Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: दिलीप कजगांवकर
तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.
साधारणतः पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. राज या माझ्या जवळच्या मित्राचा फोन आला. “मी पुढच्या रविवारी पुण्याला येणार आहे, आहेस का घरी? आणि 5-6 तास मला देऊ शकशील का?” “मित्रा ये, मी पुढच्या रविवारी एकटाच आहे, पूर्ण दिवस देईन, तू नक्की ये.” रात्रभर प्रवास करून राज सकाळी लवकरच आला. खूप वर्षांनंतर भेटल्यामुळे गप्पा रंगल्या. चहा पिताना राज म्हणाला, “आपल्या चार मित्रांकडे जायचेय.” राजने नाव, पत्ता आणि भेटीच्या वेळा दाखविल्या. “तुझी गाडी नको, मी मर्सिडीज बुक केलीय,” राजने सांगितले. बरोबर दहा वाजता आम्ही अजयच्या घरी पोहोचलो. मर्सिडीजमधून आलेलो पाहून अजयने मोठ्या आदराने स्वागत केले. गप्पा मारता मारता पोहे खाऊन झाले. “चहा की कॉफी?”…
राज हा एक हुशार, तडफदार आणि प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर. नागपूरच्या एका उच्चभ्रू सोसायटीत त्याचे वास्तव्य. राजची बहीण नागपूरच्या शासकीय शाळेत शिक्षिका, तर मेहुणे कारागृहात जेलर. सहा महिन्यांपूर्वी जेलर साहेबांच्या एका चुकीमुळे गुंड वरद जेलमधून पळण्यात यशस्वी झाला. जेलर साहेबांना तात्पुरते निलंबित करण्यात आले. पुढील 30 दिवसांत वरद सापडला नाही, तर कायमचे निलंबन होणार होते. वरद पुण्यात असल्याची खात्रीशीर बातमी राजला मिळाली आणि तो पुण्यात दाखल झाला. नेहा ही राजची सौभाग्यवती. नेहाने सांगितलेल्या मठात राज संध्याकाळी आला. अतिशय प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण होते. “बेटी, बाबा महाराजांच्या फोटोला मनापासून नमस्कार करून काय हवं ते माग. महाराज कृपाळू आहेत. नवसाला पावतात,” एक सुशिक्षित…
सदानंदांच्या आयुष्याचं एकच गणित होतं — पैशांची बेरीजच झाली पाहिजे… वजाबाकी नाही! पैसे कमवायचे, कमीत कमी खर्च करून शिल्लक बँकेत जमा करून पूंजी वाढवत जायची. बस्स! आयुष्याचं ध्येयच त्यांनी जणू या तीन गोष्टींत समाविष्ट करून ठेवलं होतं. एखादी आवश्यक वस्तू घ्यायची असली तरी, दहा वेळा विचार करायचा. भाजी महाग झाली तर भाजी कमी घ्यायची. वीजबिल वाढलं तर दिवे वापरणं कमी… नवीन चपला आणि कपडे कशाला? “जुने आहेत ना!” हॉटेलमध्ये जेवण? “घरचं जेवण किती रुचकर असतं, मग उगाच खर्च कशाला?” नवीन चष्मा? “नको नको, जुना दुरुस्त करूया.” सदानंदांसाठी खर्च म्हणजे पुंजीची वजाबाकी आणि पुंजीची वजाबाकी म्हटलं की, “नको… नको” हेच त्यांचं…
