मेष
- राशी स्वामी मंगळ 19 तारखेला कर्क राशीत आला आहे. नोकरदारांची कामे पटापट होतील, वर्चस्व राहील. मात्र, कामाच्या ठिकाणी जपून बोलावे, कोणाशीही वाद घालू नये. वरिष्ठ आणि ज्येष्ठ नागरिकांशी आदराने वागावे. व्यावसायिक वर्गाच्या दृष्टीने व्यवसाय उत्तम राहील. हितशत्रू माघार घेतील, स्पर्धक शांत बसतील. कामात गती येईल. तथापि, नोकरवर्गात अशांतता राहील. महिलांनी घरात शांतता राखण्यावर भर द्यावे, दुरुस्तीची कामे निघतील. विद्यार्थ्यांनी वाहन जपून चालवावे. एखाद्या मोर्चात सामील होण्याची शक्यता आहे.
वृषभ
- राशी स्वामी शुक्र तुळ राशीत आहे. नोकरदारांना कामासाठी प्रवासाचा योग आहे. कामात सुलभता असेल. संततीकडून शुभवार्ता समजतील. व्यावसायिक वर्गाने कुणावर अवलंबून राहू नये. एखाद्या मोठ्या स्पर्धेत भाग घेऊ शकाल आणि बक्षीस मिळवू शकाल. महिलांना माहेरी जाण्याचा योग आहे. जुन्या मैत्रिणी भेटतील. विद्यार्थ्यांनी प्रेमप्रकरणात जपून राहावे, फसवणूक होण्याची शक्यता आहे.
मिथुन
- राशी स्वामी बुध कन्या या स्वराशीत आला आहे. नोकरदारांचे नवीन घराचे स्वप्न साकार होऊ शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल, वर्चस्व राहील. व्यावसायिक वर्ग नवीन जोडधंदा सुरू करू शकेल. घरच्या लोकांचा सहभाग आणि उत्साह असेल. महिलांना अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे.
कर्क
- हा आठवडा उत्साहवर्धक आहे. नोकरदारांची कामे सुरळीत होतील. घरात नवीन वस्तूंची मनाजोगी खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. मित्र अचानक भेटतील, त्यामुळे मन प्रसन्न राहील. व्यावसायिक वर्गाला काही निर्णय अचानक घ्यावे लागतील. मार्केटवर तुमचे वर्चस्व राहील, व्यापारात वाढ होईल. महिलांना मैत्रिणी भेटतील, आठवणींना उजाळा मिळेल, त्यामुळे वेळ आनंदात जाईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल.
सिंह
- राशी स्वामी रवी कन्या राशीत आहे. नोकरदारांचे काम वाढेल. नवीन ट्रेनींना शिकवावे लागेल. घरी पाहुणे येतील. व्यावसायिक वर्गाची जुनी वादग्रस्त येणी वसूल होतील. व्यापारात नवीन करार होईल, नवीन गुंतवणूक होऊ शकेल. महिलांना उसने दिलेले पैसे परत मिळतील, वडिलांकडून लाभ होईल. विद्यार्थ्यांना छोटी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – ‘क्लिक’ झालेल्या जोडीदाराकडून नेमक्या अपेक्षा काय?
कन्या
- राशी स्वामी बुध तुमच्याच राशीत आहे. नोकरदार प्रगती करतील, प्रमोशन आणि पगारवाढीची शक्यता आहे. वाहन खरेदीचाही योग आहे. व्यावयसायिक वर्गाला चांगला फायदा होईल, नवीन गुंतवणूक करू शकाल. व्यापारवाढीसाठी परदेशात जाण्याचा योग आहे. महिला कला क्षेत्रात प्रगती करतील, सहलीचे बेत आखतील. विद्यार्थ्यांना अचानक फायदा होईल, घरातील सदस्य तुमचे कौतुक करतील, बक्षीस मिळेल.
तुळ
- राशी स्वामी शुक्र तुमच्याच राशीत आहे. नोकरदारांच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी सुलभता असेल, कामाचा ताण नसेल. सगळी कामे पटापट आणि सहजतेने होतील. व्यावसायिक वर्गाला व्यापारवृद्धीसाठी जाहिरातीवर भर द्यावा लागेल. नवीन संकल्पना अमलात आणू शकाल. व्यापारात लाभ होईल. महिला दानधर्म करू शकतील, कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी वाहन खरेदीचा योग आहे. तुम्ही कला क्षेत्रात प्रगती करू शकाल.
वृश्चिक
- राशी स्वामी मंगळ कर्क राशीत येत आहे. नोकरदारांचा भाग्योदय होईल, नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. मनाप्रमाणे गाव, नोकरी, पद, पगार मिळू शकेल, त्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. व्यावसायिक वर्गाची जुनी येणी वसूल होतील. कोर्टाची कामे मार्गी लागतील. नवीन ओळखी होतील, त्यातून फायदा मिळेल. महिलांनी संततीची काळजी घ्यावी, निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा. विद्यार्थ्यांना अभ्यासात शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल.
धनु
- राशी स्वामी गुरू कर्क राशीत आहे. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. तब्येतीच्या तक्रारी राहतील. योग्य आहार घ्या आणि नियमितपणे व्यायाम करत रहा. व्यावसायिक वर्गाला व्यवसायात अडथळे येतील, त्यातून मार्ग काढताना ताण येईल. कोणताही निर्णय घेताना जपून आणि विचारपूर्वक घ्या. महिलांना घरातील मदतनीस बायकांशी जमवून घ्यावे लागेल. विद्यार्थ्यांनी बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, विषबाधा होण्याची शक्यता आहे.
मकर
- राशी स्वामी शनी मीन राशीत आहे. नोकरदारांची सगळी कामे सुरळीत होतील. पुढील फायनान्सचे नियोजन करा; पण त्याचबरोबर गुंतवणूक विचार करून करा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे योग्य ठरेल. व्यावसायिक वर्गाच्या कर्म स्थानात शुक्र आहे, व्यापारात प्रगती होईल, चांगला फायदा होईल. व्यापारवाढीसाठी भांडवल स्वतःच उभे करू शकाल. महिलांना परदेशी प्रवासाचा योग येईल, नवीन ओळखी होतील. विद्यार्थ्यांनी कुसंगतीपासून दूर रहावे.
कुंभ
- राशी स्वामी शनी मीन राशीत वक्री आहे. कामाच्या ठिकाणी नोकरदारांना कामाचा ताण अजिबात जाणवणार नाही. कामासाठी लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाला नवीन कामे मिळतील; जरा विश्रांती घेऊन नवीन कामे जोमाने सुरू करू शकाल. सासरच्या मंडळींबरोबर महिला सहलीला जाऊ शकतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची टाळाटाळ करू नये, मेहनत करावी.
हेही वाचा – वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – आरोग्याच्या समस्या, मैत्रीची गुणवत्ता
मीन
- राशी स्वामी गुरू कर्क राशीत आहे. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल, सगळ्या कामात स्वतः लक्ष द्यावे लागेल. इतरांना मदत करताना स्वतःची कामे आधी पूर्ण करावीत. व्यावसायिक वर्गाने स्पर्धकांवर लक्ष ठेवावे, व्यावसायिक गुपिते कोणाला सांगू नयेत. नवीन स्टाफ व्यवस्थित चौकशी करून ठेवावा. महिलांनी इतरांच्या चुकीला माफ करावे, मनात जुने विचार येऊ देऊ नयेत. विद्यार्थ्यांनी मागील चुका विसरून नवीन गोष्टी आत्मसात कराव्यात, मेहनत करावी.


