेबद्दल चुकीची धारणा, परिणामी उपासमार; मग अशक्तपणा… यातून जीवघेणा धोका निर्माण होतो. इथं “फक्त खा” असा सल्ला पुरेसा नसतो.

    “तुम्हाला भूक लागत नाहीये,” हा तुमच्या शरीराचा संदेश कसा ओळखाल? तर प्रारंभी हे दोन-तीन दिवस चालेल, मग दोन-तीन आठवडे अशावेळी तपासणी आवश्यक ठरते. त्यानंतर वजनात घट, अशक्तपणा, चक्कर म्हणजे रेड सिग्नल अर्थात धोक्याचा इशारा!

    हेही वाचा – पोट सहनशील, पण…

    भूक न लागणं म्हणजे बहाणा, आळस किंवा हट्ट नाही, तो शरीराचा SOS कॉल असतो. अशावेळी पेशंट म्हणतात, “टॅानिक द्या.” पण फक्त टॉनिक देऊन भागत नाही, मूळ कारण शोधणं महत्त्वाचं असतं. कारणानुसार उपचाराची दिशा ठरवणं, त्या अनुषंगानं औषधयोजना करणं, सोबत मानसिक समुपदेशन, पचन सुधारणारे उपाय, तसेच वेळेवर, हलकं आणि आवडीचं अन्न खाण्याचा सल्ला देणे वगैरे करावं लागतं. थोडक्यात, भूक जबरदस्तीनं नाही, तर नीट समजून उमजून घेतल्यावरच परत येते.

    बाकी भूक ही फक्त पोटाची गरज नाही तर ती शरीर आणि मन यांच्यातील संवाद आहे. तो संवाद तुटला की, शरीर शांतपणे म्हणतं, “आधी मला ऐक, मगच मला खायला दे.”

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    HbA1c… मधुमेह नियंत्रणाचं प्रतिबिंब

    September 5, 2026 आरोग्य

    सत्य नाकारणं सोपं, पण…

    September 2, 2026 आरोग्य

    कावीळसाठी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट… काही घरगुती उपाय

    August 29, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    HbA1c… मधुमेह नियंत्रणाचं प्रतिबिंब

    By Team AvaantarSeptember 5, 2026

    आपल्या शरीरात रक्तामधील साखरेची पातळी किती आहे आणि ती दीर्घकाळात कशी बदलते, हे तपासण्यासाठी HbA1c…

    सत्य नाकारणं सोपं, पण…

    September 2, 2026

    कावीळसाठी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट… काही घरगुती उपाय

    August 29, 2026

    कृत्रिम आणि नैसर्गिक उपाय…

    August 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026

    मन आनंद आनंद छायो… आत्मशोधाची संगीतमय अनुभूती

    September 6, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 423
    • अवांतर 206
    • आरोग्य 144
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 569
    • फिल्मी 66
    • फूड काॅर्नर 254
    • मैत्रीण 28
    • ललित 901
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026
    Most Popular

    जातकांचे ज्योतिष ज्ञान

    September 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.