राज आणि नेहा एका टुमदार बंगल्यात रहात होते. बंगल्याच्या आजूबाजूला दाट हिरवीगार झाडी होती. बंगल्याच्या एका भागात पाहुण्यांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असलेला, सर्व सोयींनी सुसज्ज हॉल, बेडरूम, किचन आणि बाथरूम अशी स्वतंत्र व्यवस्था होती. नेहाला चार महिन्यांसाठी अमेरिकेला जायचे होते म्हणून ती तयारी करत होती, पण राज काहीसा काळजीत होता. “काय झालं?” “तू चार महिने नसणार… माझ्या जेवणाचं काय?” नेहा हसली… “मी शिकवते तुला!” नेहाने त्याला स्वयंपाक शिकवायला सुरुवात केली. पोहे, उपमा, भाजी, आमटी, भात आणि पोळी… पोळी सोडून बाकी बेचव का होईना, पण करता यायला लागलं. पहिली पोळी भारताच्या नकाशासारखी झाली… दुसरी आफ्रिकेसारखी… तिसरी पोळी पाहून नेहा म्हणाली, “राज, ही…
सदानंद आणि सावित्रीबाई पुण्याला राहात होते. राज हा त्यांचा एकुलता एक मुलगा चेन्नईत कामाला होता. सुमारे 10 वर्षांपूर्वी प्रायव्हेट कंपनीतून निवृत्त झालेल्या सदानंदांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती… आज पालकमंत्र्यांकडून सदानंदांचा त्यांच्या उत्कृष्ट लिखाणाबद्दल सत्कार होणार होता. सावित्रीबाईंनी सदानंदांचा पांढरा शर्ट आणि निळी पॅंट कालच बाहेरून इस्त्री करून आणली होती. कार्यक्रमाला जाण्यासाठी सदानंद फ्रेश झाले आणि ते शर्ट घालणार तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की, इस्त्री करून आणलेल्या शर्टवर इस्त्रीचा डाग होता आणि शर्टला एक मोठं भोक देखील पडलं होतं. आता काय करायचं? सदानंद विचारात पडले. तेवढ्यात सावित्रीबाई म्हणाल्या, “राजचा एक नवीन शर्ट कपाटात आहे, पांढऱ्या रंगाचाच आहे. तो घाला. उद्या…
“राज, पुढच्या महिन्यात तुझा वाढदिवस आहे. बाबा तुला वाढदिवसाची भेट म्हणून नवी कोरी मर्सिडीज देणार आहेत. ती गाडी आणि तिचा ड्रायव्हर फक्त तुझ्यासाठी असेल.” “आई, खरंच?” राजने आश्चर्याने विचारले. “हो राज. काल रात्री बाबांनी सांगितलं. नवीन तंत्रज्ञान आणि विशेषतः एआयचा वापर करून कंपनीचा खर्च खूप कमी होणार आहे. त्यामुळे कंपनीला भरघोस नफा होईल, असं बाबा म्हणत होते.” राज आनंदाने अक्षरशः हवेत तरंगत होता. मित्रांना काहीच न सांगता वाढदिवसाच्या दिवशी मर्सिडीज घेऊन शाळेत जायचं आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का द्यायचा, असा त्याने बेत केला. वाढदिवसाला अजून आठ दिवस बाकी होते. शाळेतून परतला, तेव्हा त्याचा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता. “राज, काय झालं?” आईने…
वातानुकूलित सिटीबस स्टॉपवर थांबली. मागच्या दरवाजातून राज, हा अतिशय रुबाबदार तरुण, बसमध्ये चढला. साधारणतः सहा फूट उंच, गोरापान वर्ण, आकर्षक पोशाख आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व! नियमांना धाब्यावर बसवण्याचा हक्क असल्याच्या तोऱ्यात पुढच्या दरवाजातून दोन सुंदर तरुणी बसमध्ये चढल्या. एकीचा गोरा वर्ण, मध्यम उंची, सडपातळ बांधा, डार्क निळा स्लीव्हलेस टी-शर्ट, ॲश कलरची जीन्स, सुंदर गॉगल आणि ब्रँडेड शूज, तर दुसरीचे लांब मोकळे केस, फॅशनेबल पंजाबी ड्रेस, गव्हाळ वर्ण, इम्पोर्टेड गॉगल आणि हाय हिल्स. त्या सौंदर्यवतींना बघताच राजची विकेट पडली. योगायोगाने किंवा जाणीवपूर्वक प्रयत्न करून, त्याला त्यांच्या मागची सीट मिळाली. गप्पा मारण्यात दोघी मग्न होत्या. राज मन लावून आणि कान टवकारून त्यांचे बोलणे…
