Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : ‘सावित्री’… वैचारिक खाद्य पुरवणारी लहानशी कादंबरी

    October 4, 2026

    एका नदीची गोष्ट…

    October 4, 2026

    रोजच परीक्षा…

    October 4, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, October 5
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पोळी बदलली… आणि विचारही!
    आरोग्य

    पोळी बदलली… आणि विचारही!

    तृप्ती देवBy तृप्ती देवJuly 2, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, आहार बदलाची गरज, डायबिटिसच्या रुग्णांची वाढती संख्या, वाढते डाययबिटिस रुग्ण, वाढते मधुमेही, आजाराची पथ्ये गरजेची जवाची पोळी, मधुमेहींसाठी गव्हाची पोळी बंद, मधुमेहींसाठी बाजरीची पोळी, मधुमेहींसाठी ज्वारीची पोळी,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आजकाल शुगर हा विषय इतका कॉमन झाला आहे की, चार लोक जमले की त्यात एक तरी शुगरचा पेशंट नक्की असतो. मग चर्चा सुरू होते…

    “हे खायचं नाही…”

    “ते खाणं बंद…”

    “गोड तर अजिबात नाही…”

    “पोळ्या कमी करा…”

    ऐकून असं वाटतं की आता खायला काहीच उरलं नाही!

    खरंतर, आजार कोणाला व्हावा किंवा होऊ नये, हे आपल्या हातात नसतं. पण तो झाल्यानंतर स्वतःची काळजी कशी घ्यायची, हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं.

    माझ्या एका मैत्रिणीच्या मिस्टरांना डायबिटिसचं निदान झालं, तेव्हा डॉक्टरांनी एक वेगळाच सल्ला दिला… गव्हाच्या पोळ्या कमी करा किंवा बाद करा आणि आहारात ज्वारी, बाजरी, नाचणीबरोबर जवाची पोळी / भाकरी सुरू करा!

    हेही वाचा – शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    ज्वारी, बाजरी, नाचणी आपण कधी ना कधी खातोच. पण जव? आपल्या स्वयंपाकघरात त्याचं नावही फारसं घेतलं जात नाही. म्हणून मलाही उत्सुकता वाटली आणि मी स्वतः जवाची पोळी खायला सुरुवात केली.

    सुरुवातीला थोडी वेगळी वाटली, पण आता सवय झाली आहे… आणि एक गोष्ट लक्षात आली, आपल्या आहारात एकच गोष्ट कायमची असण्याची गरज नाही. बदलही तितकाच महत्त्वाचा असतो! आपण रोज एकच गव्हाची पोळी खाण्यापेक्षा कधी ज्वारी, कधी बाजरी, कधी नाचणी, तर कधी जवाची पोळी खाल्ली तर आपल्या शरीरालाही वेगवेगळे पोषक घटक मिळतात.

    हेही वाचा – कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    शुगर झाली म्हणजे आयुष्य संपलं किंवा सगळं आवडतं खाणं बंद झालं, असं नाही. फक्त ताटात थोडी शहाणपणाची भर घालायची असते.

    आणि हो… पथ्य म्हणजे शिक्षा नाही. ती आपल्या शरीराची काळजी घेण्याची एक सवय आहे.

    आजकाल आपण मोबाइल बदलतो, गाडी बदलतो, फॅशन बदलतो… मग आपल्या ताटात थोडा बदल करायला काय हरकत आहे? कारण शेवटी… “औषधापेक्षा योग्य आहार रोज काम करतो, आणि छोटासा बदलही मोठा फरक घडवू शकतो.”


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    तृप्ती देव

    मी भिलाई (छत्तीसगड) येथे वास्तव्यास असलेली गृहिणी आणि हौशी लेखिका आहे. मला स्वयंपाक, वाचन आणि लेखनाची विशेष आवड आहे. खाद्यसंस्कृती, सामाजिक विषय, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन जीवनातील अनुभवांवर मी ब्लॉग लेखन करते. कथाविश्व तसेच इतर विविध व्यासपीठांवर माझे लेख प्रकाशित होत असतात. एखादा विषय मनाला भिडला की, त्यावर सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून लिहिण्याचा मी प्रयत्न करते. भिलाई वनवासी महिला संघटनेची सदस्य म्हणून सामाजिक कार्यातही माझा सहभाग आहे. शब्दांच्या माध्यमातून सकारात्मक विचार, संस्कार आणि जीवनमूल्ये वाचकांपर्यंत पोहोचवणे हेच माझ्या लेखनाचे उद्दिष्ट आहे.

    Related Posts

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026 आरोग्य

    टेंशन आहे? मग शुगर तपासून घ्या!

    October 3, 2026 आरोग्य

    चेहराच फर्स्ट इम्प्रेशन…

    October 1, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    By डॉ. शैलेंद्र वैशंपायनOctober 4, 2026

    बंगाल आणि दक्षिण भारताप्रमाणे महाराष्ट्रातही होमिओपॅथी रुजण्यामागे काही विलक्षण व्यक्तींच्या कथा आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे…

    टेंशन आहे? मग शुगर तपासून घ्या!

    October 3, 2026

    चेहराच फर्स्ट इम्प्रेशन…

    October 1, 2026

    Homeopathy : भारतात होमिओपॅथी आली तरी कशी?

    September 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : ‘सावित्री’… वैचारिक खाद्य पुरवणारी लहानशी कादंबरी

    October 4, 2026

    एका नदीची गोष्ट…

    October 4, 2026

    रोजच परीक्षा…

    October 4, 2026

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 04 ते 10 ऑक्टोबर 2026

    October 4, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रवृत्ति पेललें पोट, निवृत्ति ते पाठी नीट

    October 4, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 458
    • अवांतर 215
    • आरोग्य 155
    • पंचांग आणि भविष्य 613
    • फिल्मी 70
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 970
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : ‘सावित्री’… वैचारिक खाद्य पुरवणारी लहानशी कादंबरी

    October 4, 2026

    एका नदीची गोष्ट…

    October 4, 2026

    रोजच परीक्षा…

    October 4, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.