दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 14 जून 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 24 ज्येष्ठ शके 1948; तिथि : चतुर्दशी 12:20; नक्षत्र : रोहिणी 22:14;
- योग : धृति 13:15; करण : चतुष्पाद 22:23;
- सूर्य : वृषभ; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:16;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128.
दर्श अमावस्या (प्रारंभ दुपारी 12:20)
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
टेनिस विश्वाची माजी सम्राज्ञी स्टेफी ग्राफ
टीम अवांतर
14 जून 1969 रोजी जर्मनीच्या मॅनहाईम येथे जन्मलेल्या स्टेफी ग्राफ या टेनिसपटूने आपल्या कारकिर्दीत एकेरी 22 ग्रँड स्लॅम किताब जिंकून जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या खेळाच्या शैलीने, प्रखर ताकदीच्या फोरहँडने आणि मैदानावरील वर्चस्वाने स्टेफी ग्राफने एक पर्व तयार केलं. किशोरवयातच चमत्कार म्हणून ओळखली जाणारी ग्राफ, वयाच्या 13व्या वर्षी फ्रेंच ओपनसारख्या एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये सहभागी होणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली. पुढील काही वर्षांमध्ये तिच्या खेळात सुधारणा झाली आणि 1987च्या फ्रेंच ओपनचे पहिले मोठे विजेतेपद जिंकून, तिने महिला टेनिसमधील ख्रिस एव्हर्ट आणि मार्टिना नवरातिलोवा यांचे वर्चस्व संपुष्टात आणले.
हेही वाचा – जुईलीचा चकवा… फिरून पुन्हा त्याच जागेवर!
स्टेफीचे वडील महत्त्वाकांक्षी टेनिस प्रशिक्षक होते. त्यांनीच तिला पहिल्यांदा या खेळाची ओळख करून दिली. वयाच्या चौथ्या वर्षी स्टेफीने कोर्टवर सराव करण्यास सुरुवात केली आणि वयाच्या पाचव्या वर्षी ती पहिली स्पर्धा खेळली. लवकरच तिने ज्युनियर स्पर्धांमध्ये नियमितपणे अव्वल पारितोषिक मिळवण्यास सुरुवात केली. 1982मध्ये 12 आणि 18 वर्षांखालील युरोपियन चॅम्पियनशिप देखील तिने जिंकली. 1983मध्ये पहिल्या पूर्ण व्यावसायिक वर्षाच्या सुरुवातीला, ग्राफ 13 वर्षांची होती आणि जागतिक क्रमवारीत 124व्या क्रमांकावर होती. पुढील तीन वर्षांत तिने एकही विजेतेपद जिंकले नाही, परंतु क्रमवारीत 98, 22 आणि 1985 मध्ये 6 व्या क्रमांकापर्यंत पोहोचणे असा स्टेफीचा प्रवास झाला.
स्टेफी ग्राफसाठी 1988 हे वर्ष ऐतिहासिक ठरले. त्यावर्षी तिने ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन, यूएस ओपन या स्पर्धा आणि सेऊल ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक जिंकले. एकाच कॅलेंडर वर्षात गोल्डन स्लॅम मिळवणारी ती एकमेव टेनिसपटू आहे. जागतिक क्रमवारीत तिने विक्रमी 377 आठवडे अव्वल स्थान कायम राखले. याशिवाय, विम्बल्डन आणि फ्रेंच ओपनची अनेक विजेतेपदे पटकावली. स्टेफीने 1999 मध्ये टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतर ऑक्टोबर 2001 मध्ये माजी टेनिसपटू आंद्रे आगासीबरोबर विवाह केला.
स्टेफी सलग 1987 ते 1990, 1993, 1995 आणि 1996मध्ये आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियन म्हणून निवडली गेली. याशिवाय सलग 1987 ते 1990, 1993 ते 1996मध्ये विक्रमी 8 वेळा डब्ल्यूटीए प्लेयर ऑफ द इयर म्हणून तिची निवड झाली गेली. 1986 ते 1989 आणि 1999मध्ये जर्मन स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर म्हणून देखील ती निवडली गेली. तिच्या अभूतपूर्व गोल्डन स्लॅममुळे तिला 1988चा बीबीसी ओव्हरसीज स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. 2004मध्ये, बर्लिनर टेनिस-एरिनाचे नाव ग्राफच्या सन्मानार्थ स्टेफी-ग्राफ-स्टॅडियन (Steffi Graf Stadium) असे करण्यात आले.
हेही वाचा – आम्लपित्तासाठी योगाभ्यास मार्गदर्शन
स्टेफीला 2004मध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम आणि 2008मध्ये जर्मन स्पोर्ट्स हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. 2015मध्ये तिला इंटरनॅशनल क्लबचा जीन बोरोत्रा स्पोर्ट्समॅनशिप पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2022मध्ये न्यूयॉर्कच्या कार्नेगी कॉर्पोरेशनच्या ‘ग्रेट इमिग्रंट ॲवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
याशिवाय केरळच्या आयुर्वेदाची ब्रॅंड ॲम्बेसेडर म्हणून स्टेफी ग्राफची 2015मध्ये निवड करण्यात आली होती.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


