Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, September 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा
    आरोग्य

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    रविंद्र परांजपेBy रविंद्र परांजपेAugust 15, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मी मराठी, अभिजात मराठी, रविंद्र परांजपे, योगा शिक्षक रविंद्र परांजपे, योगा प्रशिक्षक रवींद्र परांजपे, निरामय आरोग्य, निरामय मानसिक आरोग्य, निरामय शारीरिक आरोग्य, निरामय आरोग्य मूलभूत गरज, निसर्गसुसंगत दिनचर्या, नियमित योगाभ्यास, सात्त्विक आहार सेवन, मानसिक ताणतणाव, पुरेशी झोप आवश्यक,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ‘अवांतर’ या मुक्त व्यासपीठावर ‘आरोग्य’ या सदराखाली आत्तापर्यंत मी एकावन्न लेख लिहिले. आरोग्य सदरातील माझा हा शेवटचा लेख असून मागील सर्व लेखांचा थोडक्यात आढावा साधकांना सादर करणे, असा या लेखाचा उद्देश आहे.

    निरामय आरोग्य संकल्पना

    मानवाच्या तीन मूलभूत गरजा : अन्न, वस्त्र आणि निवारा; यामध्ये आता ‘निरामय आरोग्य’ या वाढत्या गरजेची भर पडली आहे. वास्तविक, निरामय आरोग्य ही आपली उपलब्धी नसून आपली मूलभूत गरज आहे, ही बाब ध्यानात घेऊन आपण निरामय आरोग्यप्राप्ती आणि संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील रहायला हवे.

    ‘निरामय’ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ ‘निरोगी’ असा आहे. निरामय म्हणजे सात्त्विक आणि सकारात्मक, असेही म्हणता येईल. तर, ‘आरोग्य’ म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोल असलेली स्वस्थ आणि रोगमुक्त अवस्था होय.

    शारीरिक आरोग्य

    निसर्गातील अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल ही पंचमहाभूते आणि आत्मा म्हणजे मन यांचा एकत्र उचित योग झाला म्हणजे त्याला शरीर म्हणतात. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी. शरीराचे आरोग्य म्हणजे शारीरिक आरोग्य.

    मानसिक आरोग्य

    मन ही मनुष्याला मिळालेली विशेष देणगी आहे. मरेपर्यंत जे नष्ट होत नाही ते मन. मनाचे आरोग्य म्हणजे मानसिक आरोग्य.

    हेही  वाचा – स्वस्थ आरोग्य आणि आरोग्याचे विविध पैलू

    स्वस्थ आरोग्य

    आयुर्वेदाने केलेल्या स्वस्थ आरोग्याच्या व्याख्येनुसार स्वस्थ आरोग्याची थोडक्यात वैशिष्ट्ये म्हणजे – जेवणाच्या वेळेस कडकडून भूक लागणे, अन्न व्यवस्थित पचणे, मलक्रिया व्यवस्थित असून नैसर्गिकरीत्या कार्य करणे म्हणजे मलविसर्नानंतर पोट हलके वाटणे, रात्री शांत आणि गाढ झोप लागणे, शरीरात कोणतेही दुखणे अथवा कुठलाही विकार नसणे आणि मन प्रसन्न आणि आनंदी असणे.

    निरामय आरोग्य

    शरीराने आणि मनाने स्वस्थ अवस्था म्हणजे निरामय आरोग्य होय. शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे ‘आरोग्य’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मन आणि शरीर यातील परस्परसंबंध लक्षात घेऊन त्यांचे योग्य संवर्धन केल्यास आपले आरोग्य निरामय होऊन जीवन खचितच अधिक सक्षम, सफल आणि समृद्ध होईल.

    निरामय शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धनासाठी पुढील मूलभूत बाबी आवश्यक आहेत :

    • मनापासून इच्छा
    • स्वतःसाठी वेळ काढणे
    • यथायोग्य मार्गदर्शन

    आता आपण आरोग्यासंबंधित महत्त्वाच्या विषयांचा गोषवारा घेऊयात.

    ताणतणाव निवारणातून मानसिक आरोग्य

    ताणतणाव आपल्या दैनंदिन जीवनात परवलीचा शब्द बनला आहे. मानसिक आरोग्य बिघडण्याचे मूलभूत कारण म्हणजे मानसिक ताणतणाव होय. वास्तविक मानसिक ताणतणाव हे सर्व मनोकायिक समस्यांचे मूळ कारण आहे. मानसिक ताणतणावांचे सुव्यवस्थापन करण्यासाठी पुढील निवडक उपयुक्त उपाययोजनांचा आवर्जून अवलंब करावा :

    • निसर्गसुसंगत दिनचर्या
    • नियमित योगाभ्यास
    • सात्त्विक आहार सेवन

    याशिवाय योग्य आचार-विचार, निसर्ग सान्निध्य, शारीरिक व्यायाम, स्वयंप्रेरणा, समाजाशी जुडणे, धार्मिक उपासना, आयुर्वेदिक उपचार तथा मानसिक उपाय आणि उपचार हेदेखील निवडक उपयुक्त उपाय आहेत.

