दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 09 जुलै 2026; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 18 आषाढ शके 1948; तिथि : नवमी 10:37; नक्षत्र : अश्विनी 14:55;
- योग : सुकर्मा 10:11; करण : वणिज 21:31;
- सूर्य : मिथुन; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:06; सूर्यास्त : 19:20;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी (तिथीप्रमाणे)
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
अभिनेते संजीव कुमार
टीम अवांतर
आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अमीट छाप सोडणारे अभिनेते संजीव कुमार यांचा जन्म 9 जुलै 1938 रोजी सुरतमध्ये झाला. संजीव कुमार यांचं खरं नाव हरिहर जेठालाल जरीवाला होते. त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी त्यांचं कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं.
संजीव कुमार यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात स्टेज अभिनेता म्हणून केली. मुंबईतल्या आयपीटीएच्या माध्यमातून (Indian People’s Theatre Association) त्यांनी रंगमंचावर प्रवेश केला. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी आर्थर मिलरच्या ‘ऑल माय सन्स’च्या हिंदी रूपांतरित नाटकात एका म्हाताऱ्याची भूमिका केली. ए.के. हंगल दिग्दर्शित डमरू नाटकात संजीव कुमार यांनी सहा मुले असलेल्या 60 वर्षांच्या वृद्धाची भूमिका होती.
1960 मध्ये आलेल्या हम हिंदुस्तानी या चित्रपटातील छोट्या भूमिकेतून संजीव कुमार यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. मात्र त्यांचा नायक म्हणून पहिला चित्रपट निशान होता. 1968 मध्ये त्यांनी प्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांची प्रमुख भूमिका असलेल्या संघर्ष या चित्रपटात भूमिका केली. 1966 मध्ये कलापी या गुजराती चित्रपटात त्यांनी काम केले. हा चित्रपट कविता कलापी यांच्या जीवनावर आधारित होता, त्यात संजीव कुमार याची मुख्य भूमिका होती.
हेही वाचा – पावसाळा
खिलौना या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने त्यांना ओळख मिळाली. आपल्या वयापेक्षा जास्त वयाच्या भूमिका त्यांनी अनेकदा निभावल्या. नया दिन, नयी रात या चित्रपटात त्यांनी एकंदर 9 विविध पात्रे साकारली होती. ‘कोशिश’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेली मूक आणि कर्णबधिर व्यक्तीची भूमिकाही गाजली.
आपल्या फिल्मी करिअरमध्ये संजीव कुमार यांनी भूमिका स्वीकारताना केवळ मध्यवर्ती भूमिकेचा आग्रह धरला नाही; त्यांनी अनेक लहान भूमिकाही केल्यात. त्याचमुळे जया बच्चन यांच्या प्रियकराची, पतीची भूमिका साकारणाऱ्या संजीव कुमार यांनी पुढे जया यांच्या सासऱ्यांची आणि वडिलांचीही भूमिका साकारली. ‘त्रिशूल’ या चित्रपटात संजीव कुमार यांना अमिताभ आणि शशी कपूर या समकालीन अभिनेत्यांच्या पित्याची भूमिका ऑफर झाली. संजीव कुमार यांनी तीही स्वीकारली. परिचय, शोले, मौसम, आंधी यांसारख्या चित्रपटांमध्ये वयस्क आणि गंभीर भूमिका साकारणाऱ्या संजीव कुमार यांनी मनचली, सीता और गीता, अंगूर (डबल रोल), पती पत्नी और वो अशा चित्रपटांमध्ये हलक्याफुलक्या भूमिकाही साकारल्या.
1971 च्या दस्तक आणि 1973 च्या कोशिश या दोन चित्रपटांमधील भूमिकेसाठी संजीव कुमार यांना दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांना एकूण 14 वेळा फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकन मिळाले होते, त्यापैकी त्यांनी शिकार, आंधी आणि अर्जुन पंडित या चित्रपटांमधील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून तीनदा पुरस्कार जिंकला. याशिवाय कोशिश’ चित्रपटासाठी बीएफजेए (BFJA) सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचेही ते मानकरी ठरले.
6 नोव्हेंबर 1985 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागाने (India Post) 2013 मध्ये एक विशेष टपाल तिकीट जारी केले होते. 2014 रोजी सुरत महानगरपालिकेने त्यांच्या स्मरणार्थ ‘संजीव कुमार सभागृह’ उभारले आहे, ज्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी (गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री) यांच्या हस्ते करण्यात आले.
आजचे राशिभविष्य
मेष – व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही पातळ्यांवर उत्कृष्ट गोष्टी घडतील. व्यवसाय वाढवण्यासाठी गंभीर प्रयत्न कराल, ज्यासाठी तुम्हाला वित्तीय बाजारातून भरीव आर्थिक लाभ मिळेल. यामुळे आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात आणि प्रकल्पांमध्ये शिक्षकांकडून सहकार्य मिळेल.