सकाळचे आठ वाजले होते. बंगल्याच्या हिरव्यागार बागेत राज आणि त्याचा मित्र चहा-नाश्ता करत निवांत बसले होते. “राजसाहेब, येऊ का मी?” ट्रॅक पँट, हाफ बाह्यांचा टी-शर्ट, पायात चपला, डोक्यावर टोपी आणि जुनाट सायकलवर आलेला माणूस नम्रपणे विचारत होता. “अरे, तू फुलविक्या ना? ये रे,” राज जरा नाईलाजानेच म्हणाला. “वीस-बावीस वर्षांनी उगवलास. शाळेत असताना होतास, तसाच दिसतोस. अजूनही फुले विकतोस का? हुशार होतास लेका. पुढे शिकलास की नाही? काय काम काढलंस?” फुलविक्या उभाच होता. त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी सांगण्याची उत्कंठा होती. पण राजने त्याला बसायला सांगितले नाही आणि तो काही बोलणार, तेवढ्यात राज म्हणाला, “मित्रा, मी जरा घाईत आहे. पुढच्या आठवड्यात ये.” चहा-नाश्ताच…
राज आणि नेहा पुण्यातील एका प्रशस्त बंगल्यात राहणारे अतिशय श्रीमंत दाम्पत्य होते. बड्या साहेबांचा मुलगा म्हणून त्यांच्या दहा वर्षांच्या एकुलत्या एक मुलाला सर्वजण ‘छोटे साहेब’ म्हणत. राजच्या बंगल्याच्या बाजूला एका बिल्डिंगचे काम सुरू होते आणि तेथील वॉचमनचा मुलगा वरद, हा जवळजवळ छोट्या साहेबांच्याच वयाचा. दोघांची मैत्री नेहाला अजिबात पसंत नव्हती. म्हणून नेहा घरी नसतानाच ते दोघे एकत्र खेळत. त्या दिवशी छोट्या साहेबांनी फराळासाठी त्यांच्या मित्रांना घरी बोलावले होते. वरदही स्वच्छ धुतलेले कपडे घालून त्यांच्यात सामील झाला होता. नेहा क्लबमध्ये गेली होती आणि घरी काम करणाऱ्या मावशी मुलांना आग्रहाने फराळ वाढत होत्या. मुलंही फराळाचा आस्वाद घेण्यात मग्न होती. नेहा घरी परतली.…
बँकेतील जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झाल्यानंतर दादासाहेब पुण्यातील प्रभात रोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीत वास्तव्यास आले. आज सकाळी त्यांचा धुळ्याचा मित्र त्यांना भेटायला आला. बरोबर आणलेला पेढ्यांचा बॉक्स त्याने दादासाहेबांसमोर धरला. त्या बॉक्सवरील ‘चत्रभुज नानजी’ हे नाव पाहताच दादासाहेब क्षणात भूतकाळात शिरले. एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेची फी भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. मोठ्या कष्टाने जमवलेले पंचवीस रुपये वडिलांनी राजला परीक्षेची फी भरण्यासाठी दिले होते. काय ते दुर्दैव! राजच्या आईला चक्कर आली. त्यानंतर डॉक्टरांची फी, इंजेक्शन आणि औषधे यावर ते पंचवीस रुपये केव्हाच खर्च झाले. राजने दोघा-तिघा नातेवाईकांकडे पैसे उसने मागितले; परंतु कोणीही पैसे दिले नाहीत. म्हणतात ना, “बोलतात सर्व, पण गरजेच्या वेळी…