    निसर्गसुसंगत दिनचर्या

    सध्याची बदलती जीवनशैली बहुतांशी निसर्गविरोधी बनत चालली आहे. त्यामुळे विविध शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवत आहेत. या समस्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि  त्यातून मुक्त होण्यासाठी आपण आपली जीवनशैली अधिकाधिक निसर्गाला अनुसरून अनुकूल करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. शरीरातील जैविक घड्याळ, त्रिदोषचक्र आणि निसर्गचक्र ध्यानात घेऊन प्रामुख्याने पुढील बाबींवर लक्ष देणे नितांत आवश्यक आहे :

    1. दिवसाची सुरुवात सकाळी लवकर उठून सकारात्मक पद्धतीने करणे.
    2. नियमित योगाभ्यास करणे.
    3. सुनियोजन करून दैनंदिन कामे उत्साहाने करणे.
    4. आहाराच्या नियमित वेळा पाळणे, तसेच सात्त्विक आहार सेवन करणे.
    5. रात्री लवकर झोपणे.

    नियमित योगाभ्यास

    योग ही एक जीवनशैली असून त्यामध्ये शरीराबरोबर मनाचाही विचार केला आहे. मनावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण करण्याचा उपाय म्हणजे योग होय. मनोकायिक व्याधी-विकारांचे नियंत्रण करून त्यातून मुक्ती मिळवणे आणि मनाची एकाग्रता आणि शरीराची निरोगी स्थिती प्राप्त करणे हा योगाभ्यासाचा उद्देश आहे. म्हणूनच आपल्या दैनंदिन जीवनात नियमित योगाभ्यासाचा समावेश आवर्जून करावा.

    सात्त्विक आहार सेवन

    आपल्या आहाराचा आपल्या शरीर-मनावर परिणाम होत असतो आणि परिणामातून प्रकृती बनते. सात्त्विक आहार रूचकर, स्निग्ध आणि मन प्रसन्न करणारा असतो. या आहारामुळे बुद्धी, शक्ती, सुख, आरोग्य आणि आयुष्य वाढते, तसेच व्यक्तीतील सत्त्वगुणांचे पोषण होते. वास्तविक, आहार हेच औषध आहे आणि अन्न हे पूर्णब्रह्म आहे. आहाराचे सर्व उद्देश साध्य करणारा आणि सर्व वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशा आहारास खचितच आरोग्यदायी सात्त्विक आहार मानता येईल. म्हणूनच आपण आरोग्यदायी सात्त्विक आहार सेवनावर आवर्जून भर द्यावा.

    हेही वाचा – निरामय मानसिक आरोग्य

    आरोग्य लेखमालेस मिळालेल्या प्रतिसादाबद्दल वाचकांचे तसेच मला आरोग्य सदरात लेख लिहून मार्गदर्शन करण्यासाठी उत्तम संधी दिल्याबद्दल अवांतर समूहाचे मी मनापासून आभार मानून धन्यवाद देतो आणि माझ्या लेख लिखाणास विराम देतो.

    यासंदर्भात इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत संबंधित विषयांवर उपयुक्त सर्वसमावेशक सविस्तर मार्गदर्शनपर वस्तुपाठ सादर केले असून त्यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे निरामय आरोग्याचा परिपाक होय.

    समाप्त

    नम्र निवेदन

    गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर  🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.

    Avatar photo
    रविंद्र परांजपे

    लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून गेल्या 25 वर्षांपासून ते नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. जानेवारी 2015पासून ते ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला आणि पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ व ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवर्जून संपर्क करावा. मोबाइल - 9850856774

    Related Posts

    HbA1c… मधुमेह नियंत्रणाचं प्रतिबिंब

    September 5, 2026 आरोग्य

    सत्य नाकारणं सोपं, पण…

    September 2, 2026 आरोग्य

    कावीळसाठी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट… काही घरगुती उपाय

    August 29, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    HbA1c… मधुमेह नियंत्रणाचं प्रतिबिंब

    By Team AvaantarSeptember 5, 2026

    आपल्या शरीरात रक्तामधील साखरेची पातळी किती आहे आणि ती दीर्घकाळात कशी बदलते, हे तपासण्यासाठी HbA1c…

    सत्य नाकारणं सोपं, पण…

    September 2, 2026

    कावीळसाठी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट… काही घरगुती उपाय

    August 29, 2026

    कृत्रिम आणि नैसर्गिक उपाय…

    August 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026

    मन आनंद आनंद छायो… आत्मशोधाची संगीतमय अनुभूती

    September 6, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 423
    • अवांतर 206
    • आरोग्य 144
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 569
    • फिल्मी 66
    • फूड काॅर्नर 254
    • मैत्रीण 28
    • ललित 901
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026
    Most Popular

    जातकांचे ज्योतिष ज्ञान

    September 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.