वृषभ – तुमच्या करिअरसाठी आणि रखडलेल्या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरेल. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही जी प्रमुख कामे आणि प्रलंबित करार पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहात, ती सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. जुन्या आरोग्य समस्या आणि शारीरिक थकव्यापासून मोठा दिलासा मिळेल, ज्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक तंदुरुस्त आणि तणावमुक्त वाटेल.
मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आणि व्यग्र असेल. व्यावसायिक दृष्टिकोनातून, तुम्हाला लक्षणीय आर्थिक लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी कायम राहील. तुमचे वरिष्ठ अधिकारी एखाद्या मोठ्या प्रकल्पाबद्दल तुमच्याशी चर्चा करू शकतात. यावेळी तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.
कर्क – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीशील आणि शांततापूर्ण असेल. तुमचे करिअर आणि आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी एखाद्या मोठ्या स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याची मोठी योजना आखू शकता; बाजारातून एक अत्यंत फायदेशीर सौदा मिळण्याची शक्यता आहे.
सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आणि यशस्वी ठरेल. विशेषतः, स्थावर मालमत्ता, पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठ्या कॉर्पोरेट ब्रँड्सकडून महत्त्वपूर्ण निविदा किंवा व्यावसायिक प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची उलाढाल वाढेल. नोकरीच्या ठिकाणी व्यवस्थापन तुमच्या पदात किंवा कामाच्या ठिकाणात बदल झाल्याची घोषणा करू शकते.
कन्या – आजचा दिवस फायदेशीर ठरेल. आर्थिक वाढ बघायला मिळेल. जे तरुण बऱ्याच काळापासून चांगल्या नोकरीच्या किंवा करिअरमधील संधीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी आज यशाचे नवीन मार्ग खुले होतील, कामाच्या किंवा मोठ्या व्यावसायिक कराराच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो, जो खूप फायदेशीर ठरेल.
तुळ – आजचा दिवस उत्कृष्ट आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणारा असेल. व्यवसायात किंवा स्टार्टअपमध्ये भरीव आर्थिक लाभ मिळतील, ज्यामुळे तुम्हाला सुखसोयी आणि बाजारातून नवीन संसाधने मिळविण्यासाठी मदत होईल. जे लोक बऱ्याच काळापासून चांगले घर, भूखंड किंवा व्यावसायिक प्लॉटच्या शोधात आहेत, त्यांना मोठ्या विकासकांकडून अचानक मालमत्तेचा एखादा उत्तम सौदा मिळू शकेल.
वृश्चिक – आजचा दिवस तुमची प्रतिष्ठा वाढवणारा ठरेल. माध्यम, पत्रकारिता किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून काम करणाऱ्यांना विशेष ओळख मिळेल. जे विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंट किंवा नवीन नोकरीची वाट पाहत आहेत, त्यांना एखाद्या नामांकित आणि अग्रगण्य कंपनीकडून आकर्षक पगारासह थेट रुजू होण्याची चांगली संधी चालून येईल.
हेही वाचा – गुंतागुंतीचा माणूस…
धनु – आजचा दिवस पूर्णपणे अनुकूल आणि अपेक्षा पूर्ण करणारा असेल. तुमच्या व्यवसायासाठी किंवा स्टार्टअपसाठी तुम्हाला एक मोठी घाऊक ऑर्डर किंवा करार मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुमची उलाढाल दुप्पट होईल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा आणि पूर्णपणे सतर्क राहा. विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होतील आणि यशस्वी होतील.
मकर – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. व्यावसायिक वर्गाला वित्तीय बाजारातून लक्षणीय आर्थिक लाभ मिळतील, ज्यामुळे भांडवली गुंतवणूक अधिक मजबूत होईल. कुटुंबातील आनंदी वातावरण टिकून राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उज्ज्वल असेल, कारण त्यांना त्यांच्या प्रकल्पांसाठी वरिष्ठांकडून तसेच मार्गदर्शकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान असेल. आज तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढवेल. तुमचे ग्राहक आणि सहकारी तुमच्या कार्यशैलीने पूर्णपणे प्रभावित होतील. आज व्यवसायात प्रचंड नफा होईल, ज्यामुळे तुमची एकूण आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि स्थिर होईल.
मीन – आजचा दिवस खूप चांगला, संतुलित आणि प्रगतीशील असेल. जर तुम्ही दागिन्यांच्या व्यवसायात असाल, तर तुमच्या उत्पादनांच्या मागणीत अचानक वाढ होईल. यामुळे मोठा आर्थिक फायदा होईल, तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये लक्षणीय वाढ होईल. योग्य ठिकाणी केलेली भांडवली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात दुप्पट लाभ मिळवून देईल